आयुष्य पार सरलेले
तडजोडी करता करता
आयुष्य पार सरलेले
स्वप्नांची वाफ उडाली
कोरडे-शुष्क उरलेले
आता न वळे पाऊल
वाटेवरती गाण्यांच्या
कंठात रुते आवाज
ओठही बंद शिवलेले
हे दुःख आत ना मावे
बाहेर येतही नाही
पाहून पोरकी स्वप्ने
डोळ्यांशी डबडबलेले
माझे मन मोठे कोडे
सुटता न सुटे थोडेही
बाहेर दिसे स्वच्छंदी
आतूनी बुरसटलेले
खांद्याला घेऊन ओझी
मसणात रोजची वारी
एकेका दगडा खाली
एकेक स्वप्न पुरलेले
- स्वानंद
कविता खुपच सहि लिहिलेली आहे
सुरेख!
अतीशय सुंदर
मस्त
मस्त रे! खांद्याला घेऊन
सुंदर...
खूप आवडली.
काय रे ऑणसाईटला करमत नाही का?