Skip to main content

सांग सखे ...

सांग सखे ...

Published on 20/06/2011 - 12:00 प्रकाशित मुखपृष्ठ
झालीस मोगरा तू अशी वासंतिक वयात बहरताना झालो सुवास मी हि तुझिया आसपास फिरताना .... सरला काळोख आयुश्यि तुझा सूर्य उगवताना उमलले अंगांग माझे सखे, तुझे सुर्यफुल होताना ... मन भाळले इतके सहज लडिवाळ तुझ्या शब्दांना मोहरलो सावलीत तुझ्या अस्तित्व माझे संपताना .... धरलास हात माझा अन विसरलो वाट चालताना खंतले न मन तुझे जराही तो असा अचानक सोडताना .... टाळले होतेस सगळे सहज जर मला एकटे सोडताना का पाहिले होतेस मग वळून? सासुराला जाताना .... सांग सखे ... आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना .... - विश्वेश
लेखनविषय:

याद्या 1836
प्रतिक्रिया 10

"आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना ...." छान आहे..

In reply to by शैलेन्द्र

आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना व्वा....! -दिलीप बिरुटे

मस्त झालीये!! आवडली!!

In reply to by नाना बेरके

भावनावोंको समझो !!! तुझ्या आठवणीत सखे साजणे एकदा मी एक कविता लिहिली तिचा रसिकांनी आस्वाद घ्यावा म्हणूनच ती संस्थळाला वाहिली सखी मोगरा, मी त्याचा सुवास "वसंत" होता, अन सूर्यही होता मोहरून जावे सार्‍या रसिकांनी असा शब्द माझा लडीवाळ होता तू मला सोडून गेल्याची वेदना काहींचे ह्रदय पार भेदून गेली "अरेरे" म्हणाले हे रसिक हळवे व्यथा माझी संवेदना छेदून गेली परी असती काही तिथे अरसिक अंगी जणू "नाना" कळा तयांच्या शब्द्च्छल मांडला तव तयांनी प्रतिसाद न मिळो लेखा तयांच्या हलकेच घ्या :)

आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना .... अरेरे... असो... कविता झक्कास आहे !!!