पुन्हा नव्याने...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा : हा प्रतिसाद
पुन्हा नवा खेळ मांडूया
पुन्हा अनोळखी होऊया
पुन्हा नव्याने भेटूया
चल पुन्हा नव्याने जगूया
ओंगळ दु:खांना स्वछ पुसून
गोजीर्या सुखांना गिरवूया
जन्मांतरीचे आपले रेशमी नाते
नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया
चल सखे.................
सुंदर प्रेमाचे साजिरे रूप
नव्याने एकवार लेवूया
हुकलेल्या सार्या स्वप्नांना
मनाच्या गाभार्यात रुजवूया
चल सखे...................
सोड आता हा समंजसपणा
काही क्षण फिरून धुंद होवुया
विसरुनी हा विरस शहाणपणा
पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१३/०४/२०११)
वाचने
3323
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
चाल लावायला देण्यासारखी कविता .
मस्तच.. :)
विसरुनी हा विरस शहाणपणा
पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया
या ओळी आवडल्या.
दोन विचार: विरस च्या जागी निरस चांगलं वाटलं असतं का? ओळींमध्ये मात्रा कमीजास्त वाटतात.
अवांतरः चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो या गाण्याची आठवण झाली.
In reply to विसरुनी हा विरस by नगरीनिरंजन
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो या गाण्याची आठवण झाली.
In reply to विसरुनी हा विरस by नगरीनिरंजन
+१
In reply to विसरुनी हा विरस by नगरीनिरंजन
+१ सुरेख कविता!
In reply to विसरुनी हा विरस by नगरीनिरंजन
कविता आवडलीच.
विरस ऐवजी वेगळा काही शब्द सुचला तर चांगले होईल याबाबतीत सहमत आहे.
खूपच छान!!
ओंगळ दु:खांना स्वछ पुसून
गोजीर्या सुखांना गिरवूया
जन्मांतरीचे आपले रेशमी नाते
नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया
हे फारच सुंदर जमले आहे. आवडलेच.
In reply to खूपच छान!! ओंगळ दु:खांना स्वछ by निनाव
असेच म्हणतो
अतिशय सुरेख कविता. खूप आवडली.
सुंदर... :)
(प्रेमी) ;)
अरे वा ! मस्तच यार :)
चान चान !!
छान कविता...:)
सुरेख !
झकास रे भावड्या
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद!!
मस्त आहे कविता
कविता हा आमचा प्रांत नाहि पण तुमच्या कविता वाचनिय असता :)
परत एक अशीच सुंदर रचना
देव काकांना