Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Sat, 07/30/2011 - 03:22
तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ? मी असा विचार अधून मधून करत आलेलो आहे, आणि अश्या याद्या रोजनिशीत बनवल्याही आहेत, परिणामी कधीतरी का होइना, त्यातील बर्‍याचश्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्याही आहेत. उदहरणार्थ, कालिंजर चा किल्ला बघणे, लूव्र व वर्साय बघणे, विजयनगर - हंपीच्या अवशेषात पाच-सात दिवस पायी भटकणे वगैरे. या झाल्या आवडीच्या गोष्टी, परंतु अशी यादी काही कर्तव्यांच्या बाबतीत केली नाही, याचे वैषम्य वाटते. उदाहरणार्थ, मी आठ दहा वर्षांचा असल्यापासून माझी आई मला सांगायची की श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती तिला हवी होती, ती आणायला माझ्या (बाहेरगावी नोकरी करणार्‍या) मोठ्या भावांना तिने सांगून ठेवले होते, का कुणास ठाउक, आपापल्या प्रपंचात गुंतलेल्या भावांनी तशी मूर्ती कधीच आणली नाही. पुढे आईने आशा सोडून दिली असावी, कारण मी मोठा झाल्यावर तिने कधी या गोष्टीचा उल्लेख केला नाहे, मी पण (कलेच्या आणि प्रपंचाच्या नादात) लहानपणची ही गोष्ट विसरून गेलो होतो. १९९५ साली वयाच्या ८५ व्या वर्षी तिचा मृत्यु झाल्यावर मला ही गोष्ट अचानक आठवली, पण आता फार उशीर झालेला होता.... अजून सुद्धा मला कुठे श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दिसली की ती खरेदी करतो आणि अश्रू गाळतो... तुमच्या आयुष्यात्तील असे काही प्रसंग?
  • Log in or register to post comments
  • 21110 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on Sat, 07/30/2011 - 04:11

Permalink

प्रामाणिक उस्फूर्त मत

मुलीचे लग्न आणि तिचे यशस्वी बाळंतपण :प आपल्या बुवा फार इच्छा नाहीत :) पण शतावरी, बाळंतकाढा, सर्व पौष्टिक पदार्थ (हळीवाचे लाडू, खीर) , सेवा, जागरण यात कुठेही माझी दिरंगाई होऊ नये ही ईच्छा. खूप खूप स्वप्न आहे याबाबतीत. ________________________________________________ यावरून एक विनोद आठवला - भाषण चालले होते आणि वक्ता म्हणत होता "अमकं केल्याने टमकं केल्याने ९० वर्षे जगाल" कोणीतरी म्हटले "च्या** इथे ९० वर्षे जगायचे आहे कोणाला?" मागच्या बाकावरून हळूच आवाज आला - ८९ वर्षाच्या माणसाला :)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sat, 07/30/2011 - 03:43

Permalink

माझ्या दोन इच्छा!

तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ?
१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी. २. संपुर्ण अमेरिका बघायचीय.. वरील क्लॉज १ मध्ये नमुद केलेल्या व्यकीत्सोबत ;) दॅट्स ईट! - इंट्या, वय वर्षे २२, मुंबई.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 07/30/2011 - 04:14

In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही

Permalink

.

सविस्तर प्रतीसाद नंतर दिल्या जाइल.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 07/30/2011 - 14:48

In reply to . by आत्मशून्य

Permalink

+१

इंट्याच्या लखलखत्या बाशिंगाचा प्रखर उजेड डोळ्यावर आल्याने आधीक लिहण्यास असमर्थ असेच ना?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sun, 07/31/2011 - 22:36

In reply to +१ by सहज

Permalink

काय राव

इंट्याच्या गुढग्यावरील बाशिंगाचा उजेड तुमच्या डोळ्यावर आला म्हणजे इंट्या काय १४-१५ फूट उंच आहे की तुम्ही 'देढफुट्या' क्याटेगरीत आहात?
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 08/01/2011 - 07:58

In reply to काय राव by रमताराम

Permalink

आले आजोबा

प्रकाशाची तिरिप खालुन वर येउ शकत नाही काय? आणि हो, आजोबा तुमच्या पुढे मी कायम घुटनो के बल + नतमस्तक असतो त्यामुळे तुमच्यापुढे देढफुट्याच.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 07/30/2011 - 15:23

In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही

Permalink

१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा:

१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी. २. संपुर्ण अमेरिका बघायचीय.. वरील क्लॉज १ मध्ये नमुद केलेल्या व्यकीत्सोबत दॅट्स ईट! बोंबला, म्हणजे ती व्यक्ती (हा शब्द बरोबर आहे, इंट्याने टाइपलेला नाही) मुलगीच असायलाच हवीच असा तुझा आग्रह नाही तर, आणि तुझी वयाची अट पाहुनच राखी रामदेवबाबांच्या मागे लागली वाटतं, नाहीतर...
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 07/31/2011 - 09:31

In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही

Permalink

काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय

काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय बाळा?
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Sun, 07/31/2011 - 16:01

In reply to काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय by रेवती

Permalink

काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय

काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय बाळा?
ह्म्म्म जोरदार... सुरु आहे अभ्यास रेवती ताई.. पुढच्या वर्षी साधारण जुलय महिन्यापर्यंत आर्टीकलशिप सुरु होईल! :) - (प्रगतीपथावर स्वार) बाळ इंटेश. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Tue, 08/02/2011 - 21:27

In reply to काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय by इंटरनेटस्नेही

Permalink

दुरुस्ती

Although the tongue weights very little, yet very few people are able to hold it!
"Weights" नाही बे! "Weighs". तसेच, एकदा "Although" म्हटल्यावर "yet" अनावश्यक आणि अस्थानी आहे. शिवाय, शेवटचे उद्गारचिन्ह अतिरेकी आहे. पूर्णविराम बरा. Although the tongue weighs very little, very few people are able to hold it. किंवा, The tongue weighs very little. Yet, very few people are able to hold it.
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on Tue, 08/02/2011 - 16:04

In reply to माझ्या दोन इच्छा! by इंटरनेटस्नेही

Permalink

>>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो)

>>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी.<<< मायला, याच्या प्रेमात पडायला पण अटी आहेत......
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 08/02/2011 - 17:01

In reply to >>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) by मनराव

Permalink

अरे मन्या, आजकाल प्रेम फार

अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे! आणि त्याचे वय बघ, तुझे वय बघ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 08/02/2011 - 18:41

In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by अन्या दातार

Permalink

अरे मन्या, आजकाल प्रेम फार

अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे! हो ना रे अन्या थेअरी कमी अन प्रॅक्टीकल्स च जास्त होतात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 08/02/2011 - 18:45

In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by विजुभाऊ

Permalink

अरे मन्या, आजकाल प्रेम फार

अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे! हो ना रे अन्या थेअरी कमी अन प्रॅक्टीकल्स च जास्त होतात
विजुभाऊ.. थिअरी वाचुण वाचुण / प्रॅक्टीकल बघुण बघुण क्ंटाळा आला.. आता एकदा तरी प्रॅक्टीकल कधी करतोय असं झालंय मला!
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 08/02/2011 - 19:03

In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by इंटरनेटस्नेही

Permalink

पण प्रॅक्टीस केली आहेस का कधी ? की डायरेक्ट डकवर जायचा विचार आहे

डू प्राक्टीस.. बी अ म्यान... कॉझ प्राक्टीस म्येक मॅन परफ्येक्ट........
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 08/03/2011 - 10:58

In reply to पण प्रॅक्टीस केली आहेस का कधी ? की डायरेक्ट डकवर जायचा विचार आहे by आत्मशून्य

Permalink

काय वांझोटे रिप्लाय

काय वांझोटे रिप्लाय देताय... शोभतंय का आपल्याला... @इंट्या :: बाळा, आत्ताच कुठे घराबाहेर पडाया शिकला आहेस... उगाच त्रागा का करुन घेतोयस.. जीव सांभाळ... आजकाल फक्त मुलीच असुरक्षित नाहीयेत... (याचे २ अर्थ होतात जो काढायचा तो काढा....)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 08/02/2011 - 19:06

In reply to अरे मन्या, आजकाल प्रेम फार by इंटरनेटस्नेही

Permalink

बाबूजी जरा धीरे चलो

>>आता एकदा तरी प्रॅक्टीकल कधी करतोय असं झालंय मला! त्यासाठी प्रेमच करावे लागते असं नाही हो! ;) (सूचक) अन्या.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 08/02/2011 - 21:11

In reply to बाबूजी जरा धीरे चलो by अन्या दातार

Permalink

त्यासाठी प्रेमच करावे लागते

त्यासाठी प्रेमच करावे लागते असं नाही हो!
याला उत्तर दिले तर माझा (एकुलता एक) आयडी बॉल्क होईल, म्हणून व्यनीतुन बोलु.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 08/02/2011 - 18:42

In reply to >>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) by मनराव

Permalink

णुसत्या प्रेमाणे पोट भरत

णुसत्या प्रेमाणे पोट भरत णाही! पुरुषा सोबत स्त्रीनेही त्याच्या बरोबरीने कमावतं असायलाच हवं! - (व्यावहारिक) इंटरनेटप्रेमी!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sat, 07/30/2011 - 04:58

Permalink

दसविदानीया

दसविदानीया बघितलात काय हो इतक्यात ? असो. मला आयुष्य 'जगायचे' आहे. - (आयुष्य 'जगण्याची' ओढ असलेला ) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/30/2011 - 05:28

Permalink

फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा

फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा डायव्हिंग, केव्ह डायव्हिंग (http://en.wikipedia.org/wiki/Cave_diving), सोलो स्कायडाईव्हिंग करायचे आहे. २४ इंच किंवा त्यापेक्षा मोठा स्वतःचा टेलिस्कोप घ्यायचा आहे. अंतराळात जायचं आहे... ही लांबच्यालांब लिस्ट टाईपण्यात फार वेळ घालवायला नको...
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 07/30/2011 - 13:54

In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by Nile

Permalink

क्लास

डायविंग साठी क्लास लाव रे निळ्या आधी.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 07/31/2011 - 04:42

In reply to क्लास by विनायक प्रभू

Permalink

सहमत आहे.

पण काही गोष्टी अनुभवाने शिकण्यातच जास्त मजा असतो ना मास्तर? मग! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 07/31/2011 - 10:15

In reply to सहमत आहे. by Nile

Permalink

अच्छा, म्हणजे सोलोच शिकायचे

अच्छा, म्हणजे सोलोच शिकायचे आहे हे पक्के आहे तर.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 07/31/2011 - 11:27

In reply to अच्छा, म्हणजे सोलोच शिकायचे by पाषाणभेद

Permalink

हॅ हॅ हॅ

'काही' गोष्टी सोलो करण्यातच मजा असते, हे तुम्हा सोबतीची वाट बघणार्‍यांना काय कळणार म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Sat, 07/30/2011 - 22:05

In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by Nile

Permalink

फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा

फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा डायव्हिंग, केव्ह डायव्हिंग
हा ताजा खुमार "झिन्दगी ना मिलेगी दोबारा"चा हँगओव्हर आहे असे वाटत नाही काय? निरिक्षण नोंदवले... बाकी बघा... आपल्याला तर बाबा इटलीत जाउन व्हेनिस, झेकमध्ये प्राग अन अम्रिकेत कोलोराडो व मायामी ह्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा आहे........ करायचंच म्हंजे... मरण मायबापाच्या चरणी यावं ही ई. प्रा......
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 07/31/2011 - 04:45

In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by वपाडाव

Permalink

मोठे व्हा.

१. तो सिनेमा पाहिलेला नाही. २. सिनेमाच्यापुढे विचार करत चला कधीतरी.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 08/01/2011 - 19:52

In reply to फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा by वपाडाव

Permalink

प्रकाटाआ

.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 07/30/2011 - 07:11

Permalink

भुताला भेटायचंय

मला माझ्यापेक्षा अधिक भयंकर भुताला भेटायचं आहे. चेटूक शिकायचं आहे. एखाद्या सैतानाला वश करायचं आहे. एखाद्यावर करणी करायची आहे, चेटूक करून पाहायचं आहे. (कोणी वॉलंटियर असतील तर कळवा प्लीज) परकाया प्रवेश करायचा आहे. प्लँचेट करायचं आहे. ऑटोमॅटिक रायटींगची कला शिकून घ्यायची आहे. बस एवढंच! ऑन ए सिरिअस नोट, मला इजिप्तला जायचं आहे. ममीज आणि पिरॅमिड्स बघायला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Sat, 07/30/2011 - 22:10

In reply to भुताला भेटायचंय by प्रियाली

Permalink

एखाद्यावर करणी करायची आहे...

एखाद्यावर करणी करायची आहे...
काय म्हंता ??? म्हंजे आम्हाला चुकीचे स्टॅट्स तर नाहीना कळाले.... का तुम्हाला सुद्धा गजनीची जडण झालीये ???...
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 07/31/2011 - 04:42

In reply to एखाद्यावर करणी करायची आहे... by वपाडाव

Permalink

चुजापकाटाआ.

.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Sat, 07/30/2011 - 08:16

Permalink

बघूया

विचार बरेच आहेत.... उदा:
  1. १० डु आय डी काढून मि पा वर दंगा करायचाय
  2. मेगा बायटी प्रतिसाद टंकायचेत
  3. द्विशतकी धागे काढायचेत
  4. किलोने कौल टाकायचेत
काय होतय ते बघूया सध्या तरी प्रतिसाद मात्र राहून खूष आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Sat, 07/30/2011 - 08:19

Permalink

मला एक खुप मोठ्ठा मोठ्ठा (न

मला एक खुप मोठ्ठा मोठ्ठा (न डिलिट करता येन्यासारखा) लेख लिहायचा आहे. अ‍ॅट्लिस्ट एक खुप मोठ्ठा प्रतिसाद द्यायचा आहे. बाकि सगळ्या इच्छा पुर्न झालेल्या आहेत. I am completely happy man.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 07/30/2011 - 09:33

Permalink

काय मालक.. जिलबीचा साचा

काय मालक.. जिलबीचा साचा घेतलाय का नवीन... नाय मजबूत जिलब्या पाडता आहात हल्ली , म्हणून विचारले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sat, 07/30/2011 - 14:12

In reply to काय मालक.. जिलबीचा साचा by स्पा

Permalink

जौ दे रे स्पा (जाऊ दे नाही,

जौ दे रे स्पा (जाऊ दे नाही, जौ दे). मिपा हे केवळ आपलेच बागडण्याचे कुरण आहे आणि इतरांनी मात्र सांभाळून वागावे, असे मानून इतरांवर टीका करत सुटणारे नग आधीच आहेत मिपा वर. तू कशाला त्या दिशेने जातोस ?? बाकी कुणी काय करावे..निरीक्षण.... वगैरे नेहमीचे.
  • Log in or register to post comments

Submitted by पराग पाटील on Sat, 07/30/2011 - 09:48

Permalink

सेवा

मजा तर आहेच, पण त्याशिवाय गरजू लो़कांना मदत करायला आवडेल. जालावर अशा बर्‍याच संधी दिसतात, पण प्रत्यक्ष म्हणजे स्वत: तिथे राहून पैशाची, अन्नाची किंवा रोजगार पूरवण्यासाठी संस्था काढायची इच्छा आहे. कमीत कमी प्रयत्न नक्की करेन. अवांतर - Bucket List / दसविदानिया ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Sat, 07/30/2011 - 10:28

Permalink

मला

एक माणूस म्हणून जगायचे आहे. :) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 07/30/2011 - 11:07

Permalink

जगी सर्व सुखी असा कोण आहे ?

जगी सर्व सुखी असा कोण आहे ? या समर्थांच्या प्रश्नाला ' मी' असं उत्तर द्यायचं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sat, 07/30/2011 - 11:08

In reply to जगी सर्व सुखी असा कोण आहे ? by ५० फक्त

Permalink

:-)

सदरे दान करणार की बोली लावायची?
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Mon, 08/01/2011 - 02:32

In reply to :-) by सहज

Permalink

ईबे

.
  • Log in or register to post comments

Submitted by पात्र on Sat, 07/30/2011 - 11:13

Permalink

लग्न

आत्ता तरि लग्न करायचे ठरवले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Sat, 07/30/2011 - 11:41

Permalink

मला एक सुंदरसा अबलख इराणी

मला एक सुंदरसा अबलख इराणी घोडा घेऊन शेतात रहायचं आहे. बस्स एवढंच.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 07/31/2011 - 10:17

In reply to मला एक सुंदरसा अबलख इराणी by यकु

Permalink

इराणी?? अरबी म्हणायचे आहे

इराणी?? अरबी म्हणायचे आहे काय? आमच्याकडे बरेच अरबी घोडे आहेत. पण ते आमच्याच उपयोगाचे आहे. वेळप्रसंगी वापरावे लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 10/29/2013 - 13:53

In reply to मला एक सुंदरसा अबलख इराणी by यकु

Permalink

:(

:( एवढ तरी करायचा !!
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Sat, 07/30/2011 - 13:39

Permalink

माझी लिस्टः १. विम्बल्डन

माझी लिस्टः १. विम्बल्डन फायनल बघायची आहे. २. मुंबईत स्वतःचे घर घ्यायचे आहे :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Sat, 07/30/2011 - 13:58

Permalink

बस फक्त जगायचे आहे.

बस फक्त जगायचे आहे. “पिघले नीलम सा बहता हुआ यह समाँ नीली नीली सी ख़ामोशियाँ ना कहीं हैं ज़मीन ना कहीं आसमान सरसराती हुयी टहनियां, पत्तियाँ कह रही हैं की बस एक तुम हों यहाँ सिर्फ मैं हूँ मेरी सांसें हैं और मेरी धडकनें ऐसी गहराइयाँ ऐसी तनहाइयाँ और मैं सिर्फ मैं अपने होने पे मुझको यकीन आ गया”
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Sat, 07/30/2011 - 22:14

In reply to बस फक्त जगायचे आहे. by आत्मशून्य

Permalink

वाह...वाह...मित्रा तु तर

वाह...वाह...मित्रा तु तर डुंबलास की रे चक्क चक्क......
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 08/01/2011 - 19:00

In reply to वाह...वाह...मित्रा तु तर by वपाडाव

Permalink

:)

.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Sat, 07/30/2011 - 14:34

Permalink

माझी इच्छा

पाण्याची भिती बाजूला सारून पोहणं शिकायचंय आणि मग मालदिवला जावून कमीतकमी १ आठवडा रहायचंय.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 07/30/2011 - 15:28

In reply to माझी इच्छा by स्मिता.

Permalink

पाणी बाजुला सारायला शिकलात ना

पाणी बाजुला सारायला शिकलात ना का लगेच येतं पोहायला, आपण कामं करायला कसं शिकतो तसंच, आलेली कामं दुस-याकडं सारुन देता येणं यालाच काम करता येणं म्हणतात, तसंच सेम टु सेम, एकदम सोपं. मी तर पुढच्या दोन वर्षात मालदिवला नोकरी हुडकतोय, घरचे पैसे घालुन कोण जाणार फिरायला. एक बुडांतर शंका - मालदिवला पोहत पोहत जाणार का ? कुठपासुन ? रुट कोणता आहे ?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com