हे शहर झालेय ब्रॉयलर कोंबडी सारखे गुबगुबित
देखणे तरी सत्वहीन
नुसतेच मास अंगावर
बेचव नि अळणी
संस्कृतीहीन झालेय हे शहर
नि येथला निसर्ग देखील कृत्रिम झालाय
नुसतीच फुले आकर्षक
गंधहीन .........!
सुजत चाललय हे शहर
वाढत चाललय
बाद्लीबाद्लीने ओतली जातात येथे माणसे
नकोतितक्या भन्नाट वेगाने
कोण कुठली ...?
बिन चेहर्याची .....
आजूबाजूची शेत जमीन विकून
येथे उभारली जात आहेत
मोठे मोठे मॉल्स
नि तुडवला जातोय निसर्ग
एखादे सुंदर जनावर मरून पडावे
मोकळ्या मैदानात
मग जमतात गिधाडे
नि तोडीत राहतात लचके
तसे हे बेवारशी मृत शहर
बिन ओळखीचे चेहरे गिळून टाकतोय
अजगराने श्वापद गिळावे तसे ....!!
हे शहर झालेय ब्रॉयलर कोंबडी सारखे गुबगुबीत
बाहेरून सुंदर
गुबगुबीत
नुसते चरबीने भरलेले
निसत्व ,बेचव
ठीकठिकाणी देशी बार
डान्स बार ...!!
एखादे केविलवाणे देऊळ फूटपाथच्या कोपर्यावरती
टाकून दिलेल्या बेवारशी पोरासारखे
उदबत्तीच्या वासात गुदमरून गेलेले
कधीतरी बदडकण घंटीच्या आवाजात बाहिरटून गेलेले
हे शहर ......
निनावी
चेहरा नसलेले .....
पोरके
बेवारशी शहर ...!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1841
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॉरर.एखाद्या होरर हॉलिवड
आता एक "झिंगुर झुरळासारखे
वास्तवदर्शी काव्य आहे.