Skip to main content

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत
Published on शनीवार, 02/04/2011
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

याद्या 58177
प्रतिक्रिया 417

प्रतिक्रिया

भारताचे २०० रण धोणी चे ५० आजच्या धाग्याला ३०० प्रतिक्रिया झाल्या.. आणि ते हि मुरलीच्या ओव्हर मधे इंडिया इंडिया

तुटुन पडली बॅट तरी..... नुसतं लढ म्हणा..... "इंडिया इंडिया"

मुरली च्या ओव्हर मधे १०० ची पार्ट्नरशिप....

In reply to by यशोधरा

विश्वकरंडकाच्या विजयात यशोधरा आणि सखीचा खूप वाटा आहे. वाटेल तेव्हा विकेटा घेतल्या आणि पाहिजे तेव्हा धावांच्या मोठ्या भागीदा-या केल्या. :) -दिलीप बिरुटे

५३ रन्स टू विन फ्रोम ५८ बोल्स

गंभिर गेला.. मुरली चा ओव्हर असता तर... असो.. कमऑन इडिया इडिया इडिया

In reply to by राजेश घासकडवी

फूटवर्क पाहिले तर अतिशय बेजवाबदार फटका मारतांना बाद झाला. गरजच नव्हती तसा ष्ट्रोक घ्यायची. पण आजच्या सामन्यात गंभीरचा वाटा खूप मोठा आहे. -दिलीप बिरुटे

गंभीर लय भारी काम करुन गेला पण. खूप वाईट वाटले :( आता तर खुन्नसमध्ये फक्त ४ आणि ६ मिळूदेत आपल्याला. आमेन.

कोल्हापुरी भाषेत --- एकदाच घुसणार , वर्ल्ड कप उचलणार ..... नाद करायचा नाय ....

शाब्बास धोणी.....लगे रहो. रन आउट होता होता वाचला.

युवराज जोशात आहे असं दिसतंय.आशा वाढली आहे.तो फ़टकेबाजी करुन लवकर संपवेल. Yuvraj always causes confusion in running bet wickets.

इंडिया जिंकला तर काय काय करणार ते सांगा ...म्ह्ण्जे फक्त नाचणार वग्रै नाही, जसं डॉक्टर सिद्धिविनायकाला जाणार, विकासदादा रजनीकांतच्या सिनेमाला जाणार तसं.. मी उद्या शेपूची भाजी खाणार

In reply to by पुष्करिणी

>>>>मी उद्या शेपूची भाजी खाणार, खूप खा. .:) वाचला बॉ युवी. च्यायला, टेन्शनचंच काम व्हायला लागलं आहे.

मी आत्ताच मॅच संपल्यावर जिंकलो की माझ्या देवीला ५ फुलवातींचा तुपाचा दिवा लावणार! नॉट आउट! हुश्श! गणपती बाप्पा मोरया!

आता लवकर जिंकलो पाहिजे लवकरात लवकर. मलिंगा समोर आहे युवी. -दिलीप बिरुटे

२४ चेंडू २७ धावा. विश्वकरंडकाला साजेसा असा अंतिम सामना होतोय. धोणी आणि युवीच विजयापर्यंत खेळले पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ नये फक्त. -दिलीप बिरुटे

१८ चेंडू १६ धावा. रोमांचकारी सामना. -दिलीप बिरुटे

धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड

ये!!! जिंकले!!!! हुर्रे!!!!! ........................................................................ लंका जाळली!!! येस्स!!

अरे जिंकलो रे जिंकलो!!!!!! ढिंगच्याक ढिंगच्याक ढिंगच्याक ढिंगच्याक........

अरे सचिन चे स्वःप्न साकार झाले ईतिहास झाला.... धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड

ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग ! ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग ! ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग ! ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग ! ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग ! ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग !

अद्भुतरम्य मॅच.अविस्मरणीय क्षण.शाळेत असताना कपिल,रवी यांना बघितले कप धरताना.त्याची थरारक आठवण. सर्वांचे खूप अभिनंदन.वी आर चॅंपियन्स ऑफ़ चॅंपियन्स..

In reply to by यशोधरा

आले, आले :) भज्जिच्या डोळ्यात आनंदाश्रु पाहुन आणि सचिनला सगळ्यांनी उचलुन फिरवल्यावर खरचं निशब्द व्हायला झाले....

१९८३ ची मॅच आठवली कपिल आणि टीमने कप आणला होता त्यानंतर २८ वर्षांनी दुसरा कप मिळाला अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार व्हायला मिळाले, सचिनवरचे टीमचे प्रेम बघून भरुन आले. डोळ्यात पाणी आले.

टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया ...................................................................................................................................................................................................................................................

अभिनंदन! (अवांतर - ती पूनम पांडे की कोण दिसली का कोणाला?)

In reply to by आळश्यांचा राजा

हाहाहाहाहा... तुमचं लक्ष तिकडं होतं तर... :)

In reply to by श्रावण मोडक

आयडी बदलुन "हिरवटांचा राजा" घ्यावा अशी सुचना करतो. ;)

In reply to by धमाल मुलगा

चारशे अकरा प्रतिक्रियांमध्ये ह्या प्रतिक्रियेला शोधून, आवर्जून, प्रतिसाद देऊन आपल्या हिरवटपणाचे सूचक प्रदर्शन केले आहेत आणि आपले बिंग फुटलेले आहे! हिरवटांच्या क्लबात दोघांही हिरवटांचे स्वागत आहे! आपल्या सूचनेचा नम्रतेने अंशतः स्वीकार करतो, आणि हिरवटांच्या 'राजा' ऐवजी 'प्रवक्ता' जास्त योग्य ठरेल असे नमूद करतो! (आमचे काही मित्र आम्हाला रसिकलाल असेही म्हणतात..:-) बाय द वे, काही बातमी मिळाली काय? ;-) (रसिकलाल)

अभिनंदन ... फटाके, डि जे, भारत माता कि जय, वंदे मातरम... जल्लोश ...जल्लोश चालु आहे आमचे कडे

सेहवाग आणि सचिनची विकेट गेल्यावर मी बघायचेच नाही असे ठरवले. पण गंभिरने आणि धोनीने फारच कमाल केली आज. एवढ्या प्रेशरखाली खेळणे सोपे नाही. अभिनंदन!!

मित्र हो, खूप मजा आली. आपल्या सर्वांसोबत क्रिकेट विश्वकरंडक सामन्याचा आनंद लुटतांना. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...! -दिलीप बिरुटे

आता मॉडेल पूजा पांडे निर्वस्त्र होणार का? ह्यावर कौल काढावा काय? दु:शासन कोण बनणार ह्यावर ही कौल काढावा.

मायला...काय टेन्शन म्हनायचं का काय वो! बुडाला बुडबुडा आला की पार. :) आमच्या गल्लीत तिच्यामारी, फुल्ल फटाक्यांचा रावण करुन पेटिवला की राव :) खंप्लिट दसराच साजरा होतोय राव. भज्जी रडला अन सच्याला खांद्यावरुन मिरिवला त्ये बगुन च्यायला आपुनबी रड्लो राव. :) नाऽऽदखुळा म्याच खेळ्ळे गड्याहो... शेवटच्या पाच ओव्हरा तर आमचा खंप्लीट लाकूडबाबाच झालेला... झक्कास..झक्कास!! पश्या, लेका यवडा भारी धागा सुरु क्येलासा त्याच्याबद्दल आमी तुझं थ्यांकुमधी धन्यवाद रं :)

In reply to by धमाल मुलगा

मस्त प्रतिसाद आणि प्रत्येक शब्दाशब्दाला सहमत! मिपा दोन दिवस चालु होत नव्हते, इथे पहाटेपासुन मॅच बघत होते, पण मिपाकरांशी संवाद नव्हता तेव्हा खूप चुकल्यासारख वाटत होतं पण नंतर लगेच झालं चालु आणि जीव भांड्यात पडला :) त्यामुळे मिपाचे धन्यवाद.

भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन! (आणि हा ४०० वा प्रतिसाद.)

भारतियांचे मुख्यतः सचिनचे स्वप्न साकार झाले.. धोनी टिम ला यश मिळाले याचे आपण सर्व याचे साक्षीदार आहोतच विक्रम म्हणजे - यजमान देश प्रथमच जिंकला - आपल्या सगळ्यांसोबत सामन्याचा आनंद लुटला... आणि एका छोट्याशा धाग्याला ४०० + प्रतिक्रिया मिळाल्यात (९ तासात) .... हा हि विक्रमच झाला. अभिनंदन ..... आणि धन्यावाद पुन्हा एकदा इंडिया इंडिया.....

जिंकलो आपण... खुप हसायचंय, खुप रडायचंय.. जल्लोष करायचाय, दारु पिऊन मित्रांसोबत धिंगाणा करायचाय, रस्त्यांवर नाचायचंय, अनोळखी लोकांसोबतही विक्टरी लॅप घ्यायचीय, शिव्या घालायच्याहेत, येडा-खुळा व्हायचंय... इकडे मला शक्य नाहीये, पण तुम्ही करा राजेहो... सच्याबद्दल टिमचं प्रेम पाहुन गहीवरलोय.. धोनीचा निर्धार आणि "कॅप्टन्स इनिंग" पाहुन, त्याचा तो विजयी सिक्स पाहून धन्य झालोय... जल्लोष करा... आज जश्न की रात है, मदहोशी की रात है..

In reply to by चिगो

फक्त एकाच सामन्यामधे खेळला पण ईतिहास घडवला... धोनीची "कॅप्टन्स इनिंग" आणि शेवटचा ६... क्रिकेट म्हटले कि नेहमी डोळ्यासमोर राहिल झहिर ने चांगली सुरुवात करुन ५ ओव्हर मधे ६ रण दिलेत.. नंतर त्याने ... लागोपाठ युवि आणि हरभजन यांनी चांगली साथ दिली. फिल्डिंग मस्त.. सचिन गेल्यानंतर गंभिर चे जबाबदारी स्विकारत ९७ धावा काढल्या.. शेवटि धोनी ने युवि सोबत खेळत ७९ बॉल मधे ९१ धावा काढून ईतिहास घडवला..

सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं!) पेहेले हराया गोरोंको (ऑस्ट्रेलिया) फिर हराया हरामखोरोंको (पाकिस्तान) आज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका) जय श्रीराम, जय हिंदुस्तान

लंकादहन झाले............. भारत झिंदाबाद.... सचिन ला मानाचा मुजरा!!!!!!!!! धोनी ला मानाचा मुजरा!!!!!!!!!

काल इथे अशक्य राडा झाला ...प्रत्येक छोटुकल्या गावात सुद्धा मिरवणुका ....गणपती ड्यांस . दिवाळी, चतुर्थी, सगळ मागे पाडुन सेलिब्रेशन करण्यात आल ...ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक

शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य होत्या. भयानक तणाव... छातीत धडधड... शेवटी सिक्स मारली एकदाची ढाण्या वाघाने... त्यावेळी फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर... आईच्यान, एकाग्रतेचा वस्तुपाठ होता तो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळाच दिसत होता तशी ती नजर. रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच. आणि त्यानंतरचा तो रस्त्यांवरचा धिंगाणा. बेहोष!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर. खरंय...! धोणीने, षटकार मारल्यानंतर चेंडूकडे एकटक लावून पाहतांना डोळ्यात भरलेला आत्मविश्वास की आणखी काय सांगता येणार नाही. पण कुछ हटकेच नजर होती ती. >>>>रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच. आयुष्यभर स्मरणात राहील असाच सामना. काल सामना पाहिला. आज दुपारीही विविध वाहिन्यांवर बातम्यांमधून पुन्हा पुन्हा ते क्षण पाहतांना आत्ताही आनंद कमी होत नाही, झालेला नाही. कितीतरी प्रसंग वर प्रतिसादात ज्यांचा उल्लेख आलाच आहे. वानखेडेच्या ग्राउंडवर सच्याला खेळाडूंनी खांद्यावर बसवून मिरवले तो क्षण डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असाच होता. सच्याचं आणि आपलंही एक भारतीय क्रिडा रसिक म्हणून क्रिकेटविश्वचषकाचं स्वप्न ''याचि देहि याचि डोळा'' साकारतांना झालेल्या आनंदावर किती बोलावं आणि किती बोलू नये असं झालं आहे. -दिलीप बिरुटे [विश्वचषकाच्या आनंदाने भारावलेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय...! धोणीने, षटकार मारल्यानंतर चेंडूकडे एकटक लावून पाहतांना डोळ्यात भरलेला आत्मविश्वास की आणखी काय सांगता येणार नाही. पण कुछ हटकेच नजर होती ती. भें** हे घ्या. माझ्यावर टीका करत होता काय? हेच हवे होते आणि माहिती होते हे घडणार आहे. सालं सगळ्या अपयशांच्या *** ** असे काहीसे भाव होते त्याच्या चेहेर्‍यावर. प्रचंड तणाव दूर झाला आहे हे बघुन सोडलेला निश्वासही होता त्याच्यात.