काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो?
न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
का लढवय्या आता बदनाम होत आहे
पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे
यल्गाराचा आता दबला आवाज येथे
खोट्यांचाच येथे चित्कार आहे
------ शब्दमेघ
वाचने
1365
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
क्या बात... क्या बात.....
जीवघेणी रचना आहे......
का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहेसंपलो....
अतिशय भन्नाट रचना.. आहाहा.. मस्त गणेशा.. चेंडु उंच फटका मारून दर्शकां कडे भिरकावण्यात आलेला आहे.. :)
गणेशा -अति उत्तम
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
हे खूप आवडले .खूप शुभेच्छा !!
व्वा. गुरु़ जि जबरदस्त
जबरदस्त
तुमच्या रचनांमध्ये मला सगळ्यात आवडलेली रचना.
अभिनंदन!
मस्तच...
व्वाह....