थोडे सहजच

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
25 Apr 2011 - 9:09 am

स्थळः एक प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान संस्था
वेळ: सकाळची
संवादः
कर्मचारी१: अरे आपल्या कँपसमधल्या गेस्टहाऊसमधे नव्या खेळांच्या सोयीबरोबर स्विमिंग पूलही होतोय
कर्मचारी२: हो का? वा! वा! आता पुढल्या क्लायंट व्हिजिटला त्याला तिथेच उतरवता येईल. ही सोय नसल्याने आपल्या क्लायंटला वेगळ्या हॉटेलात उतरवावं लागे. कारण आता बाकी कंपन्यांमधे ती सोय आहे ना!
क.१: मला नाही हा तसं वाटत! क्लायंटला फक्त उत्तम काम हवं असतं त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं. तुम्ही ते काम किती पैशात करून देताय इतकंच तो बघतो
क.२: अरे इतकं सोपं नाही ते. आता बघ इतक्या माहिती तंत्रज्ञान पुरवणार्‍या कंपन्या आहेत. त्या वाईट का आहेत? तीच ती माणसं तशाच प्रकारे काम करतात. तरी मोठे क्लायंट इथेच काम का देतात? अनेक छोट्या कंपन्या आहेत त्या खूप स्वस्तात काम करून देतात, तेही योग्य वेळेत आणि चांगल्या दर्जाचं तरी इथे महाग कंपनी का?
क.१: हो असं होतं खरं. पण क्लायंट तुम्ही त्याची सरबराई कशी करता यावर थोडंच काम देतो
क.२: अरे त्यावर तो अजिबातच काम देत नाहि. मात्र या गोष्टीमुळे त्याची शक्ती फक्त कामावर केंद्रीत रहाते. आता कँपसमधेच उत्तम सोय होत असेल तर हॉटेलात उतरण, तिथून हॉटेलपर्यंतचा प्रवास, पुन्हा परतीचा प्रवास वगैरे आलंच शिवाय त्या हॉटेलच्या सेवेवर आपला कंट्रोल नसेल तो वेगळा. इथे कमी खर्चात शक्ती वाया न जाता क्लायंट व्यवस्थित रहातो
क.१: हं खरंय. पण तु मगाशी म्हणत होतास तसे क्लायंट मोठ्या कंपन्यांकडेच जास्त का जातो?
क.२: अरे क्लायंटला स्वतःच्या कंपनीत एक बजेट दिलं असतं. ते बजेट जर एखाद्या वर्षी वापरलं गेलं नाही तर पुढल्या वर्षी कमी बजेट मिळायची शक्यता असते. शिवाय त्याला त्याच्या संस्थेत उत्तर द्यायची असतात अश्यावेळी या मोठ्या कंपन्यांची नावं घेतली की त्याच्या व्यवहारावर फारसा संशय कोणी घेत नाही. अरे ही केलीये ही नुसती सोय नाही आहे तर इन्व्हेस्टमेंट आहे.
क.१: अरे पण काहि कंपन्या आहेत की जिथे अश्या सोयी नाहित पण क्लायंट पूर्वापार जात आहेत. त्यांना कामाचा अनुभवही वाईट नाही.
क.२: अरे ब्रँड व्हॅल्यू म्हणूनही काहि असतं की नाही? एके काळी त्यांनीही अश्या सोयी देऊन ते क्लायंट गोळा करून ठेवले असतात आता नवे क्लायंट फक्त जूनी प्रसिद्धी ऐकून येतात तेव्हढे. मात्र बघितलंस तर अश्या कंपन्यांना मोठे क्लायंट मिळवणं हळूहळू कठीण होत जातं
(कर्मचार्‍यांना इतर मित्र भेटतात आणि गप्पांचा विषय बदलतो)

========================================
स्थळः एक प्रसिद्ध धर्मस्थळ
वेळ: सकाळची
संवादः
स्थानिक१: अरे आपल्या गावातल्या धर्मशाळेत नव्या खोल्या, स्वतंत्र संडास, गरम पाणी, मोफत भोजन वगैरे सगळी सोय होतोय
स्थानिक२: हो का? वा! वा! आता भक्तांना इथेच रहावंस वाटेल आणि आपला धंदा वाढेल. आधी ही सोय नसल्याने एकतर भक्तांना बाहेरच्या महागड्या हॉटेलात उतरवावं लागे.
स्था.१: मला नाही हा तसं वाटत! भक्तांना फक्त देवाशी मतलब असतो त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं.
स्था.२: अरे इतकं सोपं नाही ते. आता बघ इतकी धर्मस्थळं आहेत. तिथे देव नाही असं काही आहे का? तिथेही भक्त जाऊच शकतात की. तरी मोठे मोठे भक्त इथेच का येतात? अनेक छोटी धर्मस्थळं आहेत जिथे देवाचं दर्शन/सेवा खूप सहज करता येत्ते, तेही कमी वेळेत आणि उत्तम-शास्त्रोक्त तरी इथे का बरं येतात?
स्था.१: हो असं होतं खरं. पण भक्त तुम्ही त्यांना गावात सेवा देता यावर याचं थोडंच ठरवतो?
स्था.२: अरे त्यावर तो अजिबातच ठरवत नाही. मात्र या गोष्टीमुळे त्याचं इथे येणं-रहाणं सुलभ होतं त्याला पुन्हापुन्हा यावंस वाटतं. आता आवारातच रहायची उत्तम सोय होत असेल तर हॉटेलात उतरणं, तिथून देवळापर्यत येणंजाणं, बाहेर खाणं वगैरे वगैरे आलंच. शिवाय बाहेर भक्तां मिळणार्‍या सेवेवर आपला कंट्रोल नसेल तो वेगळा. इथे कमी खर्चात शक्ती वाया न जाता भक्त व्यवस्थित रहातो
स्था.१: हं खरंय. पण तु मगाशी म्हणत होतास तसे भक्त मोठ्या धर्मस्थळींच जास्त का जातो?
स्था.२: अरे, जेव्हा एखादा धनाढ्य भक्त एखाद्या ठिकाणी पैसा खर्च करतो, देणगी देतो तेव्हा त्याला समाजात प्रश्न विचारले जातातच. त्याची उत्तर द्यायची वेळ कोणालाही नकोच असते. या मोठ्या धर्मस्थळांची नावं घेतली की त्याच्या व्यवहारावर फारसा संशय कोणी घेत नाही. शिवाय तिथे दिलेला पैसा हा लोकांसाठीच आहे असेही तो सांगु शकतो. थोडक्यात आपल्याकडे भक्तांची सोय म्हणून नव्हे तर इन्व्हेस्टमेंट म्हणून या सोयी कराव्या लागतात.
स्था.१: अरे पण काहि धर्मस्थळे आहेत की जिथे अश्या सोयी नाहित पण भक्त पुर्वापार जात आहेत.
स्था.२: अरे पौराणिक महत्त्व, नाव म्हणूनही काहि असतं की नाही? एके काळी त्यांनीही अश्या सोयी दिल्याच असतात. ते भक्त टिकून असतात. आता नवे भक्त जुनी प्रसिद्धी ऐकून येतात तेव्हढे. मात्र बघितलंस तर अश्या ठिकाणे मोठे-धनाढ्य भक्त फारसे जाताना दिसत नाहीत.
(स्थानिकांना इतर मित्र भेटतात आणि गप्पांचा विषय बदलतो)

समाजअर्थकारणमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

25 Apr 2011 - 9:55 am | प्रकाश घाटपांडे

गद्यबंबाळ होण्यापेक्षा थोड्या हलक्या फुलक्या संवादाने विचार मांडला आहे.
दोन्हीची तुलना आवडली. देवस्थाने स्वच्छ असतील येणार्‍या भक्तांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, चप्पल बूट ठेवण्याची सोय,पार्किंगची सोय, प्रशस्त वाटेल असा परिसर,निवासाची सोय, थोडा बाग बगीचा हिरवाई असे असल्यास प्रसन्न वाटते. अस्तिक काय पण नास्तिकांनाही प्रसन्न वाटावे असा परिसर असलेली मिशन, मठ ,उपासना मंदिरे ही नक्कीच पर्यटन म्हणुन तरी आकर्षित करतात. बाहेरुन आलेला मनुष्य प्रवासाने थकलेला असतो. त्याला फ्रेश होण्याची आवश्यकता असते.
देवस्थान ट्रस्ट यांच्या दृष्टीने भक्त हा एक प्रकारचा ग्राहकच असतो. तो खूष झाला तर दानपेटी देणगी यात त्याचा हात जरा सैल सुटतो.
कंपनीच्या अतिथी निवासात देखील येणारा सरबराईने खुष होउन कंपनीला काम देण्याकडे त्याचा कल झुकतो. अतिथि देवो भव|

शिल्पा ब's picture

25 Apr 2011 - 10:12 am | शिल्पा ब

छान मुक्तक आहे. आवडलं.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Apr 2011 - 11:47 am | llपुण्याचे पेशवेll

तुलना बालिश वाटली. किंवा केवळ एक विशिष्ठ कंपनी म्हणजेच इंडस्ट्री अशा प्रकारची वाटली.
असो. हल्ली तशीच फॅशन असल्याने वेगळे काही वाटले नाही. :)

-(देवस्थानात राबलेला) पेशवे

नितिन थत्ते's picture

25 Apr 2011 - 12:35 pm | नितिन थत्ते

>>केवळ एक विशिष्ठ कंपनी म्हणजेच इंडस्ट्री अशा प्रकारची वाटली.
>>हल्ली तशीच फॅशन असल्याने वेगळे काही वाटले नाही.

सहमत आहे.

इंडस्ट्रीने (पकडल्या गेलेल्या) कंपनीला डिसओन करण्याची (आणि इंडस्ट्री चांगलीच असल्याची ग्वाही देण्याची) फ्याशन मात्र जुनीच.

छोटा डॉन's picture

25 Apr 2011 - 12:49 pm | छोटा डॉन

इंडस्ट्रीबाबत आम्हाला काही लिहावेसे वाटत नाही.
पण देवस्थानां*बाबत मात्र अंमळ गल्ली चुकली आहे की काय अशी शंका येते आहे.

माणुस जनरली मानसिक शांती मिळावी म्हणुन देवस्थानाची वारी करतो व म्हणुनच तिथल्या सोईसुविधांचा तितकासा फरक त्याला पडत नाही असे वाटते, अर्थात त्या नसतील तर त्रास होतो हे मान्य केले तरी बहुदा त्याबाबत तक्रार नसते. आंघोळीला जरासे थंड पाणी मिळाले व धर्मशाळेतले बेडशीट्स अस्वच्छ होते म्हणुन देवदर्शनानंतरच्या ज्या काही असेल त्या समाधानात कमी-जास्त होऊ शकत नाही.
ही भावना देवस्थानाला भेट देणार्‍या जवळपास ९५% भाविकांची असते.

इंडस्ट्रीत मात्र 'विझिट्स' ह्या मानसिक 'शारिरीक / आर्थिक किंवा अन्य समाधानासाठी' होत असल्याने तिथे सोई-सुविधांचे महत्व ही अत्यंत महत्वाची प्राथमिकता मानली जाते व त्याचा फरक तुमच्या एंड रिझल्ट ( कॉन्ट्रँक्ट, बिझीनेस, डिल्स ) वर पडतो / पडु शकतो.

बेसिकली इथे बाहेरुन येणार्‍या पाहुण्याची भेटीमागे 'भावना' वेगळी असल्याने सोई-सुविधांचा त्याच्या एंड रिझल्टवर होणारा परिणाम हा स्थळानुसार वेगवेगळा असतो हेच मला लिहायचे आहे.

* देवस्थान :
ह्यात मी भपकेबाज, दिखाऊ, सोने-हिरे माणकांनी मुर्तीला मढवलेल्या श्रीमंत व खास मॅनेज केलेल्या 'देवस्थान उर्फ बिझीनेस सेंटर्स'चा समावेश करु इच्छित नाही. इनफॅक्ट मी त्यांचे नावही घेऊ इच्छित नाही.
तुमचे कॉर्पोरेट नियम इथे लावण्यास तुम्हाला पुर्ण मुभा आहे.

- छोटा डॉन

ऋषिकेश's picture

25 Apr 2011 - 1:23 pm | ऋषिकेश

प्रतिसादाबद्दल आभार.

देवदर्शनानंतरच्या ज्या काही असेल त्या समाधानात कमी-जास्त होऊ शकत नाही.
ही भावना देवस्थानाला भेट देणार्‍या जवळपास ९५% भाविकांची असते.

काहि अंशी सहमत आहे. भाविकांची समाधानाची कसोटी व पातळी वेगवेगळी असु शकतेच. प्रश्न हा आहे की धर्मस्थळे ज्या सोयी करून देतात त्यामागे उद्देश समाजकार्य वगैरे थोर असतो का अधिक भक्त गोळा करणे, धनाढ्यांच्या मनी लाँडरींगची सोय वगैरे हा असतो?
वरच्या लेखातीलच संवाद बघा

पण भक्त तुम्ही त्यांना गावात सेवा देता यावर याचं थोडंच ठरवतो?
स्था.२: अरे त्यावर तो अजिबातच ठरवत नाही. मात्र या गोष्टीमुळे त्याचं इथे येणं-रहाणं सुलभ होतं त्याला पुन्हापुन्हा यावंस वाटतं. आता आवारातच रहायची उत्तम सोय होत असेल तर हॉटेलात उतरणं, तिथून देवळापर्यत येणंजाणं, बाहेर खाणं वगैरे वगैरे

छोटा डॉन's picture

25 Apr 2011 - 1:37 pm | छोटा डॉन

प्रश्न हा आहे की धर्मस्थळे ज्या सोयी करून देतात त्यामागे उद्देश समाजकार्य वगैरे थोर असतो का अधिक भक्त गोळा करणे, धनाढ्यांच्या मनी लाँडरींगची सोय वगैरे हा असतो?

तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास अनेक मुद्द्यांचा उहापोह करावा लागेल व त्यामुळे प्रतिसादाची लांबी वाढत जाण्याचे भय आहेच, मात्र तरीही 'सर्वसाधारण व सर्वसहमत' असे निदान करणे शक्य होणार नाही असे वाटते.

सोई करण्यामागे उद्देश काय असतो ?
अर्थातच ह्या सोई लोकांसाठी असल्याने जास्त लोक इकडे आकर्षित करणे हाच उद्देश असतो हे जरी सत्य मानले गेले तरी नक्की 'कोणत्या' सोई देत आहात त्यावरुन तुम्हाला नक्की काय 'अ‍ॅट्रॅक्ट' करायचे आहे हे समजते.

१. एका प्रसिद्ध देवस्थानात आयुष्यभर एकदम साधेपणाने जीवन जगलेल्या बाबांना आज सोन्या-हिर्‍यांनी मढवुन ठेवले आहे, आख्ख्या देव्हारा सोन्याने झळाळतो आहे, पंचतारांकित सुविधा उपलब्ध असणारी निवासस्थाने उपलब्ध आहेत, व्होल्वो बसेससारख्या आरामदायी बससेवा आहेत व अजुन एक 'विमानतळा'चा घाट घातला जात आहेत.
म्हटलं तर ह्या सोई 'भाविकां'साठी आहेत पण ह्या सुविधांमुळे पोटाचा चिमटा घेत बाबांच्या भक्तीपायी इथे येणारा भणंग किंवा गरिब भक्त आता अधिक बावचळुन जाणार नाही का ?
'पेड दर्शन' ही सुविधा आहे का ? खरच ?

२. एका देवस्थानात वर्षानुवर्षे एकाच पद्धतीचे जेवण प्रसाद म्हणुन दिले जाते, अगदी प्रसादाच्या वेळेतही किंचितही बदल होत नाही, मात्र प्रसाद घ्यायला येणार्‍यालाही त्याची पत-जात-पात काही काही विचारली जात नाही.
अधिक सोई द्यायच्या म्हणुन मेन्यु बदलावा किंवा सध्या जमिनीवर बसुन जेवायच्या ऐवजी एसी हॉल बांधुन टेबलखुर्च्यांवर जेवायची सोय करावी ही 'अधिक सोईसुविधा' होऊ शकेल काय ?

मी वरच 'देवस्थान' ह्या शब्दाबाबत माझ्या भावना अत्यंत थोडक्यात लिहल्या आहेत.
त्या त्या प्रकाराप्रमाणे तिथे तिथे त्याला योग्य साजेशा 'सोई सुविधा' दिल्या जातात व दिल्या जातील असा माझा अनुभव आहे :)

- छोटा डॉन

'सर्वसाधारण व सर्वसहमत' असे निदान करणे शक्य होणार नाही असे वाटते.

+१. तसा प्रयत्नही नाही.

एका देवस्थानात वर्षानुवर्षे एकाच पद्धतीचे जेवण प्रसाद म्हणुन दिले जाते, अगदी प्रसादाच्या वेळेतही किंचितही बदल होत नाही, मात्र प्रसाद घ्यायला येणार्‍यालाही त्याची पत-जात-पात काही काही विचारली जात नाही.

मुद्दा विचारार्ह आहे. प्रसाद घ्यायला येणार्‍यालाही त्याची पत-जात-पात काही काही विचारली जात नाही. वगैरे स्वागतार्ह देखील.
मात्र जरा वेगळ्या दृष्टीने विचार करता, ही स्थाने जेव्हा काहि कारणाने स्थापित झाली तेव्हा ती आडमार्गाला होती. जेव्हा ती स्थापन झाली तेव्हा (बव्हंशी बघता) तिथे भक्ताने यावे वगैरे असे ते स्थान निर्माण होताना मनातही नव्हते. ती त्या त्या व्यक्तींच्या चिंतनाची (सामान्यांच्या भाषेत ध्यानाची), प्रसंगी समाधीची, (प्रसंगी तथाकथित) चमत्काराची वगैरे जागा असते. मात्र तिथे ट्रस्ट झाल्यावर हा 'प्रसाद' सुरू होतो. आता भाविकांची स्थान आडमार्गाला असल्याने होणारी गैरसोय संपते आणि मग तिथे भक्ताला उतरणे सोयीचे पडते. अर्थात भक्त त्या सोयीसाठी जात नाही मात्र ती सोय नसती तर इतके भक्त आले असते का?

दुसरे असे की ही धर्मस्थळे जे काहि करताहेत त्याला माझा फार आक्षेप आहे असेही नाही. फक्त या संस्थांना 'धर्नदाय' संस्था म्हणून त्यांना करात सवलत, जागेत सवलत, वीज/पाणीपट्टी माफ वगैरे गोष्टी कराव्यात का? का या संस्थांनाही व्यापारी संस्था म्हणून घोषित करावे? कोणी लहान व्यापारी आहे कोणी मोठा इतकेच.

याशिवाय व्यापारी संस्थेशी तुलना यासाठी केली की या अनुशंगाने पुढील मुद्द्यांवर चर्चा व्हावी असा मानस होता:
* धार्मिक अर्थकारण --> धर्माआडून होणारे मनी लाँडरिंग --> त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
* धर्मक्षेत्रांना/धर्मसंस्थांना वेगळे आर्थिक नियम का? या संस्था तर इतर कोणत्याही व्यापारी संस्थेप्रमाणे(किंबहूना अधिक (प्रसंगी अर्थव्यवस्थेला घातक होईल इतके)) अर्थार्जन करताना दिसतात
* भक्त हा ग्राहक झाला आहे. --> मग त्या अनुशंगाने येणारे प्रश्न जसे भक्ताची गैरसोय झाल्यास त्यास ग्राहक मंचावर तक्रार करता यावी का?वगैरे वगैरे

निवेदिता-ताई's picture

25 Apr 2011 - 8:01 pm | निवेदिता-ताई

सुंदर..