Skip to main content

न्याय तुमचा खास आहे

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी मंगळवार, 12/04/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
............ न्याय तुमचा खास आहे तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे. आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे. कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे. भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे. पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे -अशोक
लेखनविषय:

वाचने 1768
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे. पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे
फारच सुंदर रचना.... सल जाणवतेय....

प्रकाश, निनाव, नगरी निरंजन, आणि मिसळलेला काव्य्प्रेमी धन्यवाद ! नगरी निरंजन.. कविला आपलीच कविता समजूवून सांगावी लागावी हे दुर्दव आहे. ही गझल सदृष्य रचना आहे. प्रत्येक शेर (द्वीपदी) वेगळी.. पहिल्या द्वीपदीत स्त्रीची व्यथा सांगितली आहे. ती कूनी ही असो, कुठंही असो तिच्या नशिबाचा वनवास काही चुकत नाही या पुरूषी व्यवस्थेत जी तक्रार्दार, पोलीस आणि न्यायाधीश अशा सर्व म्हूमिका वठवते दुस-या द्वीपदीत हिशेबी दुनियेत हिशेब न समजण्-याची व्यथा मांडलीय तिसरी द्विपदी स्वयंस्पष्ट आहे. ती आज कालचं अरजक दर्शवते. चौथ्या द्वीपदीत स्वतःचं कौतुक स्वतःच करणा-यांविषयी कवी बोलतो आहे आणि या गोष्टीचा अतिरेक होतोय असं सूचीत केलंय शेवटची द्वीपदी गीतेतल्या कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू .. या श्लोकावर्ची तिरकस कॉमेंट आहे -अशोक

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

प्रत्येक शेर खुप छान आहे विशेषकरुन "कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे" हे जास्त आवडले.. अवांतर : वयक्तीक मत- मात्र कवी ला स्वताची कविता समजावुन सांगायला लागणे हे दुर्दैव आहे हे चुक वाटते... उलट वाचकाने व्यवस्थीत वाचुन समजुन घेण्याचा प्रयत्न केला हेच खरे सुदैव आहे त्या कवितेचे असे वाटते....

In reply to by डॉ अशोक कुलकर्णी

आणि मला उद्देशून तुम्ही प्रतिसादात लिहीलं आहे ते खरं म्हणजे निनावना उद्देशून आहे हे ही समजले. :)

In reply to by नगरीनिरंजन

सॉरी, नजरचूकीनं घडलं ! आणि हो, पुन्हा एकदा धन्य्वाद!