Skip to main content

तुम्हाला उर्वरित आयुष्यात काय काय 'करायचेच' आहे?

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 30/07/2011 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ? मी असा विचार अधून मधून करत आलेलो आहे, आणि अश्या याद्या रोजनिशीत बनवल्याही आहेत, परिणामी कधीतरी का होइना, त्यातील बर्‍याचश्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्याही आहेत. उदहरणार्थ, कालिंजर चा किल्ला बघणे, लूव्र व वर्साय बघणे, विजयनगर - हंपीच्या अवशेषात पाच-सात दिवस पायी भटकणे वगैरे. या झाल्या आवडीच्या गोष्टी, परंतु अशी यादी काही कर्तव्यांच्या बाबतीत केली नाही, याचे वैषम्य वाटते. उदाहरणार्थ, मी आठ दहा वर्षांचा असल्यापासून माझी आई मला सांगायची की श्रीकृष्णाची एक सुंदर मूर्ती तिला हवी होती, ती आणायला माझ्या (बाहेरगावी नोकरी करणार्‍या) मोठ्या भावांना तिने सांगून ठेवले होते, का कुणास ठाउक, आपापल्या प्रपंचात गुंतलेल्या भावांनी तशी मूर्ती कधीच आणली नाही. पुढे आईने आशा सोडून दिली असावी, कारण मी मोठा झाल्यावर तिने कधी या गोष्टीचा उल्लेख केला नाहे, मी पण (कलेच्या आणि प्रपंचाच्या नादात) लहानपणची ही गोष्ट विसरून गेलो होतो. १९९५ साली वयाच्या ८५ व्या वर्षी तिचा मृत्यु झाल्यावर मला ही गोष्ट अचानक आठवली, पण आता फार उशीर झालेला होता.... अजून सुद्धा मला कुठे श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दिसली की ती खरेदी करतो आणि अश्रू गाळतो... तुमच्या आयुष्यात्तील असे काही प्रसंग?

वाचने 21225
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

मुलीचे लग्न आणि तिचे यशस्वी बाळंतपण :प आपल्या बुवा फार इच्छा नाहीत :) पण शतावरी, बाळंतकाढा, सर्व पौष्टिक पदार्थ (हळीवाचे लाडू, खीर) , सेवा, जागरण यात कुठेही माझी दिरंगाई होऊ नये ही ईच्छा. खूप खूप स्वप्न आहे याबाबतीत. ________________________________________________ यावरून एक विनोद आठवला - भाषण चालले होते आणि वक्ता म्हणत होता "अमकं केल्याने टमकं केल्याने ९० वर्षे जगाल" कोणीतरी म्हटले "च्या** इथे ९० वर्षे जगायचे आहे कोणाला?" मागच्या बाकावरून हळूच आवाज आला - ८९ वर्षाच्या माणसाला :)

तुम्ही वीस वर्षांचे असा किंवा सत्तरचे, जे काही उर्वरित आयुष्य असेल, त्यात काय काय करायचेच आहे ?
१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी. २. संपुर्ण अमेरिका बघायचीय.. वरील क्लॉज १ मध्ये नमुद केलेल्या व्यकीत्सोबत ;) दॅट्स ईट! - इंट्या, वय वर्षे २२, मुंबई.

In reply to by आत्मशून्य

इंट्याच्या लखलखत्या बाशिंगाचा प्रखर उजेड डोळ्यावर आल्याने आधीक लिहण्यास असमर्थ असेच ना?

In reply to by सहज

इंट्याच्या गुढग्यावरील बाशिंगाचा उजेड तुमच्या डोळ्यावर आला म्हणजे इंट्या काय १४-१५ फूट उंच आहे की तुम्ही 'देढफुट्या' क्याटेगरीत आहात?

In reply to by रमताराम

प्रकाशाची तिरिप खालुन वर येउ शकत नाही काय? आणि हो, आजोबा तुमच्या पुढे मी कायम घुटनो के बल + नतमस्तक असतो त्यामुळे तुमच्यापुढे देढफुट्याच.

In reply to by इंटरनेटस्नेही

१. प्रेमात पडायचंय, अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी. २. संपुर्ण अमेरिका बघायचीय.. वरील क्लॉज १ मध्ये नमुद केलेल्या व्यकीत्सोबत दॅट्स ईट! बोंबला, म्हणजे ती व्यक्ती (हा शब्द बरोबर आहे, इंट्याने टाइपलेला नाही) मुलगीच असायलाच हवीच असा तुझा आग्रह नाही तर, आणि तुझी वयाची अट पाहुनच राखी रामदेवबाबांच्या मागे लागली वाटतं, नाहीतर...

In reply to by रेवती

काय इंटेश, अभ्यास कसा चाल्लाय बाळा?
ह्म्म्म जोरदार... सुरु आहे अभ्यास रेवती ताई.. पुढच्या वर्षी साधारण जुलय महिन्यापर्यंत आर्टीकलशिप सुरु होईल! :) - (प्रगतीपथावर स्वार) बाळ इंटेश. ;)

In reply to by इंटरनेटस्नेही

Although the tongue weights very little, yet very few people are able to hold it!
"Weights" नाही बे! "Weighs". तसेच, एकदा "Although" म्हटल्यावर "yet" अनावश्यक आणि अस्थानी आहे. शिवाय, शेवटचे उद्गारचिन्ह अतिरेकी आहे. पूर्णविराम बरा. Although the tongue weighs very little, very few people are able to hold it. किंवा, The tongue weighs very little. Yet, very few people are able to hold it.

In reply to by इंटरनेटस्नेही

>>अपेक्षा: उजळवर्ण, (शक्यतो) स्वजातीय, वय २० ते २५, पद्व्युत्तर शिक्षण आवश्यक, वेल्सेट्ल्ड, चांगली कौटुंबिक पार्श्वभुमी. मायला, याच्या प्रेमात पडायला पण अटी आहेत......

In reply to by अन्या दातार

अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे! हो ना रे अन्या थेअरी कमी अन प्रॅक्टीकल्स च जास्त होतात ;)

In reply to by विजुभाऊ

अरे मन्या, आजकाल प्रेम फार प्रॅक्टीकल होत चाललंय रे! हो ना रे अन्या थेअरी कमी अन प्रॅक्टीकल्स च जास्त होतात
विजुभाऊ.. थिअरी वाचुण वाचुण / प्रॅक्टीकल बघुण बघुण क्ंटाळा आला.. आता एकदा तरी प्रॅक्टीकल कधी करतोय असं झालंय मला!

In reply to by इंटरनेटस्नेही

डू प्राक्टीस.. बी अ म्यान... कॉझ प्राक्टीस म्येक मॅन परफ्येक्ट........

In reply to by आत्मशून्य

काय वांझोटे रिप्लाय देताय... शोभतंय का आपल्याला... @इंट्या :: बाळा, आत्ताच कुठे घराबाहेर पडाया शिकला आहेस... उगाच त्रागा का करुन घेतोयस.. जीव सांभाळ... आजकाल फक्त मुलीच असुरक्षित नाहीयेत... (याचे २ अर्थ होतात जो काढायचा तो काढा....)

In reply to by इंटरनेटस्नेही

>>आता एकदा तरी प्रॅक्टीकल कधी करतोय असं झालंय मला! त्यासाठी प्रेमच करावे लागते असं नाही हो! ;) (सूचक) अन्या.

In reply to by अन्या दातार

त्यासाठी प्रेमच करावे लागते असं नाही हो!
याला उत्तर दिले तर माझा (एकुलता एक) आयडी बॉल्क होईल, म्हणून व्यनीतुन बोलु.. ;)

In reply to by मनराव

णुसत्या प्रेमाणे पोट भरत णाही! पुरुषा सोबत स्त्रीनेही त्याच्या बरोबरीने कमावतं असायलाच हवं! - (व्यावहारिक) इंटरनेटप्रेमी!

दसविदानीया बघितलात काय हो इतक्यात ? असो. मला आयुष्य 'जगायचे' आहे. - (आयुष्य 'जगण्याची' ओढ असलेला ) सोकाजी

फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा डायव्हिंग, केव्ह डायव्हिंग (http://en.wikipedia.org/wiki/Cave_diving), सोलो स्कायडाईव्हिंग करायचे आहे. २४ इंच किंवा त्यापेक्षा मोठा स्वतःचा टेलिस्कोप घ्यायचा आहे. अंतराळात जायचं आहे... ही लांबच्यालांब लिस्ट टाईपण्यात फार वेळ घालवायला नको...

In reply to by विनायक प्रभू

पण काही गोष्टी अनुभवाने शिकण्यातच जास्त मजा असतो ना मास्तर? मग! ;-)

In reply to by Nile

फ्लाईंग शिकायचे आहे, स्कूबा डायव्हिंग, केव्ह डायव्हिंग
हा ताजा खुमार "झिन्दगी ना मिलेगी दोबारा"चा हँगओव्हर आहे असे वाटत नाही काय? निरिक्षण नोंदवले... बाकी बघा... आपल्याला तर बाबा इटलीत जाउन व्हेनिस, झेकमध्ये प्राग अन अम्रिकेत कोलोराडो व मायामी ह्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा आहे........ करायचंच म्हंजे... मरण मायबापाच्या चरणी यावं ही ई. प्रा......

मला माझ्यापेक्षा अधिक भयंकर भुताला भेटायचं आहे. चेटूक शिकायचं आहे. एखाद्या सैतानाला वश करायचं आहे. एखाद्यावर करणी करायची आहे, चेटूक करून पाहायचं आहे. (कोणी वॉलंटियर असतील तर कळवा प्लीज) परकाया प्रवेश करायचा आहे. प्लँचेट करायचं आहे. ऑटोमॅटिक रायटींगची कला शिकून घ्यायची आहे. बस एवढंच! ऑन ए सिरिअस नोट, मला इजिप्तला जायचं आहे. ममीज आणि पिरॅमिड्स बघायला. ;)

In reply to by प्रियाली

एखाद्यावर करणी करायची आहे...
काय म्हंता ??? म्हंजे आम्हाला चुकीचे स्टॅट्स तर नाहीना कळाले.... का तुम्हाला सुद्धा गजनीची जडण झालीये ???...

विचार बरेच आहेत.... उदा:
  1. १० डु आय डी काढून मि पा वर दंगा करायचाय
  2. मेगा बायटी प्रतिसाद टंकायचेत
  3. द्विशतकी धागे काढायचेत
  4. किलोने कौल टाकायचेत
काय होतय ते बघूया सध्या तरी प्रतिसाद मात्र राहून खूष आहे :)

मला एक खुप मोठ्ठा मोठ्ठा (न डिलिट करता येन्यासारखा) लेख लिहायचा आहे. अ‍ॅट्लिस्ट एक खुप मोठ्ठा प्रतिसाद द्यायचा आहे. बाकि सगळ्या इच्छा पुर्न झालेल्या आहेत. I am completely happy man.

काय मालक.. जिलबीचा साचा घेतलाय का नवीन... नाय मजबूत जिलब्या पाडता आहात हल्ली , म्हणून विचारले ;)

In reply to by स्पा

जौ दे रे स्पा (जाऊ दे नाही, जौ दे). मिपा हे केवळ आपलेच बागडण्याचे कुरण आहे आणि इतरांनी मात्र सांभाळून वागावे, असे मानून इतरांवर टीका करत सुटणारे नग आधीच आहेत मिपा वर. तू कशाला त्या दिशेने जातोस ?? बाकी कुणी काय करावे..निरीक्षण.... वगैरे नेहमीचे.

मजा तर आहेच, पण त्याशिवाय गरजू लो़कांना मदत करायला आवडेल. जालावर अशा बर्‍याच संधी दिसतात, पण प्रत्यक्ष म्हणजे स्वत: तिथे राहून पैशाची, अन्नाची किंवा रोजगार पूरवण्यासाठी संस्था काढायची इच्छा आहे. कमीत कमी प्रयत्न नक्की करेन. अवांतर - Bucket List / दसविदानिया ची आठवण झाली.

एक माणूस म्हणून जगायचे आहे. :) -सूर्यपुत्र.

आत्ता तरि लग्न करायचे ठरवले आहे

In reply to by यकु

इराणी?? अरबी म्हणायचे आहे काय? आमच्याकडे बरेच अरबी घोडे आहेत. पण ते आमच्याच उपयोगाचे आहे. वेळप्रसंगी वापरावे लागतात.

बस फक्त जगायचे आहे. “पिघले नीलम सा बहता हुआ यह समाँ नीली नीली सी ख़ामोशियाँ ना कहीं हैं ज़मीन ना कहीं आसमान सरसराती हुयी टहनियां, पत्तियाँ कह रही हैं की बस एक तुम हों यहाँ सिर्फ मैं हूँ मेरी सांसें हैं और मेरी धडकनें ऐसी गहराइयाँ ऐसी तनहाइयाँ और मैं सिर्फ मैं अपने होने पे मुझको यकीन आ गया”

पाण्याची भिती बाजूला सारून पोहणं शिकायचंय आणि मग मालदिवला जावून कमीतकमी १ आठवडा रहायचंय.

In reply to by स्मिता.

पाणी बाजुला सारायला शिकलात ना का लगेच येतं पोहायला, आपण कामं करायला कसं शिकतो तसंच, आलेली कामं दुस-याकडं सारुन देता येणं यालाच काम करता येणं म्हणतात, तसंच सेम टु सेम, एकदम सोपं. मी तर पुढच्या दोन वर्षात मालदिवला नोकरी हुडकतोय, घरचे पैसे घालुन कोण जाणार फिरायला. एक बुडांतर शंका - मालदिवला पोहत पोहत जाणार का ? कुठपासुन ? रुट कोणता आहे ?

In reply to by स्मिता.

मालदीवपर्यंत पोहत जाणार ठीक आहे पण मुंबईपासून पोहत जाणार की कन्याकुमारीपासून?

अस वाटते कि एक तरी मंत्री आणि दहशदवादि ठार करावा अशी खूप इच्छा आहे .

सर्व मिपाकराना भेटावेसे वाटते

हजारों ख्वाईशें ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले. कधी तरी या इच्छांवर विजय मिळवलाच पाहिजे.

स्विस ब्यांकेत प्रायव्हेट/सिक्रेट खातं उघडायचं आहे.

In reply to by नितिन थत्ते

आणि हे जाहीररीत्या सांगत आहात. धन्य आहे. (अवांतर: स्विस ब्यांकेत 'ओपन सीक्रेट' अशी काही खात्याची क्याटेगरी असते काय?)

In reply to by रामदास

हिना रब्बाणी सोबत कराचीला कट्टा जमवायचा आहे. आयला... ;) खी खी खी... काकांशी पूर्णपणे सहमत. ;) काही पण म्हणा बाई आहे मात्र टच्च मसाला ! ;) संदर्भ :--- मुत्सद्देगिरीला आभा सौंदर्याची! http://alturl.com/ae6ix

In reply to by मदनबाण

रामदास काका, तुम्ही एकटेच जा हो कराची कट्ट्याला. मबांना घेऊन जाऊ नका. :) अवांतरः जसा पुण्यात सिक्रेट रेव्ह पार्टी कट्टा झाला, तसा झाला तर उत्तमच, फक्त मला बोलवायला विसरु नका म्हणजे झाले ;)

In reply to by मदनबाण

खी खी खी... काकांशी पूर्णपणे सहमत.
'खी खी खी'? अ‍ॅज़ इन, 'KHI KHI KHI'??? एवढे ऑब्सेशन बरे नव्हे... तै एवढ्या आवडल्या वाटते?

विश्वनाथन आनंद बरोबर बुद्धीबळ खेळायचं आहे. सचिनला प्रत्यक्ष फलंदाजी करताना बघायचं आहे. अजून इच्छा आहेत पण आत्ता ह्या दोन चटकन आठवल्या! ;) -इच्छाधारी रंगा

कल्पना चांगली आहे. पण भरपूर मोठी यादी आहे. काय काय लिहू? इजिप्त, पिरॅमिड बघायचेच आहेत. नाईल नदी. किलीमांजारो. आणि वाळवंटे बघायची आहेत. एकदा तरी स्कूबा डायविंग करायचेच आहे. कुंभाराच्या चाकावर मातीचे भांडे तयार करायचे आहे. इ. इ.

माझ्या आईला कृष्णाची मूर्ती कधीच मिळाली नाही, या प्रकारचे... पश्चात्तापदग्ध अनुभव नाहीत का कुणाचे ? आता इतक्या काळानंतर सुद्धा माझे मन मला खाते...की आपण मिळवते झाल्यावर का नाही लक्षात ठेऊन आईची ही लहानशी इच्छा पूर्ण केली ?

In reply to by चित्रगुप्त

तुम्ही म्हणताय थोडा तसाच अनुभव माझा पण आहे. मी बंगलोरला असताना बाळकृष्णाची पितळेची मूर्ती आणली होती. ती आमच्या घरी देवघरात ठेवली होती. काही दिवस माझी आजी राहायला आलेली असताना तिला ती मूर्ती फार आवडली. "पुढच्या वेळी जाशील तेव्हा माझ्यासाठीपण आण हो नक्की" असं तिने बोलून पण दाखवलं. पण पुन्हा तिथे जाणं झालंच नाही. आज आजी नाही. आजीने माझ्याकडे कधीच काही मागितलं नव्हतं. एकदाच मागितलं पण मी ते पूर्ण करू शकलो नाही.

In reply to by चित्रगुप्त

माझी पोस्ट निगेटीव्ह समजली जाइल म्हणून मी सांगायला थोडा कचरत होतो पण लेखकाला असेच अनूभव अभिप्रेत होते ज्यामधे काहीतरी कायमचं निसटून गेल्याची जाणीव वा खंत आहे.... याचा अंदाज आला होता. असे काही अनूभव नक्किच आहेत पण ते उघड करायचं धाडस नाही.... :(

In reply to by चित्रगुप्त

अगदी पश्चात्तापदग्ध वैगरे नाही, पण अशा आहेत खर्‍या एक-दोन गोष्टी ज्या आता पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. असो.

हा धागा सुरु करण्या मागील काहीसा हेतु हाही होता की जसे आम्ही आपल्या तरुणपणीची स्वप्ने पूर्ण करण्यात इतके दंग राहिलो, की वृद्ध आई वडिलांची लहानशी इच्छा पूरी करण्याचे भान राहिले नाही, तसे तरूण मिपाकरांचे होउ नये ...