✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे ?

च
चित्रगुप्त यांनी
गुरुवार, 07/28/2011 - 14:29  ·  लेख
लेख
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे. या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज? हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52133 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

निषेध!

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 17:58 नवीन
रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय?
राम परस्त्रीच्या पदराला हात घालतो असे तर सुचवत नाही ना तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

धरणी माता म्हणजे सर्वांची माता. परस्त्री नव्हे.

चित्रगुप्त
गुरुवार, 07/28/2011 - 18:08 नवीन
धरणी माता म्हणजे सर्वांची माता. परस्त्री नव्हे. परंतू हे रामाला ती धरणी माता आहे, हे कळले नसावे, त्याला ती मारीचासारखी कुणी मायावी राक्षसीण वाटलेली चेहर्‍याच्या अविर्भावावरून वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

परस्त्रीच की मग

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 18:13 नवीन
परंतू हे रामाला ती धरणी माता आहे, हे कळले नसावे, त्याला ती मारीचासारखी कुणी मायावी राक्षसीण वाटलेली चेहर्‍याच्या अविर्भावावरून वाटते.
माता असल्याचे कळले नसेल तर परस्त्रीच की मग! राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का? विचारा आमच्या श्रामो, घासुगुर्जी, बिका वगैरेंना. बायदवे, रामाने आदल्या दिवशी महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण प्रकरण वाचले असण्याची शक्यता कितपत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

माझ्यामते

चतुरंग
गुरुवार, 07/28/2011 - 18:22 नवीन
रामायण हा मूवी आधी आला आणि महाभारत हा सीक्वेल आहे त्यामुळे रामाने ते बघितले असण्याची शक्यता कमी! ;) रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

राम* बहुधा सासूबाईंच्या

नितिन थत्ते
गुरुवार, 07/28/2011 - 18:23 नवीन
राम* बहुधा सासूबाईंच्या पदराला धरून "मी पण येतो" म्हणाला असावा. तेव्हा धरणीमातेने "अरे हाआआआड" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल. *येथे रघुकुलतिलक, अहल्ल्योद्धारक भगवान श्री राम असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

चित्र एक दम क्लास आहे

अजातशत्रु
Fri, 07/29/2011 - 16:36 नवीन
राम* बहुधा सासूबाईंच्या पदराला धरून "मी पण येतो" म्हणाला असावा. तेव्हा धरणीमातेने "अरे हाआआआड" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल. *येथे रघुकुलतिलक, अहल्ल्योद्धारक भगवान श्री राम असे वाचावे.
किंचित बदल "अरे हाआआआड मेल्या" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल. बाकि प्रतिसादहि भन्नाटच :) थत्ते साहेब आणि पंगा यांचे प्रतिसाद विशेष भावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

माहितीची देवाणघेवाण

श्रावण मोडक
गुरुवार, 07/28/2011 - 18:50 नवीन
राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का?
माहिती नाही. पण (किमान काही) स्त्रिया या राक्षसिणी असतात हे मात्र माहिती आहे. ;) उदा:.... जाऊ द्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

पूर्ण सहमत आहे. पुरावा :

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/29/2011 - 00:36 नवीन
पूर्ण सहमत आहे. पुरावा : http://www.misalpav.com/user/13/guestbook और मिलॉर्ड, सदस्य क्रमांकपरभी गौर किया जाए! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

चित्र कविता

राजेश घासकडवी
गुरुवार, 07/28/2011 - 20:26 नवीन
मूळ चित्राविषयी थोडं - या चित्रात एक अनोखी दुर्घटना होत असताना सगळे आपापल्या खुर्च्यांत वगैरे बसून धिक्कार, दुःख वगैरे व्यक्त करत आहेत. सीतेला सोडवायला कोणी जात नाही. चित्रात कोणी कविता करताना दिसत नाहीत, कदाचित राजा रविवर्माची ही चित्रमय कविता असेल. '*र्यहीन विचारजंती कुठचे!' असं रविवर्म्याला म्हणायचं असावं. (चित्रात राम असल्यामुळे कवितेतला शब्द वापरणं मला उचित वाटत नाही)
राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का? विचारा आमच्या श्रामो, घासुगुर्जी, बिका वगैरेंना.
राक्षसिणी या स्त्रियाच असतात. त्यांना स्त्रियांविषयीचे सगळे (सोयीचे) कायदे लागू होतात. उदाहरणार्थ त्यांच्या वयाची जाहीर चर्चा वगैरे केली तर त्यांना राग येतो. फक्त सामान्य स्त्रीप्रमाणे अबला नसल्यामुळे त्या दात, नखं, शस्त्रं वगैरे पाजळून अंगावर धावून येतात. कधीकधी त्या मूळ दोषी माणसाला सोडून निरपराधालाच फाडून खातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

*र्यहीन विचारजंती कुठचे!

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 23:27 नवीन
*र्यहीन विचारजंती कुठचे!
साध्या सोप्या मराठीत *ढ असे म्हणा ना! शेवटी सर्व भारतभूमीची लेकरे. मी सुद्धा * वापरून प्रश्न सोडवला.
कधीकधी त्या मूळ दोषी माणसाला सोडून निरपराधालाच फाडून खातात.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस... आय मीन राक्षसीण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ब्रह्म राक्षसीण?

अनिरुद्ध प
गुरुवार, 08/08/2013 - 19:00 नवीन
सुद्धा असतेका आत्मारामला विचारले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

युरेका!

पंगा
गुरुवार, 07/28/2011 - 19:51 नवीन
धरणी माता म्हणजे सर्वांची माता.
म्हणजे सीतेचीपण माता आणि रामाचीपण माताच. म्हणजे रामाची सीता कोण? "रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

>>"रामाची सीता कोण - आई की

नितिन थत्ते
गुरुवार, 07/28/2011 - 22:28 नवीन
>>"रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!! (जैन की) कुठच्यातरी रामायणात राम आणि सीता बहीण भाऊच असतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हम्म्म्म......

पंगा
गुरुवार, 07/28/2011 - 22:31 नवीन
राजा रविवर्मा जैन असावा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

याचे

अनिरुद्ध प
गुरुवार, 08/08/2013 - 19:10 नवीन
योग्य उत्तर विजुभाऊ देवु शकतिल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

राजा रवीवर्मा किंवा राम जैन

विजुभाऊ
Fri, 08/09/2013 - 14:25 नवीन
राजा रवीवर्मा किंवा राम जैन असण्याशी माझा काय संबन्ध येणार, राजरवीवर्मा किंवा राम जैन होता किंवा नाही हे भाजप सांगु शकेल जैन डायरीत त्याबाबतीत काही लिहीले असेल तर ते त्यानाच माहीत असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

मालवणी नाटकाचे नाव..

योगप्रभू
गुरुवार, 07/28/2011 - 23:04 नवीन
रामायण न वाचताही केवळ मच्छिंद्र काबळींचे 'राम तुझी सीता माऊली' हे नाटक बघून सनातन प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हे राम..

गवि
गुरुवार, 07/28/2011 - 18:01 नवीन
रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय? हे राम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

माझ्या

अनिरुद्ध प
गुरुवार, 08/08/2013 - 16:47 नवीन
द्रुष्टिला तरि तो सितामाईचाच पदर दिसतो आहे बाकी चित्रकाराच्या नजरेला काय दिसत असेल हे 'चित्रगुप्तच' जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अधिक निरिक्षणाअंती

गवि
गुरुवार, 07/28/2011 - 18:04 नवीन
जमीन (दुभंगलेला भाग पाहता) अ‍ॅल्युमिनियम पत्र्याची म्हणजे साधारणतः एसटीच्या साध्या बिनआराम बसमधली फ्लोअर असते तशी वाटतेय.
  • Log in or register to post comments

सीतामाई बरेच दिवस घरी

सूड
गुरुवार, 07/28/2011 - 18:18 नवीन
सीतामाई बरेच दिवस घरी नसल्यामुळे फरशी पुसली नसावी कोणी, त्यामुळे रंग तसा दिसत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वरची सर्व उत्तरे चुक आहेत,हा

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/28/2011 - 18:19 नवीन
वरची सर्व उत्तरे चुक आहेत, हा एका हिंदी सिनेमातील प्रसंग आहे. ती जमीनीवर बसलेली बाई आपल्या सिनेमाच्या नायकाची बहीण आहे. आणि सिहासनावर बसलेला अमरीश पुरी किंवा शक्ती कपुर आहे. मागे अमरीश पुरीचा सज्जन भाउ परेश रावल आहे. बाजुला मुनी अनुपमखेर बसलेले आहेत. त्या बाईच्या मागची स्त्री तीची आई आहे. दोन लहान मुले ही आपल्या हीरोचीच भावंड आहेत ज्यांना अमरीशपुरीने बाळं असताना पळवुन आणले आहे आणि त्यांच्या कडुन तो बुरे काम करवुन घेतो. त्यांना आत्ताच समजले आहे की ह्या बायका म्हणजे आपली बहीण आणि आई आहेत. बाई अमरीश पुरीला सांगत आहे " मुझपर दया करो मुझपे ऐसा जुलुम मत करो मै तुम्हारे बच्चेकी मा बनने वाली हु" अमरीश पुरी म्हणतो "क्या सबुत है तुम्हारे पास ईस बात का. मुझे नही पता तुम्हारे पेट मे कीसका पाप पल रहा है" त्यावर खवळुन ती म्हणते "कमीने मेरे भाई को ईस बात का पता चला तो वो तुम्हारा साम्राज्य नष्ट कर देगा" त्यावर तीची आई तीला मागे ओढत आहे आणि म्हणते आहे "बेटी यहासे चलो ईस पापी को तेरी दया नही आयेगी. हम जैसे गरीबोंका कोई वाली नही होता." आता या नंतर सनी देवल भिंत फोडुन आत येणार आहे आणि अमरीशला धु धु धुवुन काढणार आहे. तो पर्यंत मा बेटी रेल्वे रुळांवर जाउन बसणार आहेत त्यांच्या मागे दोन छोटे भाउ "मा रुक जाओ दीदी तुम्हे पिताजीकी कसम" असे म्हणत धावणार आहेत. एकी कडे सनी दुश्मन चा खातमा करत आहे आणि दुसर्‍या फ्रेम मधे, समोरुन कोळश्याचे ईंजीन लावलेली रेल्वे धडधडत येणार आणि काही कळायच्या आत सनी मधे उडी मारुन ती हातानी आडवणार. मग सगळ्या परीवाराचे मिळुन एक गाणे होणार. " आंधी आये या तुफान ये प्यार ना होगा कम, एक दुसरेसे जुदा कभी नही होंगे हम. बम चीकी बम चीकी बम" अनुपम खेरची मुलगी डिंपल कुठुन तरी धावत येउन सनीला मिठी मारते आणि मग ते सगळे मिळुन परत वरचे गाणे उच्च रवात गाउ लागतात. तेव्हड्यात द एन्ड ची पाटी येते.
  • Log in or register to post comments

हा हा हा !! ,

सूड
गुरुवार, 07/28/2011 - 18:23 नवीन
हा हा हा !! :D, :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पिच्चर पायलेला आहे कदाचित.

नरेशकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 18:55 नवीन
पिच्चर पायलेला आहे कदाचित. नाव काय आहे पिच्चरचे ? कदाचित HD विथ इंग्लिश सबटायटल पाहिला आहे. ३D गॉगल घालुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मिपाकरांच्या

चतुरंग
गुरुवार, 07/28/2011 - 18:43 नवीन
प्रतिभेला आलेला अनावर बहर वाचून रविवर्म्याने 'धरणीमाते पोटात घे' असं सेल्फ पोर्ट्रेट केलं असतं! ;) -ख्वाजा रंगकर्मा
  • Log in or register to post comments

चतुरंग- सहमत.

चिंतामणी
Sun, 07/31/2011 - 14:13 नवीन
अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

_/\_

धमाल मुलगा
गुरुवार, 07/28/2011 - 19:17 नवीन
अनुदिनी तापे, तापलो रामराया......... -धम्या बजरंगी.
  • Log in or register to post comments

हे होम मिनिस्टर च्या शूटिंग च्या वेळचे चित्र आहे.

चित्रगुप्त
गुरुवार, 07/28/2011 - 19:40 नवीन
रूप संगम कडून मिळालेली पैठणी नेसून वैनी आल्या आहेत, तेवढ्यात शूटिंग साठी घाइघाइत केलेला सेट मोडून वैन्या खाली पडु लागल्या आहेत, आदेश भावजी व सिताराम सोसायटी, डोंबिवली (पूर्व) चे शेजारी आश्चर्य चकित होउन बघत आहेत... या खास एपिडोस साठी सर्वांनी ऐतिहासिक वस्त्राप्रवरणे नेसली आहेत.
  • Log in or register to post comments

गुगली....

गणपा
गुरुवार, 07/28/2011 - 19:58 नवीन
अच्छा हे अस उत्तर अपेक्षित आहे होय. आम्ही फुकाचे पहिला नंबर लावत प्रामाणिक पणे प्रश्नपत्रिका सोडवायला बसलो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा प्रसंग जर सीतेला धरणीमाता

विजुभाऊ
गुरुवार, 07/28/2011 - 20:41 नवीन
हा प्रसंग जर सीतेला धरणीमाता पोटात घेते असा असेल तर त्यात बर्‍याच चुका आहेत. पुराणात वरील प्रसंग हा रामाच्या दरबारात घडलेला नाही. तर तो ऋषींच्या आश्रमात झालेला आहे. या प्रसंगात सीतेच्या अंगावर आश्रमातील वस्त्रे हवीत. रामाने त्याच्या अंगात चिलखत घातले असेल तर ते पुर्ण हवे . ब्लाऊज सारखे पोट उघडे दाखवणारे नको रामाच्या हातात तलवार आहे ती युरोपीयन बनावटीप्रमाणे सरळ आहे. रामायणात ज्या तलवारी आहेत त्या पुढे पाते रुंद असलेल्या आहेत. रामाच्या राजवाड्याबाहेर शिवसेनेचे झेंडे का लावलेले आहेत? दरबारात बसलेल्या रामाने पायात काहीच घातलेले नाही. पायाखालीदेखील काहीच नाही.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ हा वर्गातील हुशार मुलगा, हे जाहीर करतो..

योगप्रभू
गुरुवार, 07/28/2011 - 22:57 नवीन
चित्रातील ढोबळ चुका सर्वाधिक ओळखल्याबद्दल विजुभाऊला मी वर्गातील हुशार मुलगा म्हणून जाहीर करतो. :) -शेणकुटे गुरुजी- ........................ १) रामायणकाळात नऊवारी साडी व बाह्यांचे ब्लाऊज ही स्त्रियांची वेशभूषा नव्हती. छातीवर कंचुकी व त्यावर एक ओढणीसारखे वस्त्र (अधरीय) असे. कमरेखालचे वस्त्र उत्तरीय म्हणून ओळखले जाई. कमरेवर बांधायचे जे कटिवस्त्र असे त्याला अंशुक म्हणत. पुरुष कंचुकी वगळता हाच पोशाख करत. २) प्रसंग वाल्मिकी मुनींच्या आश्रमात घडला. तेव्हा सीतेच्या अंगावर आश्रमकन्येचा पोशाख होता. राजस्त्रियांची वस्त्रे नव्हती. ३) राम व कृष्ण यांना दाढी व मिशा नव्हत्या आणि त्यांचा शरीरवर्ण गौर नसून निळा-सावळा होता. ४) राम हा कायम कोदंडधारी (धनुर्धर) होता. त्याच्या हाती तलवार नसे. चित्रात दाखवलेली तलवार युरोपिअन धाटणीची धोप (सरळ पात्याची) आहे. भारतीय योद्धे नेहमी टोकाला बाकदार तलवारी वापरत. पुढे रुंद होणार्‍या तलवारी राक्षस वापरत. पुन्हा या चित्रातील तलवारीच्या लांबीचे प्रपोर्शन गंडले आहे. ५) भगव्या झेंड्याबाबत कुणा राजकीय पक्षाचे नाव न घेता आपण चित्रकाराला संशयाचा फायदा देऊ. इंद्राचा ध्वज हा 'झर्झर दंड' म्हणून ओळखला जाई. त्याचा रंग भगवा होता. रामायणात इंद्राचा उल्लेख आहे. (युद्धात इंद्रानेच आपला ध्वजांकित 'जैत्ररथ' व 'मातली' हा सारथी रामाला लढण्यासाठी दिला होता.) त्यामुळे भगवा झेंडा मान्य करुया. ६) खिडकीतून बाहेर दिसणारा राजप्रासादाचा कडेचा भाग चक्क टॉवरसारखा वाटतोय. टॉवर ही गॉथिक इमारतशैली आहे. ती युरोपिअनांच्या वसाहतीनंतरच आपल्याकडे रुढ झाली. (पोर्तुगीजांची गोव्यातील जुनी चर्च). रामायणकाळात अशा सरळसोट इमारती नसत. प्रासादांचे सौंध, गवाक्ष यावरही शिल्पकाम आणि नक्षी असे. चितोडच्या विजयस्तंभावरुन साधारण कल्पना येते. ७) चित्रात दाखवलेला रामाचा दरबार नसून महाल असावा. कारण दरबारात चक्रवर्ती राजा इतरांपेक्षा उच्चासनावर बसत असे. ८) सीता भूमातेच्या मांडीवर बसून जमिनीखाली गेली. त्या प्रसंगात भूमाता पाटावर बसून वर आली नव्हती तर रत्नजडित सिंहासनावर बसल्याचे वर्णन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

युरोपियन

स्मिता.
Fri, 07/29/2011 - 14:01 नवीन
हे एकच चित्र नाही तर चित्रगुप्तांनी दिलेल्या दुव्यावरचे सर्वच चित्रे युरोपियन शैलीतली वाटतात. बहुतेक चित्रातल्या स्त्रियांचे वस्त्र, हावभाव हे पाश्चात्य पद्धतीचे आहेत. हे चित्र बघा: Image removed. या प्रकारची चित्रे भारतीय शैलीची नसून (नऊवारी साडी वगळता) युरोपियन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

स्मिता! अगदी बरोबर

योगप्रभू
Fri, 07/29/2011 - 16:17 नवीन
या चित्रांवर युरोपिअन छाप पडण्यामागे एक कारण असेही असू शकेल की मॉडेल व्ह्यू मनात आणताना रविवर्मा पूर्णपणे प्राचीन काळात शिरले नसावेत. त्यांनी त्यांच्या हयातीतला काळच समोर ठेवला असावा. म्हणजेच रामाचा दरबार चितारताना त्यांनी ज्या राजाच्या दरबाराचे चित्र प्रत्यक्ष पाहिले होते तो जर अठराव्या शतकातील असेल तर तपशिलाच्या अशा चुका दिसणारच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

शिवाय आत्ता जे आपण पहात आहोत

नितिन थत्ते
Fri, 07/29/2011 - 16:32 नवीन
शिवाय आत्ता जे आपण पहात आहोत ते हजारो वर्षापासून (किंवा कलियुगाच्या सुरुवातीपासून) तस्सेच्या तस्से चालत आले आहे अशी समजूतही असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

रविवर्मा ची चित्रे

चित्रगुप्त
Fri, 07/29/2011 - 17:34 नवीन
रविवर्मा ची चित्रे: http://www.cyberkerala.com/rajaravivarma/ बाळासाहेब पंत प्रतिनिधी (१८६८ - १९५१) यांनी असे लिहून ठेवले आहे, की रविवर्मा (१८४८ - १९०६) ची चित्रे मुख्यत्वेकरून त्याचा लहान भाउ सी. राजा राजा वर्मा हा चित्रित करत असे. रविवर्मा फक्त शेवटी चेहर्‍यावरील भाव वगैरेत थोडेबहुत काम करून सही करायचा. बाळासाहेब पंत प्रतिनिधी देखील चित्रकार होते, त्यांचे एक चित्रः Image removed. दुवा: http://www.kamat.com/kalranga/mythology/ramayan/30031.htm पाश्चिमात्य चित्रकारांच्या मागे जशी एक समृद्ध् परंपरा होती, तशी या भावांना लाभली नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मॉडेल व्ह्यू

स्मिता.
Fri, 07/29/2011 - 17:45 नवीन
आपण म्हणता तसेच असावे असे वाटते. त्यातल्या त्यात खाली चित्रगुप्तांनी लिहिलंय की रवी वर्म्याची चित्रे त्याचा भाऊ काढत असे. मला ही चित्रे एखाद्या भारतीयाने पाश्चात्य पद्धतीचा अभ्यास करून काढलेल्या चित्रापेक्षा पाश्चात्य माणसाने भारतीय राहणीमान आणि कथांचा अभ्यास करून काढलेली वाटतात. रवी वर्म्याचा भाऊ युरोपात वाढला होता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

हे हे हे. रा.स्व. संघीचे नशीब

चिंतामणी
Sun, 07/31/2011 - 14:15 नवीन
रामाच्या राजवाड्याबाहेर शिवसेनेचे झेंडे का लावलेले आहेत? हे हे हे. रा.स्व. संघीचे नशीब. शिवसेनेवरच थांबले विजुभौ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हं.. राम, सीता, वगैरे विषय टर

श्रीरंग
गुरुवार, 07/28/2011 - 21:57 नवीन
हं.. राम, सीता, वगैरे विषय टर उडवण्यासाठी, टिंगल करण्यासाठी अगदी सेफ आहेत. चालू द्या....
  • Log in or register to post comments

१+

पप्पुपेजर
Fri, 07/29/2011 - 13:21 नवीन
हेच म्हणतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

दौपदी वस्त्रहरण

ऋषिकेश
गुरुवार, 07/28/2011 - 22:22 नवीन
जर चित्रात दोन मुले नसती तर हे दौपदी वस्त्रहरण वाटले होते...(वस्त्रहरण करताना दोन मुले नसावीत असा अंदाज आहे असल्यास कल्पना नाही.. तसेही एकाने डोळे झाकले आहेतच :प) बाकी राजाच्या मागे कोण उभा आहे? त्याने कानात फूल का अडकवले आहे?
  • Log in or register to post comments

मला राहून राहून एक प्रश्न

कुळाचा_दीप
गुरुवार, 07/28/2011 - 22:46 नवीन
मला राहून राहून एक प्रश्न पडतो ... सत्य युगातले , त्रेता युगातले लोक दाढी कशी करत असतील? इव्हान भगवान शंकर पण दाढी करतात ... वैदिक काळात लोकांना दाढी करण्याची कला अवगत होती का ?
  • Log in or register to post comments

ज्या लोकांकडे मान कापायला

मराठे
गुरुवार, 07/28/2011 - 22:51 नवीन
ज्या लोकांकडे मान कापायला तलवारी आहेत त्यांच्या कडे केस कापायला वस्तरे नसतील ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुळाचा_दीप

नसावेत कदाचित !

कुळाचा_दीप
गुरुवार, 07/28/2011 - 22:55 नवीन
नसावेत कदाचित !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

अध्यात्ममार्ग किती अवघड आहे

बॅटमॅन
Fri, 08/09/2013 - 12:26 नवीन
अध्यात्ममार्ग किती अवघड आहे हे सांगताना कठोपनिषदात खालील श्लोक येतो.
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्ग पथस्तत्‌ कवयो वदन्ति |
अर्थः क्षुर-म्हंजेच वस्तर्‍याच्या धारेवरून चालणे जितके अवघड तितकाच अध्यात्ममार्ग अवघड आहे. ज्या अर्थी वस्तर्‍याची उपमा उपनिषद काळात दिली गेलीये त्याअर्थी दाढी करायला न्हाव्यांकडे वस्तरे तेव्हापासून असावेत हे स्पष्टच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुळाचा_दीप

महाभारतात कणिक नीतीत पण

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 08/12/2013 - 10:41 नवीन
महाभारतात कणिक नीतीत पण वस्तऱ्याच्या उल्लेख आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रोचक! हे माहिती नव्हते.

बॅटमॅन
Mon, 08/12/2013 - 12:43 नवीन
रोचक! हे माहिती नव्हते. धन्यवाद माहितीकरिता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चित्र कुठले आहे ते माहिती

मृत्युन्जय
गुरुवार, 07/28/2011 - 22:47 नवीन
चित्र कुठले आहे ते माहिती नाही पणा रद्दड आहे ते कळाले. चित्रातल्या सर्व व्यक्तींनी विशेषतः बायकांनी सर्व कपडे घातले आहेत. अलंकारांवरुन बायका हिंदु वाटतात. तरी पुर्ण कपडे म्हणाजे तर चित्र अजिबातच वास्तवदर्शी आणि कलात्मक नाही हे कळते. असल्या फालतु चित्रांवर कशापाई वेळ वाया घालवायचा?
  • Log in or register to post comments

हे घ्या

मी_ओंकार
Fri, 07/29/2011 - 00:55 नवीन
वास्तवदर्शी चित्र . बहुदा सत्यवतीचे आहे. अर्थात ती काही देवी नाही. त्यामुळे चालून जाईल. Image removed. दुवा: त्याच अल्बम मधील चित्र ५८ https://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#5367627736101638370
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

?

पंगा
Fri, 07/29/2011 - 01:09 नवीन
सत्यवती चामड्याचा पट्टा बांधून आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार

अरसिक किती हा शेमेला

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/29/2011 - 01:13 नवीन
अरसिक किती हा शेमेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा