तडजोडी करता करता
आयुष्य पार सरलेले
स्वप्नांची वाफ उडाली
कोरडे-शुष्क उरलेले
आता न वळे पाऊल
वाटेवरती गाण्यांच्या
कंठात रुते आवाज
ओठही बंद शिवलेले
हे दुःख आत ना मावे
बाहेर येतही नाही
पाहून पोरकी स्वप्ने
डोळ्यांशी डबडबलेले
माझे मन मोठे कोडे
सुटता न सुटे थोडेही
बाहेर दिसे स्वच्छंदी
आतूनी बुरसटलेले
खांद्याला घेऊन ओझी
मसणात रोजची वारी
एकेका दगडा खाली
एकेक स्वप्न पुरलेले
- स्वानंद
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1403
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता खुपच सहि लिहिलेली आहे
कविता खुपच सहि लिहिलेली आहे
खुपच करुन भाव दर्सवित आहेत ओळी...
"पोरकी स्वप्ने" हे शब्द विशेष आवडले...
असेच लिहित रहा .. वाचत आहे
सुरेख!
सुरेख!
अतीशय सुंदर
अतीशय सुंदर...मनोवेधक...खरोखर व्यथा मांडलेली कविता.
मस्त
सुंदर रचना
चेतन
मस्त रे! खांद्याला घेऊन
मस्त रे!
खांद्याला घेऊन ओझी
मसणात रोजची वारी
एकेका दगडा खाली
एकेक स्वप्न पुरलेले
हे तर कळस!
सुंदर...
खुप आवडली!!
खूप आवडली.
खूप आवडली.
काय रे ऑणसाईटला करमत नाही का?
काय रे ऑणसाईटला करमत नाही का? ;)
कविता फारच अप्रतिम. :)