‘कॉकटेल लाउंज 1’
व्यावसायिक कामानिमीत्त काही दिवसांसाठी मध्यपुर्वेला सौदी अरेबिया ह्या वाळवंटी आणि खर्या‘ अर्थाने रूक्ष (dry) देशात जावे लागत असल्याने कॉकटेल लाउंज मालिकेत व्यत्यय येणार आहे.:( आंतरजालावरून इमेज गोळा करून नविन कॉकटेल्स मालिकेत टाकण्यात काही मजा नाही आणि इच्छाही नाही, पण मलिकेत खंड पडू नये अशी इच्छा जबर असल्यामुळॆ काय लिहावे असा विचार करीत असता जाणवले की एशिया मधे सर्व ड्रिंक्स मधे व्हिस्की जास्त प्रमाणात घेतली जाते. मग व्हिस्कीवर काहीतरी लिहावे से मनात आले म्हणून हा धागा ह्या मलिकेत टाकत आहे.
डिस्क्लेमर: माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी खरडत आहे, चूकभुल देणे घेणे आणि हलकल्लोळ न माजवता दुरुस्ती सुचवणे. :)
प्रथम सुरुवात करुया व्हिस्कीच्या स्पेलिंगने. व्हिस्कीची दोन स्पेलिंग्स आहेत, 1. Whisky and 2.Whiskey.
1. Whisky : स्कॉच, कॅनेडीअन आणि जापनीज व्हिस्की ह्या स्पेलिंगने लिहितात.
2. Whiskey : अमेरिकन आणि आयरिश व्हिस्कीचे स्पेलिंग असे लिहीतात.
हे अमेरिकन सर्व गोष्टी जगाच्या उलट करण्यात का धन्याता मानतात कोण जाणे. बघा ना, वीजेचे स्वीच उलटे, रस्त्यावर गाड्या उलटया बाजूने, सेXX...…जाउदे विषयांतर होतेय हे चाणाक्ष वाचाकांनी जाणाले असेलच ;)
आइशप्पथ, ‘चाणाक्ष वाचाकांनी’ हे असे लिहीण्याची कितीतरी वर्षांपासुनची सुप्त इच्छा आज पुर्ण करून घेतली, ह्याला म्हणतात मौके पे चौका :) असो मुळ विषयाकडे वळुयात.
ढोबळ मानाने व्हिस्कीचे दोन प्रकार मोडतात 1. सिंगल मॉल्ट व्हिस्की 2. ब्लेन्डेड व्हिस्की
आता म्हणाल की ही ‘मॉल्ट’ काय भानग़ड काय आहे? पण तीच तर खरी गंमत आहे. व्हिस्कीचे मूळ ह्या मॉल्ट मधेच दडलेले आहे. पाण्यात कडधान्य भिजवून त्याला मोड आणायचे आणि ते भट्टीत (Kiln) भाजून सुकवयचे. ह्या प्रक्रियेनंतर त्या बिचार्या् कडधान्याचे जे काही होते त्याला मॉल्ट म्हणतात. जे प्रतिथयश ब्रॅन्ड्स आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या भट्ट्या ही त्यांची खासिअत असते. व्हिस्कीची चव खुपशी ह्या भट्टीवर पण अवलंबून असते.
बर आता कडधान्य असे वाचल्यावर सर्व शाकाहारी वाचकांच्या चेहेर्यामवर आलेली चमक मला दिसतेय. होय व्हिस्की पुर्ण शाकाहारी आहे :P व्हिस्की प्रामुख्याने जवस, नाचणी आणि मका ह्या कडधान्यांपासुन बनवतात. वापरलेल्या कडधान्यामुळे आणखीन पोट्प्रकार पडतात ते पुढे येतीलच.
तर सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे डिस्टील केलेली हुच्च दर्जाची व्हिस्की. सर्व काही ‘एकच’ असल्यामुळॆ बनवन्याची प्रक्रिया महाग होते म्हणुन सिंगल मॉल्ट व्हिस्की बरीच महाग असते (आता हे विधान व्यक्तीसापेक्ष असु शकेल, पण माझ्यासारख्याला महागच)
तरीही ग्लेन फिडिच हा माझा आवडता ब्रॅंड काट्कसर करून माझ्या मीनीबार मधे विरजमान झालेला आहे हे जाता जाता येथे नमूद करतो. (कसलं साहित्यिक झाल्यासारख वाटतय आज, आहाहा)
रूम टेंपरेचरची सिंगल मॉल्ट ऑन दि रॉक्स न घेणार्याखचे ह्या भूतलावर जन्म घेणे फुकट आहे. जर त्यात थोडे ‘ड्राय व्हर्मूथ’ टाकले तर ते पिण्यात जे सुख आहे त्याची तुलना केवळ, इंद्राच्या दरबारात बसून वारूणी पिणार्या गंधर्वाच्या सुखाशीच होउ शकते. O:)
ब्लेन्डेड व्हिस्की ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड कडधान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या कडधान्यां प्रत वेगवेगळी असते/असू शकते. तसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेलया दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही जानेमाने ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
आता कडधान्यामुळे पडणारे पोटप्रकार बघुयात
स्कॉच व्हिस्की (जवस): स्क़ॉट्लंड मधे तयार होणार्या व्हिस्कीला स्कॉच व्हिस्की म्हणतात. उच्च दर्जाची जवस आणि स्प्रिंग वॉटर हे ही व्हिस्की बनवण्यासाठी अत्यावश्यक असते. मॉल्ट तयार करताना मोड आलेले कड्धान्य भाजण्यासाठी peat ह्या प्रकारच्या कोळश्याचा धूर (स्मोक) वापरला जातो आणि तेच असते ह्या स्कॉचच्या हुच्च दर्जेदार चवीच्या यशाचे गमक. स्कॉचमधे पाणि घालून पिणारे पीओत बापडे मला मात्र ऑन दि रॉक्सच आवडते.
आरयरिश व्हिस्की (मीक्स / ब्लेन्ड): आयर्लंड मधे तयार होणारी व्हिस्की म्हणजे आरयरिश व्हिस्की. आयरिश लोकांचे म्हणणॆ आहे कि स्कॉटिश लोकांनी व्हिस्की ‘प्यायला’ सुरुवात करण्याआधिपासून ते व्हिस्की ‘तयार’ करीत होते. ही व्हिस्की मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड कडधान्यांच्या मिश्रणापासून (Pure-pot still) तयार केली जाते आणि ती ट्रिपल डिस्टील्ड असते. ह्या व्हिस्कीच्या मॉल्ट प्रक्रियेमधे कोळश्याचा धूर वापरला जात नाही त्यामुळे ह्या व्हिस्कीची चव स्कॉचच्या चवी पेक्षा वेगळी असते.
कॅनडीअन राय (Rye) व्हिस्की (नाचणी): कॅनडामधे मधे तयार होणारी व्हिस्की म्हणजे कॅनडीअन राय (Rye) व्हिस्की. ही व्हिस्की Rye म्हणजे नाचणी पासून बनवितात. कॉकटेल जगतात ही व्हिस्की, व्हिस्की बेस्ड कॉकटेल बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरतात. ‘क्राउन रोयाल’ हा एक कॅनडीअन व्हिस्कीचा प्रख्यात ब्रॅन्ड आहे. (प्रख्यात अश्यासाठी की तो माझ्या मीनीबार मधे दाखल आहे ;) )
बर्बन व्हिस्की (मका): अमेरिकेत तयार होणार्या व्हिस्कीला बर्बन व्हिस्की असे म्हणतात. ह्या व्हिस्की तयार करण्यास 51% मका वापरतात. ही व्हिस्की प्रामुख्याने Tennessee आणि Kentucky ह्या स्टेट्स मधे बनवली जाते. मक्यामुळे ही चवीला थोडी गोड असते. जॅक डॅनीअल्स हा ह्या व्हिस्कीचा प्रख्यात ब्रॅंड आहे.
जापनीज व्हिस्की: जपान हा टॉप 5 देशांपैकी व्हिस्की उत्पादक देश बनला आहे. जपानमधी ‘Santory’ ही डिस्टीलरी व्हिस्की बनवते. जापनीज व्हिस्की ही स्कॉच व्हिस्की किंवा आयरीश व्हिस्की बनवन्याच्या पद्ध्तीने बनवली जाते.
भारतीय व्हिस्की (ज्वारी आणि साखरेची मळी): भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. आद्य दारू उत्पादक, लिकरकिंग, माननीय विजय माल्या ह्यांचा मॅक्डोवेल्स नं 1 हा ब्रॅंड हा तमाम भारतीयंचा आवडता ब्रॅंड समजला जातो.
माननीय कृषिमंत्री ह्यांच्या कृपेने भारत व्हिस्की उत्पादनात आघाडी मारेल अशी चिन्हे दिसत आहेत, पण हे लोकशाहीतील विरोधक म्हणजे ना, ह्यांना मेले जरा काही चांगले म्हणुन झालेले बघवतच नाही.
अश्याप्रकारे ही व्हिस्कीची गाथा इथेच संपवतो.
नोट:
1. ह्या व्हिस्कीमय धाग्यातल्या सुद्धलेखणातल्या आणि व्याकरनातल्या चुका तपासणार्यांना ऑन दि रॉक्स बुडवण्यात आले आहे म्हणजेच फाट्यावर मारण्यात आले आहे.
2. कोणाला हातभट्टीच्या व्हिस्कीची रेसीपी हवी असल्यास व्यनीतुन कळविणे म्हणजे ताकालाही जाता येइल आणि भांडेही लपवता येइल :)
वाचने
27327
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती
धन्यु
In reply to छान माहिती by सुनील
बाय द वे.. डब्लू या अक्षराला
गविजी, ICAO च्या महितीबद्दल
In reply to बाय द वे.. डब्लू या अक्षराला by गवि
मस्त लेख
हे वाचून घश्याला कोरड पडल्या
आवडला.
ज्ञाणात भर पाडल्या बद्दल मंडळ
अतिशय उत्तम लेखन.. मिपावरील
अतिशय उत्तम लेखन.. मिपावरील
In reply to अतिशय उत्तम लेखन.. मिपावरील by इंटरनेटस्नेही
-1
In reply to अतिशय उत्तम लेखन.. मिपावरील by माझीही शॅम्पेन
आमच्या अतिशय आवडत्या
+१
In reply to आमच्या अतिशय आवडत्या by अभिज्ञ
व्हिस्कीच नव्हे, तर कुठलंही
योगेश, आपण
In reply to व्हिस्कीच नव्हे, तर कुठलंही by योगेश गाडगीळ
-१
In reply to योगेश, आपण by सोत्रि
गविजी, तो मुद्दा फक्त
In reply to -१ by गवि
(No subject)
In reply to गविजी, तो मुद्दा फक्त by सोत्रि
+१ ... शिवाय मद्य आणि ज्ञान
In reply to योगेश, आपण by सोत्रि
खत्तरनाक आवडलेला आहे
व्हिस्कीसाठी कुठेही....
In reply to खत्तरनाक आवडलेला आहे by परिकथेतील राजकुमार
17 ज़ुलैला मायदेशात परत येत
In reply to व्हिस्कीसाठी कुठेही.... by सोत्रि
अं?
In reply to 17 ज़ुलैला मायदेशात परत येत by परिकथेतील राजकुमार
आम्हाला पुणेरी पध्दत आवडते.
In reply to 17 ज़ुलैला मायदेशात परत येत by परिकथेतील राजकुमार
खी खी खी ....
In reply to आम्हाला पुणेरी पध्दत आवडते. by विजुभाऊ
पाक कृती ??
होय, होय... गेला बाजार वाईनची
In reply to पाक कृती ?? by शाहिर
मरहबा...मरहबा!!!!
कल्याणंस्तू
In reply to मरहबा...मरहबा!!!! by धमाल मुलगा
तुम्हा दोघांची विमान स्वर्गात
In reply to कल्याणंस्तू by आंबोळी
चखणा!
In reply to तुम्हा दोघांची विमान स्वर्गात by गणपा
भारीच!!
बरीच माहीती आहे तुम्हाला. (हे
चव!
In reply to बरीच माहीती आहे तुम्हाला. (हे by शिल्पा ब
कडु व्हीस्की ???
गंडवागंडवी
ते बहुधा 'घेउन' बसले असतील
In reply to गंडवागंडवी by श्रावण मोडक
काश ऐसा होता
In reply to ते बहुधा 'घेउन' बसले असतील by गणपा
काहीतरी चघळायला अश्या अर्थाने...
In reply to गंडवागंडवी by श्रावण मोडक
हो हो हो........... सहमत पण
अवांतरः जवस मका नाचणी हे
In reply to हो हो हो........... सहमत पण by विजुभाऊ
सहमत!
In reply to अवांतरः जवस मका नाचणी हे by परिकथेतील राजकुमार
१२ वर्षे जुनी
व्हिस्की तयार करण्याची
In reply to १२ वर्षे जुनी by सुधीर
आर सी चे ७-८ पेग सहज
In reply to १२ वर्षे जुनी by सुधीर
:)
In reply to आर सी चे ७-८ पेग सहज by गवि
अजून एक! व्हिस्की पिणारे
In reply to :) by सुधीर
अजून एक! व्हिस्की पिणारे
In reply to अजून एक! व्हिस्की पिणारे by माझीही शॅम्पेन
अजून एक! व्हिस्की पिणारे
In reply to :) by सुधीर
एक शंका : कडधान्य?
हुप्प्या, मीही साशंक होतो.
In reply to एक शंका : कडधान्य? by हुप्प्या
बिल्कूल शंका मत लेओ. हुप्प्या
In reply to हुप्प्या, मीही साशंक होतो. by सोत्रि
कोण पाजेल म्हणून सोय करायला पायजेल
सोत्रि.. झकास धागा! मजा आली
धन्यु
In reply to सोत्रि.. झकास धागा! मजा आली by मेघवेडा
धन्यु
In reply to सोत्रि.. झकास धागा! मजा आली by मेघवेडा
स्कॉच - ग्लेन फिडीक...
In reply to धन्यु by सोत्रि
सुंदर माहिती
In reply to स्कॉच - ग्लेन फिडीक... by मैत्र
चिअर्स
In reply to स्कॉच - ग्लेन फिडीक... by मैत्र
माहितीपूर्ण धागा!
भौ.... रम वर पण एक लार्ज येऊ
भौ.... रम वर पण एक लार्ज येऊ
Ultimate Factories - Jack Daniels
ही ग्लेन फिडीक इथे मुंबईत
>>ही ग्लेन फिडीक इथे मुंबईत
In reply to ही ग्लेन फिडीक इथे मुंबईत by मराठी_माणूस