Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Mon, 06/27/2011 - 20:53
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लॉबसंग रांपा चं "यु फॉरेव्हर" पुस्तक बरेच दिवसांनी परत एकदा वाचनात आलं. यातील एक लेख आहे "ऑरा" या विषयावर. मानवी शरीराभोवती असणारे वलय जे सामान्य डोळ्यांना दिसू शकत नाही परंतु "कर्लियन फोटोग्राफी" ने दिसू शकते. लेखकाने एक मुद्दा मांडला आहे की - २ व्यक्तींचे ऑरा काही बिंदूंना अगदी व्यवस्थित जुळतात तर काही बिंदूना "टँजेन्शिअल" छेदून जातात. जितके अधिक ते जुळतात तितकी आपल्याशी समविचारी अशी ती व्यक्ती असते. आणि जितक्या अंशात छेदून जातत तितकी आपली मते फारकत घेतात. मला या मुद्द्यात तथ्य वाटते. अगदी निकटच्या व्यक्तींशी देखील १००% कधीच पटत नाही. शिवाय एकाच गोष्टीकडे पहाण्याचा २ व्यक्तींचा दृष्टीकोनदेखील कधीकधी १८० अंशाने भिन्न असतो. यासंदर्भात मला २ उदाहरणे आठवतात. दोन्ही माझ्या प्रिय व्यक्तींबरोबरची आहेत - एक बाबांबरोबरचे तर दुसरे नवर्‍याबरोबरचे आहे. बाबांचं मत हे आहे की एकदा का शाळा आणि अभ्यास मागे लागला की बालपण एकप्रकारे हरवते. कारण मग लहान मुलांना लवकर उठावं लागतं, अभ्यास मागे लागतो, रूटीन मागे लागतं. म्हणजे मुक्त, स्वच्छंद असं बालपण हरवतच. याउलट माझं मत आहे की मुलं "दिने दिने - प्रतिदिने" शहाणी बनतात, त्यांच्या भविष्याची पायाभरणी होते. लवकर उठायची सवय लागून, मेंदूतील संप्रेरके, कोठा आदि व्यवस्थित काम करायची शिस्त लागते आणि ते एक निरामय, निरोगी आयुष्य जगण्याची पूर्वतयारी करतात. दुसरा प्रसंग असा - मला नेहमी बालपण हवेसे वाटते. चिंतामुक्त, जबाबदारीमुक्त, स्वच्छंद आयुष्य हवेसे वाटते. याउलट नवर्‍याचे मत आहे बालपणाचा काळ हा अतिशय अनिश्चिततेचा आणि परावलंबनाचा असतो. मोठेपणी आपण शिक्षण-नोकरी-लग्न-मुले या जबाबदार्‍यातून मुक्त झालेलो असतो याउलट बालपणी हेच सर्व टांगती तलवार बनून डोक्यावर असते. अशा वैचारीक भिन्नतेचे स्पष्टीकरण वर लिहील्याप्रमाणे लेखकाने नमूद केले आहे.
  • Log in or register to post comments
  • 9430 views

प्रतिक्रिया

Submitted by मुलूखावेगळी on Wed, 06/29/2011 - 15:25

Permalink

अगदी निकटच्या व्यक्तींशी

अगदी निकटच्या व्यक्तींशी देखील १००% कधीच पटत नाही. शिवाय एकाच गोष्टीकडे पहाण्याचा २ व्यक्तींचा दृष्टीकोनदेखील कधीकधी १८० अंशाने भिन्न असतो.
मला पन १ उदाहरन आठवले माझी आई आनि वडील ह्यांच्यात रा.स्व. न संघ समिती ह्याबद्दल असेच वैचारिक मतभेद आहेत. म्हन्जे आई स्वल्प मदत करते तर वडिलांचे ह्याबद्दल अती प्रतिकुल मत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on गुरुवार, 06/30/2011 - 05:31

Permalink

माझे आनि माझ्या बायकोत

माझे आनि माझ्या बायकोत कोन्तेच मतभेद नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 06/30/2011 - 20:19

In reply to माझे आनि माझ्या बायकोत by नरेशकुमार

Permalink

कोणी वि४लय??

आम्हाला या माहितीचा काय उपेग? ३१ जूनला सत्कार ठेवू का शणिवार वाड्यावर आपला?
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 07/01/2011 - 08:01

In reply to कोणी वि४लय?? by मी-सौरभ

Permalink

सत्कार भाईकाकांच्या स्टाइलनं

सत्कार भाईकाकांच्या स्टाइलनं का सरकारनामाच्या स्टाइलनं ते सांगा की जरा.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 06/30/2011 - 12:19

Permalink

भेंडी आपला ऑरॉ तर साला

भेंडी आपला ऑरॉ तर साला सगळ्यांशीच टँन्जेशिअली छेदून जातो का काय फोकलीचा! घ्याला कवेत घ्यायचा उपाय बिपाय आहे का नाय हो काकू? का ओकांची नाडी (चावटपणा नकोय उगाच इथे) बघायला जावं लागलं? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on गुरुवार, 06/30/2011 - 17:50

Permalink

शुचिना काही प्रश्न १.

शुचिना काही प्रश्न १. कर्लियन फोटोग्राफी हा काय प्रकार आहे ? तसेच ऑरा दुसर्या कुठल्या मार्गांनी तपासता येतो कॅया? २. ऑरा आणि रेकी ह्याचा काही संबध आहे काय ? ३. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवं पय: ह्या उक्ती प्रमाणे प्रत्येक स्वभावधर्म आणि आणि प्रत्येक जलाशयातील पाणी हे वेगळे असत. तर प्रश्न असा आहे की तुम्हाला ऑरा चा काही अनुभव आलाय की लेखात फक्त एक परस्परसबंध दाखवायचा प्रयत्न केला आहे ? अवांतर : - मौजमजा आणि विचार ह्या कटेगिरी मध्ये लेख पाहून अंमळ गंमत वाटली !
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 06/30/2011 - 18:30

Permalink

हम्म्म्म्म्म्म्.म्म्म्म

लवकर उठायची सवय लागून, मेंदूतील संप्रेरके, कोठा आदि व्यवस्थित काम करायची शिस्त लागते हे मात्र खरे आहे.कोठा साफ झाला नाही तर माणुस विचित्र विचार करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वानन्द on गुरुवार, 06/30/2011 - 18:33

In reply to हम्म्म्म्म्म्म्.म्म्म्म by वेताळ

Permalink

विचारांचं माहित नाही पण

विचारांचं माहित नाही पण हावभाव मात्र विचित्र करतो :D
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 06/30/2011 - 22:11

In reply to विचारांचं माहित नाही पण by स्वानन्द

Permalink

म्हणजे कोटा साफ झाला तर एक

म्हणजे कोटा साफ झाला तर एक नाडीपट्टी नाहीतर दूसरी असं काहीतरी आहे काय? भां.बा.! आमचा एक मित्र दिवसातून पाच वेळा जातो ना राव, त्याच्या कीती पट्ट्या असतील!!! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 07/01/2011 - 08:06

Permalink

काही लोक ज्या आत्मविश्वासाने

काही लोक ज्या आत्मविश्वासाने गुंतागुंतीच्या वाटणार्‍या प्रक्रियांचं सहज सोपं "शास्त्रीय" कारण देतात ते पाहून न्यूनगंड येतो. असो. लेखाची धाटणी आवडली. अवांतरः हे ऑरा वगैरे म्हटलं की मला का कोण जाणे पण ऑरो नावाचं एक पात्र आठवतं.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com