✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाचवा या गुडघेदुखीतून....

च
चिंटु यांनी
Sun, 07/17/2011 - 13:05  ·  लेख
लेख
वयाच्या चोविसाव्या वर्षीच गुडघेदुखीने त्रस्त झालोय. विविध M S medicine असणार्‍या तज्ञांना दाखवूनही उपयोग न झाल्यानं मग M S Orthopedic ना सुद्धा दाखवलय. अगदि पुण्यातल्या खास ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असणार्‍या संचेती हॉस्पिटलला सुद्धा! पण कुणालाही नक्की काय बिघडलय ह्याचा अंदाज आलेला नाही. त्यांच्या मते मी फिट, धडधाकट ,शिडाशिडित असा तरुण आहे. पण ज्याचं दुखतं त्यालाच कळतं ह्याचा अनुभव घेतोय. पायर्‍या चढताना कटकट. बसमधुन जाताना कटकट.अगदि मांडी घालून बसायचीही सोय राहिलेली नाही.जीव अगदि मेटाकुटीला आलाय. पुण्यातल्या खडीवाल्या वैद्यांकडेही सहाएक महिने जाउन आलो, मात्र तीळभरही फरक नाही. कुणी मिपाकर ह्याबाबतीत सल्ला देउ शकतील काय? माझी तब्येत म्हणाल तर इतर बाबतीत अगदि व्यवस्थित आहे. मागील तीनेक वर्षात साधी सर्दी वगळता कुठलाही आजार झालेला नाही. ऑफिसमध्ये कधीही सिक लीव्ह टाकावी लागलेली नाही. उंची १६६ सेमी,म्हणजे सुमारे साडेपाच फूट, वजन ५७ किलो. दारु, सिगारेट ह्यापासुन चार हात लांबच असतो.वयही फारस नाही. मग नक्की काय उपाय करता येइल? कुणी इतर डॉक्टर क्रुपया सुचवावेत. आणि हो, मागील तीनेक वर्शापासुन मी मिपा वाचतोय, कधीच काहीही लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण मला मिपा खुप खुप आवडते. तुम्ही कुणी मदत करु शकाल अशी आशा वाटली म्हणुन इथे ह धागा टाकला. कुणी काही सुचवा प्लीज. -- गुडघेदुखीने त्रस्त छोटा चिंटु
  • वाचवा या गुडघेदुखीतून.... भाग २ (निदान/diagnosis झाले)

Book traversal links for वाचवा या गुडघेदुखीतून....

  • वाचवा या गुडघेदुखीतून.... भाग २ (निदान/diagnosis झाले) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
68061 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

ब्लड टेस्ट केली. सर्व नॉर्मल आहे.

चिंटु
Mon, 07/18/2011 - 15:16 नवीन
बी१२, डी व्यवस्थित आहे. सप्लिमेंट म्हणुन तरीही ८-१० महिने त्याच्या गोळ्या घ्यायला सांगण्यात आल्या. त्या घेतल्या. संचेती ओर्थोपेडिक सेंटार मध्ये एक खास तज्ञांचे फिजिओथेरपिस्ट सेंटर आहे. त्यांनी सांगितलेले गुडघ्याचे काही व्यायाम व काही Ham string/muscles व्यायाम करतोय,मागील सहा-एक महिन्यापासुन. पण त्रास वाढतोच आहे. डोक्टर म्हणतात नियमित gym जॉइन कर्.तुला काहीही झालेल नाही. मी म्हणालो की दुखत आहे,मला वेदना जाणवत आहेत. कदाचित त्या तुमच्या पकडीत येत नसाव्यात. आज पासुन gym जॉइन करतोय.भ्रमिष्ट होण्याची वेळ आधीच आली आहे. एका न्युरोलॉजी मध्ये उच्च शिक्षण समवयीन डॉक्टर मित्रास बोललो होतो. त्याने चक्क हा "मानसिक त्रास" किंवा नैराश्याचे शरीरावरील प्रकट रूप असण्याची शक्यताही बोलुन दाखवली.वस्तुस्थिती तशी नाही. इतर सर्व गोष्टी आयुष्यात सर्वसाधारण आहेत. त्या खूप चांगल्या नाहित तशाच त्या खूप वाइटही नाहित. "नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती इतक्या समर्थपणे दैनंदिन व्यवहार पार पाडेल असं वाटत नाही." हे उद्गार एका psychiatrist ने मला तपासल्यावर काढले व तशी शक्यता नाकारली. नैराश्यामुळे दुखणे उद्भवले असे नसुन दुखण्यामुळे मन निराश होत आहे अशी माझी तक्रार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

न्युरॉलोजिस्ट आणि

गवि
Mon, 07/18/2011 - 15:27 नवीन
न्युरॉलोजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट यात प्रचंड गोंधळ झालेला आहे. न्युरॉलॉजी म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम अशा दोन्हीचा तज्ञ. त्यात मन नव्हे तर मेंदूपासून बोटाच्या टोकापर्यंत पसरलेल्या नसा (हालचालीसाठी आणि स्पर्शज्ञानासाठी) / न्युरॉन्स वगैरेचा समावेश होतो. मनाचा इथे काही संबंध नाही. तुमची कशालाच दाद न देणारी लक्षणे मानसिक नसून न्युरॉलॉजिकल (नसा आणि एकूण नर्व्हस सिस्टीमशी) संबंधित असू शकतात. र्‍हुमॅटॉलॉजिस्ट हे ऑटोइम्युन विकारांचे तज्ञ असतात त्यांच्याकडे आर्.ए. वगैरे नाही ना ते बघण्यासाठी जाता येईल. या प्रकारच्या आर्थ्रायटिसचा ऑर्थोपेडिकशी संबंध नाही. पण इतके खात्रीने डॉक्टर्स म्हणताहेत तर नक्कीच व्यायाम न चुकता सलग अनेक महिने करत राहून फरक पहायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

एम आर आय स्कॅन चा खर्च पाच ते

स्वानन्द
Mon, 07/18/2011 - 17:57 नवीन
एम आर आय स्कॅन चा खर्च पाच ते सहा हजार असतो. कदाचित त्यामुळे सहसा डॉक्टर हा स्कॅन लगेच रेकमेंड करत नसावेत असा माझा अंदाज आहे. पण तुम्ही सतत पाठपुरावा केलात.. तर कदाचित ते स्कॅन करून घ्यायला सांगतील असे वाटते. जर लिगामेंट स्प्रेन असेल तर बाहेरील उपचारांनी ( तेल लावणे वगैरे ) मुळे सुधारणा होऊ शकेल. पण जर लिगामेंट टीअर ( पार्शिअल किंवा संपुर्ण ) तर कितीही बाह्योपचार केल्याने गुण येणे कठीण वाटते. डॉक्टरांना वारंवार भेटून किमान काय झाले आहे ह्याचे निदान होणे आवश्यक आहे असे वाटते. डॉ. हर्डीकर किंवा डॉ. वैद्य ( लोकमान्य हॉस्पिटल ) यांना हवे तर एकदा दाखवून पहा. ( अर्थात सतत डॉक्टर बदलण्यात ही अर्थ नाही वेळ आणि पैशाचा विनाकारण व्यय होइल. एकच डॉक्टर पकडा आणि निदान करून घ्या ) शिवाय गुगल वर या विषयावर बरीच माहिती मिळेल. एकाच साईट वरील माहिती वर विसंबून राहू नका. जेवढे जास्त शोधाल तेवढी तुम्हाला गुडघेदुखीबद्दल अधिक माहिती मिळेल. हे फक्त माहिती साठी बरं. डॉकटरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

तांबे

नितिन थत्ते
Mon, 07/18/2011 - 14:22 नवीन
बालाजी तांबे हे वैद्य, हकीम, डॉक्टर किंवा वैदू यापैकी काहीही नाहीत हे येथे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Mon, 07/18/2011 - 14:28 नवीन
हेच लिहायला आलो होतो. शुभेच्छा आहेतच. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

शंका

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/18/2011 - 14:35 नवीन
त्यांच्या संस्थळावर देखील त्यांना वैद्य अशी पदवी लावण्यात आलेली आहे. नक्की माहिती कोणाला आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

माहिती

नितिन थत्ते
Mon, 07/18/2011 - 15:04 नवीन
या ठिकाणी पूर्वी दुवा दिला होता तो आता चालत नाही.:( परंतु या दुव्यावर (सर्वात खाली) मात्र तसे लिहिले आहे. हा दुवा त्यांचे कौतुक करणारा असल्याने ही माहिती खरी धरायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

होय.

चिंटु
Mon, 07/18/2011 - 15:03 नवीन
त्यांच्या मुलाखतीत असं ऐकलेल आहे की ते मुख्यतः मेकॅनिकल इंजिनीअर आहेत.१९८० पर्यंत तोच त्यांचा मुख्य धंदा होता. मात्र त्यानंतर त्यांनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात प्रॅक्टिस सुरु केली. देश्-विदेशाहुन त्यांच्याकडे भारतीय्-पाश्चात्त्य असे अनेक मोठ्-मोठे लोक येउ लागले. आयुर्वेदाचा अभ्यास हा त्यांच्या घराण्यात परंपरेने चालत आलाय म्हणतात. त्यांना देशो देशीचे विविध पुरस्कार मिळाले. अनेकांनी त्यांच्या उपचारातुन फायदा झाल्याचे सांगितले. नंतर ९० च्या दशकाच्या शेवटी सकाळ मधुन फॅमिली डोक्टर पुरवणी सुरु झाल्यावर तर त्यांच्या नावाची चर्चा घराघरात जाउन पोचली. आता तर ते गीता वगैरे तत्वज्ञानावर प्रवचन करताना सकाळच्याच साम वाहिनीवर दिसतात. आयुर्वेदाची त्यांना डिग्री आहे की नाही माहित नाही. डिग्री नसताना अशी प्रॅक्टिस कायदेशीर आहे की नाही हेही माहित नाही. पण जर बेकायदेशीर असती तर आतापर्यंत कुणी ना कुणी योग्य ती कारवाइ केलीच असती की. असो. हे अवांतर होतय. श्री तांबे ह्यांच्यबद्दल अधिक सांगण्यापेक्षा सध्या माझे पूर्ण लक्ष माझ्या स्वतःच्या तब्येतीकडे देणे भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

थोडे

श्रावण मोडक
Mon, 07/18/2011 - 17:24 नवीन
थोडे तांबे यांचेही ऐका. तुमचे दुखणे नाडी आणि सांधे यांच्याशी संबंधित असेल तर हवामें उडता जाये हे गाणं ऐकत जा. ;) 'सकाळ'मधला मूळ दुवा न सापडल्याने हा त्यासंबंधीच्या लेखाचा दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

उंच खुर्चीवर बसल्यावर

रामदास
Mon, 07/18/2011 - 21:46 नवीन
जास्त त्रास होतो असे तुमचे म्हणणे आहे.म्हणजे उंची(तुमची) मध्यम असल्यामुळे पाय टेकत नाहीत का ? असे असेल तर पाय दुखत असतील. एसीच्या गारव्यामूळे पाय खास करून पोटर्‍या दुखतात.गुडघे दुखल्याचे ऐकीवात नाही तरीपण गुडघ्यापासून नडगीपर्यंत गरम कापडाचा पट्टा गुंडाळून बसत जा. (पूर्वी पोलीसाच्या पायाला गुंडाळलेल्या पट्ट्या असायच्या तशाच पट्ट्या.) ही गुडघे दुखी वाढत जाते आहे असे वाटल्यास नक्कीच एका पेक्षा जास्त तज्ञांना दाखवा. पाठीच्या मणक्यांचा एक्स रे काढून घ्या. संधीवाताची फॅमीली हिस्ट्री आहे का ?
  • Log in or register to post comments

नवीन डॉक्टर कडे आत्ताच जाउन आलो.

चिंटु
Mon, 07/18/2011 - 22:14 नवीन
सदाशिव पेठेतील डॉ चिपळूणकर हे त्यांचं नाव. त्यांनी तपासणी करुन लगेच सांगितलं की गुडघ्यात काहिही प्रॉब्लेम नाही, पण गुडघा दुखत असणं शक्य आहे! मी म्हटल :- "ते कसं काय?"'. त्यांनी लगेच भिंतीशी उभे केले, आणि माझ्या पोश्चरमधील त्रुटी दाखवली. कायम एक खांद किचित झुकवुन उभा असल्याचं प्रथमच जाणवल. ते म्हणाले, "मान व्यवस्थित आहे का? हात मानेखाली घेउन एका कुशी वर झोपायची सवय आहे का?" मी म्हटलं "मान तशी नीट नाही/नसते. सतत अवघडलेली असते.तुम्ही म्हणता तशी सवय आहे. "()दरिद्री परिस्थितीत आणि अनेकानेक जीव नकोसा करणार्‍या कौटुंबिक समस्या ह्यात बालपणापासुनचा दीर्घकाळ गेल्याने, पुरेशी पांघरुणे नसायची. साहजिकच अंगाच मुटकुळं करुन जमेल तित्कं अंग बारिक करुन एका कुशीवर झोपायची सवय लागली.तीच दशकानुदशके सुरु आहे. त्यांचे म्हणणे पडले की "मग शिरेवर शीर आली असण्ञाची दाट शक्यता आहे. किंवा तत्सम शीर्/नर्व्ह संबंधित काहितरी इश्यू असावा." . . सध्यातरी त्यांनी १० दिवस घेण्यासाठी विविध गोळ्या दिल्यात.(पौष्टिक्/टॉनिक वाल्या) दहा दिवसानी कमरेपासच्या भागाचा आणि मानेचा एक्स रे काढुन बोलावले आहे. मान किंवा कंबर ह्या भागातील नसांमध्ये काही प्रॉब्लेम असावा ह्या अंदाजाने हे केले जात आहे.काही निदान होइल व उपाय सापडेल अशी आशा आहे. सध्यातरी gym लावु नये असे सांगण्यात आले आहे. सर्व वाचकांचे आभार.
  • Log in or register to post comments

जिम

श्रावण मोडक
Mon, 07/18/2011 - 22:59 नवीन
जिम लावू नका. चिपळुणकरांची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. त्यानंतर बाकी निर्णय. शिरेशी संबंधित बाब असू शकते, हे तुम्ही इथं केलेल्या वर्णनातून दिसते. या डॉक्टरांनी तिथंपर्यंत तुम्हाला आणलं आहे, हे महत्त्वाचे. वय चोवीस आहे ना? दशकानुदशकांच्या सवयी कसल्या? हे वय असं आहे की इथून नव्या सवयी पटकन लागतील. त्या चांगल्या सवयी लावून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

ग्रेट!!

स्वानन्द
Mon, 07/18/2011 - 23:49 नवीन
ग्रेट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंटु

मुंबैत आलात तर गोरेगाव पूर्व

जाई.
Mon, 07/18/2011 - 22:48 नवीन
मुंबैत आलात तर गोरेगाव पूर्व येथील डॉ आश्विन सामंत यांना भेटा. अत्यंत निष्णात ऑर्थापेडीक तज्ञ आहेत. पत्ता= Samant nursing home Gr. floor, yashodhan, plot no 5, jaiprakash nagar, goregaon(east) tele no 26860695/268606960 EMAIL =snho@vsnl.net
  • Log in or register to post comments

ओह्. थॅंक्स...

चिंटु
Tue, 07/19/2011 - 15:17 नवीन
जर सध्याचे उपाय निष्फळ ठरले, तर मुंबैतच यावे लागेल. त्यावेळेस हा पत्ता कामाला येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

हा एक संधिवाताचा प्रकार असावा

५० फक्त
Tue, 07/19/2011 - 07:30 नवीन
हा एक संधिवाताचा प्रकार असावा असे वाटते, मिपावैद्य स्पा यांनी वर सांगितल्याप्रमाणे, कारण मला देखिल पोट बिघडले की शरीरातील जोड दुखणे हा प्रकार होतो. अजुन एक , तुम्हाला गुडघा आहे आणि तो दुखतो हेच विसरायचं जमतंय का बघा, अवघड आहे. पण मागच्या वर्षी मला डेंग्यु बरा झाल्यावर पण जे तीन चार महिने वेदना होतात, त्यावेळी डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं, ५-६ दिवस तयारी करुन पुणे - गोवा - पुणे असं १५०० किमि गाडी चालवुन फिरुन आलोय त्यानंतर. अवांतर -- ''नवीन डॉक्टर कडे आत्ताच जाउन आलो.'' म्हणजे डॉक्टरच नविन आहे का तुझ्यासाठी नविन आहे ?
  • Log in or register to post comments

आपला हा डाक्टर

ईश आपटे
Tue, 07/19/2011 - 08:13 नवीन
अजुन एक , तुम्हाला गुडघा आहे आणि तो दुखतो हेच विसरायचं जमतंय का बघा, अवघड आहे आपला हा डाक्टर डोकेदुखी वर असाच सल्ला देतो काय ?????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

माफ करा. पण पटलं नाही

चिंटु
Tue, 07/19/2011 - 15:16 नवीन
पटलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

गुदघेदुखी बद्दल काही मुद्दे

चित्रगुप्त
Tue, 07/19/2011 - 10:59 नवीन
नमस्कार तुम्ही सर्व प्रकारचे उपय करत आहातच, त्यात तुम्हाला लवकरात लवकर यश मिळो. डॉ चिपळूणकर यांच्या सल्ल्याप्रमाणे उपाय करण्याने निश्चित फायदा मिळेल, असे वाटते. इथे काही स्वानुभवाधिष्ठित मुद्दे मांडतो आहे: शरीराचे वजन, वातावरणाचा दाब आणि जमीनीचा उलटा दाब या सर्वांचा गुड्ग्याच्या सांध्यावर सर्वात जास्त परिणाम होत असतो. योग्य असे बूट घालण्याखेरिज घरात सुध्धा नरम व जाड सोल असलेल्या चपला सतत घालाव्यात. प्रमाणाबाहेर होणारा वीर्यनाश हा दांधेदुखीस मदत करतो, त्यामुळे असे होत असल्यास योग्य ती काळजी घ्यावी. घरी जर एसी असेल तर खोलीत रुंद तोंडाच्या भांड्यात वा बादलीत पाणी भरुन ठेवत जावे. म्हणजे खोलीतल्या हवेतील सर्व पाणी शोषून झाल्यावर एसी आपल्या शरीरातील पाणी खेचतो (त्यामुळे घश्याला कोरड पडते, सांधे दुखतात), त्या ऐवजी बादलीतील पाणी वापरले जाईल. हा उपाय ऑफिसातील एसी च्या बाबतीत काम करतो कि नाही हे ठऊक नाही, तरी करून बघता यावे. पायाचे स्नायु बळकट होण्यासाठी पाठीवर उताणे पडून हळूहळू पाय गोलाकार फिरवणे हा साधा व्यायाम करावा. फार जास्त चालणे सध्या टाळावे आपले शरीर व एकंदरीतच सर्व जीवन हे विश्वातल्या अगणित गोष्टींशी निगडित असल्याने ग्रहांचे भ्रमणाच्या अभ्यासातून आपल्या आयुष्यातील घटना सांगता येऊ शकतात. ज्योतिषी सांगतात ते उपाय, उदा. अमुक खड्याची अंगठी घालणे वा शनी ला तेल घालणे असले उपाय करण्याची गरज नाही, परंतु हा त्रास तुम्हाला किती काळ भोगावा लागणार आहे, हे वाटल्यास चांगल्या ज्योतिष्यास विचारावे. सर्व इलाज करून देखील फायदा झाला नाही, परंतु कालांतराने ग्रहस्थिती बदल्यावर रोग आपोआप बरा झाला, अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. पुढे कधी जमेल, तेंव्हा विपश्यना शिकून घ्या. कामाची विद्या आहे. शिकून जर रोज सवय ठेवली, तर अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

प्र का टा आ

सूड
Tue, 07/19/2011 - 13:11 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

साधा सोपा उपाय

चेतन सुभाष गुगळे
Tue, 07/19/2011 - 11:30 नवीन
चिंटू, तुमची गुडघेदुखी आता नाहीशी झाली काय? नसल्यास एक साधा सोपा उपाय करून पाहा. नेहमीच पाठीवर झोपा (एका कुशीवर नको) आणि पायाखाली एक उशी घ्या. आठवडाभर करून पाहा. फरक पडला नाही तर दोन उशी घेऊन पाहा. या उपायाने नक्कीच फरक पडेल. दोन आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील. अर्थात हे करत असताना डोक्याखाली देखील उशी घेउनच झोपले पाहिजे. डोक्याखाली उशी नसेल आणि केवळ पायाखाली उशी ठेवाल तर अ‍ॅसिडिटीच्या भयंकर दुष्परिणामांस सामोरे जावे लागेल. गेट वेल सून!
  • Log in or register to post comments

पाठीवरच झोपतो हो झोपताना.

चिंटु
Tue, 07/19/2011 - 15:14 नवीन
नेमकं उठल्यावर कळतं की आपण एका कुशीवर होतो माग्ची रात्र म्हणुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

पाठीवरच झोपतो हो झोपताना.

चिंटु
Tue, 07/19/2011 - 15:14 नवीन
नेमकं उठल्यावर कळतं की आपण एका कुशीवर होतो माग्ची रात्र म्हणुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

उपाय

नितिन थत्ते
Tue, 07/19/2011 - 11:43 नवीन
तुमच्या गुडघ्यांचा चंद्र आणि मंगळ यांच्याशी होणारा कोनही खूप परिणाम करतो हे येथे नमूद करू इच्छितो. आता गुडघ्याचा कोन बदलणे खूप अवघड आणि वेदनादायक असू शकते म्हणून त्या ऐवजी चंद्र आणि मंगळ यांच्या आकाशातल्या जागा बदलल्या तरी तोच परिणाम मिळू शकेल (संदर्भ : आइनस्टाईनचे सापेक्षतेचे तत्त्व किंवा डोंगर-महम्मद तत्त्व). आम्ही अशी चंद्र आणि मंगळ यांची स्थाने बदलून देतो. त्याचे दरही माफक आहेत. आपण अनुभव घेऊन पाहू शकता. [टीप: काल सायंकाळी उशीरा काही मिपाकर आकाशातल्या चंद्राची जागा बदलल्याचे बोलत होते. त्यावेळी इतर लोक त्यांनी प्राशन केलेल्या द्रवांचा परिणाम आहे असे सांगून त्यांची दिशाभूल करत होते].
  • Log in or register to post comments

काहिच कळले नाही.

चिंटु
Tue, 07/19/2011 - 15:12 नवीन
अ-मंगळ प्रतिसाद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरे बापरे

सहज
Tue, 07/19/2011 - 15:40 नवीन
ईश आपटे यांची गुडघेदुखीची थिअरी खरी असेल तर आता पुढील वाक्ये ऐकल्यावर काय समजायचे? १) एखादे काका सदस्य विकांता ऐवजी सोमवारच्या कट्याबद्दल म्हणता की कृपया सोमवारी कोणत्याच कट्ट्याला मी येउ शकणार नाही हां, गुडघे दुखतात. २) सुटीवरुन पुन्हा कचेरीत आलेल्या एखाद्याची खुशाली विचारता "हो हो सहल मस्त झाली फक्त जरा गुडघे जास्त दुखत आहेत इतकेच." ३) फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी आमंत्रण नाकारताना म्हणते की 'हो हो कालच मुलगा-सुनबाई सहलीवरुन आले. तसे आम्ही मोकळे आहोत पण दोन आठवडे तरी आम्ही तुमच्याकडे येत नाही. अहो आम्हा चौघांचेही गुडघे फार म्हणजे फार दुखत आहेत. असो चिंटु तुम्ही मराठी संस्थळे वाचत रहा, चर्चांमधे भाग घ्या मग बघा गुडघेदुखी आहे हे पार विसरुन जाल. हा पण मग डोकेदुखी वाढली म्हणुन धागा काढू नका म्हणजे झाले!
  • Log in or register to post comments

फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी

वपाडाव
Tue, 07/19/2011 - 19:14 नवीन
फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी आमंत्रण नाकारताना म्हणते की 'हो हो कालच मुलगा-सुनबाई सहलीवरुन आले. तसे आम्ही मोकळे आहोत पण दोन आठवडे तरी आम्ही तुमच्याकडे येत नाही. अहो आम्हा चौघांचेही गुडघे फार म्हणजे फार दुखत आहेत. अबॉबॉबॉ.....मेलो......
*** ईमरान हाशमी यांचा गुडघेदुखीने मॄत्यु.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

खरंच या थिअरीमुळे गुडघेदुखी

सूड
Tue, 07/19/2011 - 19:19 नवीन
खरंच या थिअरीमुळे गुडघेदुखी म्हणजे असं दुखणं होईल की सहन होत नाही अन् सांगता येत नाही. :D कोणी नि कॅप जरी लावली असेल तर लोक भुवया उंचावून बघणार त्याच्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

काका

रामदास
Wed, 07/20/2011 - 11:32 नवीन
गुडघे खरचटल्याच्या तक्रारी किती येतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

शी बै आच्रत...

गणपा
Wed, 07/20/2011 - 17:12 नवीन
शी बै आच्रत... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

गुडघे खरचटल्याच्या तक्रारी

वपाडाव
Wed, 07/20/2011 - 17:29 नवीन
गुडघे खरचटल्याच्या तक्रारी किती येतात ?
चुकुन "गुडघे खरे चाटल्याच्या तक्रारी किती येतात ?" असे वाचले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

_/\_

धमाल मुलगा
Wed, 07/20/2011 - 17:45 नवीन
मुनीवर्य, मेलो! =)) =)) =)) ह्यासोबत लो-ब्याक पेन, स्लीपडिस्क ह्याबद्दलही संलग्न विदा मिळणे फायद्याचे ठरेलसं वाटते, नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

खल्लास!!

चतुरंग
गुरुवार, 07/21/2011 - 02:56 नवीन
रामदास काकांनी एकदम गुडघ्यालाच .. आपलं मुद्द्यालाच हात घातलाय! ;) -ईश्श धपाटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ईश आपटे यांची गुडघेदुखीची

ईश आपटे
Wed, 07/20/2011 - 16:32 नवीन
ईश आपटे यांची गुडघेदुखीची थिअरी खरी असेल तर ही माझी थेअरी नसुन आयुर्वेदाची थेअरी आहे. आयुर्वेदिक ग्रंथ वाचावेत व वैद्यांना विचारावे...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मेलोऽऽ...

धमाल मुलगा
Wed, 07/20/2011 - 17:42 नवीन
फोनवर एखादी सासु नातेवाईकांशी आमंत्रण नाकारताना म्हणते की 'हो हो कालच मुलगा-सुनबाई सहलीवरुन आले. तसे आम्ही मोकळे आहोत पण दोन आठवडे तरी आम्ही तुमच्याकडे येत नाही. अहो आम्हा चौघांचेही गुडघे फार म्हणजे फार दुखत आहेत.
अरे अरे...आवरा! हे हे फारच खाजगी प्रकरण होतंय असं नाही का वाटत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हे करुन पहा...

नरेश_
Tue, 07/19/2011 - 16:17 नवीन
एखाद्या र्‍हुमेटोलॉजिस्ट + आणखी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या. बर्‍याचदा बरीचश्या दुखण्यांची कारणे मनोकायिक प्रकारात मोडतात. असो. तुमच्या प्रकृतीला लवकरात लवकर उतार पडो ही देवाचरणी प्रार्थना !
  • Log in or register to post comments

तुमच्या गुडघ्याच्या एक्सरेचा

Nile
Tue, 07/19/2011 - 16:44 नवीन
तुमच्या गुडघ्याच्या एक्सरेचा डिटेल्स नीट दिसतील असा एक फोटो काढून इथे चिकटवा, त्यानंतर कदाचित काही सूचवता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments

तुम्ही तुमच्या रक्तातील यूरीक

विजुभाऊ
Wed, 07/20/2011 - 16:46 नवीन
तुम्ही तुमच्या रक्तातील यूरीक अ‍ॅसीडचे प्रमाण चेक करून घ्या. युरीक अ‍ॅसीडचे प्रमाण वाढल्यामुळे सांधे वाकवताना प्रचम्ड दुखतात. बहुतेकवेळा हे छोटे सांधे असतात उदा बोटांची पेरे. मात्र गुडघ्यातील सांध्याना देखील अशा वेदना होउ शकतात यावर होमीऑपॅथी मध्ये उपाय आहे.
  • Log in or register to post comments

संधि सुधा वापरुन बघा.... सहन

अविनाशकुलकर्णी
Mon, 07/25/2011 - 12:50 नवीन
संधि सुधा वापरुन बघा.... सहन शक्ति वाढवा.... आमचे पण दुखतात.. दाक्तर म्हणतात बदलुन टाका.. पण भिति वाटते..
  • Log in or register to post comments

या धाग्यात फक्त कोलगेट आणि

विजुभाऊ
Mon, 07/25/2011 - 17:28 नवीन
या धाग्यात फक्त कोलगेट आणि वज्रदम्ती वापरून बघा एवढेच लिहायचे र्‍हायलय
  • Log in or register to post comments

-१

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/25/2011 - 17:48 नवीन
'पासपोर्टच्या लायनीत उभा राहून बघा' हे पण सांगायचे राहिलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

किंचित दुरुस्ती

सहज
Mon, 07/25/2011 - 17:52 नवीन
'पुणे पारपत्र कार्यालयाच्या लायनीत उभा राहून बघा' हे पण सांगायचे राहिलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गुडघेदुखीच्या ( knee pain ) वाढत्या समस्या

सिरुसेरि
Wed, 05/10/2023 - 15:45 नवीन
अलिकडील काळात अनेक जणांच्या गुडघेदुखीच्या ( knee pain ) वाढत्या समस्या ऐकुन , मिपा संकेत संस्थळ वर याबद्दल काही अनुभव कथन आहे का हे बघताना हा धागा दिसला . माहितीपुर्ण अनुभव कथन आहे . याच संबधी अन्य एका धाग्यावर लिहिलेला प्रतिसाद इथे पेस्ट करत आहे . माझ्या माहितीप्रमाणे पेन मॅनेजमेंट तज्ञ जास्त करुन त्यांच्या संधिदाहांत knee pain , joint pain , hip pain संबंधी pain management clinical procedures मध्ये inflammation / पाणी / सुज शरीराबाहेर काढण्यासाठी अ‍ॅस्पिरेट पद्धत व स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर करतात . बरेचदा शरीरातील अनेक विशिष्ट सांध्यांमध्ये खुप वापर झाला / झीज झाली तर तेथील बाह्य भागावर सुज येते . हि सुज साध्यांच्या आतील भागांमधे दुषित पाणी / synovial fluid / joint inflammation / joint effusion या स्वरूपात जमा होते . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय या माध्यमांमधुन याचा तपास करता येतो . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय यांच्या रीपोर्ट मधे याचा उल्लेख effusion / joint effusion किंवा fluid असा होतो. हि सुज शोधणे व ती extract करणे / शरीराबाहेर काढण्यामधे orthopedic तज्ञांपेक्षा pain management तज्ञांचा जास्त उपयोग होतो . हि सुज extract करणे / शरीराबाहेर काढ्ण्याच्या कृतीला joint aspirate procedure असे म्हणतात . त्यानंतर joint inflammation कमी व्हावे म्हणुन मेडिकल मान्यताप्राप्त स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर केला जातो . गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी कमी होण्यासाठी या pain management clinical procedures चा उपयोग होतो . अनेक मोठ्या hospitals मधे pain management तज्ञांचा वेगळा विभाग असतो तसेच त्यांची क्लिनिक्सही असतात . या विभागातर्फे गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी या संबधी operations postpone करणे वा टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात जसे की - स्टेम सेल थेरपी , प्लासमा सेल थेरपी , पी आर पी इंजेक्शन्स . हे उपचार minimal surgical/ non surgical invasive technology / therapy या नावाने ओळखले जातात ,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा