✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लोकपाल बिल - भ्रष्टाचार-विरोधी सर्वसामान्यांचा लढा ! फक्त एक फोन करा

व
वाहीदा यांनी
गुरुवार, 06/09/2011 - 12:19  ·  लेख
लेख
माननिय मिपाकर, नमस्कार ! भारत सरकारने अण्णांवर एक अट टाकली आहे जर २५ करोड नागरिकांना हे लोकपाल बिल हवे असेल तर त्यांनी या लोकपाल बिलाला आपली सहमती दर्शवायला हवी ! त्यासाठी काही फ़्रि नंबर लोकपाल बिलासाठी दिले गेले आहे उदा. +९१-२२-६१५५०७८९ / +91-22-61550789 हा नंबर मुंबई साठी आहे इतर शहरांची सध्या माहीती नाही तुम्हाला फ़क्त येथे एक विनामुल्य फ़ोन करायचा आहे. १ रिंग येईल अन फ़ोन कट होईल् पण त्यानंतर तुम्हाला तुमचा सपोर्ट रजिस्टर केल्या बध्द्ल धन्यवादाचा एक मेसेज ही येइल. त्या मेसेज मध्ये जर तुम्ही या लढ्यात भाग घेऊ इच्छित असाल तर ttp://www.indiaagainstcorruption.org/ येथे जाऊ शकता . तिथे तुम्ही लोकपाल बिल / इंग्रजी किंवा हिंदी भाषांतरीत प्रत ही वाचू शकता चला तर मग, एक भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्यासाठी हाथभार लाऊया ! Guys I have tried, it really works !! " Bring a change " :-) ~ वाहीदा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
शिफारस

प्रतिक्रिया द्या
11075 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

it really this works?

सहज
गुरुवार, 06/09/2011 - 12:28 नवीन
it really this works. म्हणजे नक्की काय? १) २५ करोड युनिक कॉल झाले की लोकपाल बील संमत होणार? २) की फोन केला की भ्रष्टाचार संपणार? it really this works. म्हणजे नक्की काय? हे फोन नंबर कोणाचे आहेत? http://www.indiaagainstcorruption.org/contactus.html येथे काही हे नंबर दिसत नाहीत. किंबहुना इंडीयाअगेन्स्टकरप्शन ह्या संस्थळावर अशी काही सुचना प्रथमदर्शनी दिसली नाही. कृपया दुवा द्यावा. हा फोनचा फंडा काही समजला नाही.
  • Log in or register to post comments

मेसेज येतो आहे अन् त्यावर http://www.indiaagainstcorruption.org

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 12:36 नवीन
मेसेज येतो आहे अन् त्यावर http://www.indiaagainstcorruption.org बध्दल माहीती आहे नाही हो, फोन केला की लगेच भ्रष्टाचार संपणार नाही पण काही तरी कुठे तरी चांगले होते याची ती पावती आहे म्हणून लिहीले it really works !! आपल्याला सकारात्मक राहीलेच पाहिजे. If we want the system to change we have to be part of the system and not out of it, and bring the positive change we wish to bring
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हा घ्या नंबर

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 12:34 नवीन
Contact us India Against Corruption A-119, First Floor, Kaushambi, Ghaziabad Uttar Pradesh: 201010 Phone Number: 09717460029, 09971900424 Email: indiaagainstcorruption.2010@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अहो

सहज
गुरुवार, 06/09/2011 - 12:46 नवीन
म्हणूनच विचारतो आहे की वरच्या यादीत ( +९१-२२-६१५५०७८९ ) हा नंबर दिसत नाही आहे. तर हा नंबर नक्की कोणाचा आहे? फ्री नंबर कोणी कोणाला कशाकरता दिला? शिवाय http://www.indiaagainstcorruption.org/ ह्या संस्थळावर तुम्ही दिलेली ही माहीती दिसली नाही. तुम्ही दिलेल्या बातमीचा ह्या संस्थळावर दुवा आहे काय? पहील्या पानावर / कॉन्टॅक्ट अस पेज वर दिसले नाही म्हणुन विचारत आहे. फोन नंबर नक्की कोणाचा आहे याची पूर्ण कल्पना नसताना फोन करणे व इतरांना फोन करा असे आवाहन करणे योग्य आहे का? इतकेच विचारायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

हम्म्म !

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 13:17 नवीन
दिले नाही आहे हे खरे पण ... एक फोन जर या नेक(मराठी ?? ) कामासाठी, तुमच्या मते जर वायाही (?) जात असेल तर काय हरकत आहे मला तरी तेथून मेसेज आला.. Thanks for Registerering your support. If you wish to volunteer , please log on to http://www.indiaagainstcorruption.org/ www.indiaagainstcorruption.org or send an sms at 09212472681 giving your details. असे कितीतरी फोन आपण मित्र / मैत्रिणींसाठी उगाचच फक्त तू कशी आहेस हे विचारण्यासाठी करतो ..मग ह्या फोन ने काहीही वाईट होणार नाही याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सही फर्माया.

चिंतामणी
गुरुवार, 06/09/2011 - 17:58 नवीन
असे कितीतरी फोन आपण मित्र / मैत्रिणींसाठी उगाचच फक्त तू कशी आहेस हे विचारण्यासाठी करतो ..मग ह्या फोन ने काहीही वाईट होणार नाही याची खात्री बाळगा. बहोत अच्छे. सही फर्माया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

आयला....

धमाल मुलगा
गुरुवार, 06/09/2011 - 13:32 नवीन
किती चौकशा त्या? नंबर दिलाय ना, तिथं फोन करुन घ्या की सगळी माहिती इच्चारुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

त्या साईट चे नाव

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 12:28 नवीन
http://www.indiaagainstcorruption.org/ असे आहे चुकुन h निघुन गेला.. अन हो फक्त वाचू नका आपला प्रतिसाद हि नोंदवा :-)
  • Log in or register to post comments

आय.ए.सी च्या +९१ ९२१२४७२६८१

किसन शिंदे
गुरुवार, 06/09/2011 - 12:35 नवीन
आय.ए.सी च्या +९१ ९२१२४७२६८१ या नंबरवरुन मला मेसेजेस येतात...परवाच एक मेसेज आला होता.. Govt's msg. " If u raise ur voice against corruption, we will crush u" Protest with Anna Hajare. Organise group fast n prayers. 8 june 9 am. pls fwd2all.
  • Log in or register to post comments

तो मेसेज जनजागृती साठी आहे

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 12:38 नवीन
तो मेसेज जनजागृती साठी आहे हे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ते कळ्तयं हो पण मग त्यात

किसन शिंदे
गुरुवार, 06/09/2011 - 12:40 नवीन
ते कळ्तयं हो पण मग त्यात सुरुवतीला जे दिलय ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

भारत सरकारने अशी अट घातली

नितिन थत्ते
गुरुवार, 06/09/2011 - 12:39 नवीन
भारत सरकारने अशी अट घातली असेल असे वाटत नाही. हा मोबाईल / टेलिफ़ोन कंपन्यांचा बिझनेस प्लॆन दिसतो.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

किसन शिंदे
गुरुवार, 06/09/2011 - 12:42 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहमत आहे

सही रे सई
गुरुवार, 06/09/2011 - 17:49 नवीन
मोबाईल कंपन्यांनीच हा प्लान केला आहे की नाही हे नाही सांगता येत. आणि या प्रकाराने कायदा होईलच याचा ही भरवसा नाही. पण मोबाईल कंपन्यांचा जबरदस्त फायदा होईल हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

या धाग्यावर इंग्रजित प्रतिसाद...

प्रशांत
गुरुवार, 06/09/2011 - 12:41 नवीन
या धाग्यावर इंग्रजित प्रतिसाद द्यावा अशि अट आहे का?
  • Log in or register to post comments

:-)) :-)) :-))

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 13:11 नवीन
नाही हो , मराठीतच द्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

ह्म्म्म्म, टेलिकॉम कंपन्यांचे

नगरीनिरंजन
गुरुवार, 06/09/2011 - 12:44 नवीन
ह्म्म्म्म, टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत.
  • Log in or register to post comments

Good One !

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 13:14 नवीन
Good One ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

काय हो वाहीदा तै, दुसरयानां

किसन शिंदे
गुरुवार, 06/09/2011 - 13:24 नवीन
काय हो वाहीदा तै, दुसरयानां सांगताय आणी स्वतः मात्र विंग्लिश मधुनच प्रतिसाद देताय..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

छान ! छान !

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 13:41 नवीन
खुश ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

भारत सरकारने अण्णांवर एक अट

मृत्युन्जय
गुरुवार, 06/09/2011 - 13:26 नवीन
भारत सरकारने अण्णांवर एक अट टाकली आहे जर २५ करोड नागरिकांना हे लोकपाल बिल हवे असेल तर त्यांनी या लोकपाल बिलाला आपली सहमती दर्शवायला हवी ! २५ करोड आकडा कुठुन आला माहित नाही. मागच्या निवडणुकीत मतदाने केलेल्यांची संख्या पण तेवढी नसेल तर मनमोहन सिंगांचे सरकार ज्या मतांवर बनले त्यांची संख्या तेवढी असणे शक्यच नाही. त्यामुळे अशी काही अट घालणारे मुर्ख आणि मान्य करणारे महामुर्ख असतील असे मी म्हणेन. मनमोहन सिंग प्रणित आणि सोनिया गांधी संचालित भारत सरकार मुर्ख आहे यावर माझा ठाम विश्वास आहे पण ते अशी मुर्खासारखी अट घालुन स्वतःचे अजुन हसे करुन घेतील असे साक्षात ब्रह्मदेवाने येउन सांगितले तरी मान्य होणार नाही. आ़णि अण्णा असली काही अट मान्य करतील असे वाटणे हे तर निव्वळ हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments

ब्बॉर !

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 13:44 नवीन
एका फोन साठी अन देशासाठी हा मुर्खपणा आम्ही पत्करला आहे असे म्हणा हवे असल्यास पण लोकपाल बिल यायलाच हवे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अफवा अशाच पसरतात!!!!

सविता
गुरुवार, 06/09/2011 - 16:31 नवीन
अफवा अशाच पसरतात!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

ki farak painda ??

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 16:39 नवीन
ki farak painda ?? (मराठी ??)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

गविंचा प्रतिसाद पहा.... मला

सविता
गुरुवार, 06/09/2011 - 17:38 नवीन
गविंचा प्रतिसाद पहा.... मला काय म्हणायचेय ते कळेल.... साक्षर आणि सुशिक्षित मधला फरक आहे तो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

पाठिंबा द्यायला काय हरकत आहे ??

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 19:31 नवीन
मला ज्यांनी हा मेसेज पाठविला ते साक्षर ही आहेत अन सुशिक्षित ही ! अन मा़झे ही संस्कार सुशिक्षितांमध्येच मोडतात . खाली डॉ दिलीप बिरुटे यांचा प्रतिसाद पहावा . हो गयी है पीर पर्वत सी पिघलनी चाहिये इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिये। सिर्फ़ हंगामा खड़ा करा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिये चाहिये।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

सहमत

स्मिता.
गुरुवार, 06/09/2011 - 13:51 नवीन
सरकार किंवा अण्णा यांच्याकडून कोणिही अधिकृतरित्या या फोनबद्दल आवाहन केले नाही की कोणत्याही प्रसार माध्यमानेही याबद्दल काही सांगितले नाहीये. हे फोन करून सपोर्ट दर्शविणे म्हणजे टेलिकॉम कंपन्या किंवा ज्याचा तो नंबर आहे त्याने आपल्या स्वार्थासाठी उठवलेली वावडी वाटते. समस मध्ये संकेतस्थळाचे नाव दिले म्हणजे तो समस त्या संकेतस्थळाकडून अधिकृत होतोच असं नाही. मी काहितरी लिहून खाली misalpav.com असे लिहून तो समस सगळ्यांना पाठवला तर त्याला 'मिसळपाव' ने पाठवलेला समस मानणार काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लुक्स होक्स !

शाहरुख
गुरुवार, 06/09/2011 - 14:02 नवीन
लुक्स होक्स !
  • Log in or register to post comments

गुगळून बघा

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 14:12 नवीन
goole it up and you will know whether it is hoax or not :-)
  • Log in or register to post comments

हे कशासाठी ?

मराठी_माणूस
गुरुवार, 06/09/2011 - 16:48 नवीन
भारत सरकारने अण्णांवर एक अट टाकली आहे जर २५ करोड नागरिकांना हे लोकपाल बिल हवे असेल तर त्यांनी या लोकपाल बिलाला आपली सहमती दर्शवायला हवी ! जेंव्हा सरकार एखादा निर्णय घेते , कयदे कानुन बनवते तेंव्ह तेंव्हा लोकमत आजमाउनच निर्णय घेतेला जातो का ?
  • Log in or register to post comments

काय करावे अशा प्रकारांना.आता

गवि
गुरुवार, 06/09/2011 - 16:54 नवीन
काय करावे अशा प्रकारांना. आता त्या नंबरच्या मालकाकडे लाखो जेन्युईन फोन नंबर्स जमा होतील. की चालले डेटाबेस विकायला.' मग कोल्ड कॉल्सना उत्तरे देत बसा. आणि आपण "देशासाठी" एवढेसेच करायचे तर काय हरकत.. म्हणून ते करायचे.. आपण देशासाठी काही करत नाही याच्या साठलेल्या गिल्टचे केवढे हे भांडवल. फोनच तर करायचाय एक.. तोही फुकट.. करुन टाका..कशाला "विचार" करता ? नुसता मिस्ड कॉल दिल्याने पाठिंबा जाहीर होतो अशी अधिकृत सरकारी अट आहे असं कोणी म्हणतो आणि आपण सुशिक्षित लोक ते मान्य करतो. आणि मिस्ड कॉल मारत सुटतो.. अद्भुतरम्य..!!!! ज्यांच्याकडे फोनच नाही त्यांच्या मताला काय किंमत हा मुद्दा बाजूलाच ठेवू. मेरा भारत महान.
  • Log in or register to post comments

अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/09/2011 - 17:34 नवीन
अध्यक्ष, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, ( राळेगण) इथे फोन केल्यावर (माहितीच्या अधिकाराच्या पुस्तकावर फोन क्रमांक होता) कळले की, सरकारने अशी अट घातलेली नाही. केवळ आंदोलनाला पाठींबा म्हणून 91-22-61550789 इथे फोन करा असे ते म्हणाले. अधिक शंका विचारण्यासाठी ०२४८८ २४०४०१. (अध्यक्ष,भ्रष्टाचार विरोधी जनाअंदोलन न्यास. राळेगण) संपर्क साधावा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

धमाल मुलगा
गुरुवार, 06/09/2011 - 18:08 नवीन
गुगलवर पडताळल्यावर ह्या विषयीच्या बर्‍याच लिंक्स दिसल्या. होअ‍ॅक्स असण्याची शक्यता कमी वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुगलणारे प्रत्येक खरेच नसते! :-)

विकास
गुरुवार, 06/09/2011 - 19:23 नवीन
गुगलवर पडताळल्यावर ह्या विषयीच्या बर्‍याच लिंक्स दिसल्या. होअ‍ॅक्स असण्याची शक्यता कमी वाटतेय. वाहीदांनी प्रामाणिकपणे दिले आहे यात शंका नाही, :-) पण गुगलणारे प्रत्येक खरेच नसते! ;) त्याजर लिंक्स पाहील्या तर कुठल्याही प्रमुख वृत्तपत्रातील दिसणार नाहीत. एक टाईम्सची दिसते पण टिचकी मारली तरी बातमी दिसत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा...

धमाल मुलगा
गुरुवार, 06/09/2011 - 19:38 नवीन
मला वाटलं विकि सारखं गुगलसर्च वाक्य प्रमाणम् मानायची पध्दत असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

असे आहे तर !

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 19:14 नवीन
सरकारने अशी अट घातलेली नाही. केवळ आंदोलनाला पाठींबा म्हणून 91-22-61550789 इथे फोन करा असे ते म्हणाले. अच्छा ! तरिही अट घातली काय अन न घातली काय पाठिंबा आहेच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१०००००० टु गवि, मिपाचा वापर

५० फक्त
गुरुवार, 06/09/2011 - 18:29 नवीन
+१०००००० टु गवि, मिपाचा वापर अफवा पसरवण्यासाठी होउ नये ही सदिच्छा. मागे एका पुस्तकाबद्दल असाच धागा आला होता आणि उडाला अवघ्या तासाभरात. पाठिंबा द्यायचा असेल तर सरळ उपोषणाला बसा जाउन. फोन का करताय. आणि असं फोनवर मतदान घेउन कायदे करायला भारतीय सरकार म्हणजे टिव्ही वरचे मॅनेजड रिअ‍ॅलिटि शो आहेत का? उद्या म्हणाल एक फोन करा मग २५ कोटी फोन झाले की भारत सरकार पाठवेल सैन्य आणि मारुन टाकेल सगळ्या अतिरेक्यांना. असे केलेले मिस कॉल हे अजुन तरी भारतीय कायद्यानुसार कोर्टात पुरावा म्हणुन ग्राह्य धरले जात नाहीत असे वाट्ते. बाकी सविता म्हणाताहेत तसे, - साक्षर आणि सुशिक्षित यातला फरक, अजुन काय ?
  • Log in or register to post comments

पण....

धमाल मुलगा
गुरुवार, 06/09/2011 - 18:42 नवीन
हर्षद, फेसबुक, ट्विटर आणि इतर 'सोशल नेटवर्किंग' साईट्सवर ज्याप्रमाणे जनतेनं उस्फुर्त पाठिंबा दिला, आणि विशेष म्हणजे, त्याची दखल काही प्रमाणात का होईना सरकारला घ्यावी लागली ते पहर्षद,ह्या आणखी एका पर्यायाचा विचार करता येऊ शकतोच की. म्हणजे, सरकारने दखल घेण्यापुर्वी, "हे असं फेसबुकावर कमेंटा टाकून काही होतं असतंय होय रे येड्या.." वगैरे संवादही होतेच की. माझं हे म्हणणं त्या अनुशंगाने आहे. शिवाय, वर बिरुटेगुर्जीनी राळेगणसिध्दीला फोन करुन कन्फर्मेशन (फोन नंबरचे आणि त्यावर फोन करुन पाठिंबा देण्याबद्दलचे) घेतले आहे असे सांगितले आहेच की. माझा मुद्दा इतकाच. अर्थात, मार्केटिंगसाठी डेटाबेस मिळवण्याची शक्यताही एखाद टक्का असू शकते, पण त्यासाठी आधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिडिया मॅनेज करणं भाग आहे. त्यासाठी किती खर्च करावा लागेल? तो ह्या कॉल डेटाबेसमधून निघेल काय असाही प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

धम्या शी सहमत !

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 19:11 नवीन
१०१ % सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा धागा उडवण्याच्या का बरे मार्गावर आहात ??

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 19:28 नवीन
५० फक्त , हा धागा उडवण्याच्या का बरे मार्गावर आहात ?? आम्ही सुशिक्षित ही आहोत अन साक्षर ही ! पण त्याची पावती तुमच्या कडून मागितली नाही . हो गयी है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकालनी चाहिए. आज ये दीवार, पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी की ये बुनियाद हिलनी चाहिए. हर सड़क पर, हर गली में, हर नदी, हर गाँव में,हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हम्म.... विशवास ठेवावा तरी

रेवती
गुरुवार, 06/09/2011 - 18:47 नवीन
हम्म.... विशवास ठेवावा तरी पंचाईत, न ठेवावा तरी पंचाईत.
  • Log in or register to post comments

लोकपाल विधेयक आणि अण्णा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/09/2011 - 19:39 नवीन
लोकपाल विधेयक आणि अण्णा हजारेंचे उपोषण दोन्ही नको असेल तर कुठे कॉल करावा ?
  • Log in or register to post comments

कपील सिब्बल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/09/2011 - 19:42 नवीन
कपील सिब्बल मला उत्तम पर्याय वाट्तो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

विकास
Fri, 06/10/2011 - 17:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परा , तु़झा मेंदू मस्तच चालतो

वाहीदा
गुरुवार, 06/09/2011 - 19:45 नवीन
लोकपाल विधेयक आणि अण्णा हजारेंचे उपोषण दोन्ही नको असेल तर कुठे कॉल करावा ? जे काही फोन नंबर असतील तेथून मेसेज इस रुट की सभी लाईनें व्यस्त हैं, कृपया थोडी देर बाद , प्रयत्न करें ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

किती चर्चा

शशिकांत ओक
गुरुवार, 06/09/2011 - 19:44 नवीन
वहीदा जी, एका कॉलसाठी किती चर्चा. ज्यांना करावासा वाटतो त्यांनी करावा.
  • Log in or register to post comments

टाळ आता नका कुटु !

सुधीर मुतालीक
गुरुवार, 06/09/2011 - 22:55 नवीन
राव तुम्ही लै उशिरा पर्यंत ही सारी कात्याकुट करताय. तुमच्या बारीक बारीक कुटन्यात नेमकी वेळ निगुन पन गेली. फोन कदी करायचा व्हता ? अन्ना अन्न न घेता जंतर मंतर ला बस्ले होते तवा. अन्ना का जेवत नव्हते? लोकपाल बिल पायजे म्हनुन. फोन याच येळेला करायचा होता. अन्नाना पाटीम्बा देण्या साटी. फोन करून आपन ही सरकारला कळवायचे होतं कि आमाला ही बिल पायजे. हो, म्हंजे तो बाबा तिथे उपाशी रहानार होतां आनी आपल्याला फक्त मिस काल द्यायचा होतं. राव, येवढा कसला कीस काढताय त्यात ? पन आता फोन चा सवालच येत नाई ना. सरकारनं मान्य केलं ना. बिल करू. त्या नंतरच बाबाने सरबत प्याले ना. फोनचे टाळ आता नका कुटु रे पोरावो !
  • Log in or register to post comments

वेल...

श्रावण मोडक
Fri, 06/10/2011 - 17:03 नवीन
एकूण फोन, आभासी विश्व आणि पायाभूत प्रश्न यांचे हे नाते पाहता, आजच एक्स्प्रेसमध्ये वाचलं ते एकदम भारी आहे - दिग्विजयसिंग - ऑन स्पीकरफोन, पंतप्रधान मनमोहन सिंग - सायलेंट मोड, सोनिया आणि राहूल - स्विच्ड ऑफ, सुषमा स्वराज - ऑन व्हायब्रेट मोड.
  • Log in or register to post comments

हा हा!

विकास
Fri, 06/10/2011 - 17:10 नवीन
मस्त! आणि पब्लीक म्हणतयं, :इस मोड से जाते है! :-) बाकी वरील ओळी वाचून लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार या ओळी पण आठवल्या :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

'मोड' शब्द वाचुन उगाचच

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/10/2011 - 17:21 नवीन
'मोड' शब्द वाचुन उगाचच फिस्स्सकन हसु आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा