Skip to main content

टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 22/03/2011 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे?? मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे?? सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!! एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!! - प्राजु *काल एक फोन आला.. "प्राजु तू कविता लिहिणे बंद केले आहेस की काय?".. म्हणून मग म्हंटलं मारावीच एक कविता मिपाकरांच्या माथी. :) *
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6416
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!! छान! 'मरण आले छानसे ' हे खूपच आवडले!

गजल म्हणून छान आहे, पण काय हे प्राजु? यह कैसी उदासी? बाकी, सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे हे मिपावर फीट्ट आहे!

In reply to by अरुण मनोहर

छे हो!! कसली उदासी आणि काय!! हे असच... ओळ सुचली मग लिहिलं! :) धन्यवाद.

मस्त! मस्त!! मस्त!!! खुप आवडली ही गजल. त्यातल्या त्यात:
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!
हे तर खासच!!

कविता छानच आहे !! सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे हे विशेष आवडले.

प्रत्येक शेर आवडला .. एकदम मस्त लिखान सांज होता, दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज, तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी, 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! खुप आवडले

मस्तच! बाकी तुमच्या कविता पण सरळ वाचायच्या का मर्ढेकरांच्या कवितांसारख्या? ;)

छान आहे गजल. तुझ्या पुढच्या पुस्तकात ही समाविष्ट करावीस इतकी चांगली झालिये. पूर्वीचा नवखेपणा आता अजिबात जाणवत नाही. माझ्या म्हणण्याकडे तू सकारत्मकतेने पाहशील अशी आशा.;) रागावलीस तर तूला टाळण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नाही गो!

"भोगले जे दुख्ख" ची आठवण झाली, आपल्या पुढच्या अल्बम मध्ये येऊ द्या काही गझला

मस्त
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!
जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी | मौत मेहेबूबा है, अपने साथ लेकर जाएगी |

सर्वच शेर एकदम जबरा आहेत. सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? अहाहा. और भी आने दो. -दिलीप बिरुटे

सुरेख रचना ! सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!

सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे?? 'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने?? मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!! अफाट शेर! गझल आवडली.

गझल, सार्‍याच द्विपदी आवडल्या. मात्र खालील शेर फार सुरेख -
सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??