सांग सखे ...
झालीस मोगरा तू अशी वासंतिक वयात बहरताना
झालो सुवास मी हि तुझिया आसपास फिरताना ....
सरला काळोख आयुश्यि तुझा सूर्य उगवताना
उमलले अंगांग माझे सखे, तुझे सुर्यफुल होताना ...
मन भाळले इतके सहज लडिवाळ तुझ्या शब्दांना
मोहरलो सावलीत तुझ्या अस्तित्व माझे संपताना ....
धरलास हात माझा अन विसरलो वाट चालताना
खंतले न मन तुझे जराही तो असा अचानक सोडताना ....
टाळले होतेस सगळे सहज जर मला एकटे सोडताना
का पाहिले होतेस मग वळून? सासुराला जाताना ....
सांग सखे ...
आज कुणा परक्याचे ते सप्तपदीचे व्रत पाळताना
आठवतो का मी? माझी कवितेची वही चाळताना ....
- विश्वेश
लेखनविषय:
याद्या
1836
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
"आज कुणा परक्याचे ते
स्सही रे स्सही...!
In reply to "आज कुणा परक्याचे ते by शैलेन्द्र
मस्त
कविता अतिशय आवडली....
कविता आवडली. "वासंतिक वय ?"
नाना....
In reply to कविता आवडली. "वासंतिक वय ?" by नाना बेरके
छान आहे.
छान कविता...
मस्त !
मस्त! प्रेमभंगाच्या सदाबहार