न्याय तुमचा खास आहे
लेखनविषय:
............ न्याय तुमचा खास आहे
तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे
सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे.
आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले
बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे.
कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही
लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे.
भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले
बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे.
पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी
काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे
-अशोक
वाचने
1761
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे
सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे.
क्षमा. कविते चा आशय कळला नाही नीट. खूपच सांकेतिक वाटली कविता. पुन्हा क्षमस्व!!
पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी
काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे
वा! आवडली!
भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे. पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहेफारच सुंदर रचना.... सल जाणवतेय....
प्रकाश, निनाव, नगरी निरंजन, आणि मिसळलेला काव्य्प्रेमी
धन्यवाद !
नगरी निरंजन..
कविला आपलीच कविता समजूवून सांगावी लागावी हे दुर्दव आहे. ही गझल सदृष्य रचना आहे. प्रत्येक शेर (द्वीपदी) वेगळी..
पहिल्या द्वीपदीत स्त्रीची व्यथा सांगितली आहे. ती कूनी ही असो, कुठंही असो तिच्या नशिबाचा वनवास काही चुकत नाही या पुरूषी व्यवस्थेत जी तक्रार्दार, पोलीस आणि न्यायाधीश अशा सर्व म्हूमिका वठवते
दुस-या द्वीपदीत हिशेबी दुनियेत हिशेब न समजण्-याची व्यथा मांडलीय
तिसरी द्विपदी स्वयंस्पष्ट आहे. ती आज कालचं अरजक दर्शवते.
चौथ्या द्वीपदीत स्वतःचं कौतुक स्वतःच करणा-यांविषयी कवी बोलतो आहे आणि या गोष्टीचा अतिरेक होतोय असं सूचीत केलंय
शेवटची द्वीपदी गीतेतल्या कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू .. या श्लोकावर्ची तिरकस कॉमेंट आहे
-अशोक
In reply to धन्यवाद! by डॉ अशोक कुलकर्णी
प्रत्येक शेर खुप छान आहे
विशेषकरुन
"कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही
लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे"
हे जास्त आवडले..
अवांतर : वयक्तीक मत-
मात्र कवी ला स्वताची कविता समजावुन सांगायला लागणे हे दुर्दैव आहे हे चुक वाटते...
उलट वाचकाने व्यवस्थीत वाचुन समजुन घेण्याचा प्रयत्न केला हेच खरे सुदैव आहे त्या कवितेचे असे वाटते....
In reply to प्रत्येक शेर खुप छान by गणेशा
गणेषा..
हो की, ही पण एक बाजू आहे या मुद्याला !
In reply to धन्यवाद! by डॉ अशोक कुलकर्णी
आणि मला उद्देशून तुम्ही प्रतिसादात लिहीलं आहे ते खरं म्हणजे निनावना उद्देशून आहे हे ही समजले. :)
In reply to मला समजली हो! by नगरीनिरंजन
सॉरी, नजरचूकीनं घडलं ! आणि हो, पुन्हा एकदा धन्य्वाद!
डॉक.. मस्त हो
पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी
काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे
सुंदर
आवडली गझल....
मस्तच...
गणेशा, हरिप्रिया आणि अर्धवट...
धन्यवाद !
तक्रार तुमची, पोलीस तुम्ही,