मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा नव्याने...

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
काव्यरस
प्रेरणा : हा प्रतिसाद पुन्हा नवा खेळ मांडूया पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नव्याने भेटूया चल पुन्हा नव्याने जगूया ओंगळ दु:खांना स्वछ पुसून गोजीर्‍या सुखांना गिरवूया जन्मांतरीचे आपले रेशमी नाते नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया चल सखे................. सुंदर प्रेमाचे साजिरे रूप नव्याने एकवार लेवूया हुकलेल्या सार्‍या स्वप्नांना मनाच्या गाभार्‍यात रुजवूया चल सखे................... सोड आता हा समंजसपणा काही क्षण फिरून धुंद होवुया विसरुनी हा विरस शहाणपणा पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१३/०४/२०११)

वाचने 3323 वाचनखूण प्रतिक्रिया 19

नगरीनिरंजन 13/04/2011 - 12:00
विसरुनी हा विरस शहाणपणा पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया या ओळी आवडल्या. दोन विचार: विरस च्या जागी निरस चांगलं वाटलं असतं का? ओळींमध्ये मात्रा कमीजास्त वाटतात. अवांतरः चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो या गाण्याची आठवण झाली.

In reply to by नगरीनिरंजन

मेघवेडा 13/04/2011 - 18:43
चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो या गाण्याची आठवण झाली.
हेच म्हणतो. छान कविता. विरस शब्द खटकतोच आहे पण.

In reply to by नगरीनिरंजन

चित्रा 15/04/2011 - 16:16
कविता आवडलीच. विरस ऐवजी वेगळा काही शब्द सुचला तर चांगले होईल याबाबतीत सहमत आहे.

निनाव 13/04/2011 - 13:16
खूपच छान!! ओंगळ दु:खांना स्वछ पुसून गोजीर्‍या सुखांना गिरवूया जन्मांतरीचे आपले रेशमी नाते नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया हे फारच सुंदर जमले आहे. आवडलेच.

मिसळलेला काव्यप्रेमी 14/04/2011 - 17:13
सगळ्यांचे खुप खुप धन्यवाद!!

पेस्तन काका 22/10/2013 - 16:31
कविता हा आमचा प्रांत नाहि पण तुमच्या कविता वाचनिय असता :) परत एक अशीच सुंदर रचना