✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आईस पत्र

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
गुरुवार, 05/19/2011 - 02:48  ·  लेख
लेख
शुचिचे मुलीस पत्र पाहून मलाही पत्रलेखनाची सुरसुरी आली. पंतप्रधान आणि/किंवा जगप्रमुख (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांना पत्र लिहीण्याएवढा मला वेळ नाही. मग ("माझ्या" काल्पनिक) आईलाच पत्र लिहून टाकलं. हाय आई, आता मोठी समजशील, नंतर मोठी समजशील आणि मग तरी तुझे उपदेशाचे डोस थांबतील असं वाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता मी नोकरीनिमित्ताने दुसर्‍या ठिकाणी येऊन रहाते आहे तरीही तू मला अजून बाळच समजते आहेस. अशा वेळी तरी तुला तुझं तरूण वय आठवेल असं वाटलं होतं. कालपर्यंत तू मला डोस पाजत होतीस, पण आतातरी निदान तू मला माझा स्वतंत्र विचार करू देशील असं वाटलं होतं. तो मी तसाही करतेच, पण ते तुला समजेल अशी अपेक्षा होती. मानापमान - माते, तुला हे कधी समजलं आहे की लहान मुलांच्या मनातही त्यांचे स्वतंत्र विचार, कल्पना असतात. डोस पाजणारे कोणालाच आवडत नाहीत आणि म्हणूनच चुकूनसुद्धा डोस पाजायचा आव आणायचा नसतो. संस्कार - संस्कार करताना तू मला कायम झाडाकडे बघ असं शिकवलंस. नारळाला खत म्हणून मीठच घालतात, तू मला आंबा समजून खत घालत असशील याची शक्यता तू कधी विचारात घेतली आहेस का? तुझ्या तरूणपणची मूल्यं, समाज, समज वेगळे असतील आणि माझी वेगळी असतील याची तुला थोडीतरी जाणीव आहे का? विचार - तू म्हणतेस पैसा खर्च करताना नेहेमी फेरविचार कर. सक्षमपणे निर्णय घेण्यासाठी आधी स्वतंत्रपणे विचार करू दिला पाहिजे. जबाबदारी हा शब्द मला नीट कळण्यासाठी कधी चुकूनतरी तू माझ्यावर जबाबदारी टाकली आहेस का? आणि मी नाही पैसे खर्च करणार तर कोण करणार, खर्च नाही करायचे तर मिळवायचे कशाला पैसे? काय वाईट आहे पैसे खर्च करण्यात? स्तुती - स्तुतीमुळे किती चांगल्या गोष्टी होतात हे तुला माहित आहे का? जेव्हा आपला आपल्यावरही विश्वास नसतो तेव्हा आपल्या लोकांनी केलेल्या तोंडदेखल्या स्तुतीमुळेसुद्धा खूप आत्मविश्वास निर्माण होतो. एखाद्याची एखादी गोष्ट खरोखरच चांगली वाटली तरी तुझ्या या उपदेशामृतामुळे कोणी सांगणार नाही. कष्ट - कोणाचे कष्ट विनमोल घेऊ नकोस हे ठीक आहे. पण आपल्याच लोकांसाठी किंवा लोकांनी काही केलं तर काय त्याचं मूल्यमापन करायचं का? मैत्रीसारखी सुंदर नाती वगैरे फक्त बोलण्याची गोष्ट नाही आई, वेळ पडली की निभावून नेण्याची गोष्ट आहे. आणि हे घरापासून दूर राहिल्यानंतर मी शिकले आहे. घरात उपदेशामृत मिळतं आणि बाहेर प्रत्यक्ष अनुभव. वाचा - मला कोणी काही बोललं तर मी का ऐकून घेऊ? माझी चूक नसेल तरीही मी पडतं का घ्यायचं? वाईट शब्दच वापरायला पाहिजेत असं नाही, पण स्पष्ट शब्दांत आपलं म्हणणं न मांडताच का निघून जायचं मी! हे लोकं मला खायला घालत नाहीत, मी माझ्या कष्टांनी कमावून खाते, उगाच का कोणाचं ऐकून घ्यायचं? तू नेहेमीच प्रवचन देतेस, हजार गोष्टी सांगतेस. पण त्यापेक्षा कधी माझ्यावर थोडी जबाबदारी टाकली असतीस, मला माझं आयुष्य जगण्याचं, माझ्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य देऊन मागे उभी राहिली असतीस ना, तर एक अक्षर न बोलताही तू मला खूप गोष्टी शिकवू शकली असतीस. "काय हे उपदेशामृत" असा उद्वेग वाटला नसता, तू माझी मैत्रीण होऊ शकली असतीस. मी तुझ्याशी काही बोलत नाही, शेअर करत नाही कारण माझ्या एका वाक्यावर तुझे दहा बुलेट्स येतात. आता पत्रातूनच काय ते लिही. टंकाळा केलास तर निदान मला वाचण्याचा त्रास कमी होईल. तुझी(?) दिया स्वानुभवावर आधारित.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
22390 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

पत्र अजिबात आवडले नाही.

सविता
गुरुवार, 05/19/2011 - 09:20 नवीन
पत्र अजिबात आवडले नाही.
  • Log in or register to post comments

आजकाल मुली आईला असं पत्र

रेवती
गुरुवार, 05/19/2011 - 11:42 नवीन
आजकाल मुली आईला असं पत्र लिहित असतील यावर विश्वास/ अविश्वास दाखवत नाही कारण तसा अनुभव नाही. माझ्या लग्नाच्या वेळी दहा वर्षाच्या आसपास लहान मुली असणार्‍या भाच्या, पुतण्या नुकत्याच नोकरीला लागल्यात आणि फेसबुकावर त्यांचे पार्ट्यांचे फोटू पाहून मला भोवळ आली होती ते आठवले. अंगभर कपडे घालायची फ्याशन कधीच गेली असे वाटले. या मुली आईला कसे पत्र लिहितील हा विचार करणे गमतीशीर असेल. माझ्या पुतण्याने नुकतीच इमेल लिहून त्याच्या काकाला (माझ्या नवर्‍याला) अमूक एका हिरव्या युनिव्हर्सिटीबद्दल विचारले. साधारण खर्च त्याला समजला होता पण अजून जरा खर्चाचा अंदाज घेऊन डायरेक्ट बाबांना कळवून टाक रे काका! यावर आम्ही आश्चर्याने हसलो होतो. सुट्टीत काय करतोय्स म्हणून विचारल्यावर "फ्लायींग क्लब जॉइन केलाय" असे म्हटल्यावर आम्ही आमच्या मुलाच्या शैक्षणिक्/अशैक्षणिक/क्षणिक अश्या सगळ्या खर्चांचा पुनर्विचार सुरु केला आहे. पत्र मजेशीर आहे. त्यातला जबाबदारी टाकण्याच्या मुद्द्याशी सहमत.
  • Log in or register to post comments

पत्र आवडलं.....कधीकधी असे

दैत्य
गुरुवार, 05/19/2011 - 12:31 नवीन
पत्र आवडलं.....कधीकधी असे विचार येणं स्वाभाविक आहे, असं लिहिल्यामुळे आईवरचं प्रेम कमी झालं आहे/कमीच आहे असं नाही वाटत..... शिवाय पहिला मुद्दा- माते, तुला हे कधी समजलं आहे की लहान मुलांच्या मनातही त्यांचे स्वतंत्र विचार, कल्पना असतात.: खूप पटला.... ह्या पत्रातली आई म्हणजे 'आपल्याला जिने जन्म दिला ती' असा टिपिकल अर्थ न घेता कोणी एक व्यक्ती म्हणून विचार केला तर वाचन अधिक सुसह्य होइल!
  • Log in or register to post comments

दैत्या, तुला अदितीचं काय

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 05/19/2011 - 15:51 नवीन
दैत्या, तुला अदितीचं काय म्हणते आहे ते समजलं. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दैत्य

पत्र आवडले.

वेताळ
गुरुवार, 05/19/2011 - 13:29 नवीन
शेवटी पोरगी पत्र लिहण्याचे हत्यार उपसते ह्याचा अर्थ आईने तिला उपदेशाचे डोस पाजुन जाम बोअर केले आहे.
  • Log in or register to post comments

इन्टरेष्टिंग्

धनंजय
गुरुवार, 05/19/2011 - 16:47 नवीन
पत्र आणि प्रतिक्रिया. लालयेत् पञ्चवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत् । प्राप्ते तु षोडषे वर्षे पुत्रीं मित्रवदाचरेत् ॥ या जुन्या ढोबळ धोरणाचा व्यत्यास असा : पहिली पाच वर्षे लाड करून घ्यावेत, (वय वर्षे ०-५) त्यानंतर दहा वर्षे शिस्त लावतात ती लावून घ्यावी, (वय वर्षे ६-१५) त्यानंतर दहा वर्षे आई-वडील हे परिपूर्ण नाहीत हे समजून रागवायचे, (वय वर्षे १६-२५) त्यानंतर दहा-वीस आई-वडील हे स्खलनशील मानव आहेत, पण प्रेमळ मानव आहेत हे समजायचे. (वय २५-४५) त्यानंतर मग आपणही त्याच प्रकारचे स्खलनशील मानव आहोत, हे समजायचे. (वय ४५+)
  • Log in or register to post comments

छान सुभाषित

आनंदयात्री
गुरुवार, 05/19/2011 - 17:02 नवीन
छान सुभाषित, पण खालील गोष्टी कळल्या नाहीत. >>प्राप्ते तु षोडषे वर्षे पुत्रीं मित्रवदाचरेत् ॥ या एका ओळीत हा खालचा आख्खा अर्थ कसा कव्हर केला आहे ?? त्यानंतर दहा वर्षे आई-वडील हे परिपूर्ण नाहीत हे समजून रागवायचे, (वय वर्षे १६-२५) त्यानंतर दहा-वीस आई-वडील हे स्खलनशील मानव आहेत, पण प्रेमळ मानव आहेत हे समजायचे. (वय २५-४५) त्यानंतर मग आपणही त्याच प्रकारचे स्खलनशील मानव आहोत, हे समजायचे. (वय ४५+) प्राप्ते म्हणजे पंचवीस का ? मग सोळा ते पंचवीस वर्षापर्यंत मुलीशी मैत्रीपुर्ण नात्याने वागावे असा अर्थ होत नाही का ? (मित्रवदाचरेत् = मित्रवत + आचरेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

व्यत्यास आणि पाल्हाळ

धनंजय
गुरुवार, 05/19/2011 - 19:07 नवीन
व्यत्यास* *व्यत्यास आणि पाल्हाळ! आईवडलांनी १५व्या वर्षापासून मित्र म्हणून वागवावे खरे. पण त्या एकतर्फी मित्रत्वाच्या काळात मुलांचे आईवडलांविषयी मत तीन टप्प्यांनी बदलत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

खाया

श्रावण मोडक
गुरुवार, 05/19/2011 - 17:00 नवीन
खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारा आना!
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ.

आनंदयात्री
गुरुवार, 05/19/2011 - 17:04 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

लेखातील विचार पटले नाहीत

पक्या
Fri, 05/20/2011 - 16:14 नवीन
लेखातील विचार पटले नाहीत . आमच्या आईने मला आणि माझ्या बहिणीला नेहमीच अनेक चांगल्या गोष्टीसाठी उत्तेजन दिले आहे. उपदेशाचे डोस पाजले नाहीत असे नाही पण तिने अनेक गोष्टीत काळाप्रमाणे स्वतःमधे बद्ल केलेले आहेत त्यामुळे आमच्यावर तिने जुने , बुरसट विचार लादले असे कधीच झाले नाही. लहानपणी आणि कॉलेजात गेल्यावरही अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही भावंडे आपापला निर्णय घेऊनच करायचो. तिचा पाठिंबा असायचाच आणि अगदिच आमचा निर्णय अयोग्य वाटला तरी सरळ नकारा ऐवजी चर्चेतून त्यावर काही तोडगा काढला जायचा. कोणत्या आईला आपली मुले स्वतंत्र , जबाबदार, स्वावलंबी झालेली आवडणार नाहीत? काही आया अती काळजी करणार्‍या असतातही पण पत्रात लिहील्याप्रमाणे स्वतःच्या मुलीबाबत विचार करणारी आई अजून तरी पाहण्यात नाही. कदाचित ती मुलगीही (पत्र लिहीणारी) आईला समजून घेण्यात कमी पडलेली असेल म्हणून तिचे तसे विचार असतील.
  • Log in or register to post comments

जिंदगी तेरे दर पर मै हजार

विजुभाऊ
Sat, 05/21/2011 - 14:55 नवीन
जिंदगी तेरे दर पर मै हजार ठोकरे खाउं हर ठोकर पर अपनी जीत का एहसास जताउं ये क्या हो रहा है आज जमाने को ; ये सबको सुनाऊं कल यहां हमने भी यही किया था ये कैसे बताउं
  • Log in or register to post comments

छान पत्र!

चित्रा
Sat, 05/21/2011 - 17:40 नवीन
पत्र छान आहे. ज्या वयात जबाबदारी कळते अशा वयात लिहीलेले हे पत्र छान आहे. मात्र वेळेचे महत्त्व, कामाचे महत्त्व कळत नाही अशा वयात, दिवसरात्र फेसबुकावर बिजी असलेल्या मुलीला, जातायेता मित्रमैत्रिणींना समस करणार्‍या मुलीला तिच्या त्याच वयात प्रवचन दिले गेले नाही तर फारसे बिघडते असे नाही, पण मुलीचा तो वेळ (कधीकधी वर्षेही) मात्र जातो. शिवाय आईने मुलीची मैत्रिण होण्याचा अट्टाहास कशाला हे मला कळत नाही. यातून मैत्रिणीचे नाते श्रेष्ठ, आईचे कमी असे काही सूचित होते आहे. मैत्रिण होणे म्हणजे काय? आई राहणे म्हणजे काय? एकत्र राहता येणे, बोलता येणे, एकमेकांबरोबर असताना काही गोष्टी आनंदाने करता येणे हे मोकळेपणाने करणे हे आई-मुलांच्या नात्यातही अपेक्षित असते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा