वयाच्या चोविसाव्या वर्षीच गुडघेदुखीने त्रस्त झालोय. विविध M S medicine असणार्या तज्ञांना दाखवूनही उपयोग न झाल्यानं मग M S Orthopedic ना सुद्धा दाखवलय. अगदि पुण्यातल्या खास ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असणार्या संचेती हॉस्पिटलला सुद्धा! पण कुणालाही नक्की काय बिघडलय ह्याचा अंदाज आलेला नाही.
त्यांच्या मते मी फिट, धडधाकट ,शिडाशिडित असा तरुण आहे. पण ज्याचं दुखतं त्यालाच कळतं ह्याचा अनुभव घेतोय.
पायर्या चढताना कटकट. बसमधुन जाताना कटकट.अगदि मांडी घालून बसायचीही सोय राहिलेली नाही.जीव अगदि मेटाकुटीला आलाय. पुण्यातल्या खडीवाल्या वैद्यांकडेही सहाएक महिने जाउन आलो, मात्र तीळभरही फरक नाही.
कुणी मिपाकर ह्याबाबतीत सल्ला देउ शकतील काय?
माझी तब्येत म्हणाल तर इतर बाबतीत अगदि व्यवस्थित आहे. मागील तीनेक वर्षात साधी सर्दी वगळता कुठलाही आजार झालेला नाही. ऑफिसमध्ये कधीही सिक लीव्ह टाकावी लागलेली नाही. उंची १६६ सेमी,म्हणजे सुमारे साडेपाच फूट, वजन ५७ किलो. दारु, सिगारेट ह्यापासुन चार हात लांबच असतो.वयही फारस नाही.
मग नक्की काय उपाय करता येइल?
कुणी इतर डॉक्टर क्रुपया सुचवावेत.
आणि हो, मागील तीनेक वर्शापासुन मी मिपा वाचतोय, कधीच काहीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण मला मिपा खुप खुप आवडते. तुम्ही कुणी मदत करु शकाल अशी आशा वाटली म्हणुन इथे ह धागा टाकला.
कुणी काही सुचवा प्लीज.
-- गुडघेदुखीने त्रस्त छोटा चिंटु
वाचने
68442
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
साधा सोपा उपाय
पाठीवरच झोपतो हो झोपताना.
In reply to साधा सोपा उपाय by चेतन सुभाष गुगळे
पाठीवरच झोपतो हो झोपताना.
In reply to साधा सोपा उपाय by चेतन सुभाष गुगळे
उपाय
काहिच कळले नाही.
In reply to उपाय by नितिन थत्ते
अरे बापरे
फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी
In reply to अरे बापरे by सहज
खरंच या थिअरीमुळे गुडघेदुखी
In reply to अरे बापरे by सहज
काका
In reply to अरे बापरे by सहज
शी बै आच्रत...
In reply to काका by रामदास
गुडघे खरचटल्याच्या तक्रारी
In reply to काका by रामदास
_/\_
In reply to काका by रामदास
खल्लास!!
In reply to काका by रामदास
ईश आपटे यांची गुडघेदुखीची
In reply to अरे बापरे by सहज
मेलोऽऽ...
In reply to अरे बापरे by सहज
हे करुन पहा...
तुमच्या गुडघ्याच्या एक्सरेचा
तुम्ही तुमच्या रक्तातील यूरीक
संधि सुधा वापरुन बघा.... सहन
या धाग्यात फक्त कोलगेट आणि
-१
In reply to या धाग्यात फक्त कोलगेट आणि by विजुभाऊ
किंचित दुरुस्ती
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
गुडघेदुखीच्या ( knee pain ) वाढत्या समस्या