✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

प
पिवळा डांबिस यांनी
Mon, 06/27/2011 - 23:36  ·  लेख
लेख
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे. जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात. संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!! या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही. जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!! काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते.... आमेन!!!! :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
22890 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

हा हा हा! वाचुन मजा आली!

इंटरनेटस्नेही
Tue, 06/28/2011 - 21:29 नवीन
हा हा हा! वाचुन मजा आली!
  • Log in or register to post comments

ऐला असं आहे होय. बरं आता सावध

llपुण्याचे पेशवेll
Wed, 06/29/2011 - 11:03 नवीन
ऐला असं आहे होय. बरं आता सावध राहीन.
  • Log in or register to post comments

हे सारे काय होऊन राहीले

नर्मदेतला गोटा
Wed, 06/29/2011 - 22:45 नवीन
हे सारे काय होऊन राहीले आहे आपल्याला चेष्टा अजिबात सहन होत नाही, सारं कसं शिस्तीत, नियम पाळून व्हायला हवं हे आपले मत वात्रटपणाला एकदम विरोध आपला तर पोराहो आता दंगा एकदम बंद. चाचा कानपुरीया ( गोटा नर्मदेतला)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
Wed, 06/29/2011 - 23:11 नवीन
हॅ हॅ हॅ! - टिंग्या संस्थापक, लष्कर-ए-खरडा
  • Log in or register to post comments

ही पण एक टिंगीच

आनंदयात्री
Wed, 06/29/2011 - 23:22 नवीन
>>संस्थापक, लष्कर-ए-खरडा ही पण एक टिंगीच (थाप) बरका !! ही संस्था अदिती, मनस्वी आणि अजुन काही अबलांना मैत्रीकिड्यापासुन मदत करण्यासाठी हेल्पलाईनच्या स्वरुपात आम्ही स्थापन केली होती. त्या काळाच्या गाजलेल्या खरडमोहिमांमध्ये श्री टिंगोजीराव खेडेकर यांचे कार्य वादातीत आहे पण त्यांचे संघटनेतील स्थान हे भाडोत्री अतिरेकी एवढेच होते हे नमूद् करु इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

अबला?

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/30/2011 - 00:30 नवीन
अदिती, मनस्वी या काही अबला काय ... चालू द्यात तुमचे पालथे धंदे, आंद्याशेठ! मला खरडवही बंद करणे वगैरे जुन्या गमती आठवल्या. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अहो

आनंदयात्री
गुरुवार, 06/30/2011 - 00:42 नवीन
अहो अबला म्हणजे स्त्री. तुम्ही शालेय जीवनात समानार्थी शब्द तर नक्की पाठ केले असतील .. आठवा बरे. - आंदुत्सु >>मला खरडवही बंद करणे वगैरे जुन्या गमती आठवल्या. असो. मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ नये म्हणुन मी बापडा खव बंद करायचो त्याच काय काढलंन आता. - (नामानिराळा) आंद्यकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/30/2011 - 00:51 नवीन
मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ नये म्हणुन मी बापडा खव बंद करायचो त्याच काय काढलंन आता.
याला म्हणतात ओढवून घेणे. मी बिझी असताना फोन करण्याबद्दल बोलत होते. असो. मनस्वी कुठे आहे अलिकडे? (लैच अवांतर झालं का, समजून घ्या हो मंडळी!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

क्काय?

श्रावण मोडक
गुरुवार, 06/30/2011 - 09:14 नवीन
क्काय? अबला आणि स्त्री हे समानार्थी शब्द आहेत? कॉम्प्लान प्या आणि मोठे व्हा. ;) मालक, यापैकी एक 'अबला' तिथंच आहे. मागाहून ती बला वाटली नाही म्हणजे मिळवली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

जौंद्या हो गूर्जी

Nile
गुरुवार, 06/30/2011 - 12:17 नवीन
(न्यूली)मॅरीड लोकांना पब्लिक मध्ये असली विधानं करावी लागतात म्हणतात. ;-) पळा तिच्यायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अनुभवाचे बोल

श्रावण मोडक
गुरुवार, 06/30/2011 - 12:20 नवीन
लग्न झालं असेल (किंवा नसतानाही तत्सम (या शब्दाचे वेगळे अर्थ माहिती करून घेण्याचा उपक्रम मी तरी केलेला नाही) तर तो पुरूष पब्लिकमध्ये कदापि स्त्रीचा अबला असा उल्लेख करणार नाही. जो करेल त्याला लगेचच ती सबला कशी असते याचा पुरावा क्लोज्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये त्याच्या बायकोकडूनच मिळतो म्हणतात. इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी भर टाकावी ही विनंती (उरलेल्या काहींनी त्यावरून धडे घेऊन आपला मार्ग ठरवावा).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/30/2011 - 12:24 नवीन
इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी भर टाकावी ही विनंती
बिकांच्या प्रतिक्रीयेची वाट पहात आहे. लपुन वारकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अवांतर

आनंदयात्री
गुरुवार, 06/30/2011 - 19:05 नवीन
श्रामो,नाईल्या आणि परा यांच्या अवांतर लेखनावर कारवाई होण्याची वाट पहात आहे. - सतत तक्रारकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सतत तक्रारकर्ते!!!

पिवळा डांबिस
Fri, 07/01/2011 - 09:36 नवीन
मिपावर आवश्यक असलेल्या लेखनस्वातंत्र्याचे आम्ही किती पुरस्कर्ते आहोत हे माहिती असतांना सुद्धा तुम्ही आमच्याच धाग्यावर कारवाई होण्याची आशा बाळगतांना पाहून एक मिपाकर म्हणून आणि तुमचा एक पर्सनल मित्र म्हणून आम्हाला शरम वाटते...... त्यांना काय लिहायचं ते त्यांना लिहूद्यात, तुम्हाला काय लिहायचं ते तुम्ही मोकळेपणाने लिहा.... तुमच्या लेखनस्वातंत्र्याचाही मी पुरस्कर्ता आहे.... पण उगाच कारवाई वगैरे वशिल्याला यामध्ये आणू नका हो...... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

येस

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 09:57 नवीन
येस. पिडांकाका, धन्यवाद. या मुस्कटदाबीचा मीही विरोध करतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हा हंत हंत

आनंदयात्री
Fri, 07/01/2011 - 17:45 नवीन
>>येस. पिडांकाका, धन्यवाद. या मुस्कटदाबीचा मीही विरोध करतो मोडकांचे पण काका !!! आता तुम्हीच ठरवा बॉ पिडाकाका ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

आदर

श्रावण मोडक
Fri, 07/01/2011 - 18:18 नवीन
मोठ्यांचा आदर करतो आम्हीही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

भंपक

आनंदयात्री
Fri, 07/01/2011 - 19:06 नवीन
>>मोठ्यांचा आदर करतो आम्हीही... म्हणजे तुम्हाला मी भंपक वाटतो ? मी खरच तुमचा आदर करतो म्हणुन तुम्हाला आदरार्थी संबोधतो. मी भंपक नाही असे सिद्ध करायला काय करू ? अब्दुल कलामांविषयी अनादराने बोलु का ? परफेक्ट सोल्युशन .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अदितीच्या पराक्रमाचा विषय

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/30/2011 - 12:16 नवीन
अदितीच्या पराक्रमाचा विषय निघाला की पुण्यातली मिपाकर मंडळी हसण्यावारी नेतात कींवा उघड-उघड कमी लेखतात. परुत्सु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

पुण्याबाहेरही जग आहे हो

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/01/2011 - 03:24 नवीन
पुण्याबाहेरही जग आहे हो पराशेट. पुणे विद्यापीठ आणि सदाशिव पेठ नदीच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>पुणे विद्यापीठ आणि सदाशिव

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 07/01/2011 - 19:09 नवीन
>>पुणे विद्यापीठ आणि सदाशिव पेठ नदीच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना आहेत. तुम्हाला गटाराच्या दोन बाजूला असे म्हणायचे आहे काय ?? असो, जिकडे छोट्याश्या टेकडीला (खरे तर पुटकुळी आहे ती) पर्वती म्हणू शकतात तिथे त्या नाल्याला प्रतिगंगा म्हणत नाहीत हेच खूप झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खिक्क् !!

सूड
Sat, 07/02/2011 - 16:39 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

टिंग्या संस्थापक,

विजुभाऊ
Sat, 07/02/2011 - 10:00 नवीन
टिंग्या संस्थापक, लष्कर-ए-खरडा अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! टिंगीतै खरडा फार खाल्ला तर विदर्भात एक व्याधी होते. याची नोंद ठेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

पि डां काका..

मी-सौरभ
Wed, 06/29/2011 - 23:28 नवीन
सेंचुरी साठी शुभेच्छा :) बा.द् वे- टारु परत तडीपार का??
  • Log in or register to post comments

शंभरी

शेखर
गुरुवार, 06/30/2011 - 00:51 नवीन
शंभरी भरण्यास मदत म्हणुन हा प्रतिसाद ;)
  • Log in or register to post comments

जमात ए कम्पु

तुझ्याच शोधात....
गुरुवार, 06/30/2011 - 12:11 नवीन
मस्त आहे मला हि घ्या यात..
  • Log in or register to post comments

फार टवाळक्या नकोत बिन लादेन

नर्मदेतला गोटा
Fri, 07/01/2011 - 02:11 नवीन
फार टवाळक्या नकोत बिन लादेन नाही पण मुल्ला ओमर येत आहे तो नाही तर आहेतच आपले....... जाऊदे दिवे घ्या -- तात्पर्य- अंधार खूप झाला पणती जपून ठेवा
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ हॅ!!

चतुरंग
Fri, 07/01/2011 - 05:20 नवीन
चान चान पिडांकाका, एकदम बिनपाण्यानेच केली आहेत की मूळ धाग्याची! ;) (जमात्-ए-पंपू) रंग-ए-चतुर
  • Log in or register to post comments

मेलो..........

धमाल मुलगा
Fri, 07/01/2011 - 18:20 नवीन
>>(जमात्-ए-पंपू) रंग-ए-चतुर मी चुकून 'ज' ला काना वाचला आणि रंगाशेठची किती धुलाई होईल ह्या विचारानं खुर्चीतून सांडलो की. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आपुनबी वरीजनल टवाळखोरच्य

गंगाधर मुटे
Fri, 07/01/2011 - 11:31 नवीन
आपुनबी वरीजनल टवाळखोरच्य है. कंपूमे थोडीशी जगहा देवनाजी...! :)
  • Log in or register to post comments

ठो ठो ठो.....

धमाल मुलगा
Fri, 07/01/2011 - 18:16 नवीन
:D क्यालिफोर्निया पीठासनाधिश श्री.श्री.श्री. पिवळा डांबिसमहाराज १००८ ह्यांच्या दिव्य प्रवचनाचा आज फारा दिवसांनी योग आला! कसं धन्य धन्य वाटलं बरं. :)
उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.
=)) =)) =)) इच्चिभनं....डायरेक्ट पिसंच काढली का? असो. हल्ली म्हणे हलाल-मुर्गा बारामतीकर स्थानबध्दतेत असतात आणि बंद ग्यालरीच्या कठड्याशी रेलून 'ने मजसि ने..परत भांडूपभूमीला...' असं गुणगुणत असतात अशी ऐकिव माहिती आहे. ;)
काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते.
सहमत आहे. डांबिसरावांनी जमात-ए-कंपू ची 'लष्कर-ए-खरडा' ही अतिरेकी कारवायांना वाहिलेली उपसंघटना जाणून बुजून दुर्लक्षित केली आहे काय असा प्रश्न पडला. ;) -मागीन भत्ते.
अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे.
ह्या कार्याने प्रभावित होऊन पुढील वर्षी डांबिसमहाराजांना जंतरमंतर येथे 'टवाळपाल' बीलाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचे प्रमुखपद देण्याचे सरकंपूचालकांनी ठरवले आहे अशी बातमी आहे. -आनंदछत्री. छ्या:! काय राव डांबिसकाका, ते आपले जुने धंगे-धिंगाणे आठवून हल्ली आपण सगळे असे पुन्हा का करत नाही बरं ह्या विचारानं अंमळ हिरमुसलो राव.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा