............ न्याय तुमचा खास आहे
तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे
सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे.
आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले
बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे.
कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही
लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे.
भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले
बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे.
पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी
काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे
-अशोक
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1768
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
तक्रार तुमची, पोलीस तुम्ही,
क्षमा. कविते चा आशय कळला नाही
पेरले मी, राखले मी. चातकासम
फारच सुंदर
धन्यवाद!
प्रत्येक शेर खुप छान
In reply to धन्यवाद! by डॉ अशोक कुलकर्णी
गणेषा.. हो की, ही पण एक बाजू
In reply to प्रत्येक शेर खुप छान by गणेशा
मला समजली हो!
In reply to धन्यवाद! by डॉ अशोक कुलकर्णी
सॉरी
In reply to मला समजली हो! by नगरीनिरंजन
डॉक.. मस्त हो पेरले मी, राखले
आवडली गझल.... मस्तच...
गणेशा, हरिप्रिया आणि