नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - २
नेहमीसारखेच - ३
नेहमीसारखेच - ४
नेहमीसारखेच - ५
नेहमीसारखेच - ६
सहज नजर उंचावून नभाकडे पहिले...
अगदी नेहमीसारखेच...
सारे कसे अगदी स्वच्छ, निरभ्र अन् शांत...
अगदी नेहमीसारखेच....
कसा थांगपत्ता लागावा गं....
क्षितीजास टेकलेल्या नजरेतून सुटलेला...
उत्कट श्वासांची उब असलेला...
एक चुकार अश्रू अवचित निसटला....
अन् जीवाला घोर लावून गेला...
कसा उमजावा हा खेळ गं....
मग मी ही जरा चाचपडायाला लागलो...
डोळे, नजर अन् श्वास सगळे काही तपासून झाले...
काही कळेना... सारे काही जगाच्या जागी...
अचानक ध्यानी आले माझ्या...
मन तपासायचे राहिले....
पहिले तर चुकून एक कप्पा उघडला गेला होता....
.......
............
तुझ्या आठवणींचा...... नेहमीसारखेच....
हं...अगदी नेहमीसारखेच....
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६/०३/२०११)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1938
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहज नजर उंचावून स्क्रीनकडे
मिसाल्ल्लेला काव्यप्रेमी -
नेहमीसारखीच छान
तुफ्फान... क्षितीजास
नेहमीसारखेच ...