मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ
काश्मीरचे आणि बर्फाचे एक अतुट समीकरण आहे. जसे मल्लिकाचे आणि कॉण्ट्रोवर्सीचे किंवा शोभा डे चे आणि फटकळपणाचे किंवा सिद्धुचे आणि असंबंद्ध प्रतिक्रियांचे, अर्चना पुरणसिंगचे आणि पातळविजयम मधल्या राक्षसासारखे हसण्याचे, मनमोहन सिंगांचे आणि हताशपणाचे, राहुल गांधींचे आणि बालिश प्रतिक्रियांचे, काँग्रेसी सरकारचे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे, गणपाचे आणि पाककृतींचे, सचिनचे आणि शतकांचे, धोनीचे आणि हेलिकॉप्टर शॉटचे अगदी तसे. काश्मीर म्हटल्यावर डोळ्यासमोर पहिल्यांदा बर्फ येतो. (कधीकधी हातात एके ४७ घेतलेला, तोंडाल मफलर गुंडाळालेला अतिरेकीही येतो पण ती गोष्ट वेगळी)
काश्मीरमध्ये बर्फ तसा सगळीकडे बघायला मिळतो. पण घाउक प्रमाणात बर्फ बघायचा असेल, बर्फात खेळायचे असेल तर सोनमर्ग आणि गुलमर्गला पर्याय नाही. एखाद्या कापसाच्या गिरणीत कापूस पिंजुन टाकुन द्यावा तसा तिथल्या पर्वत शिखरांवर बर्फ सांडलेला असतो.
गुलमर्ग - सोनमर्ग चा हा बर्फ संपुर्ण काश्मीरमध्ये पसरला आहे. वितळुन पाण्याच्या रुपात. काश्मीर खोर्यातल्या सिंधु, झेलम, शेषनाग, लीडर, रावी, चिनाब इत्यादी नद्यांचा उगम या बर्फातलाच. त्यातील झेलम, चिनाब, सिंधु इत्यादी नद्या पाकिस्तानत वाहत जातात. बाकी पाकिस्तानमध्ये उगम पावणार्या नद्याच नाहीत. भारतात उगम पावलेल्या नद्याच पाकिस्तानात पोचतात. या नद्या कश्मीरच्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहेत. कुठल्याही रस्त्याने जाताना चहुकडे पसरलेली हिमशिखरे, बाजुने वाहणार्या नद्या आणि चिनार, देवदार आणि काश्मीरी विलोची झाडे कमालीची स्वर्गीय अनुभूती देउन जातात
आपल्याकडच्या संथ वाहते गंगामाई सारख्या नद्या नाहीत या. यांच्या पाण्याला प्रचंड जोर असतो. आपल्या वाटा धुंडाळत जेव्हा या नद्या काश्मीरच्या दर्याखोर्यांमध्ये खळाळत सुटतात तेव्हा समोर येणारी प्रत्येक भिंत कोलमडुन पडते, शिळा झिजतात, वाटा आपोआप रुंदावतात
सोनमर्ग - गुलमर्ग ही दोन्हीही विरळ वस्तीची गावे. १२ महिने तिथे राहता येणे तर केवळ अशक्य. हिवाळ्यात ९०% हुन आधिक रस्ते बंद होतात आणि जगाशी संपर्क तुटतो. शिवाय थंडीमुळे तिथे राहणेही अशक्य होते तेव्हा तेथील लोक तात्पुरते इतरत्र स्थलांतरीत होते. बर्फ थोडा कमी झाला की पर्यटकांच्या आशेने परत स्वगावी परतणे होते.
या अशक्यसा भासणार्या अनारोही पर्वतरांगांमध्येच आपल्या सैन्याला रॉक क्लाइंबिंगचे शिक्षण दिले जाते. एवढ्या खडतर तपस्येतुन जेव्हा ते तावुन सुलाखुन बाहेर पडतात तेव्हा गुलमर्ग हिमाच्छादित पर्वत रांगा सुद्धा खुज्या भासत असतील.
या बर्फाचा सदुपयोग भारत सरकारने करुन घेतला नसता तरच नवल (भारत सरकारही कधीमधी बरे काम करतेच की). गुलमर्गच्या या बर्फ राज्यात सरकारने स्कीईंग प्रेमींसाठी नंदनवन उभारले आहे. म्हणजे तसे ते निसर्गानेच उभारलेले आहे पण भारत सरकारनेही थोड्याफार सुविधा पुरवुन त्यात आपला हातभार लावला आहे. नोव्हेंबर ते जुन हा गुलमर्गचा पीक सीझन. आजुबाजुला बर्फाचे प्रचंड साम्राज्य पसरलेले असुनसुद्धा. कारण याच काळात जगभरातील स्की प्रेमी इथे येतात स्कीइंगसाठी आणि बर्फात मनमुराद खेळण्यासाठी. त्याकरिता भारत सरकारने येथे आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची केबल कार (इथे त्याला गोंडोला म्हणतात) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे:
केबल कार २ टप्प्यांवर उभारली आहे. पहिला टप्पा १०००० फुटांचा - कुंगदूरी आणि दुसरा टप्पा १४००० फुटांचा आफरवात. हा गोंडोला जगातला सर्वाधिक उंचीवरचा गोंडोला आहे आणि तो जागतिक दर्जाचा आहे हे नक्की. १४००० फुटांवर गेल्यावर स्वर्ग फारसा दूर नसतो आणि स्वर्गीय सौंदर्य तर तुमच्या नजरेच्या टप्प्यात असते. इथेच मी माझ्या आयुष्यातला पहिला हिमवर्षाव अनुभवला. भुरुभुरु अंगावर सांडणार बर्फ, कुंद वातावरण, उणे तापमान अश्या वातावरणात माणूस भारुन गेला नाहितरच आश्चर्य :
आफरवातपासुन लाइन ऑफ कंट्रोल दिसते. फक्त एक किमीवर. अर्थात बर्फात एक किमी पाय ओढत चालणे ही काही सोप्पी गोष्ट नाही. त्यात वरुन बर्फ पडत असेल, दुपारी ३ वाजता अंधारुन आले असेल आणि कुठल्याही क्षणी बर्फाचा वर्षाव सुरु होउ शकेल असे वातावरण असेल तर मग तर पुढे जाण्याची हिंमत करताच येणार नाही. त्यामुळे आम्ही तिथवर जाउनही एकाही पाकड्याला कंठस्नान न घालता परत आलो. आमच्याकडे पर्याय होता, भारतीय सैन्याच्या जवानांकडे तो पर्याय नाही. हाडे गोठवणार्या थंडीत तिथे त्यांना राहवेच लागते. उन्हाळा असो अथवा हिवाळा. पुर्वी हिवाळ्यापुरते दोन्ही बाजुंकडुन शस्त्रसंधी असायची. सैन्य बर्फातुन काही काळतरी थोडीफार माघारी जायचे. पण ९८ मध्ये पाकिस्तानी सैन्याने भि**** पणा केला, आणि ही संधी साधुन लाइन ऑफ कंट्रोल ओलांडली. तेव्हापासुन सैन्य मरणाच्या थंडीतही इथे आणि इतर हिम्शिखरांवर तैनात असते.
१४ हजार फुटांवरचा भारतीय सैन्याचा हा तळ:
आणि प्रतिकुल परिस्थितीत पाय रोवुन उभ्या राहणारर्या सैन्याची तात्पुरती निवासव्यवस्था करणारे पर्वतरांगांच्या मध्यात विसावलेले हे बंकर्सः
भारतीय सैन्याच्या विजिगुषु वृत्तीला, असामान्य सहनशतीला, अफाट साहसाला आणि दिङ्मुढ करणार्या पराक्रमाला एक कडक सॅल्युट ठोकत हा भाग संपवतो. इति बर्फ अध्याय संपुर्णम.
Book traversal links for मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त रे
+१
+२
मस्त
चांगले फोटू आणि
आज फोटो दिसले... खतरनाक रे
जबरा
लै झ्याक, लै भयाण, लै अफलातून, लै तूफान.
फोटो आणि वर्णन दोन्ही एकदम
काही फरक पडणार नाही. तिथे
अप्रतिम....!!!
पाक्व्याप्त काश्मीर याहुन
निशब्द झालोय. तुमचे मनापासुन
बेनजीर कश्मिर !
........
झक्कास वर्णन
मस्त! अतीव सुंदर!
मस्त रे फोटु अप्रतिम
आधीच्या भागांच्या लिंका इथे
फोटो झकासच
खिलनमर्ग...
आम्हाला असा ढाबा नाही पण एक
मिशन काश्मीरची ही पुर्ण
सुंदर लेखमाला आणि हे नतर चे
सध्या प्रचंड उन्हाळा असताना
सध्या प्रचंड उन्हाळा असताना
सध्या प्रचंड उन्हाळा असताना
वाह
दोन्ही फोटोज खतरनाक आलेत. दिल
धन्यवाद
सर्व वाचक आणि
गर फ़िर्दौस बर रुए ज़मीन अस्त
खरे आहे. म्हणून लेखमालेची