Skip to main content

या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे ?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 28/07/2011 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे. या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज? हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#

वाचने 52227
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

अरे काय चित्रगुप्त शेठ, येवढे सोपे तुम्हाल महिती नाही ? सितेला तिची माता पृथ्वी आपल्यासोबत घेउन चालली आहे. :) अर्थात सिता भूमीच्या उदरी गडप झाली तो प्रसंग.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अगदी शंभर टक्के. आधी अंधुकपणामुळे लक्षात येत नव्हतं. आता पराभाऊंनी सांगितल्यावर पुन्हा पाहिलं. एकदम पटतंय. अर्थातच ते आसनारुढ श्रीयुत हे श्रीरामचंद्र असणार. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र, "हे काय झालं बुवा आता वेगळंच काहीतरी.." अशा अर्थाचे काहीसे अनपेक्षित दृश्य पहात असल्यासारखे वाटताहेत..

In reply to by परिकथेतील राजकुमार

जमिनीवरच्या आकृती पाहून ती सीता आणि धरणीमाता असावी हे पटतंय पण सिंहासनावर बसलेली व्यक्ती राम असावी असं वाटत नाही. म्हणजे रामाची जी प्रतिमा मनात असते ती चित्रातल्या रामशी अजिबात जुळत नाही. (पराने सांगितलं म्हणून हा विचार तरी आला, नाहीतर एखाद्या राजाच्या दरबारात एक स्त्री न्याय मागायला आलीये आणि तिचा आवेग अनावर झाल्याने दुसरी तिला सावरत आहे असे वाटले :P ) सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली.

In reply to by स्मिता.

तसेच ऋषींच्या शेजारी एकच बालक उभा दिसतोय. त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..) आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.

In reply to by गवि

कपाळावर हात का मारला असावा
गवि बहुदा त्याने भावनातिरेकाने आपले डोळे हे दृष्य बघवत नसल्याने झाकल्यासारखे वाटत आहेत. @स्मिता एकामागे एक अशी दोन बालके उभी आहेतसे वाटते. आणि शेजारीन दोन ॠषींपैकी एक वशिष्ठ असावेत.

In reply to by गवि

आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
राम तर राम त्याच्या शेजारचा एक ऋषीही तसंच विचारतो आहे. मला आपलं रामभाऊ आणि ते ऋषी सीतेला "वॉ,सप?" असे विचारत असून मागे तोंड लपवणारा कुश "ऑव! शक्स!" असं म्हणतोय असं वाटलं.

In reply to by प्रियाली

=)) =)) कदाचित तो 'अहो सासुबाई दिवाळसणाचे आता काय? आणि हे काय सासरचे दागीने पण घेऊन चाललात का काय?' असे देखील विचारत असेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाबा राम : एवेढेसे काहीतरी बोललो तर लगेच माहेरी ??!! धन्य आहे ! सीतामाय : बसा आता बडवत. हूं... चल गं आई.. कार्टं १ : मम्म्म्मी , मी पण येउ ? कार्टं २ ( डोळ्यांवर हात ठेवलेलं ) : बोंबलला... आता नाश्ता, टिफीन बोंबलला.. मागे उभे असलेले भाउजी : आयला नेहेमीचं झालय राव. ३ चा शो गेला आता चुलीत..

In reply to by गवि

आत्ता बघितल्यावर मला श्रीरामचंद्र हाताने खूण करुन कुठे निघालीस? असं विचारताहेत्सं वाटलं.
अरे हे काय अक्रित घडतय असा भाव आहे. अस आपलं माझ मत.

In reply to by गवि

त्याच्याच मागे बघा, एक कपाळावर हात मारुन घेणारे बालक आहे तो कुश असावा, (पुढचा लव असल्यास) (कपाळावर हात का मारला असावा..) हो, तो मागचा डोळे झाकणारा बालक प्रतिक्रिया टाकल्यावर दिसला. लक्ष्मणाच्या चेहर्‍यावरील भाव इतरांपेक्षा थोडे वेगळे आहेत. राम तसेच ऋषी आश्चर्यचकीत आहेत तर लक्ष्मण चिंतामग्न वाटतोय.

In reply to by स्मिता.

रामाने स्लीवलेस ब्लाऊजसारखे काहीतरी घातले आहे हे ही पाहिलेत का? ;)

In reply to by प्रियाली

मी पाहिलं ते स्लीवलेस ब्लाऊजसारखं काहीतरी... मला वाटलं लहानपणीचं चिलखत असावं :P

In reply to by स्मिता.

रामबाप्पांना चिलखत घालून राजसभेत सिंहासनावर बसायची गरज ती काय? मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं.

In reply to by प्रियाली

मला तरी ते स्लीवलेस ब्लाउजसारखं.. अंमळ तोकडं... मल्लिकातै, कत्रिनातै, राखीतैंना आवडेल असं काहीतरी वाटलं. ते ब्लाउज तोकडं असलं तरी जरा 'विचित्रच' तोकडं आहे. पण वरच्या तिन्ही तैना नविन फॅशन म्हणून चालून जाईल.

In reply to by स्मिता.

तिचा आवेग अनावर झाल्याने दुसरी तिला सावरत आहे असे वाटले
पण त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरचे भाव आवेगाचे वाटत नाहीत.. :(

In reply to by वपाडाव

मागच्या स्त्रिच्या सावरण्यामुळे आधीचा दु:खावेग आवरला गेलाय पण राजाकडे प्रश्नार्थक कटाक्ष आहेच.

In reply to by स्मिता.

>>सिंहासनावरील राजा (राम) आणि त्याच्या मागे उभा असलेला दुसरा राजपुरूष (बहुदा लक्ष्मण) यांनी केसांत माळलेली गुलाबाची फुले बघून अंमळ गंमत वाटली. कुणाचं कुठे लक्ष जाईल काही सांगता येत नाय.!!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठ रामाने धनुष्याचा त्याग करुन तलवार का बरे घेतली असवी? की या चित्राद्वारे शिवसेनेचे समर्थन केल्याचा आरोप होऊ नये म्हणुन चित्रकाराने शस्त्र बदलले असावे? एवढा लोचा होत असताना रामभक्त हनुमान दिसत नाही ?

In reply to by सर्वसाक्षी

अहो सर्वसाक्षी काका, ते म्हणतात ना 'लैला को देखो मजनु की नजरसे.' तसे आहे ते ;) इस प्रसंग को देखो राजा रविवर्मा की नजरसे.

सीतेला धरणीमाता सोबत घेऊन जाते तो प्रसंग आहे पण साफ गंडला आहे कारण सीता एकदा त्याग केल्यावर अयोध्येच्या राजसिंहासनापर्यंत पोहोचली नव्हती असे वाटते. अर्थातच, राजा रविवर्मा चित्रकार असतील तर असे गंडलेपण चालून जाण्यासारखे आहे. नऊवारी साडी नेसणारी आणि शिवलेले फिटींगचे ब्लाऊज घालणारी सीता चालते तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर काय मोठे त्यात? ;) चित्र यंडुगुंडू भाषेतील असले तरी गूगल ट्रान्सलेटमध्ये रवि वर्मा की पेंटिंग्स असेच लिहून आले.

In reply to by प्रियाली

तर अयोध्येपर्यंत पोहोचली तर काय मोठे त्यात?
घ्या ! अहो ती लोकसभेपर्यंत सुद्धा पोचली कधीच ;) अयोध्येचे काय घेऊन बसला आहात ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो ती लोकसभेपर्यंत सुद्धा पोचली कधीच अयोध्येचे काय घेऊन बसला आहात ?
हाहाहाहा! मस्त! धरणीमाते आत घे गं - मला नाही पराला. ;)

In reply to by प्रियाली

=)) =)) तसे घडले तर मग तिथुन ऑनलाईन येईन तेंव्हा मला 'बळी' असे सदस्यनाव बदलून मिळावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांचे कान पिळायला मोकळे का पराशेठ??? (वामन) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

म्हणजे तुम्ही आम्हा सर्वांचे कान पिळायला मोकळे का पराशेठ???
काय हे ? माझ्या सारखा साधा सरळ माणूस कशाला उगाच कोणाचे कान वैग्रे पिळायला जाईल अर्धवटशेठ ? तुमचे एक आपले काहीतरीच बॉ. आता पुन्हा स्वतःला वामन म्हणवताय म्हणजे आम्ही तुमच्यापासून लांबच थांबायला पाहीजे ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

बळि तो कान पिळी असे म्हणायचे असेल त्यान्ना.

सीता पण रामाकडे कशी रागाने बघते आहे.

मुलांनो, वरील चित्र बारकाईने बघा आणि त्यातील अन्य ४ ढोबळ चुका ओळखून दाखवा बरे.. (नऊवारी साडी आणि फिटिंग्जचे ब्लाऊज त्या काळात नव्हते, ही एक चूक ग्राह्य धरण्यात आली आहे.) -शेणकुटे गुरुजी-

In reply to by योगप्रभू

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा टाकलेत २.धरणीमाता सीतेला आत घ्यायला खुप वर आलीये धरनीच्या

In reply to by मुलूखावेगळी

१. रामानी जोडे काढुन सैरावैरा टाकलेत
त्याला नविन शुज विकत घ्यायचे असतील.
२.धरणीमाता सीतेला आत घ्यायला खुप वर आलीये धरनीच्या
लिफ्ट काम करत असेल

सीता भूमीत गडप होत आहे म्हणावे तर तिच्या कमरेभोवती कुणाचे हात आहेत? मला हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग वाटतो. द्रौपदीच्या कमरेभोवती दु:शासनाचे हात आहेत. सिंहासनावर बसलेला दुर्योधन आहे. राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का?

In reply to by नितिन थत्ते

राम किंवा दुर्योधन कमरेला तलवार लावत असत का? आत्तापर्यत राम नेहमी धनुष्य घेतलेलाच बघितला आहे. धरुनी शर धनुष्य दीर्घ हस्ती सुरम्य नेसूनी पीतांबर पद्मसनी सुहास्य

चित्रगुप्तांनी दिलेल्या लिंकमुळे खूप मस्त चित्रे बघायला मिळाली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. चित्राची शैली खूपच ओळखीची वाटते कारण लहानपणापासून रविवर्म्याची छापील चित्रे अनेक वाड्यांमध्ये बैठकीत, ढाळजात लावलेली पाहिली आहेत.. आमच्याही घरी बरीच चित्रे होती...

In reply to by यकु

आमच्याही घरी बरीच चित्रे होती...
आपण लै हुच्चभ्रु आहात हे आम्हा सर्व मिपाकरांस कळालेले आहे.... *नंतर काय सरपण म्हणुन वापरली का ती चित्रे (घातली का चुलीत) ???*

In reply to by आनंद

राम मला अनंग देसाईसारखा वाटला. देसाईंचा तरुणपणीचा फोटो मिळाला नाही. हा फोटो http://www.indianetzone.com/photos_gallery/3/anangdesai_3174.jpg येथून घेतला

रामाचे हस्तविक्षेप असे वाटतात की "अरे तिला घेऊन कुठे निघालीस? चल तू पण ये इकडे ".... आणि उडणारा पदर सीतेचा अहे की धरणीमतेचा? रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय?

In reply to by चित्रगुप्त

रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय?
राम परस्त्रीच्या पदराला हात घालतो असे तर सुचवत नाही ना तुम्ही?

In reply to by प्रियाली

धरणी माता म्हणजे सर्वांची माता. परस्त्री नव्हे. परंतू हे रामाला ती धरणी माता आहे, हे कळले नसावे, त्याला ती मारीचासारखी कुणी मायावी राक्षसीण वाटलेली चेहर्‍याच्या अविर्भावावरून वाटते.

In reply to by चित्रगुप्त

परंतू हे रामाला ती धरणी माता आहे, हे कळले नसावे, त्याला ती मारीचासारखी कुणी मायावी राक्षसीण वाटलेली चेहर्‍याच्या अविर्भावावरून वाटते.
माता असल्याचे कळले नसेल तर परस्त्रीच की मग! राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का? विचारा आमच्या श्रामो, घासुगुर्जी, बिका वगैरेंना. बायदवे, रामाने आदल्या दिवशी महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण प्रकरण वाचले असण्याची शक्यता कितपत आहे?

In reply to by प्रियाली

रामायण हा मूवी आधी आला आणि महाभारत हा सीक्वेल आहे त्यामुळे रामाने ते बघितले असण्याची शक्यता कमी! ;) रंगा

In reply to by प्रियाली

राम* बहुधा सासूबाईंच्या पदराला धरून "मी पण येतो" म्हणाला असावा. तेव्हा धरणीमातेने "अरे हाआआआड" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल. *येथे रघुकुलतिलक, अहल्ल्योद्धारक भगवान श्री राम असे वाचावे.

In reply to by नितिन थत्ते

राम* बहुधा सासूबाईंच्या पदराला धरून "मी पण येतो" म्हणाला असावा. तेव्हा धरणीमातेने "अरे हाआआआड" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल. *येथे रघुकुलतिलक, अहल्ल्योद्धारक भगवान श्री राम असे वाचावे.
किंचित बदल "अरे हाआआआड मेल्या" असे म्हणून पदर सोडवून घेतला असेल. बाकि प्रतिसादहि भन्नाटच :) थत्ते साहेब आणि पंगा यांचे प्रतिसाद विशेष भावले.

In reply to by प्रियाली

राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का?
माहिती नाही. पण (किमान काही) स्त्रिया या राक्षसिणी असतात हे मात्र माहिती आहे. ;) उदा:.... जाऊ द्या. ;)

In reply to by श्रावण मोडक

पूर्ण सहमत आहे. पुरावा : http://www.misalpav.com/user/13/guestbook और मिलॉर्ड, सदस्य क्रमांकपरभी गौर किया जाए! ;)

In reply to by प्रियाली

मूळ चित्राविषयी थोडं - या चित्रात एक अनोखी दुर्घटना होत असताना सगळे आपापल्या खुर्च्यांत वगैरे बसून धिक्कार, दुःख वगैरे व्यक्त करत आहेत. सीतेला सोडवायला कोणी जात नाही. चित्रात कोणी कविता करताना दिसत नाहीत, कदाचित राजा रविवर्माची ही चित्रमय कविता असेल. '*र्यहीन विचारजंती कुठचे!' असं रविवर्म्याला म्हणायचं असावं. (चित्रात राम असल्यामुळे कवितेतला शब्द वापरणं मला उचित वाटत नाही)
राक्षसिणी काय स्त्रिया नसतात का? विचारा आमच्या श्रामो, घासुगुर्जी, बिका वगैरेंना.
राक्षसिणी या स्त्रियाच असतात. त्यांना स्त्रियांविषयीचे सगळे (सोयीचे) कायदे लागू होतात. उदाहरणार्थ त्यांच्या वयाची जाहीर चर्चा वगैरे केली तर त्यांना राग येतो. फक्त सामान्य स्त्रीप्रमाणे अबला नसल्यामुळे त्या दात, नखं, शस्त्रं वगैरे पाजळून अंगावर धावून येतात. कधीकधी त्या मूळ दोषी माणसाला सोडून निरपराधालाच फाडून खातात.

In reply to by राजेश घासकडवी

*र्यहीन विचारजंती कुठचे!
साध्या सोप्या मराठीत *ढ असे म्हणा ना! शेवटी सर्व भारतभूमीची लेकरे. मी सुद्धा * वापरून प्रश्न सोडवला.
कधीकधी त्या मूळ दोषी माणसाला सोडून निरपराधालाच फाडून खातात.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस... आय मीन राक्षसीण!

In reply to by चित्रगुप्त

धरणी माता म्हणजे सर्वांची माता.
म्हणजे सीतेचीपण माता आणि रामाचीपण माताच. म्हणजे रामाची सीता कोण? "रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!!

In reply to by पंगा

>>"रामाची सीता कोण - आई की बहीण" या सनातन प्रश्नाचे उत्तर (आख्खे रामायण न वाचतासुद्धा) मिळाले! रामाची सीता नि:संशय बहीणच!!! (जैन की) कुठच्यातरी रामायणात राम आणि सीता बहीण भाऊच असतात म्हणे.

In reply to by अनिरुद्ध प

राजा रवीवर्मा किंवा राम जैन असण्याशी माझा काय संबन्ध येणार, राजरवीवर्मा किंवा राम जैन होता किंवा नाही हे भाजप सांगु शकेल जैन डायरीत त्याबाबतीत काही लिहीले असेल तर ते त्यानाच माहीत असेल

In reply to by पंगा

रामायण न वाचताही केवळ मच्छिंद्र काबळींचे 'राम तुझी सीता माऊली' हे नाटक बघून सनातन प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल :)

In reply to by चित्रगुप्त

रंगावरुन धरणीचा वाटतो, मग तो क्षणभरापूर्वी रामाच्या हातातुन निसटला आहे काय? हे राम...

In reply to by चित्रगुप्त

द्रुष्टिला तरि तो सितामाईचाच पदर दिसतो आहे बाकी चित्रकाराच्या नजरेला काय दिसत असेल हे 'चित्रगुप्तच' जाणे.

जमीन (दुभंगलेला भाग पाहता) अ‍ॅल्युमिनियम पत्र्याची म्हणजे साधारणतः एसटीच्या साध्या बिनआराम बसमधली फ्लोअर असते तशी वाटतेय.