टाळती मजला अताशा हाय! माझी माणसे
हासती का पाहुनी मज रोजला हे आरसे??
मैफ़िलीना मी सजवले प्राण माझे ओतुनी
पण तरीही का कुणीही फ़िरकले ना फ़ारसे??
सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
फ़क्त त्यांनी हुंदक्यांचे माझिया केले हसे
सांज होता दूर जाती सावल्या पायातल्या
टाळण्या मज तेवणारा दीपही का विझतसे??
'भीड आता बाळगावी तू कशाला, वेदने??
मी 'सखी' हे नाव तुजला देत केले बारसे!!
पेटवूनीया चितेला सर्व आता पांगले
सोबतीला राख आणी राहिले बस्स कोळसे!!
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले कधी
मन रमवण्या शेवटाला, मरण आले छानसे!!
- प्राजु
*काल एक फोन आला.. "प्राजु तू कविता लिहिणे बंद केले आहेस की काय?".. म्हणून मग म्हंटलं मारावीच एक कविता मिपाकरांच्या माथी. :) *
काव्यरस
वाचने
6387
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त ग तै!!!
एकले आयुष्य गेले, ना कुणी आले
गजल म्हणून छान आहे, पण काय हे
छे हो!! कसली उदासी आणि काय!!
In reply to गजल म्हणून छान आहे, पण काय हे by अरुण मनोहर
रचना आवडली !!
मस्त कविता प्राजु ताई....
सुंदर
मस्त !!!
मस्त! मस्त!! मस्त!!! खुप
मस्त
आवडली.
छान !!
प्रत्येक शेर आवडला .. एकदम
छान..
मस्त मस्त मस्त !
मस्त कविता ग प्राजुताई! छान
छान!
अप साईड डाऊन करून वाचा..
In reply to छान! by विकास
धन्यवाद!
In reply to अप साईड डाऊन करून वाचा.. by प्राजु
एकटेपणाची राख झाली
छान आहे गजल. तुझ्या पुढच्या
कळलं हो बाई!!
In reply to छान आहे गजल. तुझ्या पुढच्या by रेवती
फारच छान
मस्त एकले आयुष्य गेले, ना
स्सही रे स्सही.
सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले?
हेच म्हणतो
In reply to सांगुनी माझी व्यथा मी काय येथे मिळवले? by मीली
+२
In reply to हेच म्हणतो by धनंजय
सुरेख जमली आहे गजल, प्राजू.
सर्व वाचकांचे आणि प्रतिसाद
ह्म्म... छान. ए जरा B +ve
वा! 'मरण आले छानसे' मस्तच!
प्राजु काय लिहितेस!
गझल आवडली प्राजुताई, जरा
मस्त रचना, आवडली
समर्थ कविता
छान
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून
मस्त ग प्राजु ताइ
खुपच सुन्दर ओळीका (मला शेर
गझल मस्त!
धन्यवाद.