Skip to main content

या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे ?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 28/07/2011 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे. या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज? हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#

वाचने 52227
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

वरची सर्व उत्तरे चुक आहेत, हा एका हिंदी सिनेमातील प्रसंग आहे. ती जमीनीवर बसलेली बाई आपल्या सिनेमाच्या नायकाची बहीण आहे. आणि सिहासनावर बसलेला अमरीश पुरी किंवा शक्ती कपुर आहे. मागे अमरीश पुरीचा सज्जन भाउ परेश रावल आहे. बाजुला मुनी अनुपमखेर बसलेले आहेत. त्या बाईच्या मागची स्त्री तीची आई आहे. दोन लहान मुले ही आपल्या हीरोचीच भावंड आहेत ज्यांना अमरीशपुरीने बाळं असताना पळवुन आणले आहे आणि त्यांच्या कडुन तो बुरे काम करवुन घेतो. त्यांना आत्ताच समजले आहे की ह्या बायका म्हणजे आपली बहीण आणि आई आहेत. बाई अमरीश पुरीला सांगत आहे " मुझपर दया करो मुझपे ऐसा जुलुम मत करो मै तुम्हारे बच्चेकी मा बनने वाली हु" अमरीश पुरी म्हणतो "क्या सबुत है तुम्हारे पास ईस बात का. मुझे नही पता तुम्हारे पेट मे कीसका पाप पल रहा है" त्यावर खवळुन ती म्हणते "कमीने मेरे भाई को ईस बात का पता चला तो वो तुम्हारा साम्राज्य नष्ट कर देगा" त्यावर तीची आई तीला मागे ओढत आहे आणि म्हणते आहे "बेटी यहासे चलो ईस पापी को तेरी दया नही आयेगी. हम जैसे गरीबोंका कोई वाली नही होता." आता या नंतर सनी देवल भिंत फोडुन आत येणार आहे आणि अमरीशला धु धु धुवुन काढणार आहे. तो पर्यंत मा बेटी रेल्वे रुळांवर जाउन बसणार आहेत त्यांच्या मागे दोन छोटे भाउ "मा रुक जाओ दीदी तुम्हे पिताजीकी कसम" असे म्हणत धावणार आहेत. एकी कडे सनी दुश्मन चा खातमा करत आहे आणि दुसर्‍या फ्रेम मधे, समोरुन कोळश्याचे ईंजीन लावलेली रेल्वे धडधडत येणार आणि काही कळायच्या आत सनी मधे उडी मारुन ती हातानी आडवणार. मग सगळ्या परीवाराचे मिळुन एक गाणे होणार. " आंधी आये या तुफान ये प्यार ना होगा कम, एक दुसरेसे जुदा कभी नही होंगे हम. बम चीकी बम चीकी बम" अनुपम खेरची मुलगी डिंपल कुठुन तरी धावत येउन सनीला मिठी मारते आणि मग ते सगळे मिळुन परत वरचे गाणे उच्च रवात गाउ लागतात. तेव्हड्यात द एन्ड ची पाटी येते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पिच्चर पायलेला आहे कदाचित. नाव काय आहे पिच्चरचे ? कदाचित HD विथ इंग्लिश सबटायटल पाहिला आहे. ३D गॉगल घालुन.

प्रतिभेला आलेला अनावर बहर वाचून रविवर्म्याने 'धरणीमाते पोटात घे' असं सेल्फ पोर्ट्रेट केलं असतं! ;) -ख्वाजा रंगकर्मा

अनुदिनी तापे, तापलो रामराया......... -धम्या बजरंगी.

रूप संगम कडून मिळालेली पैठणी नेसून वैनी आल्या आहेत, तेवढ्यात शूटिंग साठी घाइघाइत केलेला सेट मोडून वैन्या खाली पडु लागल्या आहेत, आदेश भावजी व सिताराम सोसायटी, डोंबिवली (पूर्व) चे शेजारी आश्चर्य चकित होउन बघत आहेत... या खास एपिडोस साठी सर्वांनी ऐतिहासिक वस्त्राप्रवरणे नेसली आहेत.

In reply to by चित्रगुप्त

अच्छा हे अस उत्तर अपेक्षित आहे होय. आम्ही फुकाचे पहिला नंबर लावत प्रामाणिक पणे प्रश्नपत्रिका सोडवायला बसलो. ;)

हा प्रसंग जर सीतेला धरणीमाता पोटात घेते असा असेल तर त्यात बर्‍याच चुका आहेत. पुराणात वरील प्रसंग हा रामाच्या दरबारात घडलेला नाही. तर तो ऋषींच्या आश्रमात झालेला आहे. या प्रसंगात सीतेच्या अंगावर आश्रमातील वस्त्रे हवीत. रामाने त्याच्या अंगात चिलखत घातले असेल तर ते पुर्ण हवे . ब्लाऊज सारखे पोट उघडे दाखवणारे नको रामाच्या हातात तलवार आहे ती युरोपीयन बनावटीप्रमाणे सरळ आहे. रामायणात ज्या तलवारी आहेत त्या पुढे पाते रुंद असलेल्या आहेत. रामाच्या राजवाड्याबाहेर शिवसेनेचे झेंडे का लावलेले आहेत? दरबारात बसलेल्या रामाने पायात काहीच घातलेले नाही. पायाखालीदेखील काहीच नाही.

In reply to by विजुभाऊ

चित्रातील ढोबळ चुका सर्वाधिक ओळखल्याबद्दल विजुभाऊला मी वर्गातील हुशार मुलगा म्हणून जाहीर करतो. :) -शेणकुटे गुरुजी- ........................ १) रामायणकाळात नऊवारी साडी व बाह्यांचे ब्लाऊज ही स्त्रियांची वेशभूषा नव्हती. छातीवर कंचुकी व त्यावर एक ओढणीसारखे वस्त्र (अधरीय) असे. कमरेखालचे वस्त्र उत्तरीय म्हणून ओळखले जाई. कमरेवर बांधायचे जे कटिवस्त्र असे त्याला अंशुक म्हणत. पुरुष कंचुकी वगळता हाच पोशाख करत. २) प्रसंग वाल्मिकी मुनींच्या आश्रमात घडला. तेव्हा सीतेच्या अंगावर आश्रमकन्येचा पोशाख होता. राजस्त्रियांची वस्त्रे नव्हती. ३) राम व कृष्ण यांना दाढी व मिशा नव्हत्या आणि त्यांचा शरीरवर्ण गौर नसून निळा-सावळा होता. ४) राम हा कायम कोदंडधारी (धनुर्धर) होता. त्याच्या हाती तलवार नसे. चित्रात दाखवलेली तलवार युरोपिअन धाटणीची धोप (सरळ पात्याची) आहे. भारतीय योद्धे नेहमी टोकाला बाकदार तलवारी वापरत. पुढे रुंद होणार्‍या तलवारी राक्षस वापरत. पुन्हा या चित्रातील तलवारीच्या लांबीचे प्रपोर्शन गंडले आहे. ५) भगव्या झेंड्याबाबत कुणा राजकीय पक्षाचे नाव न घेता आपण चित्रकाराला संशयाचा फायदा देऊ. इंद्राचा ध्वज हा 'झर्झर दंड' म्हणून ओळखला जाई. त्याचा रंग भगवा होता. रामायणात इंद्राचा उल्लेख आहे. (युद्धात इंद्रानेच आपला ध्वजांकित 'जैत्ररथ' व 'मातली' हा सारथी रामाला लढण्यासाठी दिला होता.) त्यामुळे भगवा झेंडा मान्य करुया. ६) खिडकीतून बाहेर दिसणारा राजप्रासादाचा कडेचा भाग चक्क टॉवरसारखा वाटतोय. टॉवर ही गॉथिक इमारतशैली आहे. ती युरोपिअनांच्या वसाहतीनंतरच आपल्याकडे रुढ झाली. (पोर्तुगीजांची गोव्यातील जुनी चर्च). रामायणकाळात अशा सरळसोट इमारती नसत. प्रासादांचे सौंध, गवाक्ष यावरही शिल्पकाम आणि नक्षी असे. चितोडच्या विजयस्तंभावरुन साधारण कल्पना येते. ७) चित्रात दाखवलेला रामाचा दरबार नसून महाल असावा. कारण दरबारात चक्रवर्ती राजा इतरांपेक्षा उच्चासनावर बसत असे. ८) सीता भूमातेच्या मांडीवर बसून जमिनीखाली गेली. त्या प्रसंगात भूमाता पाटावर बसून वर आली नव्हती तर रत्नजडित सिंहासनावर बसल्याचे वर्णन आहे.

In reply to by योगप्रभू

हे एकच चित्र नाही तर चित्रगुप्तांनी दिलेल्या दुव्यावरचे सर्वच चित्रे युरोपियन शैलीतली वाटतात. बहुतेक चित्रातल्या स्त्रियांचे वस्त्र, हावभाव हे पाश्चात्य पद्धतीचे आहेत. हे चित्र बघा: या प्रकारची चित्रे भारतीय शैलीची नसून (नऊवारी साडी वगळता) युरोपियन आहेत.

In reply to by स्मिता.

या चित्रांवर युरोपिअन छाप पडण्यामागे एक कारण असेही असू शकेल की मॉडेल व्ह्यू मनात आणताना रविवर्मा पूर्णपणे प्राचीन काळात शिरले नसावेत. त्यांनी त्यांच्या हयातीतला काळच समोर ठेवला असावा. म्हणजेच रामाचा दरबार चितारताना त्यांनी ज्या राजाच्या दरबाराचे चित्र प्रत्यक्ष पाहिले होते तो जर अठराव्या शतकातील असेल तर तपशिलाच्या अशा चुका दिसणारच...

In reply to by योगप्रभू

शिवाय आत्ता जे आपण पहात आहोत ते हजारो वर्षापासून (किंवा कलियुगाच्या सुरुवातीपासून) तस्सेच्या तस्से चालत आले आहे अशी समजूतही असू शकेल.

In reply to by योगप्रभू

रविवर्मा ची चित्रे: http://www.cyberkerala.com/rajaravivarma/ बाळासाहेब पंत प्रतिनिधी (१८६८ - १९५१) यांनी असे लिहून ठेवले आहे, की रविवर्मा (१८४८ - १९०६) ची चित्रे मुख्यत्वेकरून त्याचा लहान भाउ सी. राजा राजा वर्मा हा चित्रित करत असे. रविवर्मा फक्त शेवटी चेहर्‍यावरील भाव वगैरेत थोडेबहुत काम करून सही करायचा. बाळासाहेब पंत प्रतिनिधी देखील चित्रकार होते, त्यांचे एक चित्रः दुवा: http://www.kamat.com/kalranga/mythology/ramayan/30031.htm पाश्चिमात्य चित्रकारांच्या मागे जशी एक समृद्ध् परंपरा होती, तशी या भावांना लाभली नव्हती.

In reply to by योगप्रभू

आपण म्हणता तसेच असावे असे वाटते. त्यातल्या त्यात खाली चित्रगुप्तांनी लिहिलंय की रवी वर्म्याची चित्रे त्याचा भाऊ काढत असे. मला ही चित्रे एखाद्या भारतीयाने पाश्चात्य पद्धतीचा अभ्यास करून काढलेल्या चित्रापेक्षा पाश्चात्य माणसाने भारतीय राहणीमान आणि कथांचा अभ्यास करून काढलेली वाटतात. रवी वर्म्याचा भाऊ युरोपात वाढला होता का?

In reply to by विजुभाऊ

रामाच्या राजवाड्याबाहेर शिवसेनेचे झेंडे का लावलेले आहेत? हे हे हे. रा.स्व. संघीचे नशीब. शिवसेनेवरच थांबले विजुभौ. ;)

जर चित्रात दोन मुले नसती तर हे दौपदी वस्त्रहरण वाटले होते...(वस्त्रहरण करताना दोन मुले नसावीत असा अंदाज आहे असल्यास कल्पना नाही.. तसेही एकाने डोळे झाकले आहेतच :प) बाकी राजाच्या मागे कोण उभा आहे? त्याने कानात फूल का अडकवले आहे?

मला राहून राहून एक प्रश्न पडतो ... सत्य युगातले , त्रेता युगातले लोक दाढी कशी करत असतील? इव्हान भगवान शंकर पण दाढी करतात ... वैदिक काळात लोकांना दाढी करण्याची कला अवगत होती का ?

In reply to by कुळाचा_दीप

अध्यात्ममार्ग किती अवघड आहे हे सांगताना कठोपनिषदात खालील श्लोक येतो.
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्ग पथस्तत्‌ कवयो वदन्ति |
अर्थः क्षुर-म्हंजेच वस्तर्‍याच्या धारेवरून चालणे जितके अवघड तितकाच अध्यात्ममार्ग अवघड आहे. ज्या अर्थी वस्तर्‍याची उपमा उपनिषद काळात दिली गेलीये त्याअर्थी दाढी करायला न्हाव्यांकडे वस्तरे तेव्हापासून असावेत हे स्पष्टच आहे.

चित्र कुठले आहे ते माहिती नाही पणा रद्दड आहे ते कळाले. चित्रातल्या सर्व व्यक्तींनी विशेषतः बायकांनी सर्व कपडे घातले आहेत. अलंकारांवरुन बायका हिंदु वाटतात. तरी पुर्ण कपडे म्हणाजे तर चित्र अजिबातच वास्तवदर्शी आणि कलात्मक नाही हे कळते. असल्या फालतु चित्रांवर कशापाई वेळ वाया घालवायचा?

In reply to by मृत्युन्जय

वास्तवदर्शी चित्र . बहुदा सत्यवतीचे आहे. अर्थात ती काही देवी नाही. त्यामुळे चालून जाईल. दुवा: त्याच अल्बम मधील चित्र ५८ https://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#5367627736101638370

In reply to by मी_ओंकार

सत्यवती चामड्याचा पट्टा बांधून आहे?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

'तो पट्टा तिथे नसता तर नेमके काय बिघडले असते? उलट किती फायदा झाला असता!' याचा विचार करतोय. आणि मी अरसिक??? ('आंबटशौकीन' म्हणा फार तर.)

In reply to by पंगा

हां मग ठीक आहे.... नाही तर 'कोणाला कशाचं तर पंग्याला पट्ट्याचं' असं म्हणायची पाळी आली असती. बाकी तुम्ही तो पट्टा नजरेला आणून दिल्याबद्दल तुमचे आभार. ;)

In reply to by नितिन थत्ते

हा शंतनु असेल तर त्याचे डोळे जरा जडावलेले दिसतात.
कदाचित सदर प्रसंग गुरुवारी सकाळी घडला असावा, किंवा मग बुधवारी संध्याकाळी तो आपल्या आवडत्या स्त्री बरोबर असताना चितारला गेला असावा.

In reply to by मी_ओंकार

'पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा' ही ओळ मनात आली :) येताजाता सारखे धनुष्य आणि तलवार हातात बाळगत बसायची या राजेलोकांची वाईट्ट खोड.

चित्रातला प्रसंग धरणीमाता आणि सितामाय यांचाच आहे. सीतामाय पूर्ण कपड्यात वगैरे दाखवली आहे आणि चित्रगुप्त पडले चित्रकार, म्हणून त्यांना ओळखता आली नाही.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सीतामाय पूर्ण कपड्यात वगैरे दाखवली आहे आणि चित्रगुप्त पडले चित्रकार, म्हणून त्यांना ओळखता आली नाही
. चित्रगुप्त पंढरपूर निवासी आहेत असा रोख आहे का तुमचा? ;)

In reply to by प्रियाली

नाही, सध्या चित्रकारावरच भागवतो. पंढरपूर वगैरे म्हणलं की त्यात अजून काही लोकं येतील... मग उद्याच्या, आय मीन शुक्रवारच्या, बैठकीचं बिल कोण देणार असा प्रश्न निर्माण होईल. नकोच ते. मी चित्रकार नसलो तरी अंगावर उलटणार नाही एवढेच आणि तिथेच स्वातंत्र्य घ्यायची चतुराई आहे माझ्यात, चित्रकारांसारखी! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हाण्ण तिच्यायला! काय पर्फ्येक्टं उत्तर दिलं. व्वा! आमच्या कारखान्याच्या प्यानलमदे येता काय? चेरमन कर्तो तुमाला. ;)

काय च्यायला एकेक रिकामटेकडे लोक! असो, यापेक्षा जास्त वेळ नसल्याने आलेल्या उपप्रतिसदांना उत्तर दिले जाणार नाही.

चित्रगुप्तांना ह्या चित्रातली ऐवढी गुपितं आत्ताच डोळ्यासमोर आली असतील नै का ??? स्लिव्हलेस ब्लाऊज आणि चामड्याच्या पट्ट्यांनी शर्थ केली गं बाई. हसून हसून मरायची वेळ आली. आणि काय हो? एखाद्या प्रसिध्द चित्रकाराच्या कलाकृतीची प्रशंसा करायच्या ऐवजी त्याचे एवढे धिंडवडॆ? नक्को नक्को ती वेळ आली की त्या चित्रकारावर! बिच्चारा!

In reply to by मीनल

टिका करणे हा आमचा जन्मसिद्ध अधीकार आहे व तो आम्ही बजावणारच! सहज टिळक अहो मीनलताई तरी नशीब चित्रकाराचे नाव वर्मा आहे, जर दुसरे काही असते ना जसे की ... असो. तर धिंडवडेच काय लक्तरे , देशोधडीस इ सगळे केले असते. चित्रकार काही बिच्चारे नसतात कै डॉलर अन युरो मधे अभिव्यक्ती... असो.

In reply to by सहज

'..आणि खपली खरवडली गेली!' चा प्रयोग लागला की काय थेटरात? ;)

In reply to by धमाल मुलगा

मग कधी निघायचे उधळून लावायला!! ;-)

In reply to by सहज

कशाला ते? बरं असतं अधून मधून असंही! :D

In reply to by धमाल मुलगा

'साहेब' म्हणतील तसे!!

वि चित्रवर्मानी सरळ सरळ फ्युजन करायचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्यांनी परदेशवारीही केलेली आहे हे दाखवायचा प्रयत्न केलाय. बाकी थांबू दे. मी आपले परीक्षण गोंदवले !

रामाच्या पायाजवळ चिरमुरे पडलेत. राम सावळा तर लक्षुमण गोरा होता म्हणे. इथे चित्रात उलट आहे. रामाचे सिंहासनही मंगल कार्यालयात लग्नात ठेवतात तसे आहे.

In reply to by JAGOMOHANPYARE

रामाचे सिंहासनही मंगल कार्यालयात लग्नात ठेवतात तसे आहे. त्याकाळी मंगलकार्यालये नसायची. राजवाड्याच्या प्रांगणातच लग्ने लागायची. शिवाय राजा जनकाने चारही मुलींची लग्ने एकाच वेळेस एकाच मांडवात लावून सामुदायीक विवाहामुळे खर्चात बचत होते हा वस्तु पाठ मिथीला आणि अयोध्या नगरीच्या नागरीकांपुढे ठेवला. रामाने एकच बायको बरी हा सुखी संसाराचा मंत्र नागरीकाना शिकवला ( तरीही राम हा संसारात दु:ख्खीच होता म्हणे.अगोदर त्याने बायकोला टाकले नंतर बायकोने त्याला टाकले)

In reply to by विजुभाऊ

आमची अनुदिनी : वाचु आनंदे http://vaachuanande.blogspot.com/ ....फारच सुंदर लिखाण आहे तुमच्या या अनुदिनिवर. आणखी असे जुन्या, ऐतिहासिक काळाबद्दल लिखाण आहे का?

सितेला निदान शेवटी तिचि माय उदरात घ्यायला आलि. पन ज्या बायका आयुश्यभर कश्ट करुन करुन जगतात, तीळतीळ करुन मरतात त्यांना बिचार्यांना घ्यायला कोनती माय येते का ?

दोन वर्षांपूर्वीच्या या धाग्याच्या प्रतिसादात खूप गंमत जंमत धमाल घडली होती, नवीन मिपाकरांसाठी पुन्हा वर काढत आहे.

पुन्हा एकदा त्या चित्रातील पात्रे कुठली यावर चर्चा सुरु करा. तो राम अजिबातच वाटत नाही. त्याची तलवार म्यानांत आहे का रक्ताळलेली आहे? नव्याने आधुनिक विचार केल्यावर, ती बिहारमधील सत्ताराणी आहे, तिला नेणारी कमळाबाई आहे आणि सिंहासनावर नितीशकुमार बसले आहेत. (लागली का काडी? का विझली?)

In reply to by शिल्पा ब

जनसामान्यांना कळतील अन भावतील अशी ठसठशीत चित्रे काढणे म्हंजे बोगसपणा तर कैतरी फराटे मारून टनभर विशेषणे लावून वाखाणण्यापेक्षा तसा बोगसपणा जरूर आवडतो.

In reply to by शिल्पा ब

स्वतःचे मत हे त्रिकालाबाधित सत्याच्या थाटात सांगितले तर प्रश्न उपस्थित होणारच. तसे नसेल तर मरूदे, असेल तर मग स्पष्टीकरण द्या. रविवर्मा का ओव्हर हाईप्ड होता आणि दलालांनी नेमकं काय केलं इ. फाटे फुटले तर अनंत फुटतील. न फोडता काही होत असेल तर ठीक.

In reply to by शिल्पा ब

रविवर्मा हा अत्यंत बोगस चित्रकार होता. चित्रकार दलालांनी हाईप केलेला.
च्यामारी दिग्विजय समजता काय स्वतःला? जरा कसा बोगस ते समजावून सांगाल काय? किंवा हाईप कसा केला दलालांनी हे तरी निदान. एलिमेंटरी ग्रेड चित्रकला परिक्षेची ग्रेड सांगितली तरी कळेल म्हणा.