Skip to main content

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 02/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58512
प्रतिक्रिया 417

प्रतिक्रिया

In reply to by चतुरंग

हेच म्हणतो... २०० पर्यंत हिच जोडी टिकावी! (कुणीतरी आमेन म्हणा लवकर!)

In reply to by अरुण मनोहर

त्याने त्याची खेळी राखूण ठेवली होती अंतिम सामन्याकरता! ;)

भारताचे २०० रण धोणी चे ५० आजच्या धाग्याला ३०० प्रतिक्रिया झाल्या.. आणि ते हि मुरलीच्या ओव्हर मधे इंडिया इंडिया

In reply to by यशोधरा

विश्वकरंडकाच्या विजयात यशोधरा आणि सखीचा खूप वाटा आहे. वाटेल तेव्हा विकेटा घेतल्या आणि पाहिजे तेव्हा धावांच्या मोठ्या भागीदा-या केल्या. :) -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

बॅकपेन पण आहे! पण खेळतो आहे चांगला. खेळू देत... एक-दोन चौकार पाहिजे आता!

In reply to by गवि

धोनी खूपच थकलाय खरा. बाबा थोडी कळ काढ रे.....! माय गॉड. विकेट गेली. गंभीरची. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्टँडींग ओवेशन दिली त्याला सगळ्यांनी. १०० व्हायला हवे होते त्याचे.

In reply to by गवि

तेच लिहणार होते, फारच दमल्यासारखा वाटतोय. IND 223/3 (41.1 Ovs) Gautam Gambhir* 97 (121) MS Dhoni 60 (61) अरेरे गंभीर गेला :(

गंभिर गेला.. मुरली चा ओव्हर असता तर... असो.. कमऑन इडिया इडिया इडिया

In reply to by राजेश घासकडवी

फूटवर्क पाहिले तर अतिशय बेजवाबदार फटका मारतांना बाद झाला. गरजच नव्हती तसा ष्ट्रोक घ्यायची. पण आजच्या सामन्यात गंभीरचा वाटा खूप मोठा आहे. -दिलीप बिरुटे

गंभीर लय भारी काम करुन गेला पण. खूप वाईट वाटले :( आता तर खुन्नसमध्ये फक्त ४ आणि ६ मिळूदेत आपल्याला. आमेन.

कोल्हापुरी भाषेत --- एकदाच घुसणार , वर्ल्ड कप उचलणार ..... नाद करायचा नाय ....

In reply to by पुष्करिणी

यशो, सखी.... श्लोक म्हणायला लागा...! अगदी कट टू कट चाल्लंय और ये लगा सिक्सर!! धोनी रॉक्स!!!

इंडिया जिंकला तर काय काय करणार ते सांगा ...म्ह्ण्जे फक्त नाचणार वग्रै नाही, जसं डॉक्टर सिद्धिविनायकाला जाणार, विकासदादा रजनीकांतच्या सिनेमाला जाणार तसं.. मी उद्या शेपूची भाजी खाणार

In reply to by पुष्करिणी

>>>>मी उद्या शेपूची भाजी खाणार, खूप खा. .:) वाचला बॉ युवी. च्यायला, टेन्शनचंच काम व्हायला लागलं आहे.

मी आत्ताच मॅच संपल्यावर जिंकलो की माझ्या देवीला ५ फुलवातींचा तुपाचा दिवा लावणार! नॉट आउट! हुश्श! गणपती बाप्पा मोरया!

आता लवकर जिंकलो पाहिजे लवकरात लवकर. मलिंगा समोर आहे युवी. -दिलीप बिरुटे

२४ चेंडू २७ धावा. विश्वकरंडकाला साजेसा असा अंतिम सामना होतोय. धोणी आणि युवीच विजयापर्यंत खेळले पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ नये फक्त. -दिलीप बिरुटे