Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Mon, 06/27/2011 - 20:53
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लॉबसंग रांपा चं "यु फॉरेव्हर" पुस्तक बरेच दिवसांनी परत एकदा वाचनात आलं. यातील एक लेख आहे "ऑरा" या विषयावर. मानवी शरीराभोवती असणारे वलय जे सामान्य डोळ्यांना दिसू शकत नाही परंतु "कर्लियन फोटोग्राफी" ने दिसू शकते. लेखकाने एक मुद्दा मांडला आहे की - २ व्यक्तींचे ऑरा काही बिंदूंना अगदी व्यवस्थित जुळतात तर काही बिंदूना "टँजेन्शिअल" छेदून जातात. जितके अधिक ते जुळतात तितकी आपल्याशी समविचारी अशी ती व्यक्ती असते. आणि जितक्या अंशात छेदून जातत तितकी आपली मते फारकत घेतात. मला या मुद्द्यात तथ्य वाटते. अगदी निकटच्या व्यक्तींशी देखील १००% कधीच पटत नाही. शिवाय एकाच गोष्टीकडे पहाण्याचा २ व्यक्तींचा दृष्टीकोनदेखील कधीकधी १८० अंशाने भिन्न असतो. यासंदर्भात मला २ उदाहरणे आठवतात. दोन्ही माझ्या प्रिय व्यक्तींबरोबरची आहेत - एक बाबांबरोबरचे तर दुसरे नवर्‍याबरोबरचे आहे. बाबांचं मत हे आहे की एकदा का शाळा आणि अभ्यास मागे लागला की बालपण एकप्रकारे हरवते. कारण मग लहान मुलांना लवकर उठावं लागतं, अभ्यास मागे लागतो, रूटीन मागे लागतं. म्हणजे मुक्त, स्वच्छंद असं बालपण हरवतच. याउलट माझं मत आहे की मुलं "दिने दिने - प्रतिदिने" शहाणी बनतात, त्यांच्या भविष्याची पायाभरणी होते. लवकर उठायची सवय लागून, मेंदूतील संप्रेरके, कोठा आदि व्यवस्थित काम करायची शिस्त लागते आणि ते एक निरामय, निरोगी आयुष्य जगण्याची पूर्वतयारी करतात. दुसरा प्रसंग असा - मला नेहमी बालपण हवेसे वाटते. चिंतामुक्त, जबाबदारीमुक्त, स्वच्छंद आयुष्य हवेसे वाटते. याउलट नवर्‍याचे मत आहे बालपणाचा काळ हा अतिशय अनिश्चिततेचा आणि परावलंबनाचा असतो. मोठेपणी आपण शिक्षण-नोकरी-लग्न-मुले या जबाबदार्‍यातून मुक्त झालेलो असतो याउलट बालपणी हेच सर्व टांगती तलवार बनून डोक्यावर असते. अशा वैचारीक भिन्नतेचे स्पष्टीकरण वर लिहील्याप्रमाणे लेखकाने नमूद केले आहे.
  • Log in or register to post comments
  • 9430 views

प्रतिक्रिया

Submitted by इरसाल on Mon, 06/27/2011 - 21:01

Permalink

आणि जितक्या अंशात छेदून जातत

आणि जितक्या अंशात छेदून जातत तितकी आपली मते फारकत घेतात. ------------------------------------------------------------------------------------------- तुम्ही म्हणताय तसे जर असेल ? तर बायकोबरोबर माझा ऑरा आरी सारखा असेल हो. उगाच : कर्लिअन फोटोग्राफी म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by पल्लवी on Mon, 06/27/2011 - 21:23

Permalink

हे हे हे...

आरी : :D ह्म्म. एकमेकांना भेद्णारी २ चक्र कशी दिसतील तसे दिसेल. शुचि : बिन्दु जुळने किंवा टॅन्जन्ट छेद माहीत नाही. पण ऑरा हे प्रकरण कुतुहल वाढ्वणारे आणि काही अंशी विश्वास ठेवण्यासारखे आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 06/27/2011 - 21:24

Permalink

लोबसांग राम्पा हा थर्ड क्लास

लोबसांग राम्पा हा थर्ड क्लास फिक्शन रायटर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 06/27/2011 - 21:31

In reply to लोबसांग राम्पा हा थर्ड क्लास by यकु

Permalink

तुमचं मत तसं असू शकतं पण मला

तुमचं मत तसं असू शकतं पण मला तो लेखक आवडतो. फिक्शनल पण "न्यू एज" च्या विषयांवर तो लिहीतो. फार पूर्वी भारतात त्याची पुस्तके वाचली होती. आवडली होती. सध्या परत वाचते आहे. "अ‍ॅस्ट्रल ट्रॅव्हल, थर्ड आय, ऑरा, दगड आणि त्यांच्या मेटॅफिजिकल प्रॉपर्टीज, प्राचीन ज्ञान, मृत्यूपश्चात जीवन" आदि त्याचे विषय असून त्यात थर्ड क्लास असं मला काही वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 06/27/2011 - 21:33

In reply to तुमचं मत तसं असू शकतं पण मला by शुचि

Permalink

मग ठीक आहे.

मग ठीक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Tue, 06/28/2011 - 11:32

In reply to तुमचं मत तसं असू शकतं पण मला by शुचि

Permalink

म्हणजे तुम्ही खुप पूर्वी पासुन परदेशी रहाता ..हे सांगायचा आहे तर

फार पूर्वी भारतात त्याची पुस्तके वाचली होती ........
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 06/28/2011 - 11:45

In reply to तुमचं मत तसं असू शकतं पण मला by शुचि

Permalink

<< फिक्शनल पण "न्यू एज" च्या

<< फिक्शनल पण "न्यू एज" च्या विषयांवर तो लिहीतो. त्यात थर्ड क्लास असं मला काही वाटत नाही. मग तुला सायंटॉलॉजीत सुद्धा रस आहे का? सहज विचारलं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Wed, 06/29/2011 - 15:19

Permalink

वैचारीक भिन्नता शोधायला ऑरा चेक करायची काय गरज ?

अंधश्रध्दा उत्तेजीत करणारे लिखाण.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 06/27/2011 - 21:29

Permalink

मिसळपाववरील

मिसळपाववरील आयडींचे कोणीतरी कर्लियन फोटोग्राफ काढून चिकटवा पाहू... मग कळेल कोण कोणाला किती अंशात छेदून जातो ते. थोडं सीरियसली... रांपा यांचं 'स्पष्टीकरण' तुमच्या बाबतीत कसं लागू होतं ते कळलं नाही. ऑरा हा विचारांचं कारण आहे की परिणाम आहे हेही स्पष्ट झालं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 06/27/2011 - 21:35

In reply to मिसळपाववरील by राजेश घासकडवी

Permalink

मला जे समजलं त्यावरून - रांपा

मला जे समजलं त्यावरून - रांपा चे म्हणणे आहे की - २ व्यक्तींचा ऑरा पूर्ण अनुरूप किंवा मॅचिंग असा कधीच नसतो. कुठेतरी रेषा छेदून जातात. आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे वैचारीक भिन्नता.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 06/27/2011 - 21:38

Permalink

ईन्डकटिव्ह आणी डिडक्टिव्ह पद्धतीने तपासा

असले ऑरा मानवी शरिराभोवतीच नव्हे,तर लोखंडी रॉड,प्लेस्टिकच्या कोणत्याही वस्तु...किंबहुना स्रुष्टितल्या यच्चयावत वस्तुंभोवती दिसतात(फोटोग्राफीच्या त्याच तसल्या ठराविक तंत्रामुळे)...त्याचा मानवी स्वभावधर्माच्या सुसंगती विसंगतीशी काहीही संमंध नाही...कसे ते तपासण्यासाठी - शीर्षकात नमूद केलेली पद्धती वापरावी--'' ते बींदू जितके जुळतात तितकी ती व्यक्ती आपल्याशी समविचारी''हे इंडक्टिव्हली प्रुव्ह झालं,अता डिडक्टिव्हली प्रुव्ह होतं का यासाठी--हे तत्व उलट करुन पहा--आपल्याशी समविचारी असणाय्रा १०जणांची यादी करा--अता यातल्या किमान ८ किंवा ६जणांशी तरी या तत्वानुसार आपले बिंदू जुळले पाहिजेत,जुळतात का ते पहा..याच प्रमाणे आपले ज्यांच्याशी जमत नाही,त्यांच्याही बाबतीत उरलेलं अर्ध तत्व उलट(डिडक्टिव्हली) तपासता येइल..,अर्थात ही ऑरा पद्धती भंपक आहे...पण,ज्योतिष-भविष्या कडे ज्या कारणांनी माणसं जातात,तसलीच कारणं या विज्ञानाचा मुलामा चढवलेल्या अंधश्र द्धांकडे जाण्या मागेही आहेत...काळ बदलला /जगण्या वागण्यासाठी आधुनिक साधन सामुग्री हताशी आली,तरी मन जो पर्यंत बदलत नाही(अंतर मनावरचे जुने संस्कार) तो पर्यंत नवनवीन अंधश्रद्धांचा जन्म होत राहणारच...फक्त त्यांचा प्रतिवाद करणं आमच्या हतात आहे... आज तरी...
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 06/27/2011 - 21:50

In reply to ईन्डकटिव्ह आणी डिडक्टिव्ह पद्धतीने तपासा by अत्रुप्त आत्मा

Permalink

वैज्ञानिक्-वैज्ञानिक म्हणवून

वैज्ञानिक्-वैज्ञानिक म्हणवून घेण्याच्या नादात आपण "क्लोजड माईंडेड" तर होत नाही ना हे देखील पहा. झाडाच्या पानाभोवती देखील ऑरा असतो. आपल्या आणि पानाच्या ऑराचं इंटरॅक्शन कसं होतं ते अजून माहीत नाही पण २ व्यक्तींच्या ऑराचं इंटरॅक्शन कदाचित रांपाने दिले आहे तसे होतही असेल. कदाचित लिहीले आहे - I am just being open minded. शेवटी सिद्ध कसं करणार आणि खोडून कसं काढणार जर ऑराच दिसत नसेल तर हे काही समजलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 06/28/2011 - 00:46

In reply to वैज्ञानिक्-वैज्ञानिक म्हणवून by शुचि

Permalink

वैज्ञानिक द्रुष्टीकोनाचा संमंध ओपन माईंडेड नेसशीच असतो...

तो तसा नसता तर,प्रगतीचा टप्पा मानवाच्या द्रुष्टीपथातच आला नसता,तेंव्हा क्लोज मांईं-डेड होण्याचा प्रश्नच येत नाही. आणी ओपन माईंडेडनेस म्हणजे जे आहे त्याचा स्विकार हो,,,जे असण्याची शक्यता आहे त्याचा नव्हे...शक्याशक्यतेलाच आपण पर्यायी शब्द -'' कदाचित ''- हा वापरलेला आहे. जेंव्हा एखादी गोष्ट कदाचित,म्हणजेच निव्वळ ''संभवनीय'' स्वरुपातली असते,तेंव्हा माणसानी तिथे स्थिरं राहायच असतं...(तेंव्हा माईंड ओपन राहिलं,तर त्याचा नकळत स्विकार होउन त्याचं श्रद्धेत कधी रुपांतर झालं हे कळतही नाही)... २)त्या फोटोग्राफीच्या तंत्रामुळे(करामतीमुळे)ऑरा दिसतो हो...माझ्या परिचयाच्या एका माणसानी मला झाडांचा/गाईचा ऑरा दाखवलाय,,,इतकच नव्हे तर आपल्या हतानी झाडाला/गाइला स्पर्शोपचार या नावाखाली हतानी ऊब देउन,आपण मंत्रानी ऑरा पॉवर-फुल्ल केला,किंवा वैश्विक प्राण शक्ती-(काय जबरी संज्ञा हाये राव)-आपल्या डोक्यातुन शिरुन हातातुन झाडात/गाईत जाते...आणी या सगळ्या मुळे उत्पादन वाढ होते...असा ''कळस'' सिद्धांत मांडुन दाखवला...मी त्यांना वरील प्रमाणेच काही उलट तपासणीची विनंती केली,तेंव्हा मात्र त्यांनी उत्पादनवाढ म्हणजे दर्जावाढ किंवा प्रत सुधारणा अशी पलटी खाल्ली.मी त्यांना त्याचीही कारणे स्पष्ट केल्यावर मग मात्र त्यांनी कांगावा केला...आणी मला वैज्ञानिक /एकांगी/अंनिसवादी वगैरे त्यांच्या नेहमीच्या पठडीतील शिव्या दिल्या.आमच्या सारख्यांचा हे खोडुन काढण्यामागचा ओढा ज्यानी काहीही मिळण्याची शक्यता नाही,त्याच्या मागे धावुन वेळ,परिश्रम,पैसा वाया जाउ नये.एवढाच असतो.यात काही आमचं चुकत असेल तर सांगा...कारण याच गोष्टींना उद्या प्रसिद्धी मिळाली की ही लोकं त्याचा धंदा केल्यावाचुन थोडीच रहाणार आहेत?वरील महाशयांनी या झाडं/गाई उत्पादन वाढ तंत्रावर एक दोन मासिकात लेखही लिहिल्याचं त्यांनीच मला सांगितल होतं...उद्या ते शेतकरी/गवळ्यांकडनं प्रोजेक्टही मिळवतिल,कुणी सांगावं?...गेल्याच महिन्यात आमच्या बिझनेस मिटिंगच्या ठिकाणी एक चुंबकचिकित्सावादी याच ओय्राला धरुन चांगलं तासभर प्रवचन देउन गेला.आणी त्याला बरेचजण गळाला लागलेही...आंम्हाला त्यांना मिळणाय्रा पैश्या पेक्षा लोकांची होणारी दिशाभुल जास्त अस्वस्थ करते...म्हणुन ही खोडाखोडी... ३)अवैज्ञानिक उपायांचा अर्थ-जखम एकिकडे,मलम भलतिकडे-असा होतो,,,आणी ते मलम असतं औषध नव्हे,,,त्यानी तात्पुरतं गार वाटतं,जखम आत चिघळतच राहते त्याचं काय? शेवटी आपल्याला परिणामकारक उपाय हवा की फक्त कोरडं समाधान याचा निर्णय आपण घ्यायलाच हवा... ता क---या हल्लीच्या सगळ्या वैज्ञानिक मुलामा देउन वापरल्या जाणाय्रा नव उपचार पद्धती(रेकी/विपश्यना/ चुंबक चिकित्सा/ निसर्गोपचार)या वर प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी-'पर्यायी उपचार की अंधश्रद्धेचा बाजार'नावाचं पुस्तक लिहिलं आहे.ते अवश्य वाचावे.मिळण्याचे ठिकाण-साधना मिडिया सेंटर... शनिवार पेठ पोलिस गेट समोर,पुणे...(अशी पुस्तके बहुशः तिथेच उपलब्ध असतात,म्हणुन पत्ता दिला आहे)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 06/28/2011 - 01:38

In reply to वैज्ञानिक द्रुष्टीकोनाचा संमंध ओपन माईंडेड नेसशीच असतो... by अत्रुप्त आत्मा

Permalink

>> अवैज्ञानिक उपायांचा

>> अवैज्ञानिक उपायांचा अर्थ-जखम एकिकडे,मलम भलतिकडे-असा होतो,,,आणी ते मलम असतं औषध नव्हे >> शक्य आहे!!! मला याबाबतीत अनुभव/माहीती नाही. पण एक माहीत आहे की सर्व गोष्टी विज्ञानाच्या पातळीवर जोखता येत नाहीत. विज्ञान हे- (१) स्थलातीत (२) कालातीत असते, (३) व्यक्तीसापेक्ष नसते. मी रोज जी स्तोत्रे म्हणते ती खूप व्यक्तीसापक्ष परीणाम करतात. माझ्यावर त्यांचा चांगला परीणाम होतो (माझ्या मेंदूतील संप्रेरके अधिक चांगल्या तर्‍हेने रिस्पॉन्ड करतात - श्रद्धेचा परीणाम असेल) तोच परीणाम दुसर्‍या व्यक्तीवर कदाचित होत नाही पण म्हणून मी त्या स्तोत्रांचे औषधी गुण (माझ्यापुरता) नाकारत नाही. हाच मुद्दा अन्य पर्यायी औषधोपचारांना लागू होत असावा. माहीत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 06/27/2011 - 22:04

Permalink

स्केप्टिक

हे ही पहावे. अवांतर : लेखकाने एक मुद्दा मांडला आहे की - २ व्यक्तींचे ऑरा काही बिंदूंना अगदी व्यवस्थित जुळतात तर काही बिंदूना "टँजेन्शिअल" छेदून जातात. या वाक्यात टॅन्जन्शिअल आणि छेदून असे एकमेकाशी विरुद्ध शब्द आहेत. म्हणजे जर टॅन्जन्शिअल असेल तर छेदणार नाही आणि छेदत असतील तर टॅन्जन्ट असणार नाहीत. लेखकाने काहीतरी वेगळे लिहिले असावे. (असेच लिहिले असेल तर एकुणातच दुर्लक्ष करावे).
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 06/27/2011 - 22:10

Permalink

ओरा म्हणजे ऋषी मुनी लोकांच्या

ओरा म्हणजे ऋषी मुनी लोकांच्या डोक्याभोवती वर्तुळ दाखवतात तेच ना? त्याचा अन वैचारिक भिन्नतेचा काय संबंध? ती तर असणारच. प्रत्येकाचे विचार कोणत्या न कोणत्या बाबतीत वेगवेगळे असणारच. त्याच्या एवढं पुस्तक बिस्तक लिहिण्यासारखं काय सापडलं लेखकाला !!
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 06/28/2011 - 02:03

Permalink

नेहमीच्या संकल्पनेसाठी ग्रीक शब्दाचा भडिमार

"वेगवेगळ्या व्यक्तींचे काहीकाही विचार जुळतात तर काहीकाही विचार जुळत नाहीत" ही नेहमीची संकल्पना आहे, आणि निरीक्षणही आहे. त्याकरिता ग्रीक शब्द (पण मूळ अर्थाने नव्हे) रचून काय नाविन्य आहे, ते नीटसे कळलेले नाही "वेगवेगळ्या व्यक्तींच्या ऑरा कधीकधी जुळतात तर कधीकधी जुळत नाहीत." ("ऑरा" शब्द योजण्याआधीसुद्धा तुम्ही दिलेली दोन कौटुंबीक उदाहरणे पटण्यासारखीच होती, आणि "ऑरा" शब्द वापरल्यानंतर तुमच्या उदाहरणांबाबत वेगळे काहीच कळले नाही. रोजवापरातले, सोपे-समजणारे शब्द वापरून चांगल्या रीतीने संवाद साधत असेल, तर दुर्बोध शब्द योजू नये, असे मला वाटते.) "ऑरा" शब्दाचा जुना ग्रीक (आणि लॅटिन) अर्थ "झुळूक" असा होता. इंग्रजीत "प्रकाशमान वलये" असा उपयोगसुद्धा मी ऐकलेला आहे. या दोनपैकी काव्यात्मक उपमा म्हणून कुठलीही चालेल. म्हणजे माझ्या विचारांची झुळूक आणि माझ्या बाबांच्या विचारांची झुळूक कधीकधी एकाच दिशेने वाहातात... असे काहीसे. किंवा "माझ्या विचाररूपी पिंडाचे विस्ताररूपी प्रकाशवलय" हे रूपकही चालून जाईल. (त्याच प्रमाणे माझ्या विचाररूपी तेंडुलकराने मारलेल्या फटाक्यांचे परीघ, असे रूपकही चालून जाईल.) उपमांना तोटा नाही.उपमा जितक्या नवीन वापराल, जुन्या टाळाल, तितके तुमचे लिखाण प्रभावी होत जाईल. तुम्हाला तुमच्या कौटुंबीक उदाहरणात खरोखरेच्या झुळका किंवा प्रकाशवलये तर अनुभवात आलेली नाहीत ना? फक्त काव्यात्म उपमाच अनुभवात आल्या आहेत ना? म्हणजे तुम्हाला अक्षरशः (काव्यात्म उपमेच्या दृष्टीने नव्हे) अशी प्रकाशवलये जाणवतात काय? तुमच्या पहिल्या परिच्छेदात किर्लियन फोटोंचा उल्लख आहे. म्हणजे पिंडांभोवती जे काय विद्युत(-चुंबकीय) फरक असतात, त्यांचे चित्रण. हा प्रकारसुद्धा झुळूक किंवा प्रकाशवलय यांच्यासारखा उपमास्वरूपच आहे ना? म्हणजे तुमचे पती आणि तुम्ही ज्या बाबतीत सहमत आहात, तेव्हा तुम्हा दोघांचे विद्युत-वलय एकमेकांना छेद देते. पण आनंदी मूल जवळ असता तुमचे विद्युत-वलय मुलाच्या विद्युत-वलयाला छेद देते, पण तुमच्या पतीचे विद्युतवलय मात्र त्या आनंदी मुलाच्या वलयापासून दूर राहाते? हे आश्चर्यकारक वाटते. दोन पिंड जवळ आल्यास त्यांची विद्युतवलये एकमेकांना छेद देतीलच असे वाटते. आणि पिंडांमधील अंतर जास्त असेल, तर छेद देणार नाहीच असे वाटते. तुमचा अनुभव काव्यात्म उपमास्वरूप असला, तरच मला पटतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 06/28/2011 - 12:23

Permalink

ऑरा रॉ !!! डायरीचे पान आवडले

ऑरा रॉ !!! डायरीचे पान आवडले नाही. काय लिहिले आहे तेच कळले नाही. का लिहिले आहे तेच कळले नाही. आता नसेल दोन व्यक्तिंचे पटत. आपल्याला काय करायचय त्याच्याशी ? उगाच कशाला लष्कराच्या भाकर्‍या भाजायच्या ?
शिवाय एकाच गोष्टीकडे पहाण्याचा २ व्यक्तींचा दृष्टीकोनदेखील कधीकधी १८० अंशाने भिन्न असतो.
असेल असेल. पण आजकाल बर्‍याचदा पुरुषांनी एखाद्या पुरुषाकडे आणि स्त्रीयांनी त्याच पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टीकोन एकच असतो. सॅमसंग झंप्या
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 06/28/2011 - 12:30

Permalink

मला हे सापडले

http://www.esotericonline.net/profiles/blogs/who-are-hue
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 06/28/2011 - 12:36

In reply to मला हे सापडले by इरसाल

Permalink

काय हो, हापिसात हेच जर

काय हो, हापिसात हेच जर करायचंय तर काय क्रमश: करून ठेवलंय त्याचा पुढचा भाग टंका.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 06/28/2011 - 13:18

In reply to मला हे सापडले by इरसाल

Permalink

भेंडी मी ते आधी

भेंडी मी ते आधी eroticonline.net असे वाचले. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 06/29/2011 - 19:36

In reply to भेंडी मी ते आधी by परिकथेतील राजकुमार

Permalink

सवयी

सवयी बदला. मोठे व्हा. - आंद्या मोडक
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 06/30/2011 - 17:36

In reply to भेंडी मी ते आधी by परिकथेतील राजकुमार

Permalink

भेंडी नाय काय ......गवार

भेंडी नाय काय ......गवार होणार माझी. ओ बोट दाखवून आणि दात काढून काय हसताय इकडे मी संपादकांच्या निशाण्यावर बसलोय असे वाटतेय. गरीबांचा मोगो गरिबांवर उठलाय. त्यामुळे अश लील नाई बोलायच्य बलका ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 06/28/2011 - 12:43

Permalink

तेजाला कैच कल्ला नाय

तेजाला कैच कल्ला नाय
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 06/28/2011 - 13:04

Permalink

शुचिकाकू बिघडल्या का काय परत?

शुचिकाकू बिघडल्या का काय परत? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 06/28/2011 - 21:40

Permalink

चांगला विषय... वाचतो आहे!

चांगला विषय... वाचतो आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 06/29/2011 - 03:21

In reply to चांगला विषय... वाचतो आहे! by इंटरनेटस्नेही

Permalink

काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु

काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु पुढचा भाग सुद्धा टंकणार आहेत का?
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Wed, 06/29/2011 - 20:17

In reply to काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु by शिल्पा ब

Permalink

काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु

काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु पुढचा भाग सुद्धा टंकणार आहेत का? मला अश्या ऑक्ल्ट सायन्सेस वरील विषयांवर वाचायला आवडतं.. पुर्वी ज्योतिष बघायला पण शिकत होतो.. पण कार्यव्यग्रतेमुळे वेळ मिळेनासा झाला म्हणुन पुर्ण कररा आलं नाही.. :(
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 06/30/2011 - 11:08

In reply to काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु by इंटरनेटस्नेही

Permalink

अगंबाई!!! कसली कार्यव्यग्रता

अगंबाई!!! कसली कार्यव्यग्रता एवढी?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 06/30/2011 - 11:55

In reply to काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु by इंटरनेटस्नेही

Permalink

अरे

शिंदळीच्या इंट्या, कालेजातल्या पोरींवर लाईन मारायचं वय तुझं अन कसली डोंबलाची व्यग्रता घेउन बसलायस रे! ह्या व्यग्रतेपाई वैग्रे वैग्रेचा त्रास होईल जपून जरा. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 06/30/2011 - 11:59

In reply to अरे by Nile

Permalink

नाईतं काय!!! इंट्या, विनायक

नाईतं काय!!! इंट्या, विनायक पाचलग झालाय का रे तुझा? (मेले!! आहे आता दोन पानी लेक्चर!!)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on गुरुवार, 06/30/2011 - 23:34

In reply to नाईतं काय!!! इंट्या, विनायक by शिल्पा ब

Permalink

आम्ही पोरींवर नाही, पोरी

आम्ही पोरींवर नाही, पोरी आमच्यावर लाईन मारतात. ;) - इंट्या पॉप्युलर.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 07/01/2011 - 00:00

In reply to आम्ही पोरींवर नाही, पोरी by इंटरनेटस्नेही

Permalink

पोरी तुम्हाला जे मारतात

पोरी तुम्हाला जे मारतात त्याला दगड म्हणतात रे दगडा! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 07/01/2011 - 00:15

In reply to पोरी तुम्हाला जे मारतात by Nile

Permalink

पोरी तुम्हाला जे मारतात

पोरी तुम्हाला जे मारतात त्याला दगड म्हणतात रे दगडा! हवे असल्यास आपण एकदा मुंबईला या, आणि फॅक्ट फाईंडिंग इन्क्वायरी करा!
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 07/01/2011 - 07:12

In reply to आम्ही पोरींवर नाही, पोरी by इंटरनेटस्नेही

Permalink

आम्ही पोरींवर नाही, पोरी

आम्ही पोरींवर नाही, पोरी आमच्यावर लाईन मारतात. Wink
बब्बो.... खपलो.... वर्ल्डकप फायनलचा सिक्सरच, =) =) =) =) =) =) पाय करा जरा पूढे, थोडी कृपा व्हावी म्हणतो. हे साध्य कसं केलत जरा मार्गदर्शन द्या म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 06/30/2011 - 11:58

In reply to काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु by इंटरनेटस्नेही

Permalink

मला अश्या ऑक्ल्ट सायन्सेस

मला अश्या ऑक्ल्ट सायन्सेस वरील विषयांवर वाचायला आवडतं.. पुर्वी ज्योतिष बघायला पण शिकत होतो.. पण कार्यव्यग्रतेमुळे वेळ मिळेनासा झाला म्हणुन पुर्ण कररा आलं नाही..
Image removed. Image removed. आता बास करा की स्वतःच्या टिमक्या वाजवणे. ज्याची खरच इच्छा असते तो कुठल्याही अडचणीतुन मार्ग काढून ज्ञान मिळवतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on गुरुवार, 06/30/2011 - 23:29

In reply to मला अश्या ऑक्ल्ट सायन्सेस by परिकथेतील राजकुमार

Permalink

आता बास करा की स्वतःच्या

आता बास करा की स्वतःच्या टिमक्या वाजवणे. ज्याची खरच इच्छा असते तो कुठल्याही अडचणीतुन मार्ग काढून ज्ञान मिळवतोच. हा हा! आम्ही काहीही बोललो तरी, त्याची टिमकी कशी होते देव जाणे! ज्योतिष शिकण्याच्या काळातच एन एस एस जॉईन केले आणि त्यात बिझी झालो. बाकी, ज्याची खरच इच्छा असते तो कुठल्याही अडचणीतुन मार्ग काढून ज्ञान मिळवतोच. - हे मात्र बरोबर आहे, संपुर्ण सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 06/30/2011 - 15:40

In reply to काय करणार वाचुन? आणि शुचीकाकु by इंटरनेटस्नेही

Permalink

अरे हो बरं आठवलं,

मध्यंतरी ते विपश्यना का बिपश्यना काय तरी शिकायला गेला होतास ना !! किती मार्कांनी पास केलंनीत ?? आय मीन किती मार्क्स मिळाले त्यात ?? माहित नै म्हणून विचारतोय हो, उगाच गैरसमज नको.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on गुरुवार, 06/30/2011 - 23:32

In reply to अरे हो बरं आठवलं, by सूड

Permalink

मध्यंतरी ते विपश्यना का

मध्यंतरी ते विपश्यना का बिपश्यना काय तरी शिकायला गेला होतास ना !! किती मार्कांनी पास केलंनीत ?? आय मीन किती मार्क्स मिळाले त्यात ?? माहित नै म्हणून विचारतोय हो, उगाच गैरसमज नको. विपश्यना सस्केसफुली पुर्ण केली.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 07/01/2011 - 00:03

In reply to मध्यंतरी ते विपश्यना का by इंटरनेटस्नेही

Permalink

चला हे फार बरं झालं !!

विपश्यना सस्केसफुली पुर्ण केली. चला हे फार बरं झालं !! अवांतरः सही आवडली ब्वॉ तुमची.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 07/01/2011 - 00:11

In reply to चला हे फार बरं झालं !! by सूड

Permalink

चला हे फार बरं झालं

चला हे फार बरं झालं !! धन्यवाद.. आमच्या बॅच सोबत असल्यांपैकी काही सदस्य (७० पैकी सुमारे ७ म्हणजे १०%) (जे आपापल्या जीएफ बी एफ सोबत आले होते) ते मात्र मध्येच पळुन गेल्याचं निरी़क्षण नोंदवतो. अवांतरः सही आवडली ब्वॉ तुमची आभारी आहे. हीए प्रांतवादाची कीड लागण्यापुर्वीच उपटुन टाकली पाहिजे, मिपा हे सर्व मराठी जनांचं आहे आणि या व्यतिरिक्त अन्य कोणाताही शिक्का आपल्यावर नको.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 07/01/2011 - 00:14

In reply to चला हे फार बरं झालं by इंटरनेटस्नेही

Permalink

>>हीए प्रांतवादाची कीड

>>हीए प्रांतवादाची कीड लागण्यापुर्वीच उपटुन टाकली पाहिजे हो हो, नाहीतर काय आणि हा उपटण्याचा वसा तुम्ही घेतलात हे फार्फार बरं केलंत हो. तुम्हाला ते छान जमेल अशी आशा आहे. आता उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. :D
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 07/01/2011 - 00:48

In reply to >>हीए प्रांतवादाची कीड by सूड

Permalink

>>हीए प्रांतवादाची कीड

>>हीए प्रांतवादाची कीड लागण्यापुर्वीच उपटुन टाकली पाहिजे हो हो, नाहीतर काय आणि हा उपटण्याचा वसा तुम्ही घेतलात हे फार्फार बरं केलंत हो. तुम्हाला ते छान जमेल अशी आशा आहे. आता उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. अहो मार्गशीषातले लक्ष्मीचे गुरुवार वैग्रे करता की काय आपण? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 07/01/2011 - 07:40

In reply to >>हीए प्रांतवादाची कीड by इंटरनेटस्नेही

Permalink

>>अहो मार्गशीषातले लक्ष्मीचे

>>अहो मार्गशीषातले लक्ष्मीचे गुरुवार वैग्रे करता की काय आपण? त्याचा आणि या वाक्याचा संबंध आम्हाला कळला नाही. हो, अभ्यास वाढवा लिहायचे कष्ट नका घेऊ तो वाढवू आमचा आम्ही. असो, भावना पोचल्या नाऽऽ बास मग.
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on Wed, 06/29/2011 - 12:59

Permalink

दि. २७/०६/२०११ वैचारिक

दि. २७/०६/२०११ वैचारिक भिन्नता. ; ; ; ; ; ; ; दि. ३०/०६/२०११ ? ? ? ?
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 06/29/2011 - 15:02

Permalink

लोबसंग रांपांची

लोबसंग रांपांची तृतीय नेत्र, तिबेटी डॉक्टर आणि एक (नाव विसरलो) अशी पुस्तके वाचली आहेत. कथा रोचक होत्या.. तिबेटी जीवनपद्धतीबाबत छान माहिती होती. बाकी पारलौकीक शक्तीबद्दल पास! :) तर त्यात ऑरा (ज्याला मराठीत 'आभा' म्हणात) त्याबद्दल वर्णन वाचल्याचे आठवते. त्यात ज्याची आभा जितकी मोठी तितका तो अध्यात्मात पोचलेला असतो. शिवाय स्वभावानूसार या वलयाचा रंग, तीव्रता कळतेच.. अध्यात्मात उत्तम गती असलेल्याला या आभेकडे बघुन समोरच्याच्या मनात कोणते भाव आहेत हेही कळते असे दावे या पुस्तकांत होते असे आठवते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुरोध on Wed, 06/29/2011 - 15:15

In reply to लोबसंग रांपांची by ऋषिकेश

Permalink

आभाभा...

आभाभा...
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 06/29/2011 - 19:39

In reply to लोबसंग रांपांची by ऋषिकेश

Permalink

आभा ?

>>तर त्यात ऑरा (ज्याला मराठीत 'आभा' म्हणात) त्याबद्दल वर्णन वाचल्याचे आठवते आभा ? ऋष्या तुला तेजोवलय म्हणायचे आहे का ? आभा म्हणजे सुर्यास्तांनंतर पश्चिमक्षितिजावर रहाणारा उजेड असे मला वाटते. (आभा-प्रभा vice versa)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 06/29/2011 - 19:59

In reply to आभा ? by आनंदयात्री

Permalink

म्हणजे सूर्याचे तेजोवलयच की

म्हणजे सूर्याचे तेजोवलयच की! मोल्सवर्थच्या मराठी शब्दकोशात "आभा"चा अर्थ Light, lustre, splendor (तेज, झगमगाट, भव्यदिव्यता) असे दिलेले आहेत (दुवा) मूळ व्युत्पत्तिजन्य अर्थही साधारण तसेच (संस्कृतातील विविध) : आभा (क्रियापद) उजळणे, पाजळणे, प्रकाशमान होऊन दिसून येणे... आभा (नाम) तेजस्विता, डोळ्यात भरणारे तेज, झगमगाट... त्यामुळे "ऑरा"करिता प्रतिशब्द म्हणून "आभा"चा वाढीव अर्थ मराठीत चालून जाईल, असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 06/29/2011 - 20:08

In reply to म्हणजे सूर्याचे तेजोवलयच की by धनंजय

Permalink

धन्यवाद

माझा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. माझा मुळ आक्षेप मागे घेतो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com