वैचारीक भिन्नता
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
लॉबसंग रांपा चं "यु फॉरेव्हर" पुस्तक बरेच दिवसांनी परत एकदा वाचनात आलं. यातील एक लेख आहे "ऑरा" या विषयावर. मानवी शरीराभोवती असणारे वलय जे सामान्य डोळ्यांना दिसू शकत नाही परंतु "कर्लियन फोटोग्राफी" ने दिसू शकते.
लेखकाने एक मुद्दा मांडला आहे की - २ व्यक्तींचे ऑरा काही बिंदूंना अगदी व्यवस्थित जुळतात तर काही बिंदूना "टँजेन्शिअल" छेदून जातात. जितके अधिक ते जुळतात तितकी आपल्याशी समविचारी अशी ती व्यक्ती असते. आणि जितक्या अंशात छेदून जातत तितकी आपली मते फारकत घेतात.
मला या मुद्द्यात तथ्य वाटते. अगदी निकटच्या व्यक्तींशी देखील १००% कधीच पटत नाही. शिवाय एकाच गोष्टीकडे पहाण्याचा २ व्यक्तींचा दृष्टीकोनदेखील कधीकधी १८० अंशाने भिन्न असतो.
यासंदर्भात मला २ उदाहरणे आठवतात. दोन्ही माझ्या प्रिय व्यक्तींबरोबरची आहेत - एक बाबांबरोबरचे तर दुसरे नवर्याबरोबरचे आहे.
बाबांचं मत हे आहे की एकदा का शाळा आणि अभ्यास मागे लागला की बालपण एकप्रकारे हरवते. कारण मग लहान मुलांना लवकर उठावं लागतं, अभ्यास मागे लागतो, रूटीन मागे लागतं. म्हणजे मुक्त, स्वच्छंद असं बालपण हरवतच. याउलट माझं मत आहे की मुलं "दिने दिने - प्रतिदिने" शहाणी बनतात, त्यांच्या भविष्याची पायाभरणी होते. लवकर उठायची सवय लागून, मेंदूतील संप्रेरके, कोठा आदि व्यवस्थित काम करायची शिस्त लागते आणि ते एक निरामय, निरोगी आयुष्य जगण्याची पूर्वतयारी करतात.
दुसरा प्रसंग असा - मला नेहमी बालपण हवेसे वाटते. चिंतामुक्त, जबाबदारीमुक्त, स्वच्छंद आयुष्य हवेसे वाटते. याउलट नवर्याचे मत आहे बालपणाचा काळ हा अतिशय अनिश्चिततेचा आणि परावलंबनाचा असतो. मोठेपणी आपण शिक्षण-नोकरी-लग्न-मुले या जबाबदार्यातून मुक्त झालेलो असतो याउलट बालपणी हेच सर्व टांगती तलवार बनून डोक्यावर असते.
अशा वैचारीक भिन्नतेचे स्पष्टीकरण वर लिहील्याप्रमाणे लेखकाने नमूद केले आहे.
प्रतिक्रिया
अगदी निकटच्या व्यक्तींशी
माझे आनि माझ्या बायकोत
कोणी वि४लय??
सत्कार भाईकाकांच्या स्टाइलनं
भेंडी आपला ऑरॉ तर साला
शुचिना काही प्रश्न १.
हम्म्म्म्म्म्म्.म्म्म्म
विचारांचं माहित नाही पण
म्हणजे कोटा साफ झाला तर एक
काही लोक ज्या आत्मविश्वासाने
Pagination