१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला. ज्या भाषेत पाण्याला देखील "जीवन" ह्या सार्थ शब्दाने संबोधले जाते, तेथे पाण्याचे महत्व नव्याने सांगायची गरज नसावी...
ह्या दिवसाच्या निमित्ताने जगभर स्वच्छ पाण्याची आठवण ठेवण्याचा आणि त्या निमित्ताने जागृती करायचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या दिनानिमित्त एक पाणीसमस्येवरून विषय ठरवला जातो आणि त्यावर जगभर कार्यक्रम होतात. या वर्षीचा विषय हा "Water for the Cities: Responding to the Urban Challenge" असा आहे. उपलब्ध असलेल्या जागतिक विदाप्रमाणे २००८ सालपासून ५०% हून अधिक जग आता अधिकृतपणे शहरात रहाते. अथवा याच्याच उलट म्हणायचे तर मानवी जगाचे ५०% शहरीकरण झाले आहे आणि २०५० सालापर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या ६९% जनता ही शहरी भागात रहाणार आहे. आजच्या घडीला, जगभरातील जवळ्पास नव्वद कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळत नाही. लाखो लोकं दरवर्षी दुषित पाण्याचे अथवा प्रदुषित सांडपाण्याचे बळी होतात. असे म्हणले जाते की एखाद्या युद्धापेक्षा, पाणी आणि सांडपाणी यांच्यामुळे दरवर्षी बळी जातात.
भारताच्या संदर्भात ताजे पाणी हे तुलनात्मकरीत्या किती आहे हे खालील नकाशावरून समजू शकेलः (संदर्भः www.undp.org)
थोडक्यात पाण्याचे पूर्ण दुर्भिक्ष नसले तरी अफ्रिकासोडल्यास इतर बहुतांशी प्रगत आणि विकसनशील राष्ट्रांपेक्षा आपल्याकडे पाणी कमी आहे. हे पाणी देखील ताजे आहे याचा अर्थ पिण्यायुक्त आहे असा नाही तर केवळ ते समुद्रातले नसून नद्या-तलाव, भूगर्भातील आणि साठवलेले पाणी आहे.
आज भारतात साधारण ८४% जनतेस पिण्यायुक्त पाणी मिळते असा अंदाज आहे. तरी देखील २१% रोगराई ही पाण्यामुळे वाढते असा देखील अंदाज आहे. शहरीकरणाचा विचार केल्यास अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत जिथे घरोघरी मोबाईलफोन्स आहेत पण प्यायला अथवा रोजच्या वापराकरता पाणी नाही अथवा सांडपाण्याची व्यवस्था नाही. या संदर्भात अजून बरेच काही लिहीता येईल. कमी लेखायचा तर त्याहूनही नाही. फक्त एक नागरीक म्हणून आपण काय करू शकतो याचा मात्र नक्की विचार करावासा वाटतो.
या निमित्ताने तीनएक वर्षांपुर्वी न्युयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये एक प्रदर्शन भरले होते त्यातील काही पोस्टर्सचे फोटो खाली देत आहे:
खालील पैकी प्रत्येक गोष्ट तयार करण्यासाठी किती पाणी लागते?
- घराभोवती पाणी झिरपण्यासाठी जागा (सगळेच काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण करायचे नाही).
- कचरा रस्त्यावर जाणार नाही याची काळजी घेणे.
- बागेसाठी पाण्याचा मर्यादीत उपयोग
- गाडी धुण्यासाठी आणि घरातील जमिनी धुण्यासाठी देखील कमीत कमी उपयोग.
- झाडे लावणे / वाढवणे
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
19128
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम लेख!! समायोचित. आणि
विचारकरायला लावणारा लेख
पाण्याची समस्या दिवसेंदिवस
शहरी भाग सोडून मुबलक पाणी?
In reply to पाण्याची समस्या दिवसेंदिवस by अनामिक
मला शहरी भाग सोडून म्हणजे
In reply to शहरी भाग सोडून मुबलक पाणी? by राही
बरोबर आहे
In reply to मला शहरी भाग सोडून म्हणजे by अनामिक
चक्क ८ दिवसाला एकदा पाणी येते
In reply to बरोबर आहे by किशोरअहिरे
उत्तम लेख... शॉवरचा
अतिशय उत्तम लेख. बाकी....
उत्तम समयोचित लेख!
उत्तम लेख...मी स्वतः पाणी अन
पाण्याला मीटर बसवणे.
मनोबा आपण सांगितलेला हा उपाय
In reply to पाण्याला मीटर बसवणे. by मन१
अरे व्वा!
In reply to मनोबा आपण सांगितलेला हा उपाय by मी ऋचा
@ मी ॠचा...
In reply to मनोबा आपण सांगितलेला हा उपाय by मी ऋचा
>>आपण म्हणता ते बरोबरच आहे.
In reply to @ मी ॠचा... by प्रसन्न केसकर
समयोचित लेख! दरवर्षी असे लेख
(एका मिनिटात आंघोळ करणे,
In reply to समयोचित लेख! दरवर्षी असे लेख by नगरीनिरंजन
ओ थांबा नगरी. माझ्या इतक
In reply to समयोचित लेख! दरवर्षी असे लेख by नगरीनिरंजन
काही प्रश्न
पाणी शुद्ध करण्यासाठी इंधन
In reply to काही प्रश्न by सहज
तुमने समस्या बदल डाली.
In reply to पाणी शुद्ध करण्यासाठी इंधन by ३_१४ विक्षिप्त अदिती
जिओ थर्मल एनर्जी(मराठी??)
In reply to तुमने समस्या बदल डाली. by सहज
धन्यु
In reply to जिओ थर्मल एनर्जी(मराठी??) by वपाडाव
सहज नी सहज टाकलेला प्रश्न
In reply to काही प्रश्न by सहज
उत्तम
आपण जे अन्न खातो त्याला किती पाणी लागते.
महत्वाच्या विषयावर अभ्यासपुर्ण लेखन...
सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे
स्पावड्या... अगदी हेच आमच्या
In reply to सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे by स्पा
हे आधिच बंधनकारक केलेलं आहे.
In reply to स्पावड्या... अगदी हेच आमच्या by वपाडाव
+१
विचार करायला लावणारा लेख आहे.
वॉटरलेस पब्लीक युरिनल्स...
भारतात पब्लीक युरिनल्स हिच एक
In reply to वॉटरलेस पब्लीक युरिनल्स... by प्रसन्न केसकर
पब्लीक युरिनल्स कमी असतील....
In reply to भारतात पब्लीक युरिनल्स हिच एक by अनामिक
अधिक माहिती या ठीकाणी...
In reply to पब्लीक युरिनल्स कमी असतील.... by प्रसन्न केसकर
लेख आवडला असला तरी तुम्ही
माझ्या अनुभवाने हॅण्ड हेल्ड
अस्मादिकांच्या अनुभवातुन
In reply to माझ्या अनुभवाने हॅण्ड हेल्ड by नितिन थत्ते
धन्यवाद
उत्तम परामर्श विकास
In reply to धन्यवाद by विकास
आम्ही रहात असलेल्या आधीच्या
In reply to उत्तम परामर्श विकास by अनामिक
लेख
मुसु रावांशी सहमत. उत्तम लेख
In reply to लेख by मुक्तसुनीत
विकासदादा, मी चेष्टा करत
उत्तम लेख. अजून भारतातील
उपाय
In reply to उत्तम लेख. अजून भारतातील by पुष्करिणी
च्यायला माझ्या हापिसात
मला सुद्धा असेच वाटते की
In reply to च्यायला माझ्या हापिसात by पिंगू
वापर ओळखा
In reply to मला सुद्धा असेच वाटते की by वपाडाव
पण सवय झालीए आता. अभिनंदन!
In reply to मला सुद्धा असेच वाटते की by वपाडाव