Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by लंबूटांग on गुरुवार, 04/07/2011 - 20:03
प्रेरणा बसे उकिडवा बाटली उघडून चखणा खातो कर्रम कुर्रम प्रचंडकुंथी वायूप्रदूषण धडाम धुडूम्म धडाम धुडूम्म शेव न चकली उडतो फन्ना पेला भरीतो आणिक एक आता जगाची सोडून चिंता फाड फाडतो इंग्लिश भेदक ग्लेन्मोरेन्जी यथेच्च ढोसून निरर्थ काही बर बर बरळीत शिग्रेट बीडी ओढून ओढून वूक्खु विक्खी खोकत खोकत खरडत खुरडत सावरि धोत्रा त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा बाथरूमचा कडाकोयंडा जाईजाईस्तो घडे अभद्रा आकाशातील सप्तढगावर ह्याला फाट्यावर त्याला फाट्यावर मग खंबा तो संपेस्तोवर टांगा पलटी घोडे फरार Disclaimer: मूळ कवितेप्रमाणे एकमेकांशी संबंध नसलेली कडवी लिहीण्याइतकी माझी दांडगी प्रतिभा नाही.

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 04/07/2011 - 20:08

Permalink

वा वा!

यकदा टाकली आख्ख जग.. मधे जातं. असो (आता उरलो शास्त्रापुरता)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 04/07/2011 - 20:10

Permalink

हा हा हा मस्त रे लंबु.

हा हा हा मस्त रे लंबु.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदू on गुरुवार, 04/07/2011 - 20:13

Permalink

जियो

तैंच्या कवितेच्या विडंबनाचं शिवधनुष्य तुम्ही चांगलंच पेललंय. मिपा ला एक नविन विडंबनकार मिळाला तर! जियो....
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on गुरुवार, 04/07/2011 - 20:17

Permalink

शेवटच्या कडव्यापर्यंत दारूचा

शेवटच्या कडव्यापर्यंत दारूचा असर व्यवस्थित झालेला दिसत आहे! मान गये ग्रु! बौ वधिया! मूळ कवितेइतकीच जब्बर आहे!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 04/07/2011 - 20:18

Permalink

लंबिदिनी ...आपल

लंबिदिनी ...आपल हे...लंबुटांग.... ;) मस्त रे !! शेव न चकली उडतो फन्ना पेला भरीतो आणिक एक आता जगाची सोडून चिंता फाड फाडतो इंग्लिश भेदक >>> क्षमस्व , या कडव्यात आपल्या एका मित्रा ची आठवण कशी झाली नाही ?? घोडे फरार , हले डुले आणि ...बरेच काही असलेला
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 04/07/2011 - 20:28

Permalink

शिरसाष्टांग नमस्कार!

"लंबूटांग(णी) भयंकर", तुमची नवी कविता मूळ कवितेप्रमाणेच अद्भुत आहे! आता एका कडव्याचा दुसर्‍याशी संबंध नसलेली कविता कशी 'पाडावी' याचं पेश्शल ट्रेनिंग घ्या. म्हणजे आणखी काव्यालंकार तयार करता येतील!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 04/07/2011 - 20:32

Permalink

आजकाल येगळाच मूड

आजकाल येगळाच मूड दिसतोय! विडंबन जमले आहे. लवकरच विडंबनाचार्य पदवीप्रदान समारंभ करण्यात येइल. बाथरूमचा कडाकोयंडा या जागी बाथरूमचा तो कडीकोयंडा असे असले तर?
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 04/07/2011 - 20:43

Permalink

झकास परंतु तृटीही!

लंब्या, लेका बिघडलासच बघ आता. आता तुला ह्यावर काही इलाजच नाही. :D अवांतरः शरदिनीच्या कविता नीट पहा, पंचाक्षरी शब्दांचे नादमाधुर्य अभ्यासावेस असा माझा आपुलकीचा सल्ला. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on गुरुवार, 04/07/2011 - 22:32

In reply to झकास परंतु तृटीही! by धमाल मुलगा

Permalink

ह्म्म्म

शक्य तितका प्रयत्न केला पण इतके पंचाक्षरी शब्दच सापडेनात :P.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 04/08/2011 - 08:28

In reply to ह्म्म्म by लंबूटांग

Permalink

अरे नाही सापडले तर बनवायचे.

कडाडकडकड शब्द धरपकड!! चालुद्या! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on गुरुवार, 04/07/2011 - 20:45

Permalink

लय भारी रे

लय भारी रे
  • Log in or register to post comments

Submitted by छ्छुंदरसिंग on गुरुवार, 04/07/2011 - 21:01

Permalink

ग्लेन्मोरेन्जी म्हन्जे काय

ग्लेन्मोरेन्जी म्हन्जे काय रे,भाऊ? -छ्छु
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Fri, 04/08/2011 - 20:27

In reply to ग्लेन्मोरेन्जी म्हन्जे काय by छ्छुंदरसिंग

Permalink

ग्लेन्मोरेन्जी हे मद्यान्नीला

ग्लेन्मोरेन्जी हे मद्यान्नीला घ्यावयाचे एक तीर्थ आहे. एकाच प्रकारच्या धान्यापासून बनवलेले आणि प्रक्रिया करुन शुद्ध केलेले हे तीर्थ घेतल्यावर बर्‍याचजणांची मद्यानंदी टाळी (कॉरा: परा) लागते हा चक्षुचक्षुमेवसत्य: अनुभव आहे. काही लोक यासोबत अनेक प्रकारचा प्रसादही सेवन करतात हे विशेष!! अधिक माहीतीसाठी गणपा-नाटक्या या जगप्रसिद्ध जोडगोळीला भेटावे. ते सर्वांना शहाणे करुन सोडण्यात पटाईत आहेत. --असुर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 04/07/2011 - 21:06

Permalink

लंब्या सही रे !!!!

लंब्या सही रे !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 04/07/2011 - 22:40

Permalink

मस्त रे लंब्या, मस्त चालु दे.

मस्त रे लंब्या, मस्त चालु दे.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 04/08/2011 - 01:23

Permalink

जम्तंय जम्तंय... अर्थपूर्ण

जम्तंय जम्तंय... अर्थपूर्ण वाटल्याने थोडी नशा कमी झाली इतकेच...
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Fri, 04/08/2011 - 03:15

Permalink

डिस्क्लेमर

<<मूळ कवितेप्रमाणे एकमेकांशी संबंध नसलेली कडवी लिहीण्याइतकी माझी दांडगी प्रतिभा नाही.>> ही सुद्धा उत्तम जमली आहे. असाच प्रयत्न करत राहिलात तर मूळ कवितेएव्हढे उत्तम सुद्ध फाड्फाड लिहायला लागाल...... "खरडत खुरडत सावरि धोत्रा त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा बाथरूमचा कडाकोयंडा जाईजाईस्तो घडे अभद्रा" अनेक आठवणी जाग्या झाल्या.....असो........;)
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Fri, 04/08/2011 - 07:30

Permalink

मस्त रे... --टुकुल

मस्त रे... --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 04/08/2011 - 08:44

Permalink

छ्या हे फारच अर्थसंगत आहे.

छ्या हे फारच अर्थसंगत आहे. अर्थसंगतीतून विडंबन असेल तर गोष्ट वेगळी. त्यामुळे चान चान असे म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 04/08/2011 - 09:29

Permalink

कडक.

पहिल्या धारेचं विडंबन. अजून अनाकलनियता वाढविण्यासाठी मास्तरांचा (भडकमकर) क्लास लावा ही सूचना. ह्याला म्हणतात 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.' ( टार्‍याएवढी आमची नाहीये...प्रतिभा हो)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Fri, 04/08/2011 - 09:39

Permalink

खत्रुड !

खत्रुड !
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 04/08/2011 - 11:17

Permalink

मस्त रे ..

शेवटी ......... फॉककन् टाकुन मोकळा झालास तर :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5208 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com