थोडे सहजच
लेखनप्रकार
स्थळः एक प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान संस्था
वेळ: सकाळची
संवादः
कर्मचारी१: अरे आपल्या कँपसमधल्या गेस्टहाऊसमधे नव्या खेळांच्या सोयीबरोबर स्विमिंग पूलही होतोय
कर्मचारी२: हो का? वा! वा! आता पुढल्या क्लायंट व्हिजिटला त्याला तिथेच उतरवता येईल. ही सोय नसल्याने आपल्या क्लायंटला वेगळ्या हॉटेलात उतरवावं लागे. कारण आता बाकी कंपन्यांमधे ती सोय आहे ना!
क.१: मला नाही हा तसं वाटत! क्लायंटला फक्त उत्तम काम हवं असतं त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं. तुम्ही ते काम किती पैशात करून देताय इतकंच तो बघतो
क.२: अरे इतकं सोपं नाही ते. आता बघ इतक्या माहिती तंत्रज्ञान पुरवणार्या कंपन्या आहेत. त्या वाईट का आहेत? तीच ती माणसं तशाच प्रकारे काम करतात. तरी मोठे क्लायंट इथेच काम का देतात? अनेक छोट्या कंपन्या आहेत त्या खूप स्वस्तात काम करून देतात, तेही योग्य वेळेत आणि चांगल्या दर्जाचं तरी इथे महाग कंपनी का?
क.१: हो असं होतं खरं. पण क्लायंट तुम्ही त्याची सरबराई कशी करता यावर थोडंच काम देतो
क.२: अरे त्यावर तो अजिबातच काम देत नाहि. मात्र या गोष्टीमुळे त्याची शक्ती फक्त कामावर केंद्रीत रहाते. आता कँपसमधेच उत्तम सोय होत असेल तर हॉटेलात उतरण, तिथून हॉटेलपर्यंतचा प्रवास, पुन्हा परतीचा प्रवास वगैरे आलंच शिवाय त्या हॉटेलच्या सेवेवर आपला कंट्रोल नसेल तो वेगळा. इथे कमी खर्चात शक्ती वाया न जाता क्लायंट व्यवस्थित रहातो
क.१: हं खरंय. पण तु मगाशी म्हणत होतास तसे क्लायंट मोठ्या कंपन्यांकडेच जास्त का जातो?
क.२: अरे क्लायंटला स्वतःच्या कंपनीत एक बजेट दिलं असतं. ते बजेट जर एखाद्या वर्षी वापरलं गेलं नाही तर पुढल्या वर्षी कमी बजेट मिळायची शक्यता असते. शिवाय त्याला त्याच्या संस्थेत उत्तर द्यायची असतात अश्यावेळी या मोठ्या कंपन्यांची नावं घेतली की त्याच्या व्यवहारावर फारसा संशय कोणी घेत नाही. अरे ही केलीये ही नुसती सोय नाही आहे तर इन्व्हेस्टमेंट आहे.
क.१: अरे पण काहि कंपन्या आहेत की जिथे अश्या सोयी नाहित पण क्लायंट पूर्वापार जात आहेत. त्यांना कामाचा अनुभवही वाईट नाही.
क.२: अरे ब्रँड व्हॅल्यू म्हणूनही काहि असतं की नाही? एके काळी त्यांनीही अश्या सोयी देऊन ते क्लायंट गोळा करून ठेवले असतात आता नवे क्लायंट फक्त जूनी प्रसिद्धी ऐकून येतात तेव्हढे. मात्र बघितलंस तर अश्या कंपन्यांना मोठे क्लायंट मिळवणं हळूहळू कठीण होत जातं
(कर्मचार्यांना इतर मित्र भेटतात आणि गप्पांचा विषय बदलतो)
========================================
स्थळः एक प्रसिद्ध धर्मस्थळ
वेळ: सकाळची
संवादः
स्थानिक१: अरे आपल्या गावातल्या धर्मशाळेत नव्या खोल्या, स्वतंत्र संडास, गरम पाणी, मोफत भोजन वगैरे सगळी सोय होतोय
स्थानिक२: हो का? वा! वा! आता भक्तांना इथेच रहावंस वाटेल आणि आपला धंदा वाढेल. आधी ही सोय नसल्याने एकतर भक्तांना बाहेरच्या महागड्या हॉटेलात उतरवावं लागे.
स्था.१: मला नाही हा तसं वाटत! भक्तांना फक्त देवाशी मतलब असतो त्याला तुम्ही देताय त्या सोयींशी घेणंदेणं अजिबात नसतं.
स्था.२: अरे इतकं सोपं नाही ते. आता बघ इतकी धर्मस्थळं आहेत. तिथे देव नाही असं काही आहे का? तिथेही भक्त जाऊच शकतात की. तरी मोठे मोठे भक्त इथेच का येतात? अनेक छोटी धर्मस्थळं आहेत जिथे देवाचं दर्शन/सेवा खूप सहज करता येत्ते, तेही कमी वेळेत आणि उत्तम-शास्त्रोक्त तरी इथे का बरं येतात?
स्था.१: हो असं होतं खरं. पण भक्त तुम्ही त्यांना गावात सेवा देता यावर याचं थोडंच ठरवतो?
स्था.२: अरे त्यावर तो अजिबातच ठरवत नाही. मात्र या गोष्टीमुळे त्याचं इथे येणं-रहाणं सुलभ होतं त्याला पुन्हापुन्हा यावंस वाटतं. आता आवारातच रहायची उत्तम सोय होत असेल तर हॉटेलात उतरणं, तिथून देवळापर्यत येणंजाणं, बाहेर खाणं वगैरे वगैरे आलंच. शिवाय बाहेर भक्तां मिळणार्या सेवेवर आपला कंट्रोल नसेल तो वेगळा. इथे कमी खर्चात शक्ती वाया न जाता भक्त व्यवस्थित रहातो
स्था.१: हं खरंय. पण तु मगाशी म्हणत होतास तसे भक्त मोठ्या धर्मस्थळींच जास्त का जातो?
स्था.२: अरे, जेव्हा एखादा धनाढ्य भक्त एखाद्या ठिकाणी पैसा खर्च करतो, देणगी देतो तेव्हा त्याला समाजात प्रश्न विचारले जातातच. त्याची उत्तर द्यायची वेळ कोणालाही नकोच असते. या मोठ्या धर्मस्थळांची नावं घेतली की त्याच्या व्यवहारावर फारसा संशय कोणी घेत नाही. शिवाय तिथे दिलेला पैसा हा लोकांसाठीच आहे असेही तो सांगु शकतो. थोडक्यात आपल्याकडे भक्तांची सोय म्हणून नव्हे तर इन्व्हेस्टमेंट म्हणून या सोयी कराव्या लागतात.
स्था.१: अरे पण काहि धर्मस्थळे आहेत की जिथे अश्या सोयी नाहित पण भक्त पुर्वापार जात आहेत.
स्था.२: अरे पौराणिक महत्त्व, नाव म्हणूनही काहि असतं की नाही? एके काळी त्यांनीही अश्या सोयी दिल्याच असतात. ते भक्त टिकून असतात. आता नवे भक्त जुनी प्रसिद्धी ऐकून येतात तेव्हढे. मात्र बघितलंस तर अश्या ठिकाणे मोठे-धनाढ्य भक्त फारसे जाताना दिसत नाहीत.
(स्थानिकांना इतर मित्र भेटतात आणि गप्पांचा विषय बदलतो)
वाचने
5313
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान तुलना
छान मुक्तक आहे. आवडलं.
तुलना बालिश वाटली. किंवा केवळ
+१
तुलना पटली नाही.
In reply to तुलना पटली नाही. by छोटा डॉन
कारण?
In reply to कारण? by ऋषिकेश
:)
In reply to :) by छोटा डॉन
थोडा वेगळा दृष्टीकोन आणि थोडे अधिक स्पष्टिकरण
सुंदर..