Skip to main content

एक अद्भुतरम्य जागा

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 24/07/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसच्या गजबटापासून दूर, अतिशय शांत, निर्मनुष्य आणि अद्भुतरम्य जागा म्हणजे Parc de Saint Cloud. सुमारे ११३६ एकर जागेत पसरलेल्या या उद्यानात हजारो मोठमोठी झाडे, हिरवळी, गच्च झाडीने झाकलेल्या पायवाटा, टेकड्या, पुतळे, कारंजी वगैरे आहेत. सतराव्या शतकातील या जागेचे एक चित्र: या चित्रात डावीकडे दिसणार्‍या भव्य प्रासादात सोळाव्या शतकापासून राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य असायचे, मात्र १८७० सालच्या युद्धात हा प्रासाद आग लागून नष्ट झाला. १८७१ सालची भग्न प्रासादाची दृश्ये: येथील कॅस्केड चे १८४५ मधील एक चित्र: एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे.... या प्रासाबद्दल दुवा: http://chateausaintcloud.wifeo.com/les-ruines.php

वाचने 8656
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मस्त.. वाट पाहत आहे.. :) तिथे मूड बनला / वेळ असला / सामुग्री असली तर चित्रेही काढणार का? :)

वाट बघत आहे!

सुरेख.
एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे....
वाट पहातो आहे.

मस्तच!! असेच आपल्या शनिवारवाड्याचे मुळचे चित्र कुठे पहायला मिळेल का?

In reply to by किसन शिंदे

सह्हीच!! खाली चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणे तो आगीत जळालेला सात मजली वाडा पूर्ण दिसेल असे चित्र पहायला मिळाले तर सोन्याहून पिवळं!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

हं छान छायाचित्र आहे, फक्त तो पागोटे घातलेला मुलगा पर आहे की धमु आहे ते समजत नाही. जाणकारांनी खुलासा करावा.

In reply to by पाषाणभेद

हा धमुचा मागच्या जन्मीचा बाल्पणाचा फोटो असावा असा इतीहासकारांचा दावा आहे. संशोधन चालू आहे, ते पुर्ण झाल्यावर 'शनिवार बुद्रुक टाइम्स' मधे बातमी झळकवण्याची सोय केली आहे. तरीही रोज न चुकता 'शनिवार बुद्रुक टाइम्स' वाचण्याचे करावे. (विकत घेउन, मोफत वाचनालयात हा ठेवला जात नाही) - (इतीहास संशोधक) सोकाजी

शनिवारवाड्याचे आणखी फोटो, खास करून विहंगम दॄष्य उपलब्ध आहे का कुठे? कोटाच्या आतील सातमजली वाडा होता, त्याचे?

अगदी सुरेख !

तसे चांगले आहे, पण आधुनिक, काल्पनिक आणि बटबटीत... टोपीकरांनी नाही एखादे त्याकाळी चित्र काढुन ठेवलेले? खरेतर हे काम पेशव्यांनीच करायला हवे होते...