मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो? न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे ------ शब्दमेघ

वाचने 1365 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मिसळलेला काव्यप्रेमी 12/04/2011 - 15:37
क्या बात... क्या बात..... जीवघेणी रचना आहे......
का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे
संपलो....

प्रकाश१११ 12/04/2011 - 16:15
गणेशा -अति उत्तम सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे हे खूप आवडले .खूप शुभेच्छा !!