मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रॉयलर कोंबडी सारखे हे शहर ....!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हे शहर झालेय ब्रॉयलर कोंबडी सारखे गुबगुबित देखणे तरी सत्वहीन नुसतेच मास अंगावर बेचव नि अळणी संस्कृतीहीन झालेय हे शहर नि येथला निसर्ग देखील कृत्रिम झालाय नुसतीच फुले आकर्षक गंधहीन .........! सुजत चाललय हे शहर वाढत चाललय बाद्लीबाद्लीने ओतली जातात येथे माणसे नकोतितक्या भन्नाट वेगाने कोण कुठली ...? बिन चेहर्याची ..... आजूबाजूची शेत जमीन विकून येथे उभारली जात आहेत मोठे मोठे मॉल्स नि तुडवला जातोय निसर्ग एखादे सुंदर जनावर मरून पडावे मोकळ्या मैदानात मग जमतात गिधाडे नि तोडीत राहतात लचके तसे हे बेवारशी मृत शहर बिन ओळखीचे चेहरे गिळून टाकतोय अजगराने श्वापद गिळावे तसे ....!! हे शहर झालेय ब्रॉयलर कोंबडी सारखे गुबगुबीत बाहेरून सुंदर गुबगुबीत नुसते चरबीने भरलेले निसत्व ,बेचव ठीकठिकाणी देशी बार डान्स बार ...!! एखादे केविलवाणे देऊळ फूटपाथच्या कोपर्यावरती टाकून दिलेल्या बेवारशी पोरासारखे उदबत्तीच्या वासात गुदमरून गेलेले कधीतरी बदडकण घंटीच्या आवाजात बाहिरटून गेलेले हे शहर ...... निनावी चेहरा नसलेले ..... पोरके बेवारशी शहर ...!!

वाचने 1841 वाचनखूण प्रतिक्रिया 3

नरेशकुमार 09/05/2011 - 09:50
हॉरर. एखाद्या होरर हॉलिवड पटाची कथा शोभावि असे वर्नन आहे. जसे कि Resident Evil - part 3 मध्ये नाही का ओसड शहर दाखविलेले आहे अगदी तसे द्रुश्य डोळ्यासमोरुन तर्ळुन गेले.
बाद्लीबाद्लीने ओतली जातात येथे माणसे
बाद्लीबाद्लीने नाय काय, डब्ब्या डब्याने (ट्रेनचा डब्बा हो) ओतलि जातात. :-(

टारझन 09/05/2011 - 10:10
आता एक "झिंगुर झुरळासारखे गाव " म्हणुन काव्यरचना येऊद्या १११काका ! काय बाकी षिर्षक सुचलंय .. =)) मला तर भुकंच लागली होती :) -(ब्रॉयलर कोंबडीश्रीचा मित्र ) टार्‍या कोंब्ड्यंकर