डायलॉग इन द डार्क
असे काय करतोस/तेस, दिसत नाही का? आंधळा/ळी आहेस का? असे बोल आपण इतरांना बोललो असु किंवा ऐकून घेतले असतील. नुकतेच 'डायलॉग इन द डार्क' ह्या प्रदर्शनाबद्दल एका परिचितांकडून कळले. त्यांचा अनुभव रोचक वाटला. त्यामुळे आपणही हे प्रदर्शन 'बघून' नव्हे अनुभवुन यावे असे ठरवले होते.
ह्या प्रदर्शनाबद्दल थोडक्यात म्हणायचे तर 'अंधांच्या विश्वाची झलक' ह्या तीन शब्दात वर्णन करता येईल. बरेचदा आपण प्रदर्शन 'पहायला' जातो पण इथे संपूर्ण अंधार असल्याने आपले डोळे काहीच कामाचे नसतात.
डायलॉग इन द डार्क हे प्रदर्शन डॉ. आन्द्रीयास डायनेक्क ह्या जर्मन माणसाने, १९८८ मधे सामाजीक जाणिवेतुन सुरु केलेला उपक्रम आहे. आजवर जगभरातील १५० शहरात हे एक विशेष प्रदर्शन म्हणुन फिरुन आले असले तरी आता जवळजवळ १० देशात हे प्रदर्शन आहे. आजवर साठ लाख लोकांनी हे प्रदर्शन पाहीले आहे व सहा हजार अंध व्यक्तींना यामुळे रोजगार मिळाला आहे.
भारतात हैद्राबाद येथे हे प्रदर्शन पहाता येईल.
तुम्ही, आम्ही व तसेच अंध व्यक्तीला रोज ज्या अनुभवातुन जावे लागते जसे जेवण, भाजी खरेदी, एटीएम मधुन पैसे काढणे, रस्ता ओलांडणे, अन्य लोकांप्रमाणे एखाद्या सहलीचा अनुभव घेणे इ. याचा एक अनुभव घेतल्यावर, आपण आपल्या डोळ्यांवर किती भिस्त ठेवतो हे जाणवले व तसेच स्पर्श, गंध, आवाज यांचे महत्व कळून येते.
आपण ज्या नोटा वापरतो त्यावर अशा काही खुणा आहेत की ज्या आधारे अंध लोक ती नोट किती रकमेची आहे हे ओळखु शकतात ही कधीतरी ऐकलेली माहीती प्रत्यक्ष वापरात आणल्यावर वेगळीच अनुभूती येते. भारतीय नोटा अंध लोक त्यावरील विविध चिन्हांमुळे ओळखु शकतात. जसे २० रु च्या नोटेवर एक उभा आयत असतो, ५०च्या चौकोन, १००रु त्रिकोण, ५०० रु गोल, हजार रु च्या नोटेवर चौकट.
फोटो- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीया. ऑर्ग. इन संस्थळावरुन
प्रदर्शन सुरु होतानाच 'रोल रिव्हर्सल' प्रकार म्हणजे काय हे कळून येते. आत गेल्या गेल्या, आपल्याला काहीही न दिसणे व ह्या प्रदर्शनात आपले गाईड एक अंध व्यक्ती असणे!!! आपण पुढील मार्गक्रमणासाठी सर्वस्वी त्या अंध व्यक्तीवर अवलंबून असतो व अतिशय सफाईने आपल्याला हा प्रवास घडवून आणला जातो. हा अनुभव प्रत्येकाने एकदा घेउन पहावा. ह्या प्रदर्शनाचे नाव देखील अतिशय समर्पक आहे ''डायलॉग इन द डार्क'' प्रदर्शनाच्या शेवटी एका कॅफेमधे अंधारात खाद्यपदार्थ घेउन आपल्या गाईड बरोबर गप्पा मारताना, आपण खरोखर जो संवाद साधत असतो जो बरेचदा आपण आपल्या दृश्य जगात अंध व्यक्तीबरोबर साधत नाही. जेव्हा आपण अंध असतो, तेव्हा आपल्याला सहानुभूतीपेक्षा, मदतीपेक्षा, माहीती व स्वावलंबनाला अनुकूल वातावरण हवे असते हे आधीक प्रकर्षाने जाणवते. अंध लोकांना स्वावलंबी करण्याबरोबरच त्यांचे दैनंदीन जीवन सुकर करण्याकरता समाजाने अजुन बरेच प्रयत्न केले पाहीजेत हे पुन्हा जाणवले. सर्व विद्यार्थ्यांना असे प्रदर्शन दाखवुन भावी इंजीनियर, नेते, डिझायनर्स आधीकाधिक उपकरणे अंधांच्या सोयीसाठी बनवतील अशी या प्रदर्शनांकडून आशा करायला हरकत नाही.
भारतात, हैद्राबाद मधील मिपाकरांनी जरुर भेट द्यावी. भारताबाहेर अन्य देशातही हे प्रदर्शन आहे, जालावर शोध घेतल्यास सर्व माहीती मिळेलच.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
चक्क सहजराव लिहते झाले !!!
चांगली माहिती
+१
सुंदर ओळख.
चांगली माहिती
+१
...तेव्हा कळे
धन्यु........!
.
डायलॉग इन द डार्क - स्वतःशीच संवाद
>>अरेच्या! प्रतिसाद देता देता
>>>>जुनी ओळख पटवल्याबद्दल
गुंडोपंत?
संपादक मंडळाला घातलेली हाकही
मिसळपावचे अधिकारिक धोरण
माझा प्रतिसाद अवांतर नाही
मुक्तक छान.. रोचक
आणि सहजकाकाही लिहिते झाले.
पुण्यात कधी येतय त्याकडे
अरे वा..
मस्तच!
अत्यंत 'डोळे उघडणारी' माहिती, सहजराव, धन्यवाद!
हो
सुंदर ओळख
व्वा
छान
छान माहिती हैदराबदला गेले
वेगळेच प्रदर्शन आहे असे दिसते
धन्यवाद
अरे वा! एक वेगळीच
अतिशय माहितीपूर्ण लेखन.
वा.. चांगली माहिती माहिती
वा!
मस्त
नविन माहिती.. चांगली
हलवून टाकणारा आणि अंतर्मुख
अगदी छान
+१
सहमत
अतिशय सुंदर माहिती
सुरेख
चांगला लेख अंधांच्या जगातील
धन्यवाद सहज ! चांगली माहिती
छान
धन्यवाद..