जवाहिरीचा खात्मा
लादेनचा खात्मा झाला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आता कधी एकदा त्या नं. २ ला संपवतो असे झाले होते. त्यांनी लगेच सुरक्षा समितीची बैठक बोलावली. परत तीच युक्ति वापरता येणार नाही यावर एकमत झाले. मग पर्यायी उपायांचा विचार सुरु झाला. बाँबिंग, ड्रोन हल्ला, कमांडो हे सगळे मार्ग आता परिचयाचे झाले होते, त्यामुळे शत्रु आता जास्त सावध असणार हे नक्कीच होते. नवीन काय करावे याचा उहापोह सुरु झाला. सीआयए च्या प्रमुखाने सुचवले की याबाबत भारताची मदत घ्यावी. राष्ट्राध्यक्षांसह सर्वांनीच विरोध केला. आधीच ते एकमेकांचे शत्रु आहेत, असे काही केले तर युध्दच भडकेल असे सर्वांचे मत होते.त्यावर सीआयए प्रमुख म्हणाले, माझी योजना वेगळी आहे. भारतीय लष्कराची मदत घ्यायची नाही. भारतातल्या बॉलिवुडची मदत घ्यायची. सगळे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. प्रमुख म्हणाले, बॉलिवुड मधे जय आणि वीरु ही जोडी आहे, ते करतील हे काम! यावर एका सदस्याने विचारले, पण वीरु तर क्रिकेटमधला बेभरवशाचा फलंदाज आहे. दहातून एकवेळा चांगला खेळतो आणि इतर वेळेस प्रतिस्पर्धी संघाला कॅचिंग प्रॅक्टिस देत असतो.
तो वीरु नव्हे, हा शोलेतला वीरु. त्या दोघांना त्यांच्या पसंतीची टीम ठरवु दे, काम फत्ते होण्याची खात्रीच समजा. राष्ट्राध्यक्षांना यातले काहीच समजले नाही. ते त्यांना व्यवस्थित समजावून देण्यात आले. ठराव पक्का झाला. भारतीय नेत्यांना याची चाहूलही लागू न देता अमिताभ, धर्मेंद्र यांना गुप्त योजना सांगण्यात आली. त्यांनी जोडीला विनोद खन्ना, नीतू सिंग, हेमा वगैरे खास व्यक्तिंना निवडले.गुप्तपणे सर्वांना पाकिस्तानात पोचवण्यात आले.
तिथे पोचताच त्या सर्वांनी वेषांतर केले, त्यामुळे हिंदी सिनेमाचे प्रेक्षक सोडुन ते कुणालाही ओळखता येणार नाहीत याची खात्री झाली. आधी त्यांनी रस्त्यातून महारोग्यांचा वेश घालून गाणे म्हणत एक प्रभातफेरी काढली. त्यातल्या ढकलगाडीवर झाकून एक यंत्र ठेवले होते त्याकडे बसलेला धर्मेंद्र मधेमधे लक्ष ठेवून होता. थोड्याच वेळात त्या जादुई यंत्रामुळे त्यांना अल जवाहिरी कुठल्या बंगल्यात लपून रहात होता ते समजले. आणखी माहिती काढल्यावर जवाहिरीला गाणेबजावण्याचा शौक आहे आणि त्याच्या सालगिराहला त्याने मोठी पार्टी ठेवली आहे हे या सर्वांना समजले. अर्थातच त्या पार्टीला ज्या गाणार्या पार्टीला बोलावले होते त्यांच्या मुसक्या बांधुन त्याजागी हेच सर्व यशस्वी कलाकार कव्वाली म्हणायला गेले. नीतू व हेमाच्या नाचावर जय वीरु यांनी 'हम कातिलोंके कातिल है, सबका काम तमाम करने आये है' अशी अक्कडबाज कव्वाली म्हणायला सुरवात केली. जवाहिरी, त्याचे सहकारी आणि आयएसआयचे तमाम अधिकारी डोलू लागले. नाचता नाचता अनेक वेळा नीतू व हेमा जवाहिरीच्या अगदी जवळ जाउन खंजिर दाखवत होत्या तरी कोणालाच संशय येत नव्हता. तिकडे हे सगळे लाईव्ह बघणार्या अमेरिकन नेत्यांना हे काय चालले आहे हेच कळत नव्हते.
नाच संपत आलेला असताना कोणीतरी एक जवाहिरीच्या कानाशी कुजबुजून गेला. नाच संपताक्षणी या सर्व मंडळींच्या कानाशी बंदुका रोखल्या गेल्या. राष्ट्राध्यक्षांनी निराशेनी मान हलवली. जवाहिरी गडगडाटी हसला. तेवढ्यात हा समारंभ तिसर्या मजल्यावर चाललेला असताना सुध्दा हवेतून एक मोटरसायकलस्वार रोरावत टपकला आणि हा कोण हे समजण्याच्या आत हातातली पिस्तुले गरागरा फिरवत रजनीकांतने सगळ्यांच्या छातीचा वेध घेतला. तुफान गोळीबार दोन्हीकडून झाला पण आपल्या हिरोंपैकी कुणालाच गोळी लागली नाही. त्यांची माणसे मात्र गोळी लागण्याआधीच 'आ दगा' म्हणून पडत होती. शेवटी प्रकरण हातघाईवर आले. जवाहिरीला दोन्ही बाजूनी जय व वीरु गुद्दे मारु लागले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कावून म्हणाले, अरे पटकन गोळी घालायची सोडून हे हाताने मारामारी का करताहेत ? त्यावर सीआयए प्रमुख हंसून म्हणाले, ते असंच असतं , त्या दोघांचं समाधान झाल्याशिवाय हा खेळ संपणार नाही, शिवाय त्या साळिंदराला पण मनसोक्त मोटरसायकल चालवायची आहे. अमेरिकन नेते डोकं धरुन बसले. सर्वांचा धीर सुटत चालला होता. बाहेर वाट पहाणार्या हेलिकॉप्टरचालकांचा रक्तदाबही बर्यापैकी वाढला होता. पण शेवटी एकदाचे सर्व संपले आणि हेलिकॉप्टरमधून सगळ्यांनी यशस्वी पलायन केले. भारतीयांचे शौर्य बघून सार्या जगाचे डोळे दिपले!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
//अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
लई भारी!!
//परत तीच युक्ति वापरता येणार
जवाहिरच्या लोकांनी कितितरि
जवाहिरच्या लोकांनी कितितरि
हा हा हा.. मस्तंच.
मस्त!
तुमच्या नावाचा सद्उपयोग
// थोड्याच वेळात त्या जादुई
जरुर
आई शप्पत.....
हा हा हा !!
उपहासात्मक
फुटलो अजुन यवद्यात , पार्ट २
त्यांच्यासोबत, बादल, धन्नो,
एल ओ एल
हसुन हसुन वाट लागली
पण ह्यात कथेत जय हा स्वतःच्या
कमांडो ने लयी वेळेला मार
लई भारी !!!! पार्ट -२ कधी
सलिम-जावेद नंतर तुम्हीच !
झक्कास !!
अरे ....... त्या जवाहिरीची