मागे माझ्या एका धाग्यावर (कॉकटेलच्या) आलेल्या प्रतिक्रियेमधून नाटक्या ह्यांची साकिया ही मालिका अलीबाबाच्या गुहेसारखी सापडली. अधाश्यासारखी वाचून काढल्यावर नाटक्या ह्यांचा फॅन होउन मी त्यांचे स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले. एकलव्याप्रमाणे नाटक्या ह्यांना गुरुस्थानी मानून वेगवेगळी कॉकटेल्स बनविण्याची साधना सुरु केली. जवळ जवळ एक वर्षाच्या तपस्येनंतर आपणही काही कॉकटेल सादर करावी अशी इच्छा झाली.
त्यानुसार ‘कॉकटेल लाउंज’ ही माझ्या आवडीच्या कॉकटेल्सची मालिका सुरू करीत आहे. ह्यात काही खास ‘देसी धमाका’ कॉकटेल्ससुद्धा असणार आहेत. नाटक्या ह्यांच्याइतकी प्रतिभा नसल्यामुळे ‘साकिया’ ह्या त्यांच्या मालिकेत ढवळाढ्वळ न करता स्वतंत्र मालिकेचा प्रपंच. गुरूदेव (नाटक्या) चूकभुल देणे घेणे आणि आशिर्वाद असू द्यात.
तर ‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील पहिले कॉकटेल आहे Mojito (mo-HEE-to, मोहितो).
मोहितो कुठे आणि कोणि शोधले हा वादाचा मुद्दा आहे. हे एक क्युबन क़ॉकटेल आहे हे मत मी स्विकारून माझ्यापुरता वाद संपवला आहे :)
उन्हाळ्यात, रणरणत्या उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय (उतारा म्हणू का ? ;))
साहित्य:
व्हाइट रम - 2 औस
लिंबाचे लहान तुकडे(फोडी) - 4-5
ब्राउन शुगर - एक चमचा (दुसरा पर्याय: पीठी साखर)
पुदीन्याची ताजी पाने - 8
लिंबाचा रस - 0.5 औस
शुगर सिरप - 0.5 औस
सोडा
बर्फ - बारीक तुकडे केलेले (क्रश्ड आइस)
ग्लास - कोलीन्स असल्यात उत्तम
कृती:
ग्लासमधे लिंबाचे तुकडे(फोडी), ब्राउन शुगर आणि पुदीना (5 पाने) टाकून ते चेचावे.
(चेचण्याच्या प्रक्रियेला मड्ल (Muddle) म्हणतात. चेचल्यामुले पुदीन्याचे फ्लेवर सुटुन एक आगळीच फ्रेश चव येते)
आता रम, शुगर सिरप, लिंबाचा रस त्यावर ओता. बर्फाने ग्लास भरून घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर
(ह्या, ‘ढवळा’ हे कसेसेच वाटतेय म्हणून स्टरच :) ) करा. ग्लासच्या उरलेल्या जागेत सोडा टाकून ग्लास टॉप अप करा. उरलेली 3 पुदीन्याची पाने सजावटीकरीता ग्लासच्या कडेला लावा. मोहितो तयार.
क्रमश: (पुढचे कॉकटेल : व्हाइट रशिअन)

वाचने
18840
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. पुढच्या कॉकटेलाची वाट
ल....इ...... भ..भाररीरी.....
1 औस = 30 मिली
In reply to ल....इ...... भ..भाररीरी..... by शाहिर
लै भारी......
ह्या मधे जे 'पिणारे' सदरात
अगदी
In reply to ह्या मधे जे 'पिणारे' सदरात by Mrunalini
मोहितो मस्त..
अनुमोदन
In reply to मोहितो मस्त.. by गवि
त्रिलोकेकरांनी न दिल्यास मी
In reply to अनुमोदन by स्मिता.
चालेल की!
In reply to त्रिलोकेकरांनी न दिल्यास मी by नीधप
विनंतीची नोंद घेण्यात आली आहे
In reply to मोहितो मस्त.. by गवि
नो कमेंट्स
गेल्या महिन्यात गोव्यात
मार्गारिटा आणि टकीला हा आपला
In reply to गेल्या महिन्यात गोव्यात by गवि
टकीला
In reply to मार्गारिटा आणि टकीला हा आपला by माझीही शॅम्पेन
लिंबाच्या ऐवजी कैरीचा रस
In reply to मार्गारिटा आणि टकीला हा आपला by माझीही शॅम्पेन
वा वा..
In reply to लिंबाच्या ऐवजी कैरीचा रस by नीधप
_/\_
In reply to लिंबाच्या ऐवजी कैरीचा रस by नीधप
अग्ग्ग्ग्गं!
थोडी कळ काढा
In reply to अग्ग्ग्ग्गं! by धमाल मुलगा
अलबत..अलबत!
In reply to थोडी कळ काढा by सोत्रि
मस्तच....
उपयुक्त धागा. अभिज्ञ.
लंबबेटावरील बर्फाळ चहा.. यात
मरहब्बा!!!!!
In reply to लंबबेटावरील बर्फाळ चहा.. यात by नीधप
म्हणजे फक्त लिकर्स आणि
In reply to लंबबेटावरील बर्फाळ चहा.. यात by नीधप
चवीचा तो फरक कदाचित vermouth
In reply to म्हणजे फक्त लिकर्स आणि by गवि
व्हेरीएशन
In reply to म्हणजे फक्त लिकर्स आणि by गवि
नी हे झाले 'पर्सनल व्हेरीएशन'...
In reply to लंबबेटावरील बर्फाळ चहा.. यात by नीधप
पुढच्या धाग्यापासून फॉरमॅट
In reply to नी हे झाले 'पर्सनल व्हेरीएशन'... by सोत्रि
नी, ह्यामधे व्हरमुथ टाकत
In reply to नी हे झाले 'पर्सनल व्हेरीएशन'... by सोत्रि
व्हरमुथ आणि ट्रिपल सेक म्हणजे
In reply to नी, ह्यामधे व्हरमुथ टाकत by नीधप
व्हर्मूथ ही एक व्हाइट वाइन
In reply to व्हरमुथ आणि ट्रिपल सेक म्हणजे by गवि
सोकाजीरावत्रिलोकेकर
धन्यवाद.....!!!! पुढील
हे पेय एकदा आमच्या भाग्यात
धागा
सहमत आहे!
In reply to धागा by श्रावण मोडक
या मालिकेवर डॉळा ठेवुन आहे.
ते धम्या कायपण
ओव्व.. गपा की ओ भौ..
In reply to ते धम्या कायपण by विजुभाऊ