धंद्याची स्वप्ने बघणारा ..!!
जख्ख असा म्हातारा
झाडाखाली गाडी लावून
वाट बघत बसतोय गिर्हाईकाची
ठेवतोय कसले कसले रंग
ढकलगाडीवर....
गुलाल ,रांगोळ्या ,उटणे ,उदबत्त्यांचे पुडे ,
हेयर पिन्स ,बांगड्या,फुगे
जे हवे ते ,जे लागेल ते
आकर्षित करतोय बायका -मुलांना
त्याला वाढवायचाय धंदा भरपूर ....!!
स्वप्ने बघतोय श्रीमंत होण्याचे
हातावरच्या फुगलेल्या निळ्या शिरा
वाटतात भीतीदायक...!!
वय सरकल्याच्या खुणा
शरीरावर ठाण मांडून ....
तरी स्वप्नाची हाव
लंपटपणे जिवंत ठेवतेय त्याला
काहीतरी करून दाखवायची हिमंत
अजून तेवतेय त्याच्या मनात
वाट बघत बसलाय गिर्हाईकाची
तो आशाळभूतपणे …..
कोणीतरी येईल नि काहीतरी घेईल
लुकलुकून जातात
त्याचे गढूळ डोळे..!
कोणी येतोय असे वाटले की,
एक स्वप्न फुलून जातंय डोळ्यात
इंद्रधनुष्य बहरून जातेय
मनाच्या आभाळात
अन गिर्हाईक निघून जातेय
त्याच्या स्वप्नाना चुरगळून
चोळामोळा करून ठोकरून ....
ढग जमा होतात
कभिन्न त्याच्या मनात
थरथरून जातंय त्याचे मन
भिजलेल्या मांजरासारखे
नि लोंबत राहते केवीलपण ....!!
दिवस जातात हरवून
मग दाट अंधार होत जातो
शरीर उसवून जातो
म्हातारा घशाखाली काहीतरी ढकलीत
अधाशीपणे पाणी ढोशीत
एक बारीकशी कळ
त्याला जमिनीवर लवंडून देते
पोटाशी पाय घेत.....
म्हातारा हरवून जातोय घरघरीच्या
घनघोर स्वप्नात
मुठीत रोटीचा एखादा तुकडा
राहून जातो तसाच
नि स्वप्नाची हावरट हाव हरवून जाते ..
न मिटनार्या अंधारात ....!!
वाचने
2488
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
प्रतिक्रिया
मन काळवटुन गेले.................
अशि केविलवानी परिस्थिति शत्रु वर ही येउ नये.
म्हातारा हरवून जातोय घरघरीच्या घनघोर स्वप्नात मुठीत रोटीचा एखादा तुकडा राहून जातो तसाचसहन होन्यापलिकडे आहे.
In reply to मन काळवटुन by नरेशकुमार
हृदय भाजुन निघाले .. रखरखत्या उन्हात एक बहिर्वक्र भिंग आपल्या बाहेर काढलेल्या हृदयावर फोकस करावे .. आणि त्या अति उष्म्याने काळीज खरपुस भाजुन निघावे , असे वाटले कविता वाचुन .. खरंच .. गहीवरलो .. न डोळे पाणावले ..
" धंद्याची स्वप्ने बघणारी ... !! " असे एक उत्स्फुर्त विडंबण सुचत होते , पण .. गप्प रहायचे ठरवले आहे. :)
In reply to हृदय भाजुन निघाले .. रखरखत्या by टारझन
" धंद्याची स्वप्ने बघणारी ... !! " असे एक उत्स्फुर्त विडंबण सुचत होते , पण .. गप्प रहायचे ठरवले आहे.+१ अगदी अगदी हेच सुचले होते. पण गप्प रहायचे ठरवले आहे. अवांतर :- कविता वाचुन दादुसच्या आज्याच्या धंद्याची आठवण झाली.
छान! गरीबीने पिचलेल्या आणि आशाळभूत असलेल्या म्हातार्याचे करूण चित्र छान रंगवले आहे.
दिवाळी दरम्यानची ही हकीगत आहे. खरोखरच एक म्हातारा मनुष्य सकाळी सकाळी एका कोपर्यात झाडाखाली अशी गाडी लावून वर वर्णन केलेल्या वस्तू नेटकेपणाने लावीत होता
खूप वय झालेला हा माणूस आपल्या कंपित हातानी हे सर्व करीत होता. कोठला कोण कुणास ठाऊक .माझ्या सकाळी फिरण्याच्या रस्त्यावरचे हे दृश्य आहे. आणि एके दिवशी हा माणूस गाडीजवळ संपून गेलेला दिसला
हे सर्व डोक्यात बसले होते.ते काल शब्दरुपाने अवतरले .
In reply to दिवाळी दरम्यानची ही हकीगत by प्रकाश१११
हि संवेदनशिलता अशीच टिकून राहुदेत!!
आमेन!!
सुंदर रचना!!
In reply to दिवाळी दरम्यानची ही हकीगत by प्रकाश१११
अगदि मनापसुन आवडलि कविता !
:)
In reply to दिवाळी दरम्यानची ही हकीगत by प्रकाश१११
म्हातारा हरवून जातोय घरघरीच्या घनघोर स्वप्नात मुठीत रोटीचा एखादा तुकडा राहून जातो तसाच नि स्वप्नाची हावरट हाव हरवून जाते .. न मिटनार्या अंधारात ....!!निशब्द ... नेहमीप्रमाणेच छान ... समाजाचे असे चित्रण खरेच खुप क्लेशदायक असते .. लिहित रहा .. वाचत आहे
चांगली कविता आहे. अशा परिस्थितीतही नेटाने व्यवसाय चालवू बघणार्या त्या वृद्धाला सलाम.
अन्यथा वाडवडीलांनी उभे केलेले मोठमोठाले व्यवसाय बुडवणारी माणसे मी पाहीली आहेत.
खरी त्रासदायक कविता......
मिका आणि पुपे यांच्याशी सहमत.
टारझन एवढा 'सिझन्ड' नको होऊ रे.
तुला काही बोलायाचे आहे पण , गप्प राहायचे ठरवले आहे.
अतिशय भावना प्रधान काव्य. खूपच सुंदर वर्णन प्रकाश दा.
खरंच कठिण गेले वाचतांना..डोळ्या समोर त्या व्यक्तिचे चित्र समोर तरळून गेले. खूपच सफल काव्य!
तुमच्या काव्या मधे हीच तर खूबी आहे.. तुम्ही इतुके सजग चित्र रेखाटता कि वाचक त्याचा एक भाग बनून जातो वाचता वाचता..
एक उत्तम कवि प्रथम एक उत्तम व्यक्ति असावा लागतो..निर्मळ ह्रदयी! :)
मि.कां ना अनुमोदन!!
- निनाव.
In reply to अतिशय भावना प्रधान काव्य. by निनाव
एक उत्तम कवि प्रथम एक उत्तम व्यक्ति असावा लागतो..निर्मळ ह्रदयी!अगदी बरोबर बोललास
In reply to अतिशय भावना प्रधान काव्य. by निनाव
एक उत्तम कवि प्रथम एक उत्तम व्यक्ति असावा लागतो..निर्मळ ह्रदयी!अगदी बरोबर बोललास
चांगली संवेदनशील कविता!
छान कविता...
मन काळवटुन