✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ठाणे खादाडी कट्टा

स
स्पा यांनी
गुरुवार, 04/07/2011 - 10:48  ·  लेख
लेख
ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण. ("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे. ;)) ठिकाण : पुरेपूर कोल्हापूर, राम जानकी हाउसिंग सोसायटी, घंटाळी मंदिरानजीक, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) पिन - ४००६०२ दिवस : शनिवार ९ एप्रिल २०११ वेळः संध्या ८ वाजता. मेनू: अनलिमिटेड थाळ्या : शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही. प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे. १५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे. पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20410 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2011 - 11:00 नवीन
पुणे कट्टयाच्या एक दिवस आधी ठाणे कट्ट्याचे आयोजन केल्याबद्दल स्पा यांचा जाहिर निषेध. आम्हास आदल्या दिवसापासून उपास करणे असल्यामुळे ठाणेरी आमंत्रणाचा स्वीकार करणे अशक्य आहे. शाकाहारी थाळीत फक्त इतकाच मेनू असल्याने एकंदरीत शाकाहारी मंडळींचे हाल होणार हे तर उघड आहे.:)
  • Log in or register to post comments

शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 11:03 नवीन
शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम असते. त्यात भरली वांगी, झुणका, झणझणीत उसळ, पुलाव, भाकरी आणि इतरही चांगले आयटेम असतात. शिवाय या ठिकाणी न दिलेले काही आयटेम्स सेपरेटही मागवता येतात ज्याला हवे तसे. शिवाय सर्व थाळ्यांना सोबत अनलिमिटेड पोह्याचे पापड / कुर्डया / तळलेली मिरगुंडे अशी झकास अकंपनीमेंट असते. थाळीमधे तांबडा /पांढरा रस्सा / चपात्या / भाकरी वगैरे अनलिमिटेड असल्याने ती सोयीची पडते. धनगरी मटणताट रेकमेंडेड. शिवाय "निशाणा तुला दिसला ना.. , मंगला ग मंगला.." अशी मराठमोळी झकास गाणीही असतात.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अजून

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2011 - 11:09 नवीन
शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम असते.
मग तर यायलाच पाहिजे. पापड, मिरगुंडे झकासच.
धनगरी मटणताट रेकमेंडेड.
:( शाकाहारी असल्यामुळे उपयोग नाही. शिवाय पुरेपुर कोल्हापूर मध्ये मिसळ नाही का मिळत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शिंच्या वल्ल्या, तु शाकाहारी

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 11:39 नवीन
शिंच्या वल्ल्या, तु शाकाहारी हैस का? हे कधी सांगणार !!! नाय्तर मला लैच एक्टं एक्टं झाल्यागत वाटत हुतं न बे... मले एक मैतर गटल्याचा लैच आणंद होउन राहिला ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शाकाहारी

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2011 - 12:42 नवीन
शाकाहारीबी बरेच हैत. सरुटॉबानेला कळलंच तुला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

प्र. का. टा.आ.

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 11:42 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुण्यात गल्लोगल्ली उघडलेत रे

मृत्युन्जय
गुरुवार, 04/07/2011 - 12:36 नवीन
पुण्यात गल्लोगल्ली उघडलेत रे हे पुरेपुर कोल्हापुरवाले. १. पौड रोडवर - राज मोटर्स शेजारी २. सदशिव पेठ - नागपुर खानावळ लेन, पेरुगेट पोलिस चौकीपाशी ३. एरंडवणे - अभिषेक होटेल च्या बाजुला, मेहेंदळे गॅरेज जवळ. ४. कोथरुड - हॉटेल मिर्च मसाला शेजारी, डहाणुकर कॉलनीपासुन २०० मीटर वर अजुन १-२ ठिकाणी आहे. पण आत्ता नीटसे आठवत नाही. शिवाय नळ स्टॉपला त्यांचे मिसळ जॉइंट पण आहे (जे पुण्याच्या परंपरेला जागुन बहुधा सकाळी ११ वाजताच बंद होते) शाकाहारी जेवण मात्र सुरेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चिंचवड

प्रचेतस
गुरुवार, 04/07/2011 - 12:44 नवीन
चिंचवडला पण नुकतेच उघडलेले आहे. पदमजी पेपरमिलच्या समोर. शिवाय जगातभारी कोल्हापुरी म्हणून पण कायसे ते आहे. अख्खा मसूरसाठी प्रसिद्ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नाव नका काढु त्या अख्खा

गणपा
गुरुवार, 04/07/2011 - 13:14 नवीन
नाव नका काढु त्या अख्खा मसूरचं. मागेच आपल्या अभिजितांनीं त्याच रसभरीत अनुभव वर्णन केलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शप्पथ गणपाराव... येक लंबर

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 18:04 नवीन
शप्पथ गणपाराव... येक लंबर बक्वास वाटलं मला ते होटेल... पुन्हातिकडं जाणार नाही.. वाटल्यास उपाशी राहीन.. अन आता त्या डिशची किंमत (प्रत्येकी) १००/- येइल इतकी वाढलीये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

ठाणे कट्टा उद्या ९ एप्रिल

स्पा
Fri, 04/08/2011 - 12:09 नवीन
ठाणे कट्टा उद्या ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे आज कृपया १२ वाजेपर्यंत नावे नोंदवावीत. आतापर्यंतची लिस्ट गवि रामदास काका खादाड अमिता सर्वसाक्षी लीमौजेट स्पा सुधांशू देवरुखकर विश्वनाथ मेहेंदळे विजुभाऊ मिसळलेला काव्यप्रेमी तात्या वपाडाव फिक्स आता निखील देशपांडे, प्रभू गुर्जी होल्ड वर आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हे व्हायरल मार्केटिंग ...

sagarparadkar
गुरुवार, 04/07/2011 - 12:27 नवीन
हे व्हायरल मार्केटिंग तर नव्हे? कारण हर्षद भाऊंनी 'सरूटॉबाने'चे निमंत्रण देताच लगेचच त्याच्या आदल्या दिवशीसाठी हे निमंत्रण आले. :) असं वाटण्याचं कारण म्हणजे मेनु कार्ड दिलेलेच आहे. बरं निमंत्रकांना स्वत:च्या खिशातून काहीच द्यायचं नाहिये, उलट जेव्ह्ढी अधिकाधिक माणसं ह्या आमंत्रणावरून तेथे येतील तेव्ह्ढे .... जाऊ दे शेवटी आम्ही पडलो पुणेकर ... :-) :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जाऊ दे..

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 12:33 नवीन
जाऊ दे शेवटी आम्ही पडलो पुणेकर +१००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

मेनु कार्ड दिलेलेच आहे. याला

विजुभाऊ
Fri, 04/08/2011 - 11:59 नवीन
मेनु कार्ड दिलेलेच आहे. याला म्हणायचे टोटल ट्रान्स्परन्सी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

.

स्पा
Fri, 04/08/2011 - 09:04 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जबरा बेत दिसतोय , छान छान

विनायक बेलापुरे
गुरुवार, 04/07/2011 - 11:05 नवीन
धन्यवाद निमंत्रणाबद्दल. 'पुणेरी' असून त्यादिवशी सरुटॉबा ला जाउ शकत नाही आहे तर 'ठाणेरी' बेत गाठणे केवळ अशक्यच . पण त्यादिवशी खुद्द (पुरेपुर) कोल्हापुरातच आहे त्यामुळे तिथे तुमच्या नावाने जेवेन. (पण बिल मात्र तुमच्या खात्यावर चढवणार नाही ) ;) तुम्ही पण मस्त जेवा, मजा करा आणि सचित्र-सटीप वृत्तांत येउद्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद निमंत्रणाबद्दल

नन्दादीप
गुरुवार, 04/07/2011 - 11:10 नवीन
धन्यवाद निमंत्रणाबद्दल. यायच होत पण मरोळ हून ७.३० ला निघून ८ पर्यंत नौपाड्याला पोचणे केवळ अशक्य...!!!! तरीपण ठाणेरी कट्ट्याला जोर्दार पाठिंबा.........!!!! हाणा तिज्यायला...
  • Log in or register to post comments

यायच होत पण मरोळ हून ७.३० ला

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 11:15 नवीन
यायच होत पण मरोळ हून ७.३० ला निघून ८ पर्यंत नौपाड्याला पोचणे केवळ अशक्य...!!!! तेजायला कारण कशाला देतोय बे ६ ला निघ ना :)
  • Log in or register to post comments

बघतो.... आता पोट दुखवायला

नन्दादीप
गुरुवार, 04/07/2011 - 11:20 नवीन
बघतो.... आता पोट दुखवायला लागणार बहुतेक....नायतर दुपारपासून डोस्क्याला बाम फासून बसाव लागणार बहुतेक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अय्या!

सखी
गुरुवार, 04/07/2011 - 19:17 नवीन
अय्या! तुम्ही पोट दुखायला लागल्यावर डोक्याला बाम लावता? मग थांबत का पोट? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

ख प लो !!

सुहास..
गुरुवार, 04/07/2011 - 19:35 नवीन
अय्या! तुम्ही पोट दुखायला लागल्यावर डोक्याला बाम लावता? मग थांबत का पोट? >>> =))=))=))=))=)) =))=))=))=)) =))=))=)) =))=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

मुन्नी बदनाम

संदीप चित्रे
Fri, 04/08/2011 - 01:08 नवीन
गाणं पाहिल्यापासून मला वाटायचं की बाम डोक्याला नाही आणि पोटालाही नाही , भलत्याच जागी लावायचा असतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

सहमत आहे . पण मुन्नीसारखा

टारझन
Fri, 04/08/2011 - 10:40 नवीन
सहमत आहे . पण मुन्नीसारखा बाम लावताना ज्यांचे हात थरथरतात त्यांनी काळजी घ्यायला हवी. .. उगाच थरथरत्या हाताने भलतीकडे झंडुबाम लागायचा आणि बामस्फोट व्हायचा .. का हो चित्रेसाहेब :) - मुन्ना बदमाश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

डिक्लेरेशन..

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 11:16 नवीन
तिथे मी अनेकदा जेवलो तेव्हा ती थाळी (सुके मटण , मुख्य डिश सोडून) अनलिमिटेड असल्याचंच मला दिसलं. कारण ते गरम गरम पोळ्या आणि रस्से आणून वाढत होते. मी लागेल तेवढ्या खाल्ल्या आणि तरीही बिल मेन्यूतल्या किंमती एवढेच आले. पण हा मेन्यू बघता त्यात स्पेसिफिकली २ चपात्या / १ भाकरी असं काही लिहिलेलं दिसतंय. तेव्हा अनलिमिटेडपणाबद्दल खात्री नाही म्हणून डिक्लेरेशन देत आहे.. पण जे काही थाळीत असते ते संपत नाही आणि पोटभर होते एवढे नक्की. तांबडा आणि पांढरा रस्सा अनलिमिटेड असतो एवढं नक्की.
  • Log in or register to post comments

अर्रे त्या ३ चपात्या ६ के

मृत्युन्जय
गुरुवार, 04/07/2011 - 12:38 नवीन
अर्रे त्या ३ चपात्या ६ के बराबर असतात रे. मीए कधी २ च्या वरती नाही खाउ शकलो तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मले बी येउ वाटुन राहिलं

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 11:46 नवीन
मले बी येउ वाटुन राहिलं तिकडे... तुमी बोलावलंय पण कसं जमन... काहीतरी करायलाच फैजे... (मायला बिल लैच कमी है ना राव तुमचं , पन तरीबी जाणं-येणं खाणं ७०० च्या घरात जौन राहिलं..)
  • Log in or register to post comments

हर्षद साहेब

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 11:48 नवीन
हर्षद साहेब येतायेत त्यांच्याबरोबर ये... कमी खर्चात येशील
  • Log in or register to post comments

माझे घर पुण्याला ..( सयाजी चय

गणेशा
गुरुवार, 04/07/2011 - 12:41 नवीन
माझे घर पुण्याला ..( सयाजी चय जवळच ) आणि माझी रुम ऐरोली मध्ये ...( ठाण्या जवळ) पण दोन्ही निमंत्रणामध्ये फक्त १ दिवस अंतर असल्याने बरोबर वाटले नाही.. एक आठवडा अंतर हवे होते म्हणजे दोन्हीकडची मज्जा घेता आली असती .. बाकी पुणे -मुंबई- ठाणे असल्या गोष्टींमध्ये न पडता दोन्ही कडची मज्जा घेत राहायला आवडते ... बघु कसे मॅनेज होते ते - गणेशा
  • Log in or register to post comments

येईनसं दिसतंय, कळवूच काय ते!!

सूड
गुरुवार, 04/07/2011 - 12:48 नवीन
येईनसं दिसतंय, कळवूच काय ते!! :D बाकी नाव पुरेपूर कोल्हापूर असल्याने शंका होती तिथं काही घासफूस असतं का नाही !! आता स्पावड्याने अख्खं मेन्युकार्डच दिलंयन् म्हणताना विचार करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

काही मंडल्लीना दोन्हीकडचा

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 12:54 नवीन
काही मंडल्लीना दोन्हीकडचा कट्टा अटेंड करायचा आहे अशा वेळी जर ठाणे कट्टा एक आठवडा पुढे टाकला टाकला, तर ती मंडळीही येऊ शकतील शिवाय काही साहेबांना १६ ला मिटींग्स आहेत, सो त्यांनी सुद्धा एक आठवडा पुढची तारीख मागितली आहे काय करायचं बोला
  • Log in or register to post comments

उद्याच्या शन्वारीच

सूड
गुरुवार, 04/07/2011 - 13:01 नवीन
सगळ्यांच्या अडचणी (पक्षी: प्रॉब्लेम्स) सांभाळून घ्यायला हवेत, उद्याच्या शन्वारीच कट्टा केला तर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आम्ही १२वी पास झालेलो

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 18:06 नवीन
आम्ही १२वी पास झालेलो आहेत.. त्यामुळं आम्हाला अडचणी येत नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

क्या बात क्या बात

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 13:03 नवीन
क्या बात क्या बात ..... शुभस्य शीघ्रम
  • Log in or register to post comments

बाकी गवि सुद्धा प्लानिंग

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 13:11 नवीन
बाकी गवि सुद्धा प्लानिंग कमिटी मध्ये असल्याने त्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments

परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 13:18 नवीन
परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत हा निरोप पोचणार नाही (रोज मिपावर न येणारे मिपाकर). खूप शॉर्ट नोटीस होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

काय ते लवकर ठरवा बॉ!!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/07/2011 - 14:20 नवीन
काय ते लवकर ठरवा बॉ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत

विजुभाऊ
गुरुवार, 04/07/2011 - 14:38 नवीन
परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत हा निरोप पोचणार नाही (रोज मिपावर न येणारे मिपाकर). खूप शॉर्ट नोटीस होईल. मला काही तसे वाटत नाही. शक्य असेल त्याना फोनवरून निरोप देता येईल की. मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो तर तिथले मेंबर्स सहज येवू शकतील की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

या शनिवारचं ठरलंच

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 14:45 नवीन
या शनिवारचं ठरलंच आहे. स्पावड्या थोड्यावेळात अद्ययावत करेल ही पोस्ट. वेळ ठिकाण तेच, दिवस बदलला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मी दिल्लीऊन ठाण्याला येवू

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 14:49 नवीन
मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो तर तिथले मेंबर्स सहज येवू शकतील की
आहो विजुभाऊ .. तुमच्या डोक्यावर सोनियाजींचा हात आहे .. शिवाय तुम्ही णारद मुणी .. "नारायण नारायण " म्हणता हवं तिथे प्रकट होउ शकता .. :) बाकी सामान्य लोक आहेत हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो

कुंदन
Fri, 04/08/2011 - 15:17 नवीन
दिल्लीत उपोषण सत्र सुरु झाले तर विजु भाऊ नी थेट ठाणे गाठले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हा हा हा हा

स्पा
Fri, 04/08/2011 - 15:26 नवीन
हा हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

या शनिवारीच ठरलं आहे

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 14:29 नवीन
या शनिवारीच ठरलं आहे आतापर्यंतचे मेंबर गवि विजुभाऊ स्पा सुधांशू लीमौजेट हर्षद (५०% चान्सिस) गणेशा
  • Log in or register to post comments

खूप शॉर्ट नोटीस

कुंदन
गुरुवार, 04/07/2011 - 14:54 नवीन
खूप शॉर्ट नोटीस झालीये. मी २१ एप्रिला ला येतोय , तेंव्हा करा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आयला कुंड्या तू पण येतोस का

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 14:58 नवीन
आयला कुंड्या तू पण येतोस का काय? आपण नंदी प्यालेस ला जाऊ मग खादाडीला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

३% नी स्पॉन्सर

सूड
गुरुवार, 04/07/2011 - 14:59 नवीन
३% नी स्पॉन्सर करत असाल तर विचार करु !! काय स्पा ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

वा कुंद्या ३% तू देत अशील तर

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 15:07 नवीन
वा कुंद्या ३% तू देत अशील तर धमाल येईल बे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कुंद्या ३% तू देत अशील तर धमाल येईल बे

कुंदन
गुरुवार, 04/07/2011 - 16:32 नवीन
धमाल ने होकार दिलाय का येण्याबद्दल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

गप र्‍हाय रे भौ! कुढं

बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/12/2011 - 15:32 नवीन
गप र्‍हाय रे भौ! कुढं कट्टागिट्टा करते? पैशे द्यावे लागतीन ना बे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

गप र्‍हाय रे भौ! कुढं

कुंदन
Tue, 04/12/2011 - 17:35 नवीन
ब्वॉर....... दुबैला येशीन तेंव्हा सांगजो , अढीच करु कट्टा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मला यायचेच होते ,, विशेषकरुन

गणेशा
गुरुवार, 04/07/2011 - 14:59 नवीन
मला यायचेच होते ,, विशेषकरुन सर्वांना भेटायचे होते .. पण आधीच्याच प्लॅन नुसार आज मुंबईवरुन पुण्यात आनि नंतर बारामतीला जाणार असल्याने या शनिवारी जमणार नाही. २३-२४ किंवा ३०-१ या तारखेला प्लॅन असता तर तसे कामे पुढे मागे केली असती नक्की. असो शुभेच्छा.. एकट्याच्या म्हणण्याने काही बदलवु नका.. बेटर लक नेक्स्ट टाईम ... - गणेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा