"पांगिरा"
कथा : विश्वास पाटील
दिगदर्शन: राजीव पाटील ( जोगवा फेम)
---
काय लिहु तेच जास्त कळत नाहि इतका भिषण वास्तववादी आघात झालाय मनावर... ह्या चित्रपटातुन जे चित्रण दाखवले गेले आहे, ते आपल्या अवतीभोवती आपण कायम पहात असतो- ऐकत असतो आणि त्यामुळे शेतकर्यांच्या जीवनाबद्दल तेथील राजकारनाबद्दल विचार करताना मनात कमालीची अस्वस्थता आणते आहे.. सामान्य गावामध्ये वस्तीवरती लोक कसे जीवन जगतायेत.. राजकारणी -सरपंच सरकारी योजनांचा बोजवारा वाजवुन कसा पैसा उकळतो.. गावातील -वस्तीवरील लोकांच्या रोजचे जीवन तर खरेच मन पिळवटुन टाकणारे आहेत..
त्यांचे आभाळाच्या पांघरुनाखाली निजलेले स्वप्न पिक .. त्याची चिंता .. जमीनीच्या गर्भातील संपत चालले नीरजीवन खायला महाग असताना पिकवलेला शेतमाल पुन्हा दलालांच्या कचाट्यात सापडणे आणि आयुष्य गमावलेले शेतकरी...
सगळेच सुन्न करते.. एक चित्तथरारक चित्रकृती..
सिनेमाची सुरुवात पाण्याची पातळी आणि जमीनीतील कमी पाण्याची पिके या विषयावरुन पी.एच्.डी करणार्या मिता सावरकर पासुन सुरु होते.. असे वाटत होते तीच या चित्रपटाची नायिका आहे .. पण तसे नाहिच .. या चित्रपटात नायक - नायिका नाहित ... चित्रपटाचा खरा नायक आहे "गाव" .. पांगिरा गाव.
निसर्गाच्या देण्याने समृद्ध असा गाव.. पण भुजल पातळी कमी होत आहे.. सरपंच ..राजकारणी शेतकर्यांची लुट करत आहे.. संपुर्ण जमीनीच्या जमीनी पोटात घालण्याचे प्रयत्न आहेत.
सामन्य लोकांचे सामन्य जगणे आणि त्यांची भोळी आशा .. एकमेकातील परिस्थीतीच्या तडाख्यामुळे असणारे वैर हेच खरे ह्या चित्रपटाची मध्यवर्ती भुमीका असलेले गाव..
पुढे शेतकरी कसे हवालदिल होउन जगतायेत हे पाहने म्हणजे खरेच खुप जीवाला लागते .. त्यातुन पुढे होणार्या मारामारी.. आणि मग जेंव्हा अंतिम अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहतो तेंव्हा कसे तरी सावरायला लागले तर पिकाच्या लिलावातील कमी बोली मुळे आयुष्य उद्ध्वस्थ झाल्यामुळे होणारी दंगल आणि पोलीसांचा बेछुट गोळीबार ..
आणि उरलेली भयान शांतता ...
विश्वास पाटलांच्या लेखनीतुन उतरलेली कथा म्हणजे भयानक मनस्पर्षी असनार हे माहित होतेच.. त्यात भर म्हनुन दिगदर्शन कमालीचे उच्च झालेले आहे.. वस्तुस्थीती .. परिस्थीती खुद्द आपल्या गावातीलच आहे असे बघताना वाटत राहते... प्रत्यक प्रसंग म्हणजे आपल्याच कुटंबावर होत असलेला अत्याचार वाटतो आहे.. आणि माणुस म्हणुन आपण या भुमिपुत्रांचे देणे लागत नाहि का? असा प्रश्न आपल्या पुढे उभा राहु पाहतोय ...
(अवांतर : गंगाधर मुटे यांचे जे लेख असतात.. अगदी तीच परिस्थीती या चित्रपटात पहायला मिळते.. अता पर्यंत ते मांडत आलेले प्रश्न-लेख ज्या शेतकर्यांवर आधारीत आहेत ते शेतकरी ह्या चित्रपटात दाखवले आहेत... असेच वाटले..)
आमच्या फलटन जवळच्या गावात चित्रकरण झालेले आहे तरी अशीच परिस्थीती जेंव्हा माझ्या गावात अनुभवायला मिळतेय तेंव्हा खरेच खुप असह्हय वाटते आहे.. चित्रपटाचे "जीव उडला.. पाण्यासाठी" खुप उत्तंग गाणे आहे.. खुप हेलावते मन यावेळेस.. शेवटची कविता किशोर कदमांचीच असणार "रांड मुंड झाले रान .. सैरावैरा झाले बांध" खुपच जिव्हारी लागते...
सिनेमा संपल्यावर तुम्ही ही कदाचीत थरथरत अस्वथ होउन.. एक अभिजात कलाकृती पाहिल्याचा आनंद घ्यावा की शेतकर्यांचा आपल्या अन्नदात्याच्या संसाराचे भिजलेले चित्रण मनात साठवावे ह्या विचाराने बाहेर येताल..
कृपया हा चित्रपट सर्वांनी पहावाच अशी माझी विनंती आहे.. ( हा चित्रपट उत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट म्हणुन पारितोषिक मिळवेलच हे मी तरी लिहुन देवु शकतो.. कदाचीत ऑस्कर ला पण हा चित्रपट पारितोषिक जिंकेल) .
चित्रपट .. त्यातील जीवंत अभिनय , कथा यांना तोड नाहीच.. उलट विश्वास पाटलांसारख्या दर्जेदार साहित्यिकाची दर्जेदार कलाकृती बघण्यात खरेच खुप छान वाटते आहे.. मनात घर करुन जाणारी माणसे पाहिलीत आज मी असेच वाटुन जाते.
निगेटीव्ह बाजु :
चित्रपटाची जाहीरात अजुन खुप जास्त व्हायला पाहिजे होती.. . समाजातील सर्व स्थरापर्यंत ह्या चित्रपटाबद्दल माहिती हवी होती.. तसे जानवत नाही.. हीच काय उनिव वाटते आहे...
अवांतर : यावेळेस मुंबई ला पाहिला हा सिनेमा, पुढच्या आठवड्यात ही हाच चित्रपट पुन्हा पाहत आहे.. कोणी येताय का बरोबर ?
आणि माझे पुढचे लेखन चित्रपटावर नक्की नसेन .. पण लिखानासाठी एक विषय त्याची प्रेरणा "पांगिरा" ह्या चित्रपटानेच दिलेली आहे.
वाचने
6354
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलं परीक्षण, बघितला पाहिजे
चांगली ओळख करून दिलीस. त्रास
सहमत
In reply to चांगली ओळख करून दिलीस. त्रास by नगरीनिरंजन
+१
In reply to सहमत by पैसा
ओळख छान आहे पण असं काही आता
गणेशा, परिक्षण छान आणि
प्रथमता
In reply to गणेशा, परिक्षण छान आणि by ५० फक्त
प्रथमता
In reply to गणेशा, परिक्षण छान आणि by ५० फक्त
''लोकजागरण महत्वाचे वाटते
In reply to प्रथमता by गणेशा
असो.
In reply to ''लोकजागरण महत्वाचे वाटते by ५० फक्त
छान परिक्षण
मिता सावरकरसारखे...
In reply to छान परिक्षण by प्रचेतस
!
उत्तम कलाक्रुती !!!
काय बोलता ... मला तर ती कविता
In reply to उत्तम कलाक्रुती !!! by उदय के'सागर
चित्रपट
In reply to काय बोलता ... मला तर ती कविता by गणेशा
कविता सौमित्रने म्हंटलि असेल
In reply to काय बोलता ... मला तर ती कविता by गणेशा
@ उदयब्लॉगस्पॉट ब्लॉक आहेत
In reply to कविता सौमित्रने म्हंटलि असेल by उदय के'सागर
@गणेशा ओह! माफ करा. मी विचार
In reply to @ उदयब्लॉगस्पॉट ब्लॉक आहेत by गणेशा
बरोबर
In reply to @ उदयब्लॉगस्पॉट ब्लॉक आहेत by गणेशा
अस्वस्थ