✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे ?

च
चित्रगुप्त यांनी
गुरुवार, 07/28/2011 - 14:29  ·  लेख
लेख
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे. या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज? हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52133 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

राजा रवी वर्मा यांचे चित्र

गणपा
गुरुवार, 07/28/2011 - 14:44 नवीन
राजा रवी वर्मा यांचे चित्र वाटतेय. धरणी दुभंगुन सिता जाये राम कुश-लव हताश पाहे.
  • Log in or register to post comments

खालील सगळी चर्चा वाचल्यानंतर

विजुभाऊ
गुरुवार, 08/08/2013 - 18:53 नवीन
खालील सगळी चर्चा वाचल्यानंतर रामालासुद्धा " हे राम" असे म्हणावेसे वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 14:36 नवीन
अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे सोपे तुम्हाल महिती नाही ? सितेला तिची माता पृथ्वी आपल्यासोबत घेउन चालली आहे. :) अर्थात सिता भूमीच्या उदरी गडप झाली तो प्रसंग.
  • Log in or register to post comments

+१००

गवि
गुरुवार, 07/28/2011 - 14:42 नवीन
अगदी शंभर टक्के. आधी अंधुकपणामुळे लक्षात येत नव्हतं. आता पराभाऊंनी सांगितल्यावर पुन्हा पाहिलं. एकदम पटतंय. अर्थातच ते आसनारुढ श्रीयुत हे श्रीरामचंद्र असणार. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र, "हे काय झालं बुवा आता वेगळंच काहीतरी.." अशा अर्थाचे काहीसे अनपेक्षित दृश्य पहात असल्यासारखे वाटताहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सीता

स्मिता.
गुरुवार, 07/28/2011 - 15:02 नवीन
जमिनीवरच्या आकृती पाहून ती सीता आणि धरणीमाता असावी हे पटतंय पण सिंहासनावर बसलेली व्यक्ती राम असावी असं वाटत नाही. म्हणजे रामाची जी प्रतिमा मनात असते ती चित्रातल्या रामशी अजिबात जुळत नाही. (पराने सांगितलं म्हणून हा विचार तरी आला, नाहीतर एखाद्या राजाच्या दरबारात एक स्त्री न्याय मागायला आलीये आणि तिचा आवेग अनावर झाल्याने दुसरी तिला सावरत आहे असे वाटले :P ) सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक

गवि
गुरुवार, 07/28/2011 - 15:04 नवीन
तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक उभा दिसतोय. त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..) आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

कपाळावर हात का मारला

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 15:07 नवीन
कपाळावर हात का मारला असावा
गवि बहुदा त्याने भावनातिरेकाने आपले डोळे हे दृष्य बघवत नसल्याने झाकल्यासारखे वाटत आहेत. @स्मिता एकामागे एक अशी दोन बालके उभी आहेतसे वाटते. आणि शेजारीन दोन ॠषींपैकी एक वशिष्ठ असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

राम तर राम

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 15:09 नवीन
आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
राम तर राम त्याच्या शेजारचा एक ऋषीही तसंच विचारतो आहे. मला आपलं रामभाऊ आणि ते ऋषी सीतेला "वॉ,सप?" असे विचारत असून मागे तोंड लपवणारा कुश "ऑव! शक्स!" असं म्हणतोय असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

=)) =)) कदाचित तो 'अहो

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 15:12 नवीन
=)) =)) कदाचित तो 'अहो सासुबाई दिवाळसणाचे आता काय? आणि हे काय सासरचे दागीने पण घेऊन चाललात का काय?' असे देखील विचारत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

डायल्याग..

पल्लवी
Fri, 07/29/2011 - 17:11 नवीन
बाबा राम : एवेढेसे काहीतरी बोललो तर लगेच माहेरी ??!! धन्य आहे ! सीतामाय : बसा आता बडवत. हूं... चल गं आई.. कार्टं १ : मम्म्म्मी , मी पण येउ ? कार्टं २ ( डोळ्यांवर हात ठेवलेलं ) : बोंबलला... आता नाश्ता, टिफीन बोंबलला.. मागे उभे असलेले भाउजी : आयला नेहेमीचं झालय राव. ३ चा शो गेला आता चुलीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे काय? सासूबाईंचे आणी त्या

किसन शिंदे
Fri, 07/29/2011 - 17:29 नवीन
हे काय? सासूबाईंचे आणी त्या दोन संधीसाधूंचे डॉयलॉग कुठेयत? कि त्यांना फक्त मुकाभिनय करायचाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पल्लवी

आत्ता बघितल्यावर मला

गणपा
गुरुवार, 07/28/2011 - 15:11 नवीन
आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
अरे हे काय अक्रित घडतय असा भाव आहे. अस आपलं माझ मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मागचा बालक

स्मिता.
गुरुवार, 07/28/2011 - 17:57 नवीन
त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..) हो, तो मागचा डोळे झाकणारा बालक प्रतिक्रिया टाकल्यावर दिसला. लक्ष्मणाच्या चेहर्‍यावरील भाव इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत. राम तसेच ऋषी आश्चर्यचकीत आहेत तर लक्ष्मण चिंतामग्न वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्लीवलेस ब्लाऊज

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 15:04 नवीन
रामाने स्लीवलेस ब्लाऊजसारखे काहीतरी घातले आहे हे ही पाहिलेत का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

मी पाहिलं

स्मिता.
गुरुवार, 07/28/2011 - 17:53 नवीन
मी पाहिलं ते स्लीवलेस ब्लाऊजसारखं काहीतरी... मला वाटलं लहानपणीचं चिलखत असावं :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

असहमत

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 17:57 नवीन
रामबाप्पांना चिलखत घालून राजसभेत सिंहासनावर बसायची गरज ती काय? मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

तरी

स्मिता.
गुरुवार, 07/28/2011 - 18:01 नवीन
मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं. ते ब्लाउज तोकडं असलं तरी जरा 'विचित्रच' तोकडं आहे. पण वरच्या तिन्ही तैना नविन फॅशन म्हणून चालून जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हो चुक समजुन अनदेखा किया था

मुलूखावेगळी
गुरुवार, 07/28/2011 - 18:24 नवीन
हो चुक समजुन अनदेखा किया था
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

काहीतरीच काय?

वपाडाव
गुरुवार, 07/28/2011 - 15:24 नवीन
तिचा आवेग अनावर झाल्याने दुसरी तिला सावरत आहे असे वाटले
पण त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरचे भाव आवेगाचे वाटत नाहीत.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

आवेग आवरलाय

स्मिता.
गुरुवार, 07/28/2011 - 18:05 नवीन
मागच्या स्त्रिच्या सावरण्यामुळे आधीचा दु:खावेग आवरला गेलाय पण राजाकडे प्रश्नार्थक कटाक्ष आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

>>सिंहासनावरील राजा (राम) आणि

मनराव
गुरुवार, 07/28/2011 - 17:06 नवीन
>>सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली.<<< कुणाचं कुठे लक्ष जाईल काही सांगता येत नाय.!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

(No subject)

मनिम्याऊ
गुरुवार, 08/08/2013 - 15:28 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

शस्त्र बदल

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/28/2011 - 16:52 नवीन
पराशेठ रामाने धनुष्याचा त्याग करुन तलवार का बरे घेतली असवी? की या चित्राद्वारे शिवसेनेचे समर्थन केल्याचा आरोप होऊ नये म्हणुन चित्रकाराने शस्त्र बदलले असावे? एवढा लोचा होत असताना रामभक्त हनुमान दिसत नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 16:58 नवीन
अहो सर्वसाक्षी काका, ते म्हणतात ना 'लैला को देखो मजनु की नजरसे.' तसे आहे ते ;) इस प्रसंग को देखो राजा रविवर्मा की नजरसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

गणपा पराशी सहमत

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 14:40 नवीन
सीतेला धरणीमाता सोबत घेऊन जाते तो प्रसंग आहे पण साफ गंडला आहे कारण सीता एकदा त्याग केल्यावर अयोध्येच्या राजसिंहासनापर्यंत पोहोचली नव्हती असे वाटते. अर्थातच, राजा रविवर्मा चित्रकार असतील तर असे गंडलेपण चालून जाण्यासारखे आहे. नऊवारी साडी नेसणारी आणि शिवलेले फिटींगचे ब्लाऊज घालणारी सीता चालते तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर काय मोठे त्यात? ;) चित्र यंडुगुंडू भाषेतील असले तरी गूगल ट्रान्सलेटमध्ये रवि वर्मा की पेंटिंग्स असेच लिहून आले.
  • Log in or register to post comments

तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 14:42 नवीन
तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर काय मोठे त्यात?
घ्या ! अहो ती लोकसभेपर्यंत सुद्धा पोचली कधीच ;) अयोध्येचे काय घेऊन बसला आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हेहेहेहे!

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 14:45 नवीन
अहो ती लोकसभेपर्यंत सुद्धा पोचली कधीच अयोध्येचे काय घेऊन बसला आहात ?
हाहाहाहा! मस्त! धरणीमाते आत घे गं - मला नाही पराला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 14:50 नवीन
=)) =)) तसे घडले तर मग तिथुन ऑनलाईन येईन तेंव्हा मला 'बळी' असे सदस्यनाव बदलून मिळावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हा हा हा !!

अर्धवटराव
गुरुवार, 07/28/2011 - 23:30 नवीन
म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांचे कान पिळायला मोकळे का पराशेठ??? (वामन) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तसे ते आत्ताही मोकळे आहेत,

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 07/29/2011 - 10:12 नवीन
तसे ते आत्ताही मोकळे आहेत, सर्वांचे कान पिळायला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/29/2011 - 13:24 नवीन
म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांचे कान पिळायला मोकळे का पराशेठ???
काय हे ? माझ्या सारखा साधा सरळ माणूस कशाला उगाच कोणाचे कान वैग्रे पिळायला जाईल अर्धवटशेठ ? तुमचे एक आपले काहीतरीच बॉ. आता पुन्हा स्वतःला वामन म्हणवताय म्हणजे आम्ही तुमच्यापासून लांबच थांबायला पाहीजे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अहो

अनिरुद्ध प
गुरुवार, 08/08/2013 - 16:41 नवीन
बळि तो कान पिळी असे म्हणायचे असेल त्यान्ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हे हे हे हे

निवेदिता-ताई
Fri, 07/29/2011 - 08:02 नवीन
प्रियाली.........सही ग ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

सीता

कच्चा पापड पक्…
गुरुवार, 07/28/2011 - 15:06 नवीन
सीता पण रामाकडे कशी रागाने बघते आहे.
  • Log in or register to post comments

राग? बहुतेक व्याकुळता.

गणपा
गुरुवार, 07/28/2011 - 15:11 नवीन
राग? बहुतेक व्याकुळता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्चा पापड पक्का पापड

वरील सर्व प्रतिक्रीया टाकणा-यांना

चिंतामणी
गुरुवार, 07/28/2011 - 15:19 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

पण धरणीमातेचा चेहरा कष्टी

सूड
गुरुवार, 07/28/2011 - 15:20 नवीन
पण धरणीमातेचा चेहरा कष्टी वाटतोय. 'चल, येतेच आहे का आता ?' अशा तर्‍हेचा काहीसा.
  • Log in or register to post comments

या चित्रातील इतर ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा...

योगप्रभू
गुरुवार, 07/28/2011 - 15:29 नवीन
मुलांनो, वरील चित्र बारकाईने बघा आणि त्यातील अन्य ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा बरे.. (नऊवारी साडी आणि फिटिंग्जचे ब्लाऊज त्या काळात नव्हते, ही एक चूक ग्राह्य धरण्यात आली आहे.) -शेणकुटे गुरुजी-
  • Log in or register to post comments

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा

मुलूखावेगळी
गुरुवार, 07/28/2011 - 15:37 नवीन
१. रामानी जोडे काढुन सैरावैरा टाकलेत २.धरणीमाता सीतेला आत घ्यायला खुप वर आलीये धरनीच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा

नरेशकुमार
गुरुवार, 07/28/2011 - 19:01 नवीन
१. रामानी जोडे काढुन सैरावैरा टाकलेत
त्याला नविन शुज विकत घ्यायचे असतील.
२.धरणीमाता सीतेला आत घ्यायला खुप वर आलीये धरनीच्या
लिफ्ट काम करत असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

टाईल्स

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 15:40 नवीन
धरणीमाता टाईल्स फोडून वर आली आहे. कोण रे तो कॉन्ट्रॅक्टर इतकं बेक्कार काम करणारा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

सीता भूमीत गडप होत आहे

नितिन थत्ते
गुरुवार, 07/28/2011 - 15:30 नवीन
सीता भूमीत गडप होत आहे म्हणावे तर तिच्या कमरेभोवती कुणाचे हात आहेत? मला हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग वाटतो. द्रौपदीच्या कमरेभोवती दु:शासनाचे हात आहेत. सिंहासनावर बसलेला दुर्योधन आहे. राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का?
  • Log in or register to post comments

दुवा.

गणपा
गुरुवार, 07/28/2011 - 15:34 नवीन
दुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

राम किंवा दुर्योधन कमरेला

कच्चा पापड पक्…
गुरुवार, 07/28/2011 - 18:02 नवीन
राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का? आत्तापर्यत राम नेहमी धनुष्य घेतलेलाच बघितला आहे. धरुनी शर धनुष्य दीर्घ हस्ती सुरम्य नेसूनी पीतांबर पद्मसनी सुहास्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

धन्यवाद चित्रगुप्त!!!!!

यकु
गुरुवार, 07/28/2011 - 15:50 नवीन
चित्रगुप्तांनी दिलेल्या लिंकमुळे खूप मस्त चित्रे बघायला मिळाली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. चित्राची शैली खूपच ओळखीची वाटते कारण लहानपणापासून रविवर्म्याची छापील चित्रे अनेक वाड्यांमध्ये बैठकीत, ढाळजात लावलेली पाहिली आहेत.. आमच्याही घरी बरीच चित्रे होती...
  • Log in or register to post comments

आमच्याही घरी बरीच चित्रे

वपाडाव
गुरुवार, 07/28/2011 - 18:08 नवीन
आमच्याही घरी बरीच चित्रे होती...
आपण लै हुच्चभ्रु आहात हे आम्हा सर्व मिपाकरांस कळालेले आहे.... *नंतर काय सरपण म्हणुन वापरली का ती चित्रे (घातली का चुलीत) ???*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

*नंतर काय सरपण म्हणुन वापरली

यकु
गुरुवार, 07/28/2011 - 18:15 नवीन
*नंतर काय सरपण म्हणुन वापरली का ती चित्रे (घातली का चुलीत) ???*
गटारी अभी दूर है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

राम हा तेनालीरामा सिरीयल

आनंद
गुरुवार, 07/28/2011 - 17:36 नवीन
राम हा तेनालीरामा सिरीयल मधल्या राजाच काम करणार्‍या अभिनेत्या सारखा दिसतोय
  • Log in or register to post comments

अनंग देसाई

प्रियाली
गुरुवार, 07/28/2011 - 17:42 नवीन
Image removed. राम मला अनंग देसाईसारखा वाटला. देसाईंचा तरुणपणीचा फोटो मिळाला नाही. हा फोटो http://www.indianetzone.com/photos_gallery/3/anangdesai_3174.jpg येथून घेतला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

रामाचे हस्तविक्षेप

चित्रगुप्त
गुरुवार, 07/28/2011 - 17:57 नवीन
रामाचे हस्तविक्षेप असे वाटतात की "अरे तिला घेऊन कुठे निघालीस? चल तू पण ये इकडे ".... आणि उडणारा पदर सीतेचा अहे की धरणीमतेचा? रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा