<पेयनिष्ठ पेताडाचा कर्मदरिद्री बाटलीभंग>
प्रेरणा
बसे उकिडवा बाटली उघडून
चखणा खातो कर्रम कुर्रम
प्रचंडकुंथी वायूप्रदूषण
धडाम धुडूम्म धडाम धुडूम्म
शेव न चकली उडतो फन्ना
पेला भरीतो आणिक एक
आता जगाची सोडून चिंता
फाड फाडतो इंग्लिश भेदक
ग्लेन्मोरेन्जी यथेच्च ढोसून
निरर्थ काही बर बर बरळीत
शिग्रेट बीडी ओढून ओढून
वूक्खु विक्खी खोकत खोकत
खरडत खुरडत सावरि धोत्रा
त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा
बाथरूमचा कडाकोयंडा
जाईजाईस्तो घडे अभद्रा
आकाशातील सप्तढगावर
ह्याला फाट्यावर त्याला फाट्यावर
मग खंबा तो संपेस्तोवर
टांगा पलटी घोडे फरार
Disclaimer: मूळ कवितेप्रमाणे एकमेकांशी संबंध नसलेली कडवी लिहीण्याइतकी माझी दांडगी प्रतिभा नाही.
वा वा!
हा हा हा मस्त रे लंबु.
जियो
शेवटच्या कडव्यापर्यंत दारूचा
लंबिदिनी ...आपल
शिरसाष्टांग नमस्कार!
आजकाल येगळाच मूड
झकास परंतु तृटीही!
ह्म्म्म
अरे नाही सापडले तर बनवायचे.
लय भारी रे
ग्लेन्मोरेन्जी म्हन्जे काय
ग्लेन्मोरेन्जी हे मद्यान्नीला
लंब्या सही रे !!!!
मस्त रे लंब्या, मस्त चालु दे.
जम्तंय जम्तंय... अर्थपूर्ण
डिस्क्लेमर
मस्त रे... --टुकुल
छ्या हे फारच अर्थसंगत आहे.
कडक.
खत्रुड !
मस्त रे ..