जख्ख असा म्हातारा
झाडाखाली गाडी लावून
वाट बघत बसतोय गिर्हाईकाची
ठेवतोय कसले कसले रंग
ढकलगाडीवर....
गुलाल ,रांगोळ्या ,उटणे ,उदबत्त्यांचे पुडे ,
हेयर पिन्स ,बांगड्या,फुगे
जे हवे ते ,जे लागेल ते
आकर्षित करतोय बायका -मुलांना
त्याला वाढवायचाय धंदा भरपूर ....!!
स्वप्ने बघतोय श्रीमंत होण्याचे
हातावरच्या फुगलेल्या निळ्या शिरा
वाटतात भीतीदायक...!!
वय सरकल्याच्या खुणा
शरीरावर ठाण मांडून ....
तरी स्वप्नाची हाव
लंपटपणे जिवंत ठेवतेय त्याला
काहीतरी करून दाखवायची हिमंत
अजून तेवतेय त्याच्या मनात
वाट बघत बसलाय गिर्हाईकाची
तो आशाळभूतपणे …..
कोणीतरी येईल नि काहीतरी घेईल
लुकलुकून जातात
त्याचे गढूळ डोळे..!
कोणी येतोय असे वाटले की,
एक स्वप्न फुलून जातंय डोळ्यात
इंद्रधनुष्य बहरून जातेय
मनाच्या आभाळात
अन गिर्हाईक निघून जातेय
त्याच्या स्वप्नाना चुरगळून
चोळामोळा करून ठोकरून ....
ढग जमा होतात
कभिन्न त्याच्या मनात
थरथरून जातंय त्याचे मन
भिजलेल्या मांजरासारखे
नि लोंबत राहते केवीलपण ....!!
दिवस जातात हरवून
मग दाट अंधार होत जातो
शरीर उसवून जातो
म्हातारा घशाखाली काहीतरी ढकलीत
अधाशीपणे पाणी ढोशीत
एक बारीकशी कळ
त्याला जमिनीवर लवंडून देते
पोटाशी पाय घेत.....
म्हातारा हरवून जातोय घरघरीच्या
घनघोर स्वप्नात
मुठीत रोटीचा एखादा तुकडा
राहून जातो तसाच
नि स्वप्नाची हावरट हाव हरवून जाते ..
न मिटनार्या अंधारात ....!!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2488
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मन काळवटुन
हृदय भाजुन निघाले .. रखरखत्या
In reply to मन काळवटुन by नरेशकुमार
+१
In reply to हृदय भाजुन निघाले .. रखरखत्या by टारझन
छान! गरीबीने पिचलेल्या आणि
दिवाळी दरम्यानची ही हकीगत
हिच
In reply to दिवाळी दरम्यानची ही हकीगत by प्रकाश१११
अगदि मनापसुन आवडलि कविता !
In reply to दिवाळी दरम्यानची ही हकीगत by प्रकाश१११
म्हातारा हरवून जातोय
In reply to दिवाळी दरम्यानची ही हकीगत by प्रकाश१११
चांगली कविता आहे. अशा
खरी त्रासदायक
अतिशय भावना प्रधान काव्य.
एक उत्तम कवि प्रथम एक उत्तम
In reply to अतिशय भावना प्रधान काव्य. by निनाव
एक उत्तम कवि प्रथम एक उत्तम
In reply to अतिशय भावना प्रधान काव्य. by निनाव
चांगली
छान कविता...