✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाचवा या गुडघेदुखीतून....

च
चिंटु यांनी
Sun, 07/17/2011 - 13:05  ·  लेख
लेख
वयाच्या चोविसाव्या वर्षीच गुडघेदुखीने त्रस्त झालोय. विविध M S medicine असणार्‍या तज्ञांना दाखवूनही उपयोग न झाल्यानं मग M S Orthopedic ना सुद्धा दाखवलय. अगदि पुण्यातल्या खास ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असणार्‍या संचेती हॉस्पिटलला सुद्धा! पण कुणालाही नक्की काय बिघडलय ह्याचा अंदाज आलेला नाही. त्यांच्या मते मी फिट, धडधाकट ,शिडाशिडित असा तरुण आहे. पण ज्याचं दुखतं त्यालाच कळतं ह्याचा अनुभव घेतोय. पायर्‍या चढताना कटकट. बसमधुन जाताना कटकट.अगदि मांडी घालून बसायचीही सोय राहिलेली नाही.जीव अगदि मेटाकुटीला आलाय. पुण्यातल्या खडीवाल्या वैद्यांकडेही सहाएक महिने जाउन आलो, मात्र तीळभरही फरक नाही. कुणी मिपाकर ह्याबाबतीत सल्ला देउ शकतील काय? माझी तब्येत म्हणाल तर इतर बाबतीत अगदि व्यवस्थित आहे. मागील तीनेक वर्षात साधी सर्दी वगळता कुठलाही आजार झालेला नाही. ऑफिसमध्ये कधीही सिक लीव्ह टाकावी लागलेली नाही. उंची १६६ सेमी,म्हणजे सुमारे साडेपाच फूट, वजन ५७ किलो. दारु, सिगारेट ह्यापासुन चार हात लांबच असतो.वयही फारस नाही. मग नक्की काय उपाय करता येइल? कुणी इतर डॉक्टर क्रुपया सुचवावेत. आणि हो, मागील तीनेक वर्शापासुन मी मिपा वाचतोय, कधीच काहीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण मला मिपा खुप खुप आवडते. तुम्ही कुणी मदत करु शकाल अशी आशा वाटली म्हणुन इथे ह धागा टाकला. कुणी काही सुचवा प्लीज. -- गुडघेदुखीने त्रस्त छोटा चिंटु
  • वाचवा या गुडघेदुखीतून.... भाग २ (निदान/diagnosis झाले)

Book traversal links for वाचवा या गुडघेदुखीतून....

  • वाचवा या गुडघेदुखीतून.... भाग २ (निदान/diagnosis झाले) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
68061 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

निदान झाले नाही? की निदान

प्रकाश घाटपांडे
Sun, 07/17/2011 - 13:21 नवीन
निदान झाले नाही? की निदान झाले परंतु त्यावर डॉक्टरांकडे उपचार नाहीत हे लिखाणावरुन पुरेसे स्पष्ट होत नाही.काही गोष्टींवर उत्तर नसते हे मात्र खरे. थोडीशी 'टाकून' पहा कदाचित गुडखेदुखी चा विसर पडेल.
  • Log in or register to post comments

निदान नाही झाले हो......

चिंटु
Sun, 07/17/2011 - 13:37 नवीन
कुठल्यापण ओर्थोपेदिक कडे गेल्यावर तो तुम्हाला पेशम्ट-बेडवर टाकुन पाय/गुडघा मुडपुन पाहतो. माझा तसा व्यवस्थित मुडपला जातो आहे. मग ते म्हणतात की सगळ अगदि रुटीन आहे नोर्मल आहे. मी त्यांना म्हनालो की असा पडल्या पडल्या सगलच व्यवस्थित आहे. पन जेव्ह केव्हा थोदावेळ खुर्चीवर बसतो आनि मग उठु बघतो तेव्हा भयंकर वेदना होतात. जितकी खुर्चीची उंची कमी असते, तित्का त्रास जास्ती. म्हनजे ऑफिस मधल्या खुर्चीनेही त्रास होतो, पन एखाद्या थेटरमधे गेल्यावर तो खुपच जास्ती होतो. पायर्‍या उतरताना हल्कासा त्रास होतो. पन पायर्‍या चढताना ब्रम्हांड आठवते.आणि डोक्तर म्हनतात की सगल कस व्यवस्थित आहे.कुथेच काही कमी/मालफंक्शनालिटी नाही म्हणुन. गुडघ्याचा एक्स्-रे काधुन झालाय. ब्लड टेस्त पन झाल्यात. फक्त थोदसं विटामिन b12 कमी होत.(पन ते तसही ८०% शाकाहारी/भारतीय लोकात ते त्याच प्रमानात असतं म्हने.) औशध घेउन ते पन योग्य लेवलला आलय तरीही त्रास वाढतोच आहे. जीव कासावीस होतोय कुठलेही पिकनिक प्लेनिंग करताना.गड्-किल्ले जास्ती चढता येनार नाहित ह्यानी मन निराश होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तुमची गुडघेदुखी चालू

स्वानन्द
Sun, 07/17/2011 - 23:32 नवीन
तुमची गुडघेदुखी चालू होण्यासाठी कुठला अपघात कारणीभूत होता का? की मधूनच कधीतरी सुरू झाली? तुम्ही एक्स-रे फोटो काढून घेतलाच आहे.. पण मग डॉक्टरांनी गुडघ्याचा एम आर आय स्कॅन करून घ्यायला सांगितले नाही का? लिगामेंट ला दुखापत झाली असेल किंवा लिगामेंट तुटले असेल किंवा मेनिस्कस ( गादी ) ला इजा झाली असेल तर ते एक्स रे फोटो मध्ये कळून येत नाही. एम आर आय स्कॅन मध्ये ते समजून येऊ शकते. आणि जर याची चाचणी सुद्धा करून झाली असेल तर मग स्पा ने व्यक्त केलेली शंका आणि सुचवलेला उपाय सद्ध्या तरी धरून चलावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

हे करुन बघा

कुंदन
Sun, 07/17/2011 - 13:23 नवीन
नाडी वाला उपाय करुन बघा.
  • Log in or register to post comments

गुढगे दुखी इतकी वाढलीये

स्पा
Sun, 07/17/2011 - 13:35 नवीन
गुढगे दुखी इतकी वाढलीये म्हणजे शरीरातला वात प्रचंड प्रमाणात दुषित झालेला आहे.. आणि त्याच संतुलनही बिघडलेलं आहे तोच वात अख्या शरीरभर फिरून अशी दुखणी वाढवतो.. एखाद्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट सुरु करा तिळाच्या किंवा राई च्या तेलाने गुध्घ्यांना मसाज करत जा ( तेल गरम करून घ्या) वात कमी करणारी औषध उपयोगी पडतील आहारातून भोपळी मिरची, कोबी, वांग असे वात वाढवणारे पदार्थ वर्ज्य करून बघा रात्री झोपताना काशाच्या वाटीला साजूक तूप लावून तळपायांवर घासत जा, जेणेकरून वात संतुलन होण्यास मदत होईल :)
  • Log in or register to post comments

असे कुनी वैद्य पुन्यात आहेत का?

चिंटु
Sun, 07/17/2011 - 21:41 नवीन
खदीवाले वैद्याने फक्त लांबुनच बघुन त्रास विचारला, नीट न तपासताही काही औशध दिले. ते ७-८ महिने घेउन पण काहीच उपयोग झाला नाही. दुसरं कुनी सांगु शकता का इथे पुन्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मुंबईत असता तर नाव दिली

स्पा
Sun, 07/17/2011 - 13:42 नवीन
मुंबईत असता तर नाव दिली असती,, पुण्यात असाल तर " बालाजी तांब्यांची" औषध घेऊन बघा
  • Log in or register to post comments

मुंबैतली चालतील सर आता.

चिंटु
Sun, 07/17/2011 - 15:18 नवीन
तुम्ही द्या तर खरी. आताच एकानं डॉ अनिल पाटिल(आयुर्वेद + अ‍ॅलोपथिक) ह्यांची मिश्र उपचार पद्धती सुचवली आहे.हे मुंबै ला असतात म्हणे, पण पुण्यात त्यांच्या शाखा आहेत. तुम्ही थेट मुंबैतले कुणी सुचवले तरी चाल्तील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आर्य

चिरोटा
Sun, 07/17/2011 - 14:28 नवीन
आयुर्वेदिक वा अ‍ॅलोपाथी , उपचार अचूक आणि उपचार करणारा बुद्धिमान हवा. चिंटू, आर्य वैद्यशाळा माहित आहे का? तेथे विचारून पहा- http://www.aryavaidyasala.com/(S(b2vyny34yuchxuzxcnclxd55))/Index.aspx मला चांग्ला अनुभव आला आहे.
  • Log in or register to post comments

लिंक बघितली.

चिंटु
Sun, 07/17/2011 - 15:15 नवीन
पण सतत विझिट साठी तिथे केरळात जायला कसं जमेल हे समजत नाही. आयुर्वेदिक उपाय असल्यानं थोडासा अधिक वेळ लागेल आणि अधिक वेळेस वैद्यांना भेट द्यावी लागणार. मग ते कसं जमायचं हे समजल नाही. पुणे( किंवा पुणे-मुंबै पट्ट्यात) त्या तोडीचे उपचार कुठेतरी असतीलच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

चिंटु,

प्रास
Sun, 07/17/2011 - 14:35 नवीन
व्य. नि. बघावा.
  • Log in or register to post comments

चिंटूस, माझा अनुभव सांगतो.

जयंत कुलकर्णी
Sun, 07/17/2011 - 16:14 नवीन
चिंटूस, माझा अनुभव सांगतो. माझ्या गुड्घ्यातील लिगॅमेंटस जेव्हा काढली तेव्हा मला हाच प्रश्न पडला होता. मी २ वर्षे पोहलो ते आजतागायत मला कधीही त्रास झाला नाही. पण भुकेमुळे जास्त खाल्यामुळे वजन मात्र वाढले. आपला जर खाण्यावर नियंत्रण असेल तर ताबोडतोब पोहायला लागा. २/३ महिन्या ]नंतर बोलू.
  • Log in or register to post comments

आपटे म्हणतात त्याप्रमाणे

अप्पा जोगळेकर
Sun, 07/17/2011 - 19:34 नवीन
आपटे म्हणतात त्याप्रमाणे वातामुळे हा आजार होत असेल असेच मलाही वाटते. त्रास होणारी व्यक्ती अजिबात व्यायाम करत नसावी असे वाटते. बर्‍याच वेळेला असा अनुभव आला आहे की डॉक्टर लोकांना अशा गोष्टींचे निदान करता येत नाही. तुम्ही स्वतःच तुमच्या आहार-विहाराचे अत्यंत बारकाईने अ‍ॅनॅलिसिस करुन पाहिलेत तर उपाय साप्डेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

होय. व्यायामशून्य जीवनशैली आहे, हे खरे आहे.

चिंटु
Sun, 07/17/2011 - 21:46 नवीन
सकाळी उठुन रोज पाचेक किलोमीटर फिरुन येतो.(जाताना अडीच तीन, येताना अडीच तीन, सकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान). पण हा व्यायाम म्हणुन पुरेसा नाही हे कबुल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

रोज ५ किमी

नितिन थत्ते
Sun, 07/17/2011 - 22:03 नवीन
एवढा व्यायाम पुरेसा आहे बहुधा. तुम्ही फार थंड जागी बसता/झोपता का? एसी फार जास्त ठेवता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

म्हणजे..हो.

चिंटु
Sun, 07/17/2011 - 22:30 नवीन
इतरांपेक्षा मला पंखा वगैरे ची गरज कमी लागते.तरीपण इथे सगळ्या रूममेट्स ना जोरात पंखा वगैरे लागतो, म्हणुन ते बिंदास लावतात. मी पांघरुण कधी डोक्यावरुन घेउन तर कधी पायात मोजे घालुन झोपतो.मला थंडी जास्त वाजते. झालच तर ऑफिस म्हणजे एक एम एन सी कार्यालय आहे, तिथेही दिवसातले ८-१० घंटे एसी झेलावा लागतो. त्याचाही संबंध असु शक्तो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

नक्कीच असू शकतो! एसीने

मी ऋचा
Mon, 07/18/2011 - 11:59 नवीन
नक्कीच असू शकतो! एसीने सान्धेदुखी हि फारच कॉमन गोष्ट आहे! बाकी पूण्यातल्या डॉक्टर्स बद्दल काही माहिती नाही. नाग्पूरला कधी चक्कर झाली तर डॉ. अनिल गोल्हर, (एम. एस. ऑर्थो) रामदास्पेठ यांना नक्की म्हण्जे नक्की दाखवा. त्यांचा हातगुण म्हणजे जादू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

एक सूचना

प्रदीप
Mon, 07/18/2011 - 18:10 नवीन
झालच तर ऑफिस म्हणजे एक एम एन सी कार्यालय आहे, तिथेही दिवसातले ८-१० घंटे एसी झेलावा लागतो.
ऑफिसात गरम कपडे घालून बसा; उदा. कमीतकमी एकादा विंडब्रेकर तरी काही दिवस घालून पहा. (नित्यनेमाने करणार्‍या गोष्टी एकेक करून वगळून पाहिल्यात का? उदा. काही दिवस कामावरून रजा घेतली असेल, तर त्या दिवसांतही हा त्रास होतो का? अथवा इतर काही खाण्ञापिण्यातील पदार्थ, उदा. दही/ ताक वर्ज्य करणे इ. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

तुम्ही गुडघ्याचा एक्सरे काढला

अनामिक
Sun, 07/17/2011 - 20:38 नवीन
तुम्ही गुडघ्याचा एक्सरे काढला म्हणताय.... मग त्यात काही आढळून आले का? माझी आत्या, जी वयाने जास्तं आहे, पण तिच्या बाबतीत गुडघ्याच्या वाटीखाली असलेले फ्लुईड कमी झाले, आणि त्यामुळे उठता बसताना मांडी आणी पोटरीचे हाड त्यांना जोडणार्‍या गुडघ्याच्या वाटीवर आतून घासले जाऊ लागले. त्यामुळे तिला प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. तुमच्या बाबतीतही तसेच काही आहे का याचे नीट निदान करुन घ्या, व डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार करा.
  • Log in or register to post comments

एक्स रे नॉर्मल आहे म्हणतात सगळे.

चिंटु
Sun, 07/17/2011 - 21:49 नवीन
अस म्हणणार्‍यांमध्ये ओर्थोपेदिक तज्ञही आले अन् M S मेदिसिन वाले प्रॅक्टिशनर पन आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक

ईश आपटे
Sun, 07/17/2011 - 22:45 नवीन
अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक महत्वाचे कारण आहे. हे बरेच अ‍ॅलोपेथीक डाक्टर पेशंटला सांगत नाहीत. आयुर्वेदिक वैद्यांना हे पूर्ण माहिती आहे. ह्या कारणामुळेच धातुक्षय झाल्याने शेकडा ९०% गुडघेदुखी बरी होत नाही
  • Log in or register to post comments

>> अति सेक्स हे गुडघे दुखीचे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 07/18/2011 - 13:22 नवीन
>> अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक महत्वाचे कारण आहे काही मित्रांकडून कंबरदुखीचे ऐकले होते ;-) गुढघ्याचे प्रथमच ऐकतो आहे. >>ह्या कारणामुळेच धातुक्षय झाल्याने शेकडा ९०% गुडघेदुखी बरी होत नाही ओ आपटेकाका, इथे धातू म्हणजे वीर्य असा अर्थ धरायचा आहे का ? तसे असेल तर त्याचा आणि गुडघ्याचा नक्की काय संबंध आहे ? आणि मग हस्तमैथुनाने पण होते का गुडघेदुखी? तसे असेल तर मग "जगी गुडघेदुखी मुक्त असा कोण आहे?" ते सोडा, स्त्रीयांना नक्की कशामुळे गुडघेदुखी होते? धातू या शब्दाचा वेगळा अर्थ असेल तर सांगा, मग परत बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

अहो हे फॅमेली डाक्टर

ईश आपटे
Mon, 07/18/2011 - 18:25 नवीन
अहो हे फॅमेली डाक्टर पुरवणीतील माहिती व जनसामान्यात असणार्‍या जुन्या रुढी व माहिती ह्यांनुसार आहे. अतिसेक्सचा कमरेशी संबंध आहे व गुडघा कमरेपासुन लांब नाही....... तसेच धातु रस,रक्त इ. ७ आहेत व वीर्य ही त्या ७ पैकी एक धातु आहे. अधिक माहिती आयुर्वेदाच्या पुस्तकात किंवा वैद्यांना विचारावी........................ मी अनेक कारणांपैकी एक कारण (९०%)असा उल्लेख केला आहे. केवळ तेच कारण आहे अस म्हणलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सर्व मिपाकरांच्या वतीने

शाहरुख
Tue, 07/19/2011 - 21:59 नवीन
सर्व मिपाकरांच्या वतीने विचारतोय, अति म्हणजे किती ते तरी सांगा ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

+१

धमाल मुलगा
Wed, 07/20/2011 - 17:41 नवीन
असेच विचारतो. -(अति शहाणा) धम्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख

मुद्दाच

गवि
Wed, 07/20/2011 - 17:54 नवीन
मुद्दाच नसताना सगळे तपशिलात कसे काय जाताय बुवा कळत नाही.. कसला धातू आणि कसला क्षय.. आणि त्याने गुडघेदुखी होते? साप म्हणून कायतरी धोपटत बसण्याचा प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कारण

Nile
Wed, 07/20/2011 - 17:57 नवीन
आजकाल फारच गुडघे दुखताहेत हे सांगत फिरायला कारण हवं असेल त्यांना... तुम्ही नका काळजी करू. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शारुखभायने बोला...

धमाल मुलगा
Wed, 07/20/2011 - 18:08 नवीन
सर्व मिपाकरांच्या वतीने विचारतोय सर्वेऽ सुखिन:संतु...... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/20/2011 - 18:16 नवीन
मला फ्लर्टची जाहिरात आठवली. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हाईट

ईश आपटे
Wed, 07/20/2011 - 18:50 नवीन
हे मात्र किती ही सौजन्य दाखवायच म्हंटल तरी सहन करण्यापलीकडे आहे................. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काका मला वाचवा...

सोत्रि
Mon, 07/25/2011 - 15:36 नवीन
मेलो रे हसुन हसुन! अरे तो बिचारा चिंटु विचारतोय काय आणि तुम्ही सगळॆ त्याला सांगताय काय ..... - (अती अवांतर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

_/\_

सोत्रि
Mon, 07/25/2011 - 15:36 नवीन
विमे, लैभारी.कॉम - (गुडघेदुखीचा त्रास असणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक...

खादाड_बोका
Sun, 07/17/2011 - 23:11 नवीन
अति सेक्स हे गुडघे दुखीचे एक महत्वाचे कारण आहे. कुठे लिहीले आहे. मुर्खासारखे काही बरळु नको.
  • Log in or register to post comments

फॅमिली डॉक्टर ही पुरवणी वाच व

ईश आपटे
Sun, 07/17/2011 - 23:16 नवीन
फॅमिली डॉक्टर ही पुरवणी वाच व जुने अंक शोध. आयुर्वेदिक तज्ञांना विचार... मूर्खासारख लिहु नको...
  • Log in or register to post comments

हो.

चिंटु
Tue, 07/19/2011 - 15:21 नवीन
आयुर्वेदाचं तसं म्हणणं असल्याचं ऐकलय. पण आपल्यापेक्षा भोगवादी आणि चंगळवादी समाज समजल्या जाणार्‍या पाश्चात्त्य जगात तर मग सर्वत्रच गुडघेदुखीचे थैमान असायला हवे ना. ते का दिसत नसावे अशी शंका येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश आपटे

Do you have flat foot, I have

APPLE
Mon, 07/18/2011 - 00:58 नवीन
Do you have flat foot, I have similar problem of knee pain because of flat foot and got much relief by adding shoe support. I hope this may help you. Sorry I can not write in Marathi font. Apple
  • Log in or register to post comments

आपली जीवनशैली व शरीरप्रकृती

पाषाणभेद
Mon, 07/18/2011 - 08:44 नवीन
आपली जीवनशैली व शरीरप्रकृती आदर्शतेकडे झुकणारी आहे. असे असतांनाही आपणाला हा त्रास व्हावा व त्याचे निदान चांगल्या तज्ञांनाही न व्हावे याचे आश्चर्य वाटते. एकाचवेळी अनेक प्रयोग शरीरावर करू नका. सध्या आहाराबाबत योग्य ती काळजी घ्या. जास्त चालू नका. अन मग बघा काय होते ते. आपल्याला कशाने आराम वाटतो ते येथे सांगणे म्हणजे आपल्या आजाराचे स्वरूप व त्यावरची उपाययोजना सगळ्यांच्या ध्यानात येईल. धाग्यावर लक्ष ठेवून आहे. व्यवस्थापकांना: मागे आरोग्याविषयी एक नविन सदर चालू करावे असे सुचवले होते. बर्‍याच सदस्यांनी त्याची आवश्यकता लक्षात घेवून त्यास अनुमोदनही दिले होते. फक्त ते सदर चालू झाल्यानंतर एखाद्या वैद्याचा किंवा औषधी कंपन्यांचा किंवा आजाराच्या शंका मनात घालणार्‍या लेखांचा उदोउदो करणार्‍या बाजारू लेखांचा नसावा. त्यात केवळ रुग्णांनी एकमेकांना सहाय्य केलेलेच लेख असावेत. डॉक्टर वैद्य लोकांचे लेख नसावेत. त्यांचे लेख केवळ वाचकांच्या मनात अवास्तव भिती घालणारे, शंका निर्माण करणारे व केवळ आजाराचे लक्षणे सांगणारेच असतात.
  • Log in or register to post comments

सूचनेशी सहमत.

स्वानन्द
Mon, 07/18/2011 - 08:54 नवीन
सूचनेशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मालक हि सूचना लवकरच अमलात

स्पा
Mon, 07/18/2011 - 09:03 नवीन
मालक हि सूचना लवकरच अमलात आणणार आहेत
  • Log in or register to post comments

वैद्य श्री नरेन्द्र पेन्डसे

तत्सत
Mon, 07/18/2011 - 10:59 नवीन
वैद्य श्री नरेन्द्र पेन्डसे, स. प. महाविद्यालयाजवळ, टिळक रोड, पुणे.
  • Log in or register to post comments

ऑलीव ऑईल

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 07/18/2011 - 12:20 नवीन
ऑलीव ऑईलने सकाळ संध्याकाळ रोज मालीश करा. दोन महीन्यात आराम पडेल. हो पण ऑलीव ऑईल अस्सल हवे.
  • Log in or register to post comments

सोपा उपाय..

योगप्रभू
Mon, 07/18/2011 - 12:42 नवीन
गर्लफ्रेंडला मांडीवर बसवून फार वेळ गप्पा मारत जाऊ नका. तरुणपणी गुढघेदुखीचा त्रास तिथूनच सुरू होतो. :)
  • Log in or register to post comments

एकूणात काय तर तुम्ही

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/18/2011 - 12:46 नवीन
एकूणात काय तर तुम्ही पॄथ्वीलाच नव्हे तर स्वतःला देखील भार झाला आहात. ;) असो.. विनोदाचा भाग सोडल्यास वरती श्री. सफरचंद ह्यांने म्हणल्याप्रमाणे शू-सपोर्ट हा अत्यंत साधा व सोपा उपाय आहे. सध्या जर बुट वापरत असाल तर त्यात अजून एक एक्स्ट्रा कुशन टाकुन पहा, नक्कीच फरक जाणवेल. तसेच शॉर्ट सॉक्स व बुटाच्या आत अ‍ॅक्युप्रेशर सोल वापरल्याने देखील फरक नक्की पडेल. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

दोन्हीपैकी खालील प्रॉडक्टवर

गवि
Mon, 07/18/2011 - 16:37 नवीन
दोन्हीपैकी खालील प्रॉडक्टवर नजर सुरक्षा कवच पेंडंट /ब्रेसलेट फ्री आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सायकलिंग करुन बघा

रणजित चितळे
Mon, 07/18/2011 - 15:56 नवीन
रोज ५ ते ६ किमी सायकलिंग करा, मला वाटते बरे वाटेल त्यांने. आमच्या कडे एकाचा हाच पॉब्लेम होता. घुडग्याच्या स्नायूंना नेमका व्यायाम मिळतो. करुन बघा.
  • Log in or register to post comments

आभार.

चिंटु
Tue, 07/19/2011 - 15:19 नवीन
पण सध्या दहाएक दिवस तरी सायकलिंगला मनाई केलेली आहे चिपळूणकर सरांनी. दोन्-चार वर्षापूर्वीपर्यंत दिवसाला १०-१२ किमी चालवायची सवय होती सायकल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

छोटे चिंटु का बडा ईश्यु....

गणपा
Tue, 07/19/2011 - 16:10 नवीन
दिवसाला १०-१२ किमी चालवायची सवय होती सायकल.
सकाळी उठुन रोज पाचेक किलोमीटर फिरुन येतो.
आणि आताशा जीम पण लावताय. अती तेथे माती झाली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

तसं नाही.अंमळ* गल्लत होतिये.

चिंटु
Tue, 07/19/2011 - 17:55 नवीन
सायकल चालवायचो कॉलेजात असताना, तेव्हा फिरत बसायला वेळ नव्हता. कॉलेज, कट्टा आणि दोस्त हाच काय तो दिनक्रम होता. ह्या तीनही गोष्टींसाठी ग्रॅज्युएशन दरम्यान सायकलवरच जावे लागयचे. तेव्हा इतर काही नव्हते. इथे जॉब करतोय करतोय तेह्वापासुन सायकल सुटली. पण सकाळी लवकर(की वेळेवर?) उठायची सवय कायम आहे. मग उठल्यावर सहजच फिरावस वाटल्यामुळे आपोआप निय्मित फिरु लागलो. अजुनतरी जिम लावलेली नाही. जिम लावल्यावर फिरायला नियमित वेळ देता येणार नाही असे वाटते. * " अंमळ गल्लत " हा वाक्प्रचार इथल्या नेहमीच्या सदस्याकडुन उधार घेतलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आभार्....पण

चिंटु
Mon, 07/18/2011 - 13:55 नवीन
@स्वानन्द:- एम आर आय स्कॅन अजुन केलेला नाही. ३-४ वेगवेगळ्या ओर्थो स्पेशालिस्त़कडे दाखवल्यावर त्यापैकी कुणीच एम आर आय वगैरे सुचवलेलं नव्हतं. माहितीबद्दल आभार; आता त्यांच्याशी पुनश्च बोलेन ह्याच्याबद्द्ल. कुठलाही अपघात कारणीभूत नव्हता. हळुहळु सुरु झाली. छोट्याशा प्रमाणावरुन सुरु होउन आता पुर्ण दिमाग खराब केलय. @जयंत कुलकर्णी :- आपले लिगामेंट्स खराब झाले होते का? गुदघे दुखत होते का? @मी ऋचा :- माहितीबद्द्ल थँक्स. पोटाची खल्गी भरायला एसी मध्ये काम करणं भाग आहे असच सध्या वाटत आहे. @ईश आपटे :- तुम्ही दिलेली शक्यता फॅमिली दॉक्तर मध्ये आहे, हे खरे आहे. पण तांब्यांच्या बाबत म्हनाल तर त्यांच्या औषधात तथ्य असेलही, पन कधी कधी ते आरोग्य्+आध्यात्म्+कर्मकांड ह्यांची अशी काही बेमालूम सरमिसळ करतात की काहिच कळत नाही. आजार आणि औषध ह्याबद्दलच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्म परवडत. कारण नाही तर ते इतके काही infeasible उपाय सुचवतात किंवा गीतेतले दाखले देतात की सध्या जॉब सोडुन थेट २४x7 केवळ तब्येतीचीच देखभाल करावी लागेल असं वाटत्. मी निम्न्-मध्यमवर्गीय (थोदक्यात दरिद्री) परिस्थितित असल्यान त्यांचं सगलच काही ऐकनं जमेल असा वाटत नाइ. @apple :- नाही. मझा flat foot नाही. साधा नोर्मल वाला आहे. @पाशान्भेद :- आभार. आरोग्य्-सदर सुरु झाल्यास छानच. @तत्सतः- शतशः आभार. डॉ पेंडसे ह्यांच्याकदे आजच जात आहे. @मिसळलेला काव्यप्रेमी :- ओलिव्ह नाही पन "ऑर्थ्रोसोन" (हळ्द्,तुलस वगैरे वनस्पतींचे औषधी तेल) नामक एका औषधी तेलानं मसाज केलाय. काही काळ आराम पडातो हे खरय. पण ते आहे pain killer. त्यानं दुखने बरे होत नाही. मला cure हवाय. त्याही आधी मला हवाय diagnosis. शिंचं झालय काय तेच कळेना, उपाय कसले करु मग? @योगप्रभु :- बरोबर आहे. पन मग मांदीवर बसवल्यावर गप्पा न मारता इतर काही केले तर गुदघेदुखी थाम्बेल का? त्यासाथी आधी गरलफ्रेंड आनायची कुथुन तेही सांगा. @परिकथेतील राजकुमार:- करुन बघतो . सांगतो. सगळ्या सगळ्यांचे आभार. मी अजुन मराठी टायपिंग शिकतोय, त्यामुळे वेगात लिहिण्याच्या नादात बर्‍याच चुका होतात. क्शमस्व. फक्त एक सांगु का? कुठलाही उपाय सांगण्यापेक्षा जर योग्य डोक्टर्/वैद्य्/इस्पितळ सुचवलेत तर जास्त उपयुक्त ठरेल असा मला वाटते. कारण आपण सांगितलेले उपाय कुठल्या एका विशिष्ट दुखण्यासाठी योग्य असु शकतील, पण इथे नेमक "गुडाघ्यामध्ये भसकलेलं तरी काय आहे" हेच माहित नाही. त्याचं निदानही/diagnosis झालेले नाही. त्यामुळे योग्य ते निदान झाल्यावर अचुक उपचार मिळतील अशी मी आशा करतोय. जसे की एम आर आय काढुन एखाद्या तज्ञाला दाखवावा असा विआचर सध्या करतोय. पुन्हा सगळ्यांचे आभार. अशुद्धलेखनाबद्दल पुन्हा क्षमस्व.मी प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments

यासाठी अजून योग्य किंवा खास

गवि
Mon, 07/18/2011 - 14:26 नवीन
यासाठी अजून योग्य किंवा खास सिद्ध डॉक्टरची गरज आहे असं तुम्ही दिलेल्या माहितीवरुन वाटत नाही. ज्याअर्थी ऑर्थोपेडिक क्लिनिकल टेस्ट आणि एक्स रे (मुख्यतः ऑर्थोपेडिक मोडॅलिटी) यात काही अ‍ॅबनॉर्मल नाही आणि तरीही वेदना होतात, त्याही वजन पडल्यावर / चढताना वगैरे. म्हणजेच लक्षणे तीव्र आहेतच. या स्थितीत डॉक्टर्सनी नक्कीच अजून वरच्या लेव्हलची तपासणी (सी.टी. आणि नंतर एम आर आय (सॉफ्ट टिश्यूच्या आजारांसाठी)) तसेच इतर आवश्यक त्या रक्तचाचण्या वगैरे सुचवायला हव्या होत्या. तशा ते सुचवत नाहीयेत याचा अर्थ -डॉक्टर्सना काही अ‍ॅब्नॉर्मॅलिटी (निदान उपचार करुन सुधारण्यासारखी) नसल्याची खात्री आहे. किंवा -ते तुमची लक्षणे कॅज्युअली घेत आहेत. यावर उपाय हाच की त्यांना पुढील लेव्हलच्या तपासण्या करुन घेण्याची तुमची इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवणे. पुन्हापुन्हा त्यांच्याकडे जाऊन लक्षणे सुधारत नाहीयेत हे सांगणे. अर्थात पुढच्या टेस्ट्स कोणत्या हे त्यांनी ठरवायचे आहे. डॉक्टर्स बदलून फार काही फायदा नाही. एक शक्यता अशीही आहे की तुमचा वेदनांचा थ्रेशहोल्ड कमी आहे (किंवा झाला आहे). अशा वेळी प्रत्यक्ष वेदनेपेक्षा पर्सिव्ह्ड वेदना खूप जास्त असते. पण खासकरुन पायावर गुरुत्वाकर्षणाच्या उलट दिशेने ताण पडला (अँटि ग्रॅव्हिटी) की जास्त वेदना होत आहेत. आणि बसून राहिले की वेदना होत नाही. त्यामुळे ही शक्यता कमी असावी. फिजिओथेरपिस्टला दाखवणे हाही एक उत्तम उपाय ठरु शकतो. नुसत्या एसीने अशा प्रकारची वेदना होणे अनकॉमन वाटते. ऑर्थोपेडिकने पूर्णपणे हात वर केले असतील तर न्यूरॉलॉजिस्टला दाखवा. वर्णनावरुन न्युरॉलॉजिकल जास्त वाटते आहे (नर्व पेन). गुडघ्यात लोकल काही गडबड नसावीही कदाचित, तो एक लोड बेअरिंग पॉईंट असल्याने अनेक आजारांची वेदना तिथे प्रकट होऊ शकते. बी १२ आणि डी ही जीवनसत्वे बराच अविश्वसनीय हॅवॉक घालू शकतात. तीही प्रमाणात ठेवलीच पाहिजेत. हे सर्व आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या अनुभवांनी आणि विषयातल्या रुचीमुळे लिहीलं. यात कोणताही थेट वैद्यकीय सल्ला नाही आणि एकूणच आंतरजालावरुन आलेला कोणताही सल्ला फक्त माहिती म्हणूनच घ्यावा हे वेगळे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा