✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ठाणे खादाडी कट्टा

स
स्पा यांनी
गुरुवार, 04/07/2011 - 10:48  ·  लेख
लेख
ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण. ("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे. ;)) ठिकाण : पुरेपूर कोल्हापूर, राम जानकी हाउसिंग सोसायटी, घंटाळी मंदिरानजीक, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) पिन - ४००६०२ दिवस : शनिवार ९ एप्रिल २०११ वेळः संध्या ८ वाजता. मेनू: अनलिमिटेड थाळ्या : शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही. प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे. १५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे. पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20410 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

लागले

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 15:01 नवीन
लागले खात्रीचे मेंबर गळायला... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

गवि फिकीर नोट... जे मेंबर

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 15:08 नवीन
गवि फिकीर नोट... जे मेंबर खात्रीदायक नव्हते ते येत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाहि हो गवि ... माझ्या

गणेशा
गुरुवार, 04/07/2011 - 15:08 नवीन
नाहि हो गवि ... माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन मी एकदा येणार म्हंटल्यावर कधीच नाहि म्हणुन पलटत नाही. पण मला खरेच माहित नव्हते या शनिवारी तुम्ही ठरवत आहात ते .. स्पा ने आत्ता सांगितल्यावरच कळाले. मला वाटले तुम्ही नेक्ट शनिवारी ठरविनार असाल. तरीही एकट्यासाठी प्लॅन चेंज करावा हे माझे मत कधीच नसते... त्यामुळॅ काहीच बोलत नाही. असे बरेचसे ऑर्गनाईज केलेले आहेत गेट टुगेदर त्यामुळे सगळॅ अनुभव आहेत. उलट १६ लाच ठेवले असते तर मी सयाजी कॅन्सल करणार असे ठरवले होते .. असो .. शुभेच्छा... भेटत तर राहुच ... येथे आज आल्या आल्याच तसा रिप्लाय दिला होताच ( http://www.misalpav.com/node/17555#comment-304535) की सोमवार पर्यंत नाहीये ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो, कांदेपोह्यांचा

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/07/2011 - 15:10 नवीन
अहो, कांदेपोह्यांचा कार्यक्रम सोडून कसा येईल तो? तुम्ही पण ना गवि....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कसले काय .. गावाला काम आहे

गणेशा
गुरुवार, 04/07/2011 - 15:15 नवीन
कसले काय .. गावाला काम आहे म्हणुन जातो आहे. कांदेपोह्याचे कार्यक्रम नाहियेत आता येव्हड्यात .. जरा नंतर बघणार आहे. उलट ज्यांना बारामतीला ला यायचे असल्यास चला . पवार साहेबांकडे नाही न्हेणार .. आधीच ते अन्न आनि अण्णा यांच्यामुळे काळजीत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

अरे बाबा नुसते काळजीत नाही.

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/07/2011 - 15:24 नवीन
अरे बाबा नुसते काळजीत नाही. फेफरे यायची वेळ आली आहे त्यांना. (वरील प्रतिसाद अवांतर असल्यास उडविला तरी हरकत नाही!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तू येणार आहेस का ते सांग आधी,

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 15:29 नवीन
तू येणार आहेस का ते सांग आधी, नुसतं अवांतर टाकत बसू नकोस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

येणार तर!! ठाण्यात राहायचे

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/07/2011 - 15:34 नवीन
येणार तर!! ठाण्यात राहायचे आहे मला अजुन बरीच वर्षे... तुमची आज्ञा खाली पाडून कसे चालेल? :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आतापर्यंतचे

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 15:48 नवीन
आतापर्यंतचे मेंबर गवि विजुभाऊ स्पा सुधांशू लीमौजेट हर्षद (५०% चान्सिस) रामदास काका मिसळलेला काव्यप्रेमी विश्वनाथ मेहेंदळे बिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

एन्जोय !!!!!!!!!!

पप्पुपेजर
गुरुवार, 04/07/2011 - 14:47 नवीन
मेनू पाहून तर राहवले जात नाही आहे असुदे कट्याला शुभेच्छा !!!!!
  • Log in or register to post comments

शनिवारी संध्याकाळी ७.३०

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 14:48 नवीन
कट्टा या शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता जमत आहे जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा कारण सीट्स आधी बुक कराव्या लागतील ओक्के?
  • Log in or register to post comments

ठाकुर्लीचं पाणी !!

सूड
गुरुवार, 04/07/2011 - 14:53 नवीन
>>जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा सूचना का धमकी म्हणायची ही ?? ठाकुर्लीचं पाणी !! दुसरं काही नाही . :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

जे कोण येणार असतील त्यांनी

मृत्युन्जय
गुरुवार, 04/07/2011 - 15:01 नवीन
जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा कारण सीट्स आधी बुक कराव्या लागतील हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ . हेच कोणी पुणेकराने म्हटले असते तर पुणेद्वेष्टे बाह्य सरसावुन पुढे निघाले असते. (आणि आता तेच पुणेद्वेष्टे पुणेरी लोक याहुन जास्त खडुस कसे बोलले असते याबद्दल लिहितील)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

"जास्तीत जास्त मित्रांनी यावे

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 15:06 नवीन
"जास्तीत जास्त मित्रांनी यावे अशी विनंती करतो. अगत्याचे निमंत्रण दिले आहे. अगदी हातातले एखादे काम जितके टाळता येईल तितके टाळूनही या दोस्तांच्या कट्ट्यावर यावे. सर्व गावांहून जे दोस्तलोक येणार आहेत त्यांनी उद्या सकळी अकरापर्यंत स्पा कडे नावे कळवल्यास सर्वांनाच फारच सोयीचे होईल..यामुळे सर्वांना आरामात बसता येण्याची खात्री करुन घेता येईल..." (ठाणेरी) गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वा गवि. छान

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/07/2011 - 15:36 नवीन
वा गवि. छान प्रतिसाद. @मृत्युंजय हा बघा ठाणेरी आणि पुणेरी माणसातील फरक. इथे एखाद्या पुणेकराने (to be precise माझ्या माहितीतील काही पुणेकरांनी) "वर लिहिले तेच बरोबर आहे. हे असेच लिहायला हवे........" असे बरेच काही लिहिले असते. ठाणेरी माणसाने पटकन सुधारून घेतले की नाही. आत्ता बोला ;-) (समस्त पुणेरी मित्र हलके घेतील अशी अपेक्षा किंवा त्यांनी हलके घ्यावे ही विनंती) मुंबैकर वि.मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यामुळे सर्वांना आरामात बसता

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 18:12 नवीन
यामुळे सर्वांना आरामात बसता येण्याची खात्री करुन घेता येईल..."
गवि.. बघा पुन्हा शब्द वळवु नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

यामुळे सर्वांना आरामात टेकता

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 18:14 नवीन
यामुळे सर्वांना आरामात टेकता येण्याची खात्री करुन घेता येईल..." अशी सुधारणा करतो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मृत्या पिस्तुल से काट दाळूंगा

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 15:10 नवीन
मृत्या पिस्तुल से काट दाळूंगा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हें कधीपासनं सुरु केलं म्हणें

सूड
गुरुवार, 04/07/2011 - 15:15 नवीन
हें कधीपासनं सुरु केलं म्हणें ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ . हेच कोणी

विजुभाऊ
गुरुवार, 04/07/2011 - 17:39 नवीन
हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ . हेच कोणी पुणेकराने म्हटले असते तर पुणेद्वेष्टे बाह्य सरसावुन पुढे निघाले असते. तेच वाकु पुणेकरानी असे म्हंटले असते." ज्याने त्याने आपापल्या जबदारीवर येण्या आणि जाण्याची व्यवस्था करावी. आयोजक ७:१५ पर्यन्त पोहोचतील. ७:१७ नन्तर आलेल्या पाहुण्यांची खुर्चीची व्यवस्था होणार नाही . सबब ज्याना उशीर होणार असेल त्यानी स्वतःची खुर्ची आणावी. ही अट आयोजकाना लागू होत नाही. मागाहून तक्रार करू नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बाकी ....

कुंदन
गुरुवार, 04/07/2011 - 14:58 नवीन
बाकी "अर्ध्या अंड्याची करी" हे असे अर्धवट का ? बाकी अर्धे अंडे हवे असेल तर वाढीव पैसे का?
  • Log in or register to post comments

बाकी अर्धे अंडे हवे असेल तर

मुलूखावेगळी
गुरुवार, 04/07/2011 - 15:21 नवीन
बाकी अर्धे अंडे हवे असेल तर वाढीव पैसे का?
नाही ३% सवलतीच्या दरात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

३% ने अंडी तुम्ही देणार काय?

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 15:39 नवीन
३% ने अंडी तुम्ही देणार काय? :ऑ :ऑ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

आलात चोंबडेपना करायला? कोनी

मुलूखावेगळी
गुरुवार, 04/07/2011 - 15:52 नवीन
आलात चोंबडेपना करायला? कोनी बोलावलेले नसताना. अंडी देनारे आनि खानारे बघतील ना? कुंदन उत्तर देतीलच ना ह्यवर बाकि अरबट,वाह्यत, मर्यादा सोडुन बोलायला , अचरट्पना करायला तुम्हाला तर सोडत दिलेलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

उगी उगी .. चिडु नका ...

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 15:54 नवीन
उगी उगी .. चिडु नका ... वाक्याचा संदर्भ पहाता माझे वाक्य अरबट वाह्यत (?) मर्यादा सोडलेले , अचरट वगैरे आहे असे मला वाटत नाही .. पण म्हणतात ना .. जैसी दृष्टी तैसी ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

वाक्याचा संदर्भ पहाता माझे

मुलूखावेगळी
गुरुवार, 04/07/2011 - 15:58 नवीन
वाक्याचा संदर्भ पहाता माझे वाक्य अरबट वाह्यत (?) मर्यादा सोडलेले , अचरट वगैरे आहे असे मला वाटत नाही .. पण म्हणतात ना .. जैसी दृष्टी तैसी ..
हे कोन बोलतेय बघा आता? वाल्याचा वाल्मिकी झाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वाल्याचा वाल्मिकी झाला

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 16:02 नवीन
वाल्याचा वाल्मिकी झाला का? तुला टाऱ्याचा टाल्मिकी म्हणायचय का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

कृपया

कुंदन
गुरुवार, 04/07/2011 - 16:08 नवीन
कृपया या गप्पा खरडवहीत माराव्यात. धाग्याचा खरडफळा करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अगदी !!

सूड
गुरुवार, 04/07/2011 - 16:10 नवीन
अगदी !! कारण हे लेखन तीन दिवसात उडविल्या जाणार नाहीये !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अरेरे.........

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/07/2011 - 15:25 नवीन
कोल्हापुरी थाळी म्हण्टल्यावर जीभ जमीनी पर्यंत खाली घरंगळली ती परत गुंढाळून घेतली कारण ह्याच काय पुढच्या शनिवारीही येणे शक्य नाही .मी साधारण पणे २३च्या शनिवारी भारतात येऊ शकेन. पुढे महिनाभर आहे भारतात. तेवढ्या कालावधीत दुसरा कट्टा (पुण्यात - मुंबईत - ठाण्यात) कुठेतरी ठरवा बुवा! तुर्तास तुमच्या ठाणे आणि पुणे दोन्ही कट्ट्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा..........!
  • Log in or register to post comments

नक्कीच .. माझे असे ठाणे टिमला

गणेशा
गुरुवार, 04/07/2011 - 15:31 नवीन
नक्कीच .. माझे असे ठाणे टिमला म्हणने आहे ... येथे आलेल्या रिप्लाय वरुन .. बरेच जण २३ ला येवु शकत आहेत ... व्यक्तीशः माहित नाहीत पण कुंदन आणि आनखिन कोणीतरी पण तसेच बोलले आहेत. जास्त जनांना सामावुन घेण्यासाठी बघा पुढे ढकलता येते काय ते ... नसेल तर शुभेच्छा आहेतच .. तुमेहे या जावुन पुन्हा एकदा जावू .. काही हरकत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

२२-२४ मधे असेल तर मी ३३ %

मुलूखावेगळी
गुरुवार, 04/07/2011 - 15:35 नवीन
२२-२४ मधे असेल तर मी ३३ % ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

२३ ला मी

विलासराव
Mon, 04/11/2011 - 21:08 नवीन
पण येउ शकतो. बघा कसं ठरतय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

जीभ जमीनी पर्यंत खाली घरंगळली

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 18:15 नवीन
जीभ जमीनी पर्यंत खाली घरंगळली ती परत गुंढाळून घेतली
मला "द मास्क" चित्रपटातील जिम कॅरीची आठौण झाली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आपण हसे लोकाला

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 15:39 नवीन
("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे) असे लिहून पुणेकारांवर दुगण्या झाडणा-यांच्या लक्षात पुढील गोष्टी आल्या नाहीत काय???? १)कट्टा या शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता जमत आहे जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा कारण सीट्स आधी बुक कराव्या लागतील ओक्के? २)"अर्ध्या अंड्याची करी" पुणेरी कट्ट्याच्या धाग्यात असल्या सुचना नक्कीच नाहीत. स्वच्छ भाषेत लिहीले आहे तुम्हाला जास्त माहिती धाग्याच्या शेवटी दिलेल्या दुव्यावरुन पाहता येईल. दिवस - १७ एप्रिल २०११ वेळ - संध्याकाळी ७.३० ते ११.०० प्रकार - व्हेज आणि नॉनव्हेज खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-
  • Log in or register to post comments

दुगाण्या नाही हो..

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 15:40 नवीन
नुसती मैत्रीपूर्ण थट्टा.. :) कृपया ती ह.घ्या. (काहीसा बचावः अर्ध्या अंड्याचा उल्लेख हॉटेलचा आहे.. निमंत्रकांचा नाही..ती डिश अफलातून असते. खिमाच असतो ताटलीत. तर्रीसारखा. जहाल असल्याने थोडासाच असतो आणि तेवढाही संपवता येत नाही. कधीकधी त्या खिम्याऐवजी त्याच प्रसिद्ध तर्रीत अर्धे अंडे देतात. त्याचा भाग आणि उपयोग लोणच्यासारखा आणि तितकाच असतो. बाकीची मेन डिश भरपूर असते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

वो क्के

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 15:41 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ती कोपरखळी पुणे कट्ट्याला

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 15:46 नवीन
ती कोपरखळी पुणे कट्ट्याला नसून पुणेरी सर्वसामान्य घरगुती निमंत्रणाच्या पद्धतीला आहे. हे आता इथे म्हणून स्पष्ट झाल्याने आणि शिवाय ठाणे मित्रांनी पुणे कट्ट्याच्या तारखेशी क्लॅश येऊ नये म्हणून केवळ लक्षात येताक्षणीच तारीखही बदलली आहे. एकाच मिपा परिवारात पुणे ठाणे चकमक होऊ नये आणि यावर आता पडदा पडावा अशी इच्छा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

पडदा टाकल्या गेल्या आहे

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 15:47 नवीन
पडदा टाकल्या गेल्या आहे -स्पाकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पडदा टाकल्या

कुंदन
गुरुवार, 04/07/2011 - 17:53 नवीन
..फार च चिंता करतात बुवा , चिंतामणी राव. ( "ओन्ली चिंता , नो मनी" वाला ) कुंदन. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कुंदन भौ- लेट लतीफ

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 18:05 नवीन
गवींचा "दुगाण्या नाही हो." या १५.४० च्या पोस्टला १५.४१ला प्रतीसाद दिलेला वाचलेला दिसत नाही. लगेचच १५.४१ला पडदा टाकला होता. पुन्हा एकदा कट्टयासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

शुभेच्छा!

सुनील
गुरुवार, 04/07/2011 - 15:37 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

स्पावड्या तु आणी हर्षद्...कुठ

स्पंदना
गुरुवार, 04/07/2011 - 15:48 नवीन
स्पावड्या तु आणी हर्षद्...कुठ फेडाल ही पाप? आम्ही नुसत गरीबा सारख बघत जिभल्या चाटायच्या. मरु दे...आम्ही धागा उघडला नाही...मेन्यु कार्ड वाचल नाही....धनगरी मटण चांगल असत अस गवी म्हणतात ..मला माहिती नाही.....
  • Log in or register to post comments

कशाला त्यांना फेडायला लावता

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 15:52 नवीन
कशाला त्यांना फेडायला लावता ... पापं ? तुम्ही पण जा की ? तुम्हाला बॅन नाही केलेलं त्यांनी :) तुम्ही एक शब्द तर टाका .. आमचा स्पा मोठा दिलदार माणुस .. तुमच्या प्रवासपाण्याची सोय पण करुन देइल तो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आमचा स्पा मोठा दिलदार माणुस

स्पा
गुरुवार, 04/07/2011 - 15:55 नवीन
आमचा स्पा मोठा दिलदार माणुस .. तुमच्या प्रवासपाण्याची सोय पण करुन देइल तो तेजायला टार्या, तो काय शेअर रिक्षाचा प्रवास आहे काबे , प्रवास खर्च करायला :D
  • Log in or register to post comments

तो काय शेअर रिक्षाचा प्रवास

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 18:19 नवीन
तो काय शेअर रिक्षाचा प्रवास आहे काबे , प्रवास खर्च करायला
मुंबैची मोठ्या दिलाची मान्सं अन त्यांची दिलं दिसली रे बाबा... (पुण्यात या आता..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

शनीवारी उपलब्ध असणार नाही हे

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/07/2011 - 16:31 नवीन
शनीवारी उपलब्ध असणार नाही हे आधीच स्पा ला सांगितले होते. त्यामुळे चालुद्या
  • Log in or register to post comments

तुमची

कुंदन
Fri, 04/08/2011 - 01:17 नवीन
तुमची अनुपलब्धता यापुढील काही महिने गृहित धरुन चालतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

पुरेपूर कोल्हापूर नमुना..

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 17:10 नवीन
जालावरुन साभार.. आत्ताच फोनवरुन कन्फर्म केल्याप्रमाणे ते दोन्ही (तांबडा आणि पांढरा) रस्से अमर्यादित आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments

परन्तु

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 17:20 नवीन
पोळी ऐवजी भाकरी असेल तर जास्त छान लागेल जेवण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा