✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)

श
शरद यांनी
Sat, 07/02/2011 - 11:18  ·  लेख
लेख
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन) इतिहास : कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत. (१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते. श्री साने, मंडलिक यांनी हे मत मांडले आहे. या उपर्‍या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते. (२) दुसरे मत राजारामशास्त्री भागवतांनी मांडले आहे. त्यांचे म्हणणे ही माणसे दक्षिणेतील कर्नाटकातून कोकणात शिरली. कर्नाटकातल्या गोकर्ण महाबळेश्वर (जोगळेकर), वनवासी (बापट) वगैरे ब्राह्मण कुटुंबे तेथील देवालयांत पुजारी म्हणून अजूनही आहेत. आणखी एक पुरावा म्हणजे माणुस स्वदेश सोडून दुसरीकडे गेला तरी नवीन वस्तीस आपल्या जुन्या गावांची नावे ठेवतो. जगभर ही प्रथा आहे. कर्नाटकातील अनेक गावांची नावे कोकणातही आढळतात. मलबारात अजूनही काही गौरवर्णी जमाती आढळून येतात. (३) तिसरे मत हे लोक मराठवाडा-विदर्भातून चवदाव्या शतकातल्या दुष्काळात तेथून निघाले व कोकणात स्थिरावले. या वेळी महाराष्ट्रात इतकी उलथापालथ झाली होती की हे सहजशक्य आहे. याला पुरावा म्हणून आंबेजोगाई येथील देवी अनेक कोकणस्थ कुटुंबांची कुलदेवता आहे याची साक्ष देतात. नाही तर शेकडो मैलांवर असलेले दैवत कुलदैवत कसे होणार ? आणखी एक शक्यता म्हणजे उत्तर हिंदुस्थानातून गुजराथ-काथेवाड भागातून जलमार्गे हे ब्राह्मण कोकणात आले व त्यांनी तेथून येतांना परशुराम पूजा आणली. परशुरामाचा संबंध गुजराथशी ( शुर्पारक भूमी) जास्त आहे. तेव्हा परशुराम क्षेत्र तेथून कोकणात आले म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते. व्यवसाय : मुळ वसाहत करणारे क्षितिपावन म्हणजे शेतकरी होते. ते वेदांचे अध्ययन व अध्यापन करत व इतर जातींचे पौरोहित्य करत. सतराव्या शतकात भट घराणे देशावर आले व बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा पंतप्रधान झाला. पुढे पटवर्धन, फडके, मेहेंदळे, गोखले, खाजगीवाले, रास्ते इत्यादी अनेक रणधुरंधर पुरुष नावाजले.राजकारणच नव्हे तर इतर क्षेत्रातही,वैदिक पंडित, ग्रंथकार, मुत्सद्दी, वकील, सावकार, व्यापारी वगैरेत त्यांनी शिरकाव केला. नंतर इंग्रजी काळातही रानडे, टिळक, चिपळुणकर, आगरकर, कर्वे वगैरे अनेकांनी आपली कर्तबगारी दाखवली. देवधर्म : प्रारंभी सर्व कोकणस्थ शैव होते. गुहागरचा वाडेश्वर, हरिहरेश्वर, कोळेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळेश्वर, सोमेश्वर हे मह्त्वाचे कुलदेव. चित्पावन देवीचे उपासक नाहीत पण काहींनी जोगेश्वरी ही कुलदेवता म्हणून स्विकारली. काही जण वाडेश्वर-जोगेश्वरी, सोमेश्वर-महालक्ष्मी, महादेव-जगदंबा अशी जोडकुलदैवते मानतात. काही कुळांत विष्णूची उपासना सुरू झाली.लक्ष्मी-नारायण, केशवराज, लक्ष्मीनृसिंह, लक्ष्मीकेशव ही कुलदैवते काही घराण्यांनी स्विकारली. याशिवाय खंडोबा,भवानी, त्यंबकेश्वर, गिरमाई, वेताळ, कालभैरव,व्यंकोबा यांनाही कुलस्वामीचे स्थान मिळाले आहे. काही घराण्यात जोगवा मागण्याचे व्रत पाळले जाते. या शिवाय जाखाई, केडजाई, करंजेश्वरी, नवलाई इत्यादी ग्रामदेवता पुजणारेही सापडतात. सण व उत्सव : चैत्री पाडवा, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, होळी व रंगपंचमी हे महत्वाचे सण. गणेशाचे महत्व पेशवाईपासून वाढले कारण पेशवे गणेशभक्त होते. शरद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
39586 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

हम्म्म्म... भूगोलाचा तास..

भडकमकर मास्तर
Sat, 07/02/2011 - 11:27 नवीन
जलमार्ग, विदर्भ, कर्नाटक, मराठवाडा, काठेवाड -गुजरात... झालंच तर मध्य युरोप, ग्रीस, इटली, मध्यपूर्व .... शिवाय इस्त्रायल, वगैरेवगैरे... अवांतर : आता राहिले काय .... आसाम, मणिपूर, झैरे, अदिस अबाबा, , तैवान, टास्मानिया, फिजी, जलालाबाद, इस्तंबूल वगैरे वगैरे....
  • Log in or register to post comments

इटली

सुनील
Mon, 07/04/2011 - 13:48 नवीन
झालंच तर मध्य युरोप, ग्रीस, इटली, मध्यपूर्व .... शिवाय इस्त्रायल, वगैरेवगैरे... ह्यात इटली हे कोकणस्थांचे मूळ असण्याची शक्यता किती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

लाइक

लॉरी टांगटूंगकर
Mon, 07/04/2011 - 21:06 नवीन
सुपर लाइक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हॅ हॅ हॅ नव्या वादास सुरुवात

स्पा
Sat, 07/02/2011 - 11:40 नवीन
हॅ हॅ हॅ नव्या वादास सुरुवात
  • Log in or register to post comments

बळंच!!

स्वानन्द
Sat, 07/02/2011 - 12:52 नवीन
धाग्याचा मजकूर तरी वादविवाद करणारा वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ओ मोगो (गरिबांचे)

मी-सौरभ
Sat, 07/02/2011 - 18:50 नवीन
वाद नाही होणार कारण 'कोब्रा' ना वाद घलण्यापेक्षा 'डसणं' जास्त आवडते :) ---------- आम्हाला श्री कृपेकरून काम धंदे असल्याने सपक, टुकार, राजकारण आणि जातीवरून वादविवाद करणाऱ्या धाग्यांचा किरकोळ, तसेच घाऊक दरात बाजार आउटसोर्स केल्या गेलेला आहे :) ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आम्हाला श्री कृपेकरून काम

स्पा
Sat, 07/02/2011 - 20:26 नवीन
आम्हाला श्री कृपेकरून काम धंदे असल्याने सपक, टुकार, राजकारण आणि जातीवरून वादविवाद करणाऱ्या धाग्यांचा किरकोळ, तसेच घाऊक दरात बाजार आउटसोर्स केल्या गेलेला आहे तेच तर तुम्हा व्हाइट कलर लोकांच चुकत ना ;) काम धंदे आहेत म्हणून... हातावर हात ठेवायचे. काम धन्द्यांच्या नावाखाली .. आपण काय करता ते देवच जाणे ;), अणि मग समाजात काही चांगल होतच नाही.. काही घडतंच नाही, म्हणत बोंबलत फिरायला मोकळे.. जिथे चूक दिसते ती तेंव्हाच ठेचायला हवी ... असो... अधिक काय बोलणे... बाकी बोलणे आपण खरडीतून करूच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

ठीक आहे...

मी-सौरभ
Sun, 07/03/2011 - 14:34 नवीन
ख व त च भेटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

१००+ नक्की

अमोल खरे
Sat, 07/02/2011 - 11:50 नवीन
पुर्वी वाचले होते की चित्पावन स्पेन मध्ये गेले की तेथील स्थानिक त्यांना स्पॅनिश समजुन त्यांच्याशी स्पॅनिश मध्ये संभाषणास सुरुवात करतात. आता ह्यात तथ्य किती ते माहिती नाही. पण मी काही स्पॅनिश लोकांना पाहिले होते ज्यांचा टिपिकल चित्पावन लुक होता. कोणी मिपाकर स्पेनमध्ये गेला असेल तर जास्त सांगु शकेल.
  • Log in or register to post comments

अवांतर

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/02/2011 - 22:19 नवीन
काही स्पॅन्यर्ड्स भारतीय म्हणून खपून जातील असे दिसतात, काही पक्के पश्चिम/मध्य युरोपातले दिसतात. हीच गोष्ट ग्रीक, इतालियन लोकांबद्दलही म्हणता येईल. या तीनही देशांमधे काही भारतीय* मित्रमैत्रीणींना, स्थानिकांनी या भारतीयांना स्थानिक समजण्याचा अनुभव आहे. या तिन्ही देशातील लोकांची सरासरी उंची भारतीयांपेक्षा बरीच जास्त आहे. विख्यात फ्रेंच अभिनेत्री ऑद्रे तोतू हिने आपण स्पॅनिश, इतालियन वा आफ्रिकन किंवा आशियाई वंशाची नाहीत असा स्पष्ट उल्लेख केला आहे. *या लोकांच्या जाती-भाषेचा उल्लेख मुद्दामच टाळला आहे. माहितीपूर्ण लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा!

सुधीर काळे
Mon, 07/04/2011 - 12:51 नवीन
माझ्याशी व माझ्या सख्ख्या बहिणीशी अमेरिकेतले बरेच लोक स्पॅनिशमध्ये बोलायला सुरुवात करतात व आम्ही स्पॅनिश येत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यावर आश्चर्य दर्शवितात हे खरे आहे. तसेच अमेरिकन हॉटेल्समधील बरेच कर्मचारी मेक्सिकन असतात व तेही आधी स्पॅनिशमधून बोलतात हे आजही अनुभवाला येते. मी पहिल्यांदा बार्सिलोनाला गेलो (१९७८) तेंव्हा मला ’घरी’ आल्यासारखे वाटले हे आजही आठवते. तिथल्या लोकांच्या चेहरेपट्टीत कोकणस्थांशी कमालीचे साम्य मला भासले. पण बर्‍याच लोकांच्या मते कोकणस्थ पूर्व युरोपातील आर्मेनियाच्या आसपासच्या प्रदेशातून आले. तुर्की लोकही कोकणस्थ दिसतात व त्यांचा दही-ताक खाण्यावर असलेला भर कांहींसा त्या भागातील इतर लोकांपेक्षा वेगळा व कोंकणस्थांशी मिळता-जुळता वाटला. लो. टिळकांच्या मते कोकणस्थ उत्तर ध्रुवीय प्रदेशातून आले तर कांहीं युरोपीय संशोधक ते ज्यू असल्याचे सांगतात. थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

शक्यता

नितिन थत्ते
Mon, 07/04/2011 - 14:02 नवीन
>>कांहीं युरोपीय संशोधक ते ज्यू असल्याचे सांगतात. बेने इस्राएल (शनवार तेली) या रायगड जिल्ह्यात राहणार्‍या समाजात सुद्धा अशीच कहाणी (जहाज, प्रेते वगैरे) सांगितली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

शंका

पंगा
Tue, 07/05/2011 - 10:26 नवीन
ज्यू लोकांत सुंता करण्याचीसुद्धा प्रथा आहे. कोंकणस्थांत ही प्रथा नेमकी कधी (आणि का) लोप पावली असावी बरे? (की अजूनही आहे? कल्पना नाही - पडताळून पाहण्याचा योग आलेला नाही. तशी इच्छाही नाही म्हणा!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थोडक्यात आवडले...ते स्वीकारतो..!

अजातशत्रु
Mon, 07/04/2011 - 17:07 नवीन
+१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

?

पंगा
Mon, 07/04/2011 - 22:56 नवीन
तुर्की लोकही कोकणस्थ दिसतात व त्यांचा दही-ताक खाण्यावर असलेला भर कांहींसा त्या भागातील इतर लोकांपेक्षा वेगळा व कोंकणस्थांशी मिळता-जुळता वाटला.
तुर्की लोकांचा कबाब वगैरे खाण्याकडेही भर असतो असे कळते. हे कोकणस्थांच्या नेमक्या कोणत्या प्रथेशी मिळतेजुळते असावे बरे?
थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा!
हे एवढे एकच काय ते खरे असावे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

तुर्की-चितपावन लोकांच्या DNA मध्ये खूप साम्य आहे असे वाचले आहे

सुधीर काळे
Tue, 07/05/2011 - 06:46 नवीन
पंगा-जी, "आम्ही चितपावन" या पुस्तकाच्या लेखकांपैकी एक-डॉ. जगन्नाथ दीक्षित-माझे चांगले पत्रस्नेही आहेत. पूर्वी आम्ही दोघे एका संस्थळावर बरेच लिहायचो. त्यांनी लिहिलेल्या वरील पुस्तकात त्यांनी चितपावनांच्या DNA वर खूप लिखाण केलेले आहे. (दुर्दैवाने मला ते समजले मात्र नाहीं) मी तुर्कस्तानच्या भेटीनंतर त्यांना तुर्की लोकांच्या दही-ताकाबद्दलच्या आवडीबद्दल लिहिले असता त्यांनी तुर्की लोकांच्या आणि चितपावन लोकांच्या DNA मध्ये खूप साम्य असल्याबद्द्ल मला कळविले होते. पण ही माहिती सांगोवांगीची (hearsay) आहे! यातून काय तो बोध घ्यावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

बहुधा तथ्य नसावे

पंगा
Tue, 07/05/2011 - 09:30 नवीन
पुर्वी वाचले होते की चित्पावन स्पेन मध्ये गेले की तेथील स्थानिक त्यांना स्पॅनिश समजुन त्यांच्याशी स्पॅनिश मध्ये संभाषणास सुरुवात करतात. आता ह्यात तथ्य किती ते माहिती नाही.
बहुधा तथ्य नसावे, असे वाटते. साधी गोष्ट घ्या. स्पॅन्यर्ड्ज़ जर कोंकणात - किंवा गेलाबाजार सदाशिवपेठेत - आले, तर स्थानिक लेले-नेने-सानेमंडळी त्यांना चित्पावन समजून त्यांच्याशी सानुनासिक मराठीत 'हॅ हॅ हॅ... कसें येणें केलेंत? चहां घेऊनच आलां असांल... काय? चहां घेत नाहीं तुम्हीं? उत्तम! अहों, चहां पित्तकारक, म्हणजे प्रकृतीस अपायकारक! छे छे... काँफीं आम्हीं नाहीं हो पींत! काँफीं बद्धकोष्ठकारक आणि वातकारक - तुम्हींसुद्धां कद्धी पीत जाऊं नकां बरें... असो. पुन्हां कधी आलांत(च), तर जेवूंन जा हों' अशी संभाषणास सुरुवात करतील काय? थियरीत तथ्य असते, तर इट शुड हॅव वर्क्ड बोथ वेज़.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

हॅ हॅ हॅ

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/05/2011 - 09:51 नवीन
ग्रीक लोकांनी माझ्याशी ग्रीकमधून संभाषण सुरू करण्याचा अनुभव आहे. मला ग्रीक समजत नाही हे समजल्यावर इंग्लिशमधून बोलले; (इंग्लिश येत नाही हे ग्रीक बोलण्याचं कारण नव्हतं*). "मी ग्रीक दिसते काय?", असं न विचारल्यामुळे त्यांनी ग्रीकमधून संभाषण सुरू करण्याचं कारण समजलं नाही. *बेल्जममधे असताना फ्रेंच आणि डच / फ्लामिश येत नसल्यामुळे मी मराठी बोलणं वेगळं! ... पण, सदाशिवपेठी कोब्रा लोकं भय्या आणि अण्णा लोकांशीही मराठीतूनच बोलतात असं ऐकून आहे! तसं एका पोर्तुगीज मातृभाषिक ब्राझिलियन बाईने माझ्याशी केलेल्या संभाषणाची सुरूवात "नमस्ते"ने केली होती. मी पण मग स्पॅनिश आणि पोर्तुगीज फार वेगळे नसाव्यात या समजापायी "ओलाऽ" केलं बाकी मूळ थिअरीबद्दल काही कल्पना नाही. शरद यांच्याकडून या लेखाप्रमाणे माहितीपूर्ण लेखनाची अपेक्षा आहेच. वेगवेगळ्या देशांतल्या करदात्यांच्या पैशांवर किती प्रवास केला याची ही जाहिरात नव्हे. तुर्की, ग्रीस हे देशच नव्हे तर एकूण भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांमधल्या हवेमुळे तिथे दही लागणं शक्य आहे या कारणामुळे हे लोकं दही खातात हे शक्य आहे का? आजघडीला पश्चिम युरोपात ग्रीक दही बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. ग्रीक शाकाहारी जेवणाची चवही आपल्या शाकाहारी जेवणाशी साधर्म्य दाखवणारी असते, याचं कारण हवा असेल काय? इंग्लंडात भेंडी,गवारी पिकत नाहीत. याचा संदर्भ मानवी गुणसूत्रांशी नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

पण तरीही...

पंगा
Tue, 07/05/2011 - 10:07 नवीन
... पण, सदाशिवपेठी कोब्रा लोकं भय्या आणि अण्णा लोकांशीही मराठीतूनच बोलतात असं ऐकून आहे!
हो, पण याचा अर्थ ते भय्या आणि अण्णा मंडळींना कोब्रा समजतात असा घेता येऊ नये, नाही का? (कदाचित स्पेनमधील स्पॅन्यर्डांचे आणि ग्रीसमधील ग्रीकांचेही असेच काही असू शकेल काय?) अतिअवांतर: फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीतून जात होतो, आणि जुनी दिल्ली स्टेशनावर उतरल्यावर तेथून लाल किल्ल्याकडे जायचे होते. (अतिअतिअवांतर: लाल किल्ला बघण्यासाठी म्हणून नव्हे. तर, दिल्लीत मला जेथे जायचे होते तेथे मला नेणारी बस लाल किल्ल्यासमोरून सुटत होती म्हणून. असो.) रस्ता तसा साधारणपणे माहीत होता, पण एका चौकात पोहोचल्यावर 'आपल्याला उजवीकडे वळायचे आहे ते नेमके या चौकात की पुढल्या चौकात' अशा प्रकारचा संभ्रम मनात निर्माण झाला. म्हणून सर्वप्रथम दिसला त्या पोलिसाला हटकून रस्ता विचारला. पोलीस सरदारजी. त्याने मला समजते-न समजते याची पर्वा न करता अस्खलित पंजाबीतून पत्ता सांगितला. आणि मी 'मला पंजाबी समजत नाही, कृपया हिंदीत सांगतलेत तर बरे होईल' असे वारंवार (हिंदीतून) सुचवूनही महाशय पंजाबीची कास सोडायला तयार नव्हते. आता या पोलिसाला मी सरदारजी आहे असे वाटण्याचे कोणतेही कारण निदान माझ्या तरी लक्षात आलेले नाही. (मी फेटा बांधत नाही, दाढी सहसा वाढवत नाही आणि त्या वेळी तर निश्चितच वाढवलेली नव्हती.) असो.
तुर्की, ग्रीस हे देशच नव्हे तर एकूण भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांमधल्या हवेमुळे तिथे दही लागणं शक्य आहे या कारणामुळे हे लोकं दही खातात हे शक्य आहे का? आजघडीला पश्चिम युरोपात ग्रीक दही बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. ग्रीक शाकाहारी जेवणाची चवही आपल्या शाकाहारी जेवणाशी साधर्म्य दाखवणारी असते, याचं कारण हवा असेल काय? इंग्लंडात भेंडी,गवारी पिकत नाहीत. याचा संदर्भ मानवी गुणसूत्रांशी नसावा.
ही शक्यता पटण्यासारखी वाटते. अधोरेखिताशी विशेष सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

फेटा

आनंदयात्री
Tue, 07/05/2011 - 20:51 नवीन
>> फेटा बांधत नाही, दाढी सहसा वाढवत नाही आणि त्या वेळी तर निश्चितच वाढवलेली नव्हती फेटा या शब्दाएवजी पगडी हा शब्द योग्य आहे अशी आमची एक बारकी सुचवणी, बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

तुमच्या अतिअवांतरातला पंजाबी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/05/2011 - 22:06 नवीन
तुमच्या अतिअवांतरातला पंजाबी बोलणारा पोलिस आणि माझ्या आधीच्या प्रतिसादात लिहील्याप्रमाणे मी बेल्जममधे जाऊन मराठी बोलणं यात मला फार फरक दिसत नाही.
याचा अर्थ ते भय्या आणि अण्णा मंडळींना कोब्रा समजतात असा घेता येऊ नये, नाही का? कदाचित स्पेनमधील स्पॅन्यर्डांचे आणि ग्रीसमधील ग्रीकांचेही असेच काही असू शकेल काय?
शक्य आहे. फ्रेंच लोकं सर्व जगाशी फ्रेंचच बोलतात याचं कारण ते जगाला फ्रेंच भाषिक, फ्रेंच वांशिक नव्हे(!) समजतात असं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

माझेही अवांतर

स्मिता.
Fri, 07/08/2011 - 21:42 नवीन
फ्रेंच लोकं सर्व जगाशी फ्रेंचच बोलतात याचं कारण ते जगाला फ्रेंच भाषिक, फ्रेंच वांशिक नव्हे(!) समजतात असं आहे. हे बाकी अगदी खरं. कुणीही येवून फ्रेंच तर बोलतातच (कदाचित मी फ्रेंच दिसत असेल ;)), पण आपण कितीही नम्रपणे त्यांना इंग्रजीतून बोलायची विनंती केली तरी ते बोलत नाहीत (इंग्रजी बोलता येत असेल तरी!!) हाईट म्हणजे इंडियन स्टोअर चालवणारेही (जे बहुदा तमिळ असतात) सर्व भारतीय चेहर्‍यांशी संभाषणाची सुरूवात फ्रेंचमधूनच करतात असा अनुभव आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला... असा नियम लागू व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडक्यात तुम्ही फ्रांस मधे

शिल्पा ब
Fri, 07/08/2011 - 23:49 नवीन
थोडक्यात तुम्ही फ्रांस मधे असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

फिल्टर

स्मिता.
Sat, 07/09/2011 - 01:47 नवीन
मला खूप दिवसापासून एक प्रश्न आहे: तुमच्या लॅपटॉप/डेस्कटॉपच्या पडद्यातून काय फक्त लिहिणार्‍याच्या वास्तव्याच्या जागांचीच नावे तेवढी फिल्टर होवून दिसतात का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हो.

शिल्पा ब
Sat, 07/09/2011 - 05:43 नवीन
हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

हे तुम्ही फ्रेंच मडळींमुळे तमिळी असे झाले म्हणत असाल

सूड
Sat, 07/09/2011 - 01:24 नवीन
>>ढवळ्या शेजारी पवळा बांधला... असा नियम लागू व्हावा. हे तुम्ही फ्रेंच मडळींमुळे तमिळी असे झाले म्हणत असाल तर मी उलट म्हणेन की फ्रेंचांना ही सवय तमिळींमुळे लागली असावी. तिकडे जाऊनही तमिळींनी मातृभाषेचा नसता टेंभा मिरवायला लागल्यावर फ्रेंच मडळींनी वेळीच सावध होऊन ही फ्रेंच बोलण्याची सवय लावून घेतली असावी. असा माझा आपला अंदाज, बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

स्मिताजी हाच अनुभव तुम्हाला

निनाद मुक्काम …
Sat, 07/09/2011 - 04:00 नवीन
स्मिताजी हाच अनुभव तुम्हाला जर्मनी मध्ये येईल . युके मध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे .( येथे गुजराती आणी पंजाबी ही लोक दुसर्या महायुध्धा नंतर केनिया व इतर आफ्रिकन देशात पूर्वी मजूर म्हणू नेली होती ती इंग्रजांनी बहुसंख्य प्रमाणात यु के मध्ये आणली .स्वस्त मजूर मिळवणे हा मुख्य हेतू .ह्याच लोकांच्या समूहाने पुढे भारतीय किराणा माल व हॉटेल ह्याची मोठ्ठी साखळी युकेत निर्माण केली .लंडन मधील सौथ होल येथे पंजाबी किंवा हिंदी येत असेल तर दुकानच काय पण कुठल्याही ठिकाणी निभाऊन जाते . वेम्ली मध्ये हिंदी आणी गुजराती आले पाहिजे . तर इस्ट लंडन मध्ये हिंदी आणी बंगाली . पण अशी सुविधा फ्रेंच लोकांनी त्यांच्या कॉलनी असलेल्या देशांना दिली नाही .त्यामुळे फ्रांस व जर्मनी येथे कुठल्याही परप्रांतीय माणसाला तेथील भाषा यावी लागते . सध्या अनेक निर्वासित ( आफ्रिकन व अरब देशातील ) ह्यांच्या देशात येऊन स्वस्तात काम करत आहेत .तर कुशल मजूर ( भारत ,जपान ,अमेरिका ) येथून येऊन मोठ्या पदावर आहेत .त्यामुळे स्पर्धेत व गुणवत्तेत स्थानिक युरोपियन मार खात आहेत .भरीस भर म्हणून पूर्व युरोप युरोपियन युनियन मध्ये आला आहे .त्यामुळे त्यांचे लोंढे ह्यांच्या देशातील नोकर्या पळवत आहेत .त्यामुळे आपल्या संस्कृतीवर गदा येईल व आपल्या देशात आपण परके होऊ ह्या असुरक्षित भावना त्या मागे असते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

सहमत

स्मिता.
Sat, 07/09/2011 - 12:29 नवीन
निनाद, तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीवर गदा येईल व आपल्या देशात आपण परके होऊ ह्या असुरक्षित भावना त्या मागे असते. कोणत्याही परप्रांतात गेल्यावर तिथल्या लोकांनी आपल्याशी स्थानिक भाषेत संभाषण सुरू करण्यास हे महत्त्वाचे कारण असावे. आपले राष्ट्र, भाषा याविषयीची अस्मिता जागृत ठेवण्याचा तो प्रयत्न असावा. असाच अनुभव आपल्याकडे तामिळनाडूमध्ये येतो. यावरून सर्वच भारतीय तमिळ लोकांसारखे दिसतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ;) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हे ग्रीक लोक

प्रचेतस
Tue, 07/05/2011 - 10:06 नवीन
हे ग्रीक लोक पुर्वी भारतात आलेच होते. मूळात पश्चिम आशियातील आयोनिया भागातून आलेले हे लोक. आयोनिया म्हणजेच सध्याचा ग्रीस. तिकडून आलेले लोक आयोनियन, त्यांना इथले लोक योन म्हणायला लागले झाले व परत पुढे यवन म्हणून रूपांतरण झाले. मौर्य, सातवाहनकाळातील बौद्ध धर्माच्या प्रसारानंतर यातील बहुसंख्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, पुढे हिंदू धर्माचा प्रभाव परत वाढल्यानंतर यातीलच काही हिंदू झाले असतील व पुढे त्यांचेपण ब्राह्मणीकरण झाले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं

नितिन थत्ते
Tue, 07/05/2011 - 10:27 नवीन
चला. कुठले का होईना..... कोकणस्थ बाहेरचे (परके/उपरे वगैरे) हे कन्फर्म ना? नाही म्हणजे उपर्‍यांना घालवून लावण्यासाठीचं* आंदोलन सुरू करायला हवे. ;) . . . * घालवून दिल्यावर त्यांनी स्पेन/इस्राएल/ग्रीस/तुर्कस्थान कोठेही जावे. तो आमचा प्रश्न नाही. . . (स्थानिक भूमिपुत्र)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सावरकर...

पंगा
Tue, 07/05/2011 - 10:38 नवीन
... हे चित्पावन, नाही का? (नसल्यास चूभूद्याघ्या.) म्हणजे (या थियरीप्रमाणे) मूळचे यवन! मग त्यांना यवनांबद्दल नि यावनी संस्कृतीबद्दल एवढा राग का बरे असावा? की अरबस्तानातले प्रेषितापूर्वीचे मूर्तिपूजक रहिवासीही अरबच, आजचे (मुसलमान) रहिवासीही अरबच, पण आजच्या रहिवाशांना 'त्या' अरबांच्या संस्कृतीबद्दल तिटकारा असतो, तसे काही आहे हे? हो म्हणा, कितीही झाले तरी सावरकर म्हणजे बाटगे यवन. (बाटून हिंदू ब्राह्मण झालेले.) आणि बाटगे हे अधिक कट्टर असायचेच. जाऊ द्या, झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एक उपपत्ती

प्रचेतस
Tue, 07/05/2011 - 11:21 नवीन
मी फक्त एक उपपत्ती मांडली. यवनांचा(ग्रीकांचा - यांना बरेच लोक गैरसमजूतीमुळे मुसलमान वा अरब मानतात. ) व चित्पावनांचा काही संबंध असेलच असेही नाही. पण यवनांनी बौद्ध/हिंदू धर्म स्वीकारला होता हे मात्र निश्चित, याचे पुरावे आजही लेण्यांमध्ये शिलालेखांच्या रूपाने बघायला मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

शो कॉज नोटीस - हा धागा का उडवू नये?

सोत्रि
Sat, 07/02/2011 - 12:25 नवीन
होमपेज वरील संपादकांच्या नोटीशीला फाट्यावर मारणारा हा धागा का उडवू नये?
  • Log in or register to post comments

-१

प्यारे१
Sat, 07/02/2011 - 12:40 नवीन
शरद यांनी कुठलीही जिज्ञासा न दाखवता सरळ्सोट माहिती दिलेली आहे. यामध्ये भडकाऊ पणाचे काहीही आढळत नाही. समाजमानसात असलेले प्रवाद त्यांनी इथे मांडले आहेत. (हे वैयक्तिक मत आहे.) उत्तम माहिती शरदराव. अवांतरः ऐतिहासिक काळात आलेल्या/झालेल्या/लादल्या गेलेल्या देशीविदेशी 'संबंधां'मुळे निर्माण शारिरीक वर्णबदलाच्या शक्यतेवर आज ऐच्छिक/ स्वेच्छा म्हणून केलेल्या संबंधातून शारिरीक वर्णबदल होण्याच्या काळात चर्चा सुरु असलेली पाहून अम्मळ मौज वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अवांतर

अजातशत्रु
Sat, 07/02/2011 - 14:28 नवीन
अवांतरः ऐतिहासिक काळात आलेल्या/झालेल्या/लादल्या गेलेल्या देशीविदेशी 'संबंधां'मुळे निर्माण शारिरीक वर्णबदलाच्या शक्यतेवर आज ऐच्छिक/ स्वेच्छा म्हणून केलेल्या संबंधातून शारिरीक वर्णबदल होण्याच्या काळात चर्चा सुरु असलेली पाहून अम्मळ मौज वाटते आहे.
ऐतिहासिक काळात आलेल्या/झालेल्या/लादल्या गेलेल्या देशीविदेशी 'संबंधां'मुळे निर्माण शारिरीक वर्णबदल आज ऐच्छिक/ स्वेच्छा म्हणून केलेल्या संबंधातून शारिरीक वर्णबदल होण्याच्या काळ ?? ... . . . . . .. . . . . . . (जनरलवाले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नोटीस देणारे तुम्ही कोण?

शिल्पा ब
Tue, 07/05/2011 - 03:54 नवीन
नोटीस देणारे तुम्ही कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

छान

विसोबा खेचर
Sat, 07/02/2011 - 14:05 नवीन
छान लेख..! आपला, (बहुजनसमाजवादी चित्तपावन) तात्या.
  • Log in or register to post comments

त्यांचे म्हणणे ही माणसे

Nile
Sat, 07/02/2011 - 14:23 नवीन
त्यांचे म्हणणे ही माणसे दक्षिणेतील कर्नाटकातून कोकणात शिरली
द्क्षिण कर्नाटकात लेले, नेने वगैरे नावे आढळतात काय? नसल्यास अशी नावे कशी आली असावीत?
आणखी एक पुरावा म्हणजे माणुस स्वदेश सोडून दुसरीकडे गेला तरी नवीन वस्तीस आपल्या जुन्या गावांची नावे ठेवतो. जगभर ही प्रथा आहे. कर्नाटकातील अनेक गावांची नावे कोकणातही आढळतात
. पण ही नावे कोकणस्थांनीच ठेवली असे कशावरून ठरवता येते?
मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.
ब्राह्मणत्वच का दिले असावे?
या उपर्‍या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते.
कालांतराने बदल होण्याचे कारण काय असावे?
तिसरे मत हे लोक मराठवाडा-विदर्भातून चवदाव्या शतकातल्या दुष्काळात तेथून निघाले व कोकणात स्थिरावले. या वेळी महाराष्ट्रात इतकी उलथापालथ झाली होती की हे सहजशक्य आहे. याला पुरावा म्हणून आंबेजोगाई येथील देवी अनेक कोकणस्थ कुटुंबांची कुलदेवता आहे याची साक्ष देतात. नाही तर शेकडो मैलांवर असलेले दैवत कुलदैवत कसे होणार ?
इतकी उलथापालथ झालीच असेल तर कोकणातून विदर्भाकडे का गेले नसतील आणि तिकडे गेलेल्यांनी सोयीने आंबेजागाई कुलदेवता का करून घेतली नसावी? कोकणात कोकणस्थांचे कीती कुलदेव्/देवता आहेत? त्याशिवाय कालौघात, देशावरचे/विदर्भातले काही कोकणस्थ झाले नसावेत याला काही खात्रीशीर पुरावा आहे काय?
चित्पावन देवीचे उपासक नाहीत पण काहींनी जोगेश्वरी ही कुलदेवता म्हणून स्विकारली.
हे वाक्यवरील विधानाला छेद देतेच. वरील प्रश्न फक्त कुतुहल म्हणून विचारलेले आहेत.
  • Log in or register to post comments

श्री. नाईलशत्रु ह्यांना

परिकथेतील राजकुमार
Sat, 07/02/2011 - 14:38 नवीन
श्री. नाईलशत्रु ह्यांना अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आमचे कुलदेवत कर्‍हाटेश्वर आणि

खादाड
Sat, 07/02/2011 - 14:29 नवीन
आमचे कुलदेवत कर्‍हाटेश्वर आणि जोगेश्वरी आहे !
  • Log in or register to post comments

रिज्युम

अजातशत्रु
Sat, 07/02/2011 - 14:30 नवीन
मला वाटले धागा पुन्हा संपादित करुन रिज्युम झाला कि काय?
  • Log in or register to post comments

छान माहिती

रणजित चितळे
Sat, 07/02/2011 - 14:33 नवीन
मला माहित नव्हती ही माहिती.
  • Log in or register to post comments

आभार.........!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/02/2011 - 18:27 नवीन
माहितीपूर्ण लेखनाबद्दल आभार.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

'आम्ही चित्पावन' या पुस्तकात तपशीलवार माहिती आहे

योगप्रभू
Sat, 07/02/2011 - 18:45 नवीन
म. श्री. दिक्षित यांच्या 'आम्ही चित्पावन' या पुस्तकात चित्पावन समाजाचा इतिहास, चालीरीती, स्वभाववैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती आहे. बाकी चालू दे...
  • Log in or register to post comments

सिर्फ

तिमा
Sat, 07/02/2011 - 19:23 नवीन
'चित्पावन -कोकणस्थ', सिर्फ नाम ही काफी है! (वाद निर्माण व्हायला, पोटात दुखायला, हार्टबर्न व्हायला)
  • Log in or register to post comments

या धाग्यावर कोणताही जातीय वाद

रेवती
Sat, 07/02/2011 - 20:00 नवीन
या धाग्यावर कोणताही जातीय वाद सुरु होवू नये ही इच्छा! माहिती म्हणूनही काही लिहायची सोय ठेवली नाहिये.
  • Log in or register to post comments

नमस्कार, मिसळपाव.कॉमवर

अविनाशकुलकर्णी
Sat, 07/02/2011 - 22:46 नवीन
मिसळपाव.कॉमवर कुठल्याही प्रकारे जातीय अथवा धार्मीक तेढ निर्माण करणारे लेखन लिहीण्यास बंदी आहे. कुणी सदस्यं जाणीवपुर्वक असे लेखन करताना आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. कुणाला असे लेखन आढळल्यास कृपया संपादकांशी संपर्क साधावा. तसेच मिसळपाव हे केवळ मराठी म्हणून एकत्र येणार्‍या मराठी मनाच्या लोकांसाठी आहे.ज्यांना ही मराठीपणाची चौकट मान्य नसेल त्यांना संकेतस्थळावर प्रवेश घेण्याची तसदी घेऊ नये. ============================================ असे लिहावयाचे व देशस्थ..कोकणस्थ..क~हाडे..ओ.बीसी ..दलीत..असे लेख लिहायचे हे कितपत योग्य??????????कुठली जात काहि स्वर्गातुन वा नरकातुन निर्माण झाली नाहि मग कौतुक वा द्वेश कशा साठी??...........धागा उडवणार का? का देशस्थ..त्यांचे कार्य..संत मंडळी..सामाजिक योगदान..शिवकालीन काळातिल स्वराज्य स्थापने मधिल योगदान ....असा धागा आला वा दलित समाज व आंबेडकरांचे योगदान..वा शिवाजी महाराज..मराठा समाज..व त्यांचे योगदान चालीरिति...वा फुले व त्यांना त्रास देणारा ब्राह्मण समाज व फुल्यांचे कार्य व माळी समाजाच्या चालिरिति ...असे लिहिले तर त्याचे स्वागत करणार????????????जातीय अथवा धार्मीक तेढ निर्माण करणारे वा कौतुक व उदात्तिकरण करणारे असेहि लिखाण नसावे असे वाटते...........
  • Log in or register to post comments

अविनाश

चिरोटा
Sat, 07/02/2011 - 23:22 नवीन
अविनाश करतात धाग्याचा सत्यानाश!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

नमस्कार, मिसळपाव.कॉमवर

अजातशत्रु
Mon, 07/04/2011 - 17:32 नवीन
श्री.अविनाशकुलकर्णी आपल्याशी सहमत आहे.
जातीय अथवा धार्मीक तेढ निर्माण करणारे वा कौतुक व उदात्तिकरण करणारे असेहि लिखाण नसावे असे वाटते..
कौतुक व उदात्तिकरण करण्यास काहि हरकत नाही, पण ते करण्याच्या नादात इतरांना बालिशपणे खिजवने अत्यंत हिन आहे, अशाच एका प्रतिसादावर मि दिलेली प्रतिक्रिया या दोन्ही ही अप्रकाशीत करण्यात आलेल्या आहेत, संपादक मंडळाच्या या कारवायीचे मनापासून अभिनंदन, केलेली कारवायी अत्यंत योग्य होती.अतिशय आवडले. या लेखातून येणारी नवनविन माहीती खरेच महत्वपुर्ण आहे, आणखी माहीतीच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

>>या मताप्रमाणे यांचा गोरा

नर्मदेतला गोटा
Sun, 07/03/2011 - 00:19 नवीन
>>या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते. -- हॅ हॅ हॅ यांच्यातही अनेक लोक काळ्या रंगाचे असतात हे कशे ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा